'त्यांच्या बुडाला…', शिंदे-राज भेटीने उद्धव ठाकरेंचा जळफळाट? प्रश्नावर राऊत चिडून म्हणाले, 'ते मूर्ख..'

'त्यांच्या बुडाला…', शिंदे-राज भेटीने उद्धव ठाकरेंचा जळफळाट? प्रश्नावर राऊत चिडून म्हणाले, 'ते मूर्ख..'


Sanjay Raut On Raj Thackeray Meeting Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीवरुन वेगवेगळ्या शक्यता बोलून दाखवल्या जात असतानाच या भेटीमुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा जळफळाट झाल्याची टीका शिंदेंच्या नेत्यांकडून केली जात आहे. या टीकेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये उत्तर दिलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

शिंदे-राज भेटीसंदर्भात ठाकरेंशी काही बोलणं झालं का?

राज ठाकरेंनी शिंदेची भेट घेतली. या भेटीसंदर्भात तुमचं उद्धव ठाकरेंशी काही बोलणं झालं का? असा सवाल राऊत यांना विचारला. या प्रश्नावर राऊत यांनी थोड्याश्या चिडलेल्या स्वरातच, “बरं झालं असेल तर मी इथं कशाला सांगू? माझं बोलणं झालं असेल तर मी इथे का सांगू? मी कॅमेरावर का सांगू? हा आमचा अंतर्गत विषय आहे. कोणी कोणाला भेटावं हा अंतर्गत विषय आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे शत्रू आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाहांच्या मदीतने चोरली. म्हणून ते महाराष्ट्राचे किंवा शिवसेनेचे प्रमुख होऊ शकत नाही. हा खटला न्यायप्रविष्ठ असून आम्ही तो जिंकू,” असं उत्तर दिलं.

आम्ही ते भांडण टोकाला नेऊ

पुढे बोलताना, “एकनाथ शिंदे आमचं भांडण आहे आणि राहील. ते भांडणं व्यक्तिगत नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं, हिताचं, नैतिकतेचं आहे. हे भांडण आम्ही टोकाला नेऊ. याउपर मी काही बोलायचं नाही. असं सांगूनही तुम्ही वारंवार हा प्रश्न विचारताय,” असं म्हणत राऊत पत्रकारांवरच चिडले.

मूर्ख लोक म्हणत राऊतांचा टोला

मैत्री अशी आहे की समोरच्याचा जळफळाट व्हावा, असं उदय सामंतांचं स्टेटमेंट आहे, असं म्हणत पत्रकाराने प्रश्न विचारला. यावर संजय राऊतांनी, “कोण जळलं? त्यांचा रोख कोणावर असेल? त्यावर आमच्या पक्षाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे का? कोणी काही बोललं का? ते स्वत: जळत आहेत. त्यांच्या बुडाला आग लागली आहे. या विषयावर त्यांनी चर्चा करु नये. ते मूर्ख लोक आहेत,” असं म्हणत प्रश्न उडवून लावला. 

राज्यसभेसंदर्भात राऊत काय म्हणाले?

राज्यसभेसाठी कोणाला उमेदवारी दिली जाणार याबद्दल महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करुन निर्णय घेतील असं राऊतांनी म्हटलं आहे. शरद पवार या जागेसाठी उत्सुक असले तरी तिन्ही पक्ष एकत्र बसूनच यासंदर्भात अंतिम निर्णय घेतली असं राऊतांनी पत्रकारांना सांगितलं.





Source link

अजित पवार विमान अपघाताच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी! 28 तारखेपूर्वी 'ही' माहिती मिळणार

अजित पवार विमान अपघाताच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी! 28 तारखेपूर्वी 'ही' माहिती मिळणार


राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला आता वेग आला असून, या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल 28 फेब्रुवारीपूर्वी सादर होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, कोणत्याही विमान अपघाताचा चौकशी अहवाल महिनाभरात सादर करणे बंधनकारक असते, त्या दृष्टीने तपास यंत्रणांनी आपली कार्यवाही पूर्ण केली आहे. डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधून मिळणार महत्त्वाचे पुरावे. तपास पथकाने विमानाच्या डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर (DFDR) मधील माहिती यशस्वीरीत्या डाऊनलोड केली आहे. या डेटाच्या विश्लेषणामुळे अपघाताच्या वेळी नेमकी काय स्थिती होती, हे स्पष्ट होणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

अहवालात नेमके कोणते मुद्दे स्पष्ट होणार?

दृश्यमानता (Visibility): लँडिंगच्या वेळी हवामान कसे होते आणि वैमानिकाला धावपट्टी स्पष्ट दिसत होती का?
विमानाची उंची (Altitude): विमान कोसळण्यापूर्वी आणि अपघाताच्या नेमक्या क्षणी ते किती उंचीवर उडत होते?
तांत्रिक स्थिती: विमानाची गती आणि इंजिनची स्थिती कशी होती?

कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरला (CVR) उष्णतेची झळ

तपासादरम्यान एक अडथळा समोर आला असून, विमानाच्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरला (CVR) आगीमुळे किंवा तीव्र उष्णतेमुळे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सीव्हीआरमध्ये वैमानिकांच्या संभाषणाची नोंद असते. आता तांत्रिक तज्ज्ञ यातून काही माहिती पुनर्प्राप्त (Recover) करता येईल का, याचा प्रयत्न करत आहेत.

महिनाभरात अहवाल येणे अपेक्षित

विमान अपघाताच्या चौकशीसाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, घटनेच्या ३० दिवसांच्या आत प्राथमिक माहिती समोर येणे आवश्यक असते. या अपघाताला आता काही दिवस उलटले असून, २८ फेब्रुवारीपर्यंत चौकशी समिती आपला पहिला अधिकृत अहवाल सरकारला सादर करेल. या अहवालामुळे अजित पवारांच्या विमानाला झालेला अपघात हा तांत्रिक बिघाडामुळे होता की मानवी चुकीमुळे, यावरील पडदा उठण्याची शक्यता आहे.

 जय पवार यांची भूमिका

अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी 18 फेब्रुवारी 2026 रोजी सोशल मीडियाच्या (इन्स्टाग्राम स्टोरी) माध्यमातून प्रथमच आपली भूमिका मांडली आहे. ब्लॅक बॉक्सबाबत शंका वर्तवण्यात आली आहे विमाचा ‘ब्लॅक बॉक्स’ (Black Box) विमान अपघातात इतक्या सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पारदर्शक तपासाची मागणी जय पवार यांनी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेला या भीषण दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच VSR व्हेंचर्सवर कारवाईची मागणी केली आहे. ज्या कंपनीचे (VSR Ventures) हे विमान होते, त्या कंपनीच्या उड्डाणांवर तात्काळ बंदी घालण्याची आणि त्यांच्या विमानांच्या देखभालीतील संभाव्य गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

रोहित पवारांचे आरोप 

रोहित पवार यांनी या अपघाताबाबत सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. घातपाताची शंका व्यक्त केली आहे.  हा केवळ अपघात नसून वैमानिकाचा वापर करून घडवून आणलेला ‘घातपात’ असू शकतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. तपासातील दिरंगाई: अपघाताला २० दिवस उलटूनही प्राथमिक अहवाल का आला नाही? असा सवाल त्यांनी केला असून तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप केला आहे. विमानाचा मॉडेल नंबर चुकीचा नोंदवणे, वैमानिकाची शेवटच्या क्षणी झालेली बदललेली नियुक्ती आणि विमानातील अतिरिक्त इंधन यांसारखे मुद्दे त्यांनी समोर आणले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आंतरराष्ट्रीय एजन्सी आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी व पवार कुटुंबातील सदस्य यांचा समावेश असलेली समिती स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 





Source link

'…घाई करु नका', ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र; यासंदर्भात केलं सावध

'…घाई करु नका', ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र; यासंदर्भात केलं सावध


Milind Narvekar Letter to Devendra Fadnavis: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’च्या उद्घाटनापूर्वी मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार असल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं असलं तरी, सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारला सावध केले आहे.  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प एप्रिल 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

बोर घाटातील खोल दरी आणि हवेचा प्रचंड दाब लक्षात घेता, सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्याशिवाय घाईघाईत हा मार्ग सुरू करू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.  तसंच, सुरुवातीचे 6 महिने प्रायोगिक तत्त्वावर केवळ प्रवासी वाहनेच या मार्गावरून सोडावीत आणि भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जड वाहनं तसंच ज्वलनशील पदार्थ नेणाऱ्या टँकर्सना या मार्गावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही नार्वेकर यांनी केली आहे.

नार्वेकर यांची ही मागणी फेब्रुवारी 2026 च्या पहिल्या आठवड्यात खंडाळा घाटात झालेल्या भीषण टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर करण्यात  आली आहे. त्या अपघातात प्रोपिलिन गॅसची गळती झाल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग तब्बल 32 तास ठप्प झाला होता आणि हजारो प्रवासी अडकून पडले होते. 

अशा आपत्कालीन स्थितीत प्रभावी मदतीसाठी त्यांनी यापूर्वीच अटल सेतूवर (MTHL) हेलिपॅड आणि आपत्कालीन यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटनांच्या वेळी तातडीने बचाव कार्य करणे शक्य होईल.

पत्रात काय लिहिलं आहे?

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक प्रकल्प या राज्याच्या महत्वाकांक्षी व जागतिक दर्जाच्या प्रकल्पाचे काम त्वरेने प्रगतीत आहे. सदरहू प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होऊन अपघातात घट होणार आहे. त्यामुळे बोर घाटातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका होणार आहे. सदरहू प्रकल्प एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होऊन वाहतुकीस खुला होणार असल्याचे समजते याबाबत सर्वप्रथम आपले मनापासून अभिनंदन.

तसंच या अनुषंगाने सार्वजनिक उपक्रम समिती सदस्य म्हणून मी विनंती करतो की, सदर प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याने व बोर घाटातील खोल दरीत मोठ्या प्रमाणात हवेचा दाब असून व पावसाच्या व धुक्याचे गडद क्षेत्र असल्याने सदर प्रकल्पातील सर्व तांत्रिक चाचण्या व अनुषंगिक कामे पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक सुरु होण्याची घाई करण्यात येऊ नये. तशा सूचना आपल्या स्तरावरुन संबंधितांस देणेबाबत विनंती आहे. 

तसेच सद्यस्थइतीत मुंबई – पुणे द्रूतगती मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली असून मोट्या प्रमाणात दळणवळण होणाऱ्या अवजड वाहनांमुळे घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या अनुषंगाने एक सूचनावजा विनंती आहे की, सदर प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रायोगिक स्तरावर किमान 6 महिने फक्त प्रवासी वाहने या मार्गाने सोडण्यात यावीत व अवजड वाहने सोडण्यात येऊ नये. तसंच कोणत्याही प्रकारची इंधने/ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारी वाहने या मार्गावर कधीही सोडण्यात येऊ नये म्हणून भविष्यात कोणतीही दुर्घटना होणार नाही. 





Source link

'मी मर्जीने … ' भिगवन तरुणी अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, गोपीचंद पडळकरांची भूमिका मात्र…

'मी मर्जीने … ' भिगवन तरुणी अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, गोपीचंद पडळकरांची भूमिका मात्र…



Bhigwan Kidnapping Case : 21 वर्षीय तरुणीचं लग्नापूर्वी अपहरण करण्यात आलं होतं. ही घटना इंदापूर येथील भिगवणमध्ये घडली आहे. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील तरुणीचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकारणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. 



Source link

मोठी बातमी! मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के एसबीसी आरक्षण रद्द, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी! मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के एसबीसी आरक्षण रद्द, राज्य सरकारचा मोठा निर्णय


Muslim NBC Reservation: मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के एसबीसी आरक्षण रद्द करण्यात आलं आहे. आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक जारी करण्यात आलं असून, त्यात आरक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा शासनादेश जारी झाला आहे. उच्च न्यायालयाने मुस्लीम आरक्षणाला स्थगिती दिल्यानं सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुस्लीम आरक्षणाचा शासन निर्णय 12 वर्षांनी रद्द झाला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर, आगामी विधानसभा निवडणुकांकडे लक्ष ठेवून असलेल्या महाराष्ट्र सरकारने मराठा आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला होता. सरकारने सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठ्यांना 16 टक्के आणि मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण जाहीर केले होते. यामुळे राज्यातील एकूण आरक्षण 73 टक्के झाले होते. 

राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नसीम खान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुस्लिम समुदायासाठी 5 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव मांडला होता. कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. 

अध्यादेशात काय लिहिलं आहे?

सामाजिक  शैक्षणिकदृष्ट्टया मागासलेल्या मुस्लिम गटासाठी विशेष मागास प्रवर्ग-अ अंतर्गत शासकीय व निमशासकीय सरळसेवा भरतीमध्ये व शैक्षणिक संस्थेतील प्रवेशासाठी 5 टक्के आरक्षण सामान्य प्रशासन विभागाच्या वाचा क्र 1 येथील अध्यादेशान्वये विहीत करण्यात आले होते. त्यानुसार, वाचा क्रं2 येथील अल्पसंख्यांक विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये सरळ सेवेच्या पदभरतीमध्ये विशेष मागास प्रवर्ग-अ (एसबीसी-ए) प्रवर्गासाठी 5 टक्के आरक्षण देण्यात आले होते. 

अल्पसंख्याक विकास विभागाच्या वाचा क्र.2 येथील शासन निर्णयातील निदेशानुसार या विभागाकडून वाचा क्र.3 येथील शासन निर्णय व वाचा क्र 5 येथील शासन परिपत्रकान्वये विशेष मागास प्रवर्ग-अ मधील मुस्लिम समाजास नियमानुसार जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रे देण्याबाबतची कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. 

सन 2014 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 14 विरोधात मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका क्र 2053/2014 श्री. संजित शुक्ला विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर संलग्न याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. प्रस्तुत प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दि १४.११.२०१४ रोजीच्या आदेशान्वये सदर अध्यादेशातील कलम ४(१) मधील राज्याच्या वनयंत्रणाखालील लोकसेवांमधील सरळ सेवा प्रवेश नियुक्त्यांमधील ५% नियुक्त्या विशेष मागास प्रवर्ग-अ करता राखून ठेवण्याच्या तरतुदीस अंतरिम स्थगिती दिलेली आहे.

सामान्य प्रशासन विर्भागाच्या वाचा क्र. 1 येथील अध्यादेशाचे दिनांक 23.12.2014 पर्यंत कायद्यात रुपांतर न झाल्याने सदरहू अध्यादेश व्यपगत झाला आहे. त्यानुषंगाने निर्गमित केलेले शासन निर्णय/ परिपत्रक आपोआप रद्दबातल ठरतात. 

त्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने वाचा क्र.6 येथील दि. 02.03.2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये अध्यादेशास अनुसरून निर्गमित केलेला वाचा क्र.4 येथील दि. .24.07.2014 रोजी शासन निर्णय रद्द केला आहे. सबब, उपरोक्त अध्यादेश व्यपगत झाल्याने या विभागाकडून निर्गमित केलेला शासन निर्णय/परिपत्रक रद्दबातल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 

 





Source link

माझ्या 70 सेकंदांच्या वक्तव्याचा… टिपु सुलतान वादाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांचा मोठा खुलासा

माझ्या 70 सेकंदांच्या वक्तव्याचा… टिपु सुलतान वादाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांचा मोठा खुलासा


Harshvardhan Sapkal:  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने वादाचा भडका उडाला आहे. सपकाळांविरोधात भाजपनं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करत वक्तव्याचा निषेध केला.यावेळी सपकाळांच्या प्रतिकात्मक फोटोला काळं फासत, जोडो मारत तीव्र निषेध केला. सोबतच सपकाळांनी शिवभक्तांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. टिपु सुलतान वक्तव्य प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त

हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत. शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त केली आहे.  सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही, तर ऐक्याचा संदेश जावा, या आशयाचे माझे ७० सेकंदांचे वक्तव्य होते. दुर्दैवाने, त्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला. त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला हे आपण पुण्यात पाहिले आहे.

मी पुन्हा एकदा स्पष्ट आणि ठामपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही,मी केलेली नाही. टिपू सुलतानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इंग्रजाविरूद्ध लढा दिल्याचे मी म्हटले होते. त्यांच्या योगदानाची दखल घेत थेट भारताच्या संविधानामध्ये देखील त्यांची तसबीर आहे त्यांच्या प्रतिमेच्या संदर्भात समाजात तणाव वाढू नये, सर्वांनी परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपावा, हा माझ्या वक्तव्याचा गाभा होता. इतिहासावर मतभेद असू शकतात; मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये,जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये,हीच भूमिका मी मांडली होती.

प्रकरणी भाजपचा तीव्र शब्दात निषेध करतो त्यांच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्या बद्दल शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता. शिवजयंती दोन दिवसांवर आली आहे,  आपण सर्वांनी गैरसमज दूर ठेवूया, अपप्रचाराला बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वराज्य, सहिष्णुता आणि लोककल्याणाचा मार्ग स्वीकारून परस्पर आदर, ऐक्य आणि समन्वयाने महाराष्ट्र घडवूया ही नम्र विनंती. आणी पुढे भाजपाच्या विखारी, खोडसाळ अपप्रचाराविरुद्ध लढत राहू भाजपच्या विकृतीला व ट्रेड-दिल व जेफ़री एपस्टीन घोटाळा चव्हाट्यावर आणत राहू! 
कठीण वज्रास भेदूं ऐसे
भले तरि देऊं कासेची लंगोटी ।
 नाठाळाचे माथी हाणू काठी ।
मायबापाहूनि बहु मायावंत । 
करूं घातपात शत्रूहूनि ॥
अमृत तें काय गोड आम्हांपुढें ।
 विष तें बापुडें कडू किती ॥





Source link

YouTube
Instagram
WhatsApp