उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो; महाराष्ट्रात हे चाललंय काय?
मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
Source link
मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
Source link
भंडा-यात नवजात बालकांची विक्री करणा-या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. एका दाम्पत्याला विक्री केलेल्या दहा दिवसांच्या बालिकेची सुटका करण्यात आलीय. या प्रकरणाचा सूत्रधार गोंदियातील एक बडा डॉक्टर असल्याची माहिती समोर आलीये.
Source link
Na Certificate: पूर्वी कृषी जमिनीला गैरकृषी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागत असे. ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ होती.
Source link
विशाल मोरे मालेगाव, ( नाशिक )
Grampanchayat Nashik District : येत्या 15 फेब्रुवारी पासून नाशिक जिल्ह्यातील 622 गावातील ग्रामपंचायतींवर प्रशासक राज येणार आहे. पेठ – सुरगाणा हे दोन तालुके वगळता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात प्रशासक राज येणार आहे. तेव्हा एका प्रशासकावर अंदाजे 15 ते 20 गावांच्या विकासाची जबाबदारी येणार असल्याची शक्यता असल्याने गावाचा विकास कसा साधला जाणार हा मोठा प्रश्न आहे.
आधीच जिल्हा परिषद आणि 15 पंचायत समित्या यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यात आता 622 ग्रामपंचायत निवडणुका या सहा महिन्यानंतर घेण्यात याव्या अशी मागणी प्रशासनाकडून करण्यात आल्याचे डाबली गावाचे सरपंच यांनी सांगत आता माजी सरपंच यांना जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट केले.
एका पंचायत समितीला चार विस्तार अधिकारी असतात. एका विस्तार अधिकाऱ्याकडे 20 ते 25 गाव असतात त्यामुळे ते कोणकोणत्या गावाकडे लक्ष देणार आहेत आणि एका सरपंचाकडे एक गाव असते. भविष्यात उन्हाळा, चारा, पाणी टंचाई आहे. तेव्हा ज्यावेळी विधानसभा बरखास्त होते तेव्हा राज्याचा कारभार बघण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री हे काम बघतात तसेच प्रशासक ही संकल्पना रद्द करत सरपंच यांना देखील काळजीवाहू सरपंच म्हणून आदेश काढत निवडणुका होई पर्यंत कारभार बघू द्या अशी मागणी सचिन साळुंखे, नाळे येथील सरपंचांनी व्यक्त केली.
गावांवर प्रशासक राज येणार मात्र याआधी जो विकास निधी मंजूर होता तो निधी बऱ्याच गावांवर अधिकारी नसल्यामुळे कामात घेता आला नाही. त्यातच निवडणुका लांबणीवर का टाकल्या याचे कारण शासनाने सांगावे. तेव्हा निवडणुका या प्रशासक राज लागल्यानंतर तत्काळ घ्याव्यात अशी मागणी सरपंच वीराने यांनी केली आहे.
जिल्हा परिषद मार्फत पंचायत समिती कडून एक प्रस्ताव दाखल केला जाणार आहे. पंचायत समितीचे आरोग्य, शिक्षण असे विविध विस्तार अधिकारी आहेत त्यांची आम्ही प्रशासक म्हणून नेमणूक करणार आहोत. जास्तीत जास्त प्रशासक कसे नेमले जाणार याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. तसेच अद्याप निवडणूक
आयोगाकडून वॉर्ड रचना, पुनर्निरीक्षण करणे या बाबत कुठलाच आदेश आला नसल्याचे गटविकास अधिकारी वेंदे यांनी सांगितले. एकंदरीत सरपंचाकडून करण्यात आलेल्या काळजीवाहू सरपंच पदाची मागणी, तसेच लवकर ग्रामपंचायत निवडुकांचे कार्यक्रम घोषित करण्याची मागणी, प्रशासक ही संकल्पना रद्द करण्याची मागणी या सगळ्यांचा विचार आता सरकार कडून कसा करण्यात येईल हे बघणे महत्वाचे ठरेल.
कळवण- 29
येवला- 68
इगतपुरी- 9
दिंडोरी- 30
त्र्यंबकेश्वर- 3
सिन्नर- 100
निफाड -65
चांदवड- 53
देवळा- 11
नांदगाव- 60
मालेगाव- 99
नाशिक- 25
एकूण- 622
Maharashtra: निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेक उमेदवार आनंद साजरा करतात, तर काहींना पराभव स्वीकारावा लागतो. कारेगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडियावर ‘रिलस्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या निर्मला नवले यांनाही यंदा मतदारांनी संधी दिली नाही. मात्र निकालानंतर त्यांनी निराश न होता मतदारांशी संवाद साधत आपली भावना व्यक्त केली. लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि हा पराभव आपल्या प्रवासाचा शेवट नसल्याचे सांगितले. लोकांसाठी काम करण्याची इच्छा अजूनही तितकीच मजबूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाल्या निर्मला नवले?
या निवडणुकीत नवले यांचा सुमारे 300 मतांनी पराभव झाला. निकाल अपेक्षेप्रमाणे नसला तरी 6577 मतदारांनी दाखवलेला विश्वास आपल्या आयुष्यातील मोठी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. “निवडणुकीत पैसा जिंकला, माणूस हरला,” अशी भावना व्यक्त करत त्यांनी मतदारांचे आभार मानले. त्यांच्या मते मतदारांशी असलेले नाते हे फक्त निवडणुकीपुरते मर्यादित नसते.
..म्हणून मी पराभूत झाले!
नवले यांनी प्रचारादरम्यान विकासाच्या प्रश्नांपेक्षा पैशांचा प्रभाव जास्त जाणवल्याचे सांगितले. काही ठिकाणी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी चुकीच्या पद्धती वापरल्या गेल्याचेही त्यांनी सूचित केले. पैशाच्या बळावर मते मिळू शकतात, पण विश्वास आणि आपुलकी विकत घेता येत नाही, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेची खरी भावना जपण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुण पिढीबद्दल चिंता
गावातील युवकांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेबद्दल त्यांनी विशेष चिंता व्यक्त केली. ड्रग्ससारख्या घातक सवयी तरुणांचे भविष्य बिघडवत असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाने एकत्र येऊन या समस्येला थांबवण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या मते हा विषय कोणत्याही राजकीय निकालापेक्षा अधिक गंभीर आहे.
पुढील वाटचालीचा निर्धार
पराभवानंतरही लोकांसाठी काम करण्याची जिद्द कमी झालेली नाही, असे नवले यांनी स्पष्ट केले. सामाजिक प्रश्न, गावाचा विकास आणि तरुणांच्या भविष्यासाठी पुढेही प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक हरली तरी लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आपला संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कोंकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये तातडीने विलिनीकरण करा तसेच रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्या. खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत नियम 377 अन्वये लोकसभेत मांडला प्रस्ताव.
Source link