Ahilyanagar Crime: बायको नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून चार चिमुकल्यांसह बापाने जीवन संपवले

Ahilyanagar Crime: बायको नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून चार चिमुकल्यांसह बापाने जीवन संपवले


प्रतिनीधी कुणाल जामदाडे- Ahilyanagar Crime:  अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोहाळे शिवारात घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. कौटुंबिक वादातून एक बापाने आपल्या चार चिमुकल्या मुलांसह आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुण कैलास काळे (वय 30, रा. चिखली, ता. श्रीगोंदा) यांची पत्नी आठ दिवसांपूर्वी पती-पत्नीतील वादामुळे माहेरी येवला येथे गेली होती. पत्नी नांदायला येत नसल्याने नैराश्यातून अरुण यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शनिवारी सकाळी कोहाळे शिवारात एका विहिरीत चार चिमुकल्यांचे आणि वडिलांचा मृतदेह दिसून आला. अरुण यांनी स्वतःच आपला एक हात आणि एक पाय दोरीने बांधून विहिरीत उडी घेतल्याचे दिसून येत आहे. ही आत्महत्या आहे की अन्य काही याबाबत स्थानिक पोलीस सध्या तपास करत आहेत.

अजून दोन मुलांचा शोध सुरु 

मयतांची नावे पुढील प्रमाणे आहेत.  शिवानी अरुण काळे (वय 8). प्रेम अरुण काळे (वय 7). वीर अरुण काळे (वय 6). कबीर अरुण काळे (वय 5). अरुण काळे (वय 30). यापैकी अरुण काळे आणि दोन मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात पोलीस आणि गावकऱ्यांना यश आले असून उर्वरित दोन मुलांचा शोध सुरू आहे.

विहिरीत एकाच कुटुंबातील मृतदेह दिसताच उपस्थित गावकरी आणि नातेवाईकांचा हंबरडा फूटला. घटनास्थळापासून काही अंतरावर अरुण यांची मोटारसायकल आढळली असून त्यावरूनच ही घटना घडल्याचा संशय लावला जात आहे.

पती-पत्नीच्या वादामुळे चार मुलांचा बळी

पत्नी नांदायला येत नाही म्हणून चार निरागस जीवांचा बळी गेला ही बाब अत्यंत हृदय पिळवून टाकणारी आहे. छोट्याशा वादामुळे एका कुटुंबाचे अस्तित्व संपुष्टात आले असून यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पुढील तपास राहाता पोलीस करत आहेत.

FAQ

कोहाळे शिवारात काय घटना घडली?

कोहाळे शिवारात एका बापाने कौटुंबिक वादातून आपल्या चार चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

ही घटना कधी आणि कुठे घडली?

ही घटना 16 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोहाळे शिवारात घडली.

या घटनेचे कारण काय होते?

प्राथमिक माहितीनुसार, अरुण यांची पत्नी आठ दिवसांपूर्वी वादामुळे माहेरी गेली होती आणि ती नांदायला येत नसल्याने अरुण यांनी नैराश्यातून हा टोकाचा निर्णय घेतला.





Source link

…म्हणून आंदोलकाच्या कंबरेत लाथ मारली, DYSP चं स्पष्टीकरण, म्हणाले 'महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर…'

…म्हणून आंदोलकाच्या कंबरेत लाथ मारली, DYSP चं स्पष्टीकरण, म्हणाले 'महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर…'


Jalna News : स्वातंत्र्यदिनानिमित्त जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एक विचित्र प्रकार घडला. पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न एका आंदोलकाने केला. त्याला रोखण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं असताना आंदोलकाच्या कमरेत DYSP अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईलने लाथ घातल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात या घटनेवर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता DYSP अनंत कुलकर्णी यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे. (Jalna police viral video of officer kicking protester sparks public outrage dysp anant kulkarni clarification)

DYSP अनंत कुलकर्णी यांचं स्पष्टीकरण

DYSP अनंत कुलकर्णी म्हणालेत की, गोपाल चौधरी हे मागच्या काही दिवसांपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. यावेळी पोलिसांनी त्यांची अनेकवेळा समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. इतकं करून देखील 15 ऑगस्टला पंकजा मुंडे दौऱ्यात असताना त्यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीस महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेल टाकलं म्हणून त्यांना ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर केल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी स्पष्टकरण दिलं आहे. 

काय आहे प्रकरण?

जालना शहरातील चौधरी कुटूंबातील सून ही लग्नानंतर घटस्फोट न घेता निघून गेली. एवढंच नाही तर तिने दुसरं लग्न ही केलं याची तक्रार कुटूंबातील पती गोपाळ आणि रमेश चौधरी यांनी पोलिसात केली होती. मात्र पोलिसांनी सुनेच्या उलट तक्रारीवरूनच चौधरी कुटुंबावर कौटुंबिक वादातून जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याचं गुन्ह्यामुळे चौधरी कुटुंबानी गेल्या अनेक दिवसापासून सुनासह त्यांच्या नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा म्हणून आंदोलनाचा पावित्र घेतला. मात्र कुणाचं दाद देत नसल्याने स्वातंत्र्यदिनानिमित्त जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या जालना दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा जात असताना चौधरी कुटुंबातील आंदोलकांने पंकजा यांचा ताफा अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं.

त्याचवेळी आंदोलकांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात असतानाच जालन्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी चक्क पाठीमागून येऊन ताब्यात घेतलं. यावेळी  DYSP अनंत कुलकर्णी यांनी आंदोलकाच्या कंबरेत पाठीमागून धावत येत फिल्मी स्टाईल लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या सर्व प्रकारामुळे आंदोलकांप्रमाणेच सामान्यांमध्येही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

FAQ

1. जालना येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त कोणता कार्यक्रम झाला?

स्वातंत्र्यदिनानिमित्त जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला.

2. या कार्यक्रमादरम्यान कोणता विचित्र प्रकार घडला?

पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून गोपाल चौधरी नावाच्या आंदोलकाने अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याला रोखण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, यावेळी DYSP अनंत कुलकर्णी यांनी आंदोलकाच्या कमरेत लाथ मारली, जी घटना व्हायरल झाली.

3. DYSP अनंत कुलकर्णी यांनी या घटनेवर काय स्पष्टीकरण दिलं?

DYSP अनंत कुलकर्णी यांनी सांगितलं की, गोपाल चौधरी गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत होते. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यांनी पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी एका महिला पोलिस कर्मचाऱ्यावर रॉकेल टाकलं, म्हणून बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलं.

4. या प्रकरणाचं मूळ कारण काय आहे?

चौधरी कुटुंबातील सून लग्नानंतर घटस्फोट न घेता निघून गेली आणि तिने दुसरं लग्न केलं. याबाबत गोपाल आणि रमेश चौधरी यांनी पोलिसांत तक्रार केली, पण पोलिसांनी सुनेच्या तक्रारीवरून चौधरी कुटुंबावरच कौटुंबिक वादाचा गुन्हा दाखल केला. यामुळे चौधरी कुटुंबाने सुनेच्या आणि तिच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन सुरू केलं.





Source link

महाराष्ट्रातील सर्वात थरारक दहीहंडी! खोल विहिरीवर बांधलेली उंच दहीहंडी उडी मारुन फोडतात; पाहताना अंगावर काटा येईल

महाराष्ट्रातील सर्वात थरारक दहीहंडी! खोल विहिरीवर बांधलेली उंच दहीहंडी उडी मारुन फोडतात; पाहताना अंगावर काटा येईल


No match is being played.

Aug 12, 2025 | 3rd ODI

Pakistan in West Indies, 3 ODI Series, 2025

WI

(50 ov) 294/6

VS

PAK

92(29.2 ov)

West Indies beat Pakistan by 202 runs
Full Scorecard →

Aug 12, 2025 | 2nd T20

South Africa in Australia, 3 T20I Series, 2025

SA

(20 ov) 218/7

VS

AUS

165(17.4 ov)

South Africa beat Australia by 53 runs
Full Scorecard →

Aug 10, 2025 | 2nd ODI

Pakistan in West Indies, 3 ODI Series, 2025

PAK

(37 ov) 171/7

VS

WI

184/5(33.2 ov)

West Indies beat Pakistan by 5 wickets (DLS method)
Full Scorecard →





Source link

मुंबईच्या हातावर तुरी; विदर्भ कोकणात मात्र मुसळधार, पाऊस कुठे- कधी जास्त बरसणार? पाहा

मुंबईच्या हातावर तुरी; विदर्भ कोकणात मात्र मुसळधार, पाऊस कुठे- कधी जास्त बरसणार? पाहा


Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरासमवेत अरबी समुद्रामध्येसुद्धा निर्माण होणाऱ्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि एकंदर कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागांना 13 ते 19 ऑगस्टदरम्यान मान्सून झोडपणार असल्याचं म्हटलं गेलं. मात्र काही भाग वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण वगळता पावसानं फारशी समाधानकारक हजेरी लावली नाही. 

पुढील 24 तासांमध्ये कसं असेल राज्यातील पर्जन्यमान? 

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यात प्रामुख्यानं कोकण विभाग, घाटमाथ्यावरील क्षेत्र, विदर्भ आणि संलग्न मराठवाडा या भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल. जिथं काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊसधारा बरसतील तर, काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असेल. 

दरम्यान, मुंबईसह ठाणे पालघर भागात शुक्रवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ज्यानंतर रविवारी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. राज्यात प्रामुख्यानं धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, यवतमाळमध्ये मेघगर्जनेसह आणि मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग इथं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

FAQ

कोकणात कसं असेल हवामान? 
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मुसळधार पाऊस. मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह (30-40 किमी/तास) जोरदार पावसाची शक्यता.

घाटमाथ्यासाठीचा अंदाज… 
पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूरच्या घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. भूस्खलनाचा धोका असू शकतो.

विदर्भात कोणत्या भागांना पाऊस झोडपणार? 
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ येथे मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळी वारे.





Source link

महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांमध्ये मोठा वाद; रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत राजकीय भडका

महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांमध्ये मोठा वाद; रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत राजकीय भडका



रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत राजकीय भडका उडाला आहे. सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले वादाचा नवा अंक समोर आलाय. तटकरे यांनी उलटीगिनती सुरू झाली, असा थेट इशारा गोगावले यांनी दिलाय. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांचा नवा सामना सुरू झालाय. रायगडमध्ये नेमकं काय घडतंय,



Source link

…म्हणून शिंदे दिल्लीवाऱ्या करतात! UBT चा खळबळजनक दावा; 'PM मोदी, गृहमंत्री शहांची भेट घेऊन…'

…म्हणून शिंदे दिल्लीवाऱ्या करतात! UBT चा खळबळजनक दावा; 'PM मोदी, गृहमंत्री शहांची भेट घेऊन…'


Uddhav Thackeray Shivsena On Why Eknath Shinde Visits Delhi: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यातील सत्ताधारी मित्रपक्षांवर निशाणा साधला आहे. राज्यातील सरकारमधल्या घटक पक्षांमध्ये अनेकदा नाराजीनाट्यच सुरु असते असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखामधून केलेल्या या टीकेत मुख्यपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदेंचा उल्लेख ‘सरकारमधील अंतर्गत नाराजीचे स्वयंघोषित ‘ब्रँड अम्बेसेडर’ असा करण्यात आला आहे. एवढ्यावरच न थांबता सतत एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी का जातात याबद्दलही या लेखातून भाष्य करण्यात आलं आहे.

बेबनाव पुन्हा चव्हाट्यावर

“गेल्या आठवड्यात ‘बेस्ट’ उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यावरूनही सामान्य प्रशासन विभाग आणि नगरविकास विभाग यांनी एकाच दिवशी स्वतंत्र आदेश काढले होते. त्यावरूनही फडणवीस-मिंधे यांच्यातील बेबनाव पुन्हा चव्हाट्यावर आलाच होता,” असा उल्लेख करत ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये निर्णयांवरुन समन्वय नसल्याकडे लक्ष वेधलं आहे. “सरकारमधील अंतर्गत नाराजीचे ते (एकनाथ शिंदे) स्वयंघोषित ‘ब्रँड अम्बेसेडर’च आहेत. त्यामुळे त्यांना अनेकदा नाराजीची उचकी लागत असते आणि ती दाखवून देण्याचा त्यांचा उद्योग सुरू असतो,” असा खोचक टोला लेखातून लगावण्यात आला आहे.

नाराजीनंतरचे दुसरे यशस्वी ठिकाण साताऱ्यातील ‘दरे’ गाव

एकनाथ शिंदेंवर टीका करताना, “आताही त्यांना अशीच उचकी लागली आणि मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीला ते गैरहजर राहिले. ते म्हणे थेट श्रीनगरला जाऊन बसले आहेत. श्रीनगरात ते कशासाठी गेले? एकतर त्यांनी कामाख्या मंदिरात अघोरी पूजेसाठी आसाम-गुवाहाटीला जायला हवे होते. नाहीतर त्यांचे नाराजीनंतरचे दुसरे यशस्वी ठिकाण साताऱ्यातील ‘दरे’ गावी जायला हवे होते, पण नाराज मिंधे गेले थेट श्रीनगरात. तेथे त्यांनी एका पडेल पहेलवानासोबत रक्तदानाचा कार्यक्रम मोठ्या प्रसिद्धीसह पार पाडला. उपमुख्यमंत्री असलेल्या मिध्यांकडे महाराष्ट्र मंत्रिमंडळातली मलईदार खाती आहेत. नगरविकास, गृहनिर्माण, रस्ते उपक्रम. त्यात हे महाशय कधी लक्ष घालतात?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे. 

…म्हणून शिंदे सतत दिल्लीला मोदी-शाहांना भेटायला जातात

एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत, “इथे मलिदा-मलई गोळा करायची व दिल्ली, श्रीनगर, दरे गाठायचे हाच यांचा सार्वजनिक उपक्रम सध्या आहे. म्हणजे एकंदरीत असे की, मुख्यमंत्री फडणवीस हे मिंध्यांना असे धक्के देत असतात की मिंध्यांचे मन मंत्रालयात रमत नाही. त्यामुळे मिंधे दिल्लीत जातात ते फडणवीसांवर कारवाईची मागणी करण्यासाठीच. गेल्या आठवड्यातही मिंधे यांनी याचसाठी दिल्लीवारी केली होती. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांची भेट घेऊन नाराजीचा पाढा वगैरे वाचला होता. त्यांनी म्हणे पंतप्रधानांना ‘महादेवा’ची मूर्तीही एक प्रतीक म्हणून भेट दिली. मिंधे यांचे हे असे अधूनमधून ‘कैलास पर्वता’वर जाणे आणि तेथे आपल्या ‘नाराजीच्या जटा’ आपटणे हे काही जनतेला नवीन राहिलेले नाही,” असं लेख म्हटलं आहे.

कुरघोड्या-कुरबुरी अशी ‘कु’ची बाराखडी

“महाराष्ट्रात सध्या सरकारमध्ये जनहिताची कोणतीच कामे होताना दिसत नाहीत. कारण सत्ताधाऱ्यांना फक्त स्वहिताची काळजी आहे. त्यातून रोजच एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. कुणी श्रीनगरला जाऊन बसत आहे तर कुणी कोणाची ‘जनाची-मनाची’ काढत आहे. सरकारमध्ये रोज फक्त कुरघोड्या-कुरबुरी अशी ‘कु’ची बाराखडी सुरू आहे. हे सरकार जनतेचे आहे, असे सत्ताधारी म्हणत असले तरी हे नाराजांचे सरकार आहे. सत्ताधारीही नाराज आणि जनतादेखील. सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी नाराजीच्या ‘छटा’ दाखवीत आहेत, तर कुणी नाराजीच्या ‘जटा’ आपटत आहेत,” असं म्हणत लेख संपवला आहे.

FAQ

1. ‘सामना’च्या अग्रलेखात शिंदे-फडणवीस सरकारवर कोणता प्रमुख आरोप आहे?
उत्तर: सत्ताधारी पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी आणि कुरघोड्यांचे नाट्य सुरू आहे. सरकार जनहिताची कामे करत नसून, सत्ताधाऱ्यांना फक्त स्वहिताची काळजी आहे. यामुळे एकमेकांची उणीदुणी काढण्यात आणि कुरबुरींमध्ये त्यांचा वेळ खर्च होतो, असा आरोप आहे.

2. एकनाथ शिंदे यांच्याबाबत अग्रलेखात काय म्हटले आहे?
उत्तर: एकनाथ शिंदे यांना सरकारमधील अंतर्गत नाराजीचे ‘स्वयंघोषित ब्रँड अम्बेसेडर’ संबोधले आहे. त्यांना वारंवार नाराजीची ‘उचकी’ लागते आणि ते मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहून श्रीनगरला रक्तदानाच्या कार्यक्रमासाठी गेले. त्यांच्याकडे मलईदार खाती (नगरविकास, गृहनिर्माण, रस्ते) असूनही त्यात लक्ष नसल्याचा आरोप आहे.

3. एकनाथ शिंदे यांच्या श्रीनगर दौऱ्यावर अग्रलेखात काय टिप्पणी आहे?
उत्तर: शिंदे यांनी नाराजीमुळे मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारून श्रीनगरला रक्तदानाचा कार्यक्रम केला. त्यांनी कामाख्या मंदिर (आसाम) किंवा साताऱ्यातील ‘दरे’ गावी जाणे अपेक्षित होते, पण श्रीनगर निवडल्याबद्दल खोचक टिप्पणी आहे.

4. शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत काय उल्लेख आहे?
उत्तर: शिंदे सतत दिल्लीला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांना भेटून फडणवीसांविरोधात नाराजीचा पाढा वाचतात. गेल्या आठवड्यात त्यांनी पंतप्रधानांना ‘महादेवा’ची मूर्ती भेट दिली आणि ‘नाराजीच्या जटा’ आपटल्याचे लेखात म्हटले आहे.

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp