by Hansraj Agrawal | Feb 5, 2023 | Trending News
Pune Bypoll: पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election) आणि चिंचवडची पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll Election) बिनविरोध करण्याच्या भाजप (BJP) पूर्ण प्रयत्न करतान दिसत आहे. तर दुसरीकेड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना विनंती केली होती. मात्र, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठी घोषणा केली आहे. ट्विट करत त्यांनी (Maharastra Political News) माहिती दिली आहे. (Pune Bypoll Election Kasba Peth and Chinchwad Bypoll Election will not uncontested Nana Patole tweeted Maharastra Political News)
काय म्हणाले Nana Patole?
पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा मतदार संघात (Pune Bypoll Election) विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष आणि चिंचवड मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला आहे, असं नाना पटोले (Nana Patole Tweet) यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
पाहा ट्विट –
कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची (BJP candidates) घोषणा करण्यात आली आहे. कसबा मतदार संघासाठी हेमंत रासने (Hemant Rasne) आणि चिंचवड मतदार संघासाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. नाना पटोले यांच्या ट्विटमुळे (Nana Patole On Pune Bypoll) आता निवडणुकीचा थरार पहायला मिळणार आहे.
आणखी वाचा – Supriya Sule: “सध्या वडील पळवायची शर्यत लागलीय”, दादांचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या…
दरम्यान, महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन केली होती. तर राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे पत्राचा कागद दाखवून निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडीनेही (MVA) निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 5, 2023 | Trending News
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिकच्या इगतपुरीमध्ये (Nashik Igatpuri) अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अंधश्रद्धेचा (superstition) डोकं बधिर करणारा खळबळजनक प्रकार समोर आलाय. भूतबाधा केल्याच्या संशयावरुन आठ ते दहा कुटुंबांना गाव सोडण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली आहे.
इगतपुरीच्या धारगावमधल्या भोरवाडी आदिवासी पाड्यावर एका लहान बालकाचा मृत्यू झाला. मात्र, या बालकाचा मृत्यू भूतबाधा केल्यानं झाल्याचा आरोप करत एका कुटुंबाने इतर आठ कुटुंबांची झोप उडवली. हे कुटुंब नेहमी शिवीगाळ करुन भांडण उकरून काढत होतं. अखेर या आठ कुटुंबांना राहतं घर सोडण्यास सांगण्यात आले आहे. परिस्थितीसमोर हतबल या आठ कुटुंबांनी घराची मोडतोड करत पाठीवर संसार घेत स्थलांतराला सुरुवात केली. पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा हा प्रकार समोर आल्यानं एकच खळबळ उडाली.
मुलाच्या मृत्यूनंतर भुताटकी केली जात असल्याचे कारण देत सातत्याने होणाऱ्या छळास वैतागून इगतपुरी तालुक्यातील भोरवाडी येथील आठ कुटुंबांनी आपल्या घरांची मोडतोड करीत स्थलांतर केले आहे. या प्रकारामुळे तालुक्यातील आदिवासींच्या मानगुटीवरील अंधश्रद्धेचे भूतअजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
नेमका काय आहे प्रकार
भोरवाडी येथील एका कुटुंबातील आजारी असणाऱ्या बालकाचा मागील महिन्यात मृत्यू झाला. भुताटकी केल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत या परिवाराने गावात आठ कुटुंबांचा छळ सुरू केला. सातत्याने होणाऱ्या वादास वैतागलेल्या या आठ कुटुंबांनी अखेर वाद वाढल्याने याबाबत घोटी पोलिसांत धाव घेतली आणि आता गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या गावातील लक्ष्मण धापटे, सोमा शिद, भाऊ पादिर, सनू पादिर, गंगूबाई खडके, शांताराम खडके यांच्यासह अन्य दोन कुटंबांनी आपल्या राहत्या घरांची मोडतोड करीत पाठीवर संसार साहित्य घेत स्थलांतर केले. या प्रकारामुळे इगतपुरी तालुक्यातील अंधश्रद्धेच्या प्रकाराची नव्याने चर्चा सरु झाली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली कठोर कारवाईची मागणी
इगतपुरी तालुक्यातील भूतकाळ भूताटकीच्या प्रकाराने छळ झाल्याने ग्रामस्थांनी घर सोडून पलायन केले. या घटने विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली आहे. संपूर्ण प्रकाराची चौकशी करून आरोप करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर, स्थानिक महिलांनीही याबाबत न्याय देण्याची मागणी केली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 4, 2023 | Trending News
प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : आशियातील खंडातील सर्वात मोठी गुहा महाराष्ट्रात (Asia largest cave in maharashtra) आहे. गोंदियातील 40 वर्ष जुनी परंपरा असलेल्या कचारगड यात्रेमुळे (Kachargarh Yatra) ही गुहा चर्चेत आली आहे. 18 राज्यातील आदीवासी बांधव लाखोंच्या संख्येने या यात्रेत सहभागी होतात. गुहेत जवळपास पाच हजार भाविक एकाच वेळेस दर्शन घेऊ शकतात.
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्थ घनदाट जंगलात कचारगड गुहा असुन आदिवासी बांधवाचे पवित्र श्रद्धास्थान असुन या गुफेत आदिवासी बांधवाचे आराध्य दैवत म्हणजे “पारी कोपार लिंगो” ची मूर्ती आहे. मागील 40 वर्षा पासून या ठिकाणी यात्रा भरत आहे.
या कचारगड यात्रेला महाराष्ट्रासह इतर 18 राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने आपल्या कुलदेवतेची पूजा व दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावतात. अत्यंत दुर्गम व निसर्गाचा सानिध्यात असलेल्या कचारगड या ठिकाणी ही यात्रा पाच दिवस सुरु असते.
कचारगडच्या गुफेतूनच आदिवासी बांधवचा उगम झाला अशी आख्यायिका असल्याचे बोलले जाते. कचारगड मध्ये असलेली गुफा ही निसर्ग निर्मित असुन आशिया खंडातील सगळ्यात मोठी गुफा आहे. तसेच या गुफेत जवळपास पाच हजार भाविक एकाच वेळेस दर्शन घेऊ शकतात, इतकी जागा या गुफेत उपलब्ध आहे.
आदिवासी बांधव दरवर्षी कोया पौर्णिमेला या ठिकाणी येत आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेत असतात. या वेळी आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन पाहायला मिळते. या यात्रे करिता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छतीसगड, आंध्र प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड, उत्तर प्रदेश, मिझोरम, मेघालय आदी 18 राज्यातून लाखो आदिवासी भाविकांची गर्दी या ठिकाणी होत असते. कचारगडच्या गुफेत आदिवासींचे आराध्य दैवत म्हणजे *”पारी कोपार लिंगो”* ची मूर्ती आहे.
या दैवताचे दर्शन घेण्यासाठी आपल्या संस्कृतीमधील परंपरा कायम राखत आदिवासी बांधव मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी उपस्थिती लावतात. त्याच प्रमाणे विविध राज्यातील विभिन्न आदिवासी बांधव या यात्रेवेळी आप आपल्या राज्याच्या पंरपरेनुसार आदिवासी नृत्याचे संस्कृतीचे सादरीकरण करतात. त्यामुळे संस्कृतीचा अभ्यासकांसाठी ही यात्रा एक प्रकारची पर्वणीच ठरते.
या आदिवासी बांधवाच्या यात्रे दरम्यान आदिवासी समाजातील रोटीबेटीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात होत. असते त्यामुळे या यात्रेला अतिशय महत्व असते कचारगड हा परिसर नक्षलग्रस्त भागात मोडत असल्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टीकोणातून मोठ्या प्रमाणात पोलीस बळ देखील या यात्रे साठी तैनात करण्यात येतो.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 4, 2023 | Trending News
Crime News : तुळजापुरात तरुणाकडून प्रेयसीच्या मुलाचं अपहरण ( Son Kidnapping) करण्यात आले. (Tuljapur Police) मात्र, हे अपहरण चक्क प्रेयसीवर केलेला खर्च वसूल करण्यासाठी केले गेले.
Updated: Feb 4, 2023, 01:34 PM IST
Source link
by Hansraj Agrawal | Feb 3, 2023 | Trending News
एकादशी निमित्ताने अनेक भाविक पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मीणी मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मात्र, या वारकऱ्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Updated: Feb 3, 2023, 11:11 PM IST
Source link
by Hansraj Agrawal | Feb 3, 2023 | Trending News
Maharashtra Kasba Peth Assembly By-Election : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतून (Kasba Peth Assembly By-Election) टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना प्रदेश प्रवक्ते नियुक्त केले. या जागेसाठी मंगळवारपर्यंत अर्ज करायचे आहेत. (Political News in Marathi) दरम्यान, विद्यमान आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाल्यानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. (Maharashtra News in Marathi)
भाजपकडून ‘या’ नावांची चर्चा
सुरुवातीला मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी देऊन निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होती. पण शहर भाजपने प्रदेश भाजपकडे पाच नावं पाठवली आहेत. त्यात टिळक पितापुत्रांसह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेते धीरज घाटे, गणेश बीडकर यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांत उमेदवाराची घोषणा अपेक्षित असतानाच भाजपने कुणाल टिळक यांची प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्याची खेळी खेळली. त्यामुळे टिळक कुटुंबीयांची कसब्याच्या उमेदवारीवरील दावेदारी संपुष्टात आल्याची चर्चा आहे.
विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का
दरम्यान, विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या पाच मतदारसंघांतील निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रभाव असलेल्या नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघाची हक्काची जागा भाजपने गमावली. निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व राखल्याचं चित्र आहे.
अमरावतीमध्ये भाजप उमेदवार पिछाडीवर होता. तिथे अजूनही मतमोजणी सुरू आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाची जागा मात्र भाजपने जिंकून महाविकास आघाडीवर मात केली. नाशिकमध्ये अपेक्षेप्रमाणे अपक्ष सत्यजित तांबे यांनी २९ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. मराठवाडय़ाची जागा राष्ट्रवादीने कायम राखली आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी अजून सुरुच आहे. दरम्यान मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची झाली. जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काल मध्यरात्री दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. भाजप उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्यासमोर जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने भाजप उमेदवार रणजीत पाटील मतमोजणी केंद्राबाहेर निघून गेले.
Source link