Pankaja Munde: ‘मी सध्या बेरोजगार, साहेबांच्या काळात…’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Pankaja Munde: ‘मी सध्या बेरोजगार, साहेबांच्या काळात…’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या


Beed News : जनतेच्या मनात असेन तोपर्यंत पंतप्रधान मोदीही (PM Narendra Modi) आपल्याला संपवू शकणार नाहीत असं मोठं विधान पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यानंतर पंकजा मुंडे चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपण बेरोजगार असल्याचं वक्तव्य केलंय.

काय म्हणाल्या Pankaja Munde –

मी कुणाला काम देऊ शकते? सध्या मी बेरोजगार आहे. त्यामुळे कुणाला काम देऊ शकत नाही, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. परळी शहरात संत भगवानबाबा प्रतिष्ठान तर्फे आयोजित सार्वजनिक दुर्गा महोत्सवात पंकजा बोलत होत्या.

मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी वादग्रस्त वक्त्यावरून झालेल्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.

जुन्या काळातलं युद्ध वेगळं होतं. नव्या काळातलं युद्ध वेगळं आहे. साहेबांच्या वेळचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे होते. आत्ताचं युद्ध वेगळं आहे.हे युद्ध सोशल मीडियावर लढलं जातंय, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत.

Rohit Pawar Birthday: ‘पाहता क्षणी प्रेमात पडलो’, रोहित आणि कुंती पवारांच्या लग्नाची गोष्ट

सध्याचं राजकीय युद्ध सोशल मीडियावर लढलं जातं. तलवारी, भाले, ढाली यांची काहीच गरज नाही. आपण यामध्ये बसत नाही. आपण सगळे आपापलं काम करत असतो, असं सार्वजनिक दुर्गा महोत्सवात पंकजा मुंडे म्हणाल्या.





Source link

उस्मानाबाद पोलीसात खळबळ; खोटा गुन्हा दाखल केल्याने दहा जणांविरुद्ध राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

उस्मानाबाद पोलीसात खळबळ; खोटा गुन्हा दाखल केल्याने दहा जणांविरुद्ध राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार


उस्मानाबाद : उस्मानाबादचे (Osmanabad) माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार आणि उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्याप्रकरणी उस्मानाबाद पोलीस दलातील दहा पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध राज्य मानवाधिकार आयोगाकडे (State Human Rights Commission) तक्रार दाखल (complaint lodged) करण्यात आली आहे. त्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 

उस्मानाबादमध्ये 2020 मध्ये 10, 11 आणि 12 जानेवारी या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. या साहित्य संमेलनात झी २४ तासचे तत्कालीन रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणी पत्रकार सुनील ढेपे यांनी सोशल मीडियावर सडेतोड लेख लिहून तत्कालीन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांचे वाभाडे काढले होते. ‘बिहारी बाबू , आता तरी जागे व्हा ‘ या शीर्षकाखाली हा लेख लिहीण्यात आला होता.

ढेपे यांचा लेख माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी सोशल मीडियावर शेअर केला होती.  त्यामुळे पोलिसांनी चिडून पत्रकार सुनील ढेपे यांच्यासह सुभेदार यांच्याविरुद्ध आनंद नगर पोलीस ठाण्यात  14 जानेवारी 2020 रोजी  पोलीस ( अप्रितीची भावना चेतवने)  कायदा 1922 चे  कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात  दोषारोपपत्र  दाखल केले होते. हा खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंध महाराष्ट्रात पत्रकारांनी संताप व्यक्त करून निषेध व्यक्त केला होता. 

या एफआयआर आणि चार्जशीटला पत्रकार सुनील ढेपे व  बाळासाहेब सुभेदार यांनी  मुंबई उच्च न्यायालयाच्याच्या औरंगाबाद खंडपीठात 16 फेब्रुवारी 2021 रोजी आव्हान दिलं होते. कोरोनामुळे या आव्हान याचिकेची सुनावणी लांबणीवर पडली होती. पण दीड वर्षानंतर या आव्हान याचिकेचा 3 ऑगस्ट 2022 रोजी निकाल लागला. न्यायालयाने एफआयआर आणि चार्जशीट रद्दबातल ठरवले आहे आणि पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. 

राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

बाळासाहेब सुभेदार आणि पत्रकार सुनील ढेपे यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्याप्रकरणी उस्मानाबाद पोलीस दलातील दहा पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

यामध्ये सायबर पोलीस स्टेशनचे तत्कालीन सपोनि ( सध्या तामलवाडी पोलीस स्टेशन ) सचिन अशोक पंडित, आनंद नगर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.एस. चव्हाण , पोलीस उपनिरीक्षक क्रांती सुधाकर ढाकणे, पो. कॉ.विठ्ठल सुखदेव गरड , पो. कॉ. माधवी म्हाळाप्पा व्हदरगंडे, पो. कॉ.अरविंद अंकुश ढेकणे, पो. कॉ. राहुल नागनाथ नाईकवाडी, पो. कॉ.मनोज महादेव  मोरे, पो. कॉ. सुनील सुखदेव मोरे, पो. कॉ. एम. के. कुलकर्णी यांचा समावेश आहे.

तत्कालीन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या सांगण्यावरून सायबर पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन अशोक पंडित यांनी आनंद नगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. तर आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस.एस. चव्हाण यांनी गुन्हा नोंद केला होता. उर्वरित आठ पोलीस कर्मचाऱ्याचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करताना जबाब नोंदवण्यात आले होते. विशेष म्हणजे यातील अनेकांनी पोस्ट देखील वाचली नव्हती. दरम्यान राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर उस्मानाबाद पोलीस दलात खळबळ उडाली आहे.





Source link

Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे आज एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात

Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे आज एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात


कपिल राऊत,  झी मीडिया, ठाणे :  ऐन नवरात्रौत्सवात (Navratri 2022) ठाण्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट (Thackeray Group vs Shinde Group) पुन्हा आमनेसामने येणाराय. निमित्त आहे ते रश्मी ठाकरेंच्या (Rashmi Thackeray) दौऱ्याचं. आनंद दिघेंच्या (Anand Dighe) देवीच्या दर्शनाला रश्मी ठाकरे ठाण्याला जाणार आहेत. त्यांच्या या दौ-यामुळं वादाची ठिणगी पेटणार का, पाहूयात हा रिपोर्ट. (uddhav thackeray wife rashmi thackeray thursdat 29 september in thane for tembhi naka devi darshan)

शिवसेनेतला ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष शिगेला पोहोचलाय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या संघर्षाची धग जाणवतेय. आता देवीच्या दरबारातही ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने उभे ठाकणार आहेत. त्यासाठी निमित्त ठरणाराय तो रश्मी ठाकरेंचा ठाणे दौरा. गुरुवारी रश्मी ठाकरे ठाण्यात म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाणार आहेत. ठाण्यातील टेंभी नाका इथल्या अंबामातेचं दर्शन त्या घेणार आहेत. 

अंबामातेच्या दरबारात वादाची ठिणगी?

आनंद दिघेंची देवी, टेंभी नाक्याची देवी, ठाण्याची दुर्गेश्वरी अशा विविध नावांनी ही देवी ओळखली जाते. स्वर्गीय आनंद दिघे यांनी 1978 साली टेंभी नाक्यावर नवरात्रौत्सव सुरू केला. गोरगरीब आणि सामान्य ठाणेकरांना गरबा आणि नवरात्र उत्सवाचा आनंद घेता यावा, यासाठी त्यांनी हा उत्सव सुरू केला. 

यंदा या नवरात्रौत्सवाचं 46 वं वर्ष आहे. टेंभी नाका जय अंबे मंडळावर सध्या एकनाथ शिंदे गटाचा वरचष्मा आहे. मात्र आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांना ठाकरे गटानं ठाणे जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी दिलीय. त्यामुळं रश्मी ठाकरेंच्या दौ-याच्या वेळी अंबेमातेच्या दरबारातच दोन्ही गटांमध्ये पुन्हा खटका उडण्याची शक्यता आहे. मात्र देवीच्या दरबारात कसलंही राजकारण होणार नाही, अशी ग्वाही शिंदे गटाकडून दिली जातेय…

याआधी देखील रश्मी ठाकरेंनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात एन्ट्री केली होती. गणेशोत्सव काळात मंगळागौरीच्या निमित्तानं रश्मी ठाकरे ठाण्यात आल्या होत्या. एकनाथ शिंदे गटाला ठाण्याच्या बालेकिल्ल्यातच काटशह देण्यासाठी ठाकरे गटानं ही नवी रणनीती आखलीय. रश्मी ठाकरे त्यासाठी स्वतः मैदानात उतरल्यात. रश्मी ठाकरे यांच्यापाठोपाठ उद्धव ठाकरे देखील टेंभी नाका नवरात्रौत्सवाला भेट देणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल.





Source link

पुणेकरांची चिंता कायमची मिटणार, चांदणी चौकातील पुल या दिवशी रात्री पाडला जाणार

पुणेकरांची चिंता कायमची मिटणार, चांदणी चौकातील पुल या दिवशी रात्री पाडला जाणार


पुण्यातील चांदणी चौकातील पूल रात्री इतक्या वाजता पाडला जाणार


Updated: Sep 27, 2022, 11:34 PM IST





Source link

बहिणीला मंत्रिपद मिळण्यासाठी जीव कासावीस, प्रीतम म्हणतात, ‘आमच्या पंकजाताईला…’

बहिणीला मंत्रिपद मिळण्यासाठी जीव कासावीस, प्रीतम म्हणतात, ‘आमच्या पंकजाताईला…’


बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) गेल्या काही दिवसांमागे नाराज असल्याचं बोललं जात होतं. पक्षाअंतर्गतच त्यांचं खच्चीकरण होत असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात होत होत्या. अशातच भाजपच्या खासदार प्रीतम मुंडेंनी (MP Preetam Munde) पंकजा मुंडे यांना पालकमंत्री करण्याची मागणी केली आहे. (MP preetam munde statement on pankaja munde)

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई (Ambajogai) येथे आयोजित “समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद”  या कार्यक्रमामध्ये बोलताना प्रीतम मुंडेंनी हे वक्तव्य केलं आहे. प्रीतम मुंडे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. यादरम्यान बोलताना, पंकजा मुंडे पालकमंत्री असताना गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग (National highway) आले, रेल्वे (Raiway) आली, महत्त्वाचे उद्योग आले. आता पुन्हा पंकजाताई पालकमंत्री झाल्या तर उरलेला विकासही पूर्ण होईल, प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर (Guardian Minister list 2022) केली त्यामध्ये अतुल सावेंकडे बीडचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे. त्यासोबतच त्यांच्याकडे जालना जिल्ह्याचंही पालकमंत्रीपद दिलं आहे. याच कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडे यांनी थेट पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) आव्हान देणार वक्तव्य केलं आहे. 

पंकजा मुंडे यांनी काँग्रेस (Congress) पक्षात वंशवादाचं राजकारण सुरु असल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मी सुद्धा वंशवादाचं प्रतीक आहे मात्र मला कोणी संपवू शकत नाही, मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य राज्यभर चर्चेत आलं आहे. 

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार, गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव, दादा भुसे- नाशिक, संजय राठोड- यवतमाळ, वाशिम, सुरेश खाडे- सांगली, 

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव), रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग, अब्दुल सत्तार- हिंगोली, दीपक केसरकर -मुंबई शहर, कोल्हापूर, अतुल सावे – जालना, बीड, शंभूराज देसाई – सातारा, ठाणे, मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर





Source link

Video : स्कूलबसमधल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर?

Video : स्कूलबसमधल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर?



हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. सकाळी पावणेसातच्या सुमारास ग्रीन सिटी संकुलात विद्यार्थ्यांनी भरलेल्या या बसला अपघात झाला. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp