कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी अचानक सह्याद्रीच्या डोंगरातून वाहू लागले; शेवटी अधिकाऱ्यांना दोष सापडला

कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी अचानक सह्याद्रीच्या डोंगरातून वाहू लागले; शेवटी अधिकाऱ्यांना दोष सापडला



या धरणाच्या कॅनलला गळती लागल्याच्या वृत्ताने एकच गोंधळ उडाला. कोयना जलविद्युत टप्पा क्र. 1 आणि 2 च्या आपत्कालीन झडप भुयार येथील भिंतीमधुन आणि छतामधुन पाण्याची गळती झाली



Source link

रोबोटलाही कळलं स्वच्छतेचं महत्व, चक्क शहरातल्या नालेसफाईचं काम घेतलं हाती… पाहा ‘हा’ व्हायरल video

रोबोटलाही कळलं स्वच्छतेचं महत्व, चक्क शहरातल्या नालेसफाईचं काम घेतलं हाती… पाहा ‘हा’ व्हायरल video


पुढील
बातमी

पांढरा शुभ्र, उंच देखणा, डोळ्यात काजळ आणि… सलमानची किंमत अर्धा करोड





Source link

गर्भवती महिलांचं इंजेक्शन गायी-म्हशींना, सहा जणांना अटक

गर्भवती महिलांचं इंजेक्शन गायी-म्हशींना, सहा जणांना अटक


सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : आरोग्याबाबत (Health) तुम्हाला सजग करणारी महत्वपूर्ण बातमी. गायी-म्हशीचं (Cow and Buffalo milk) दूध आपण घरात सर्रासपणे वापरतो. मात्र हे दूध तुमच्या आरोग्यासाठी हानीकारकही ठरू शकतं. कारण जनावरांच्या दूधवाढीसाठी केमिकल इंजेक्शनचा वापर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. (use of chemical injection for milk increase in cows and buffaloes fda seized 53 lakh rupees medicins)

मोठ-मोठ्या बॉक्समध्ये असलेली ही औषधं, हा कुठल्या हॉस्पिटलमधील औषधांचा साठा नाही, तर ही आहेत ऑक्सीटोसीन इंजेक्शन्स. तसं पाहिलं तर ही औषधं महिलांच्या डिलिव्हरीसाठी वापरली जातात. मात्र काही माफियांनी याचा वापर थेट दुभत्या जनावरांवर सुरू केलाय. गायी-म्हशींच्या दूध वाढीसाठी या औषधांचा सर्रासपणे बेकायदा वापर होतोय.

अंमली पदार्थ विरोधी पथक आणि अन्न औषध प्रशासनानं याची माहिती मिळताच मोठी कारवाई करत पुण्यातून तब्बल 53 लाखांची औषधं जप्त केलीयेत. यामागे पश्चिम बंगालमधील टोळी असून आतापर्यंत सहा जणांना अटकही करण्यात आलीय.

ऑक्सिटोसीन हे इंजेक्शन महिलांच्या डिलिव्हरीवेळी वापरलं जातं. यामुळे प्रसूती वेदना कमी होतात. मात्र हे इंजेक्शन गायी-म्हशींना दिल्यास त्या जास्त दूध देतात. या इंजेक्शनच्या वापरामुळे जनावरांनी दिलेलं दूध मानवी शरीरासाठी घातक मानलं जातं. मात्र, त्याचा परिणाम मानवी शरीरावर होतो. ते दूध प्यायल्यास अशक्तपणा, दृष्टीविकार, पोटाचे आजार, नवजात बालकांना कावीळ, गर्भवती महिलेला रक्तस्त्राव, अनैसर्गिक गर्भपात, श्वसनाचे विकार तसच त्वचेचे विकार असे गंभीर विकार होण्याची शक्यता आहे.

मात्र हे सगळे नियम पायदळी तुडवून पश्चिम बंगालची टोळी पुण्यात या केमिकलयुक्त इंजेक्शनची निर्मीती आणि विक्री करत होती. सकस आहार म्हणून दुधाकडे पाहिलं जातं. मात्र काही माफियांनी पैसे कमावण्याच्या नादात आता दुधालाही बदनाम करण्याचा घाट घातलाय. अशा समाजकंटकांना कडक शिक्षा व्हायलाच हवी.





Source link

धक्कादायक! महिलांच्या प्रसुतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा गाई म्हशींवर वापर

धक्कादायक! महिलांच्या प्रसुतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा गाई म्हशींवर वापर


सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  दुधात (Milk) भेसळ केली जात असल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. सणासुदीच्या काळात ही भेसळ अधिकच वाढते. भेसळयुक्त दुधामुळे (Adulterated milk) शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. आजकाल पिशवी बंद दुधातही भेसळ केली जात आहे. त्यामुळे ही भेसळयुक्त दूध ओळखण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. आधी ही भेसळयुक्त दूधाची विक्री केली जात होती. मात्र आता गाई, म्हशी दूध देण्याआधीच त्यात भेसळ केल्याचा प्रकार समोर आलाय.

गायी, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी महिलांच्या प्रसूतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ”ऑक्‍सीटोसीन” इंजेक्‍शनची जिल्ह्यात सर्रास विक्री केले जात असल्याच समोर आलं आहे . हे इंजेक्‍शन दिलेल्या गायी, म्हशींचे दूध मानवी आरोग्यास हानीकारक असून त्याची सर्सास विक्री केली जात आहे. या इंजेक्‍शनची बेकायदा निर्मिती आणि विक्री करणाऱ्या टोळीला अमली पदार्थ विरोधी पथक आणि अन्न औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करुन अटक केली आहे. त्यांच्याकडून 52 लाखांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.

समीर कुरेशी, विश्‍वजीत नाना, मंगल गिरी, सत्यजीत मोंडल, श्रीमंत हल्दर आणि बाबुभाई उर्फ अल्लादीन (सर्व रा. कलवड वस्ती) अशी अटक आरोपींची नावे आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने निरीक्षक सुहास तानाजी सावंत यांनी फिर्याद दिली आहे.

ऑक्‍सीटोसीन इजेक्शंन काय आहे?

महिलांच्या प्रसूती दरम्यान डॉक्‍टर या ऑक्‍सीटोसीन  इंजेक्शनचा वापर करतात. यामुळे प्रसूती वेदना कमी होतात. मात्र हे इंजेक्‍शन गायी, म्हशींसाठी वापरल्यास त्या जास्त प्रमाणात दूध देतात. याचा वापर मानवाव्यतिरीक्त इतरत्र करण्यास कायद्याने बंदी आहे. तसेच हे इंजेक्‍शन तयार करण्यासाठी आणि विक्रीसाठी औषध व सौंदर्यप्रसाधन कायद्यानुसार परवाना आवश्‍यक असतो.

अटक केलल्या आरोपींकडे कोणताही परवाना नसताना ते इंजेक्‍शनची बेकायदा निर्मिती आणि विक्री करत होते. याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने सयुंक्त कारवाई केली. अधिकाऱ्यांनी कलवडवस्ती येथील एका पत्र्याच्या शेडवर छापा मारुन इंजेक्‍शन निर्मितीसाठी लागणारे केमिकल आणि इतर साहित्य जप्त केले. तसेच पाचही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे औषध निर्मिती आणि विक्रीचा कोणताही परवाना नव्हता.

गोठ्यात जाऊन इंजेक्शनचा पुरवठा

दरम्यान याप्रकरणी तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांनी सांगितले, आरोपी गेल्या दोन वर्षांपासून हा व्यवसाय करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. ते शहर आणि ग्रामीण भागातील गोठ्यांमध्ये जाऊन इंजेक्शनची विक्री करत होते. अनेकदा गोठा मालकही त्यांच्याकडे येऊन इंजेक्‍शन घेऊन जात होते. या इंजेक्‍शनने दूध वाढत असल्याचे लक्षात आल्यावर आरोपींकडे ग्राहकांचा ओघ वाढू लागला होता. इंजेक्‍शनसाठी वापरल्या जाणाऱ्या 50 ऍम्बूसचे (केमिकल असलेली बाटली) बॉक्‍स ते 100 रुपयांना विक्री करत होते. यातील एकाच आरोपीने फक्त 12 वी पर्यंत शिक्षण घेतलेले आहे. तर इतर आरोपी अशिक्षित आहेत. याप्रकरणी इतर आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.





Source link

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे; कर्ज काढून न दिल्याने रिक्षावाल्याने महिलेला…

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे; कर्ज काढून न दिल्याने रिक्षावाल्याने महिलेला…



ऑटोचालक संजयने संगीता यांच्यावर विळ्याने हल्ला केला. या हल्ल्यात संगीता गंभीर जखमी झाल्या आहेत.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp