by Hansraj Agrawal | Oct 3, 2022 | Trending News
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : (Navratri 2022) साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या (Nashik) नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी मंदिरात प्राण्यांच्या बळी देण्यास परवानगी देऊ अशी माहिती महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाला दिली. यामुळे 2017 च्या राज्य सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे.
(saptashrungi devi temple) सप्तश्रृंगी मंदिर परिसरात पशुबळी देण्यावर राज्य सरकारने 2107 मध्ये बंदी लादली होती. राज्य सरकारच्या या आदेशाला आदिवासी विकास संस्थेने 2019मध्ये आव्हान दिले होते. न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला आणि आरएन लड्ढा यांच्या खंडपीठाने ही याचिका निकाली काढली.
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, मंदिर ट्रस्ट तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी केलेली व्यवस्था पाहता याचिकेचा उद्देश टिकत नाही असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. 2016 मध्ये झालेल्या गोळीबारात 12 जण जखमी झाल्यानंतर 2017 मध्ये पशुबळीवर बंदी घालण्याचा आदेश पारित झाला आणि या आदेशाला विरोध करणारी याचिका 2019 मध्ये दाखल करण्यात आली होती. अपघाती गोळीबाराच्या घटनेमुळे लोकांना दुखापत झाली आणि त्यामुळे बंदी लादण्यात आली, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
या अटीवर सरकारने दिली परवानगी
मात्र, अनादी काळापासून आदिवासी आणि इतर समाज बकऱ्यांचा बळी देत आले आहेत आणि हा विधी त्यांच्या धर्माचा अविभाज्य भाग आहे. जर हा पशुबळी दिला नाही तर अशुभ मानले जाते. पशुबळीवरील बंदी उठवण्यासाठी अधिकाऱ्यांना अनेक निवेदने देण्यात आली.
अधिक वाचा : “सचिन वाझे महिन्याला मातोश्रीवर 100 कोटी रुपये पाठवायचा”
ट्रस्टने विधीच्या वेळी केवळ सहा व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी आणि फक्त एका बकऱ्याचा बळी द्यावा, असा प्रस्ताव आम्ही सादर केला असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान राज्य सरकारने पशुबळीला परवानगी देऊ मात्र इतर कोणत्याही विधींना परवानगी न देणार नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. त्यानंतर न्यायालयाने राज्याची भूमिका मान्य करत याचिका निकाली काढली.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 2, 2022 | Trending News
Pune: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknat Shinde) यांनी जीवे मारण्याची धमकी (threatened) देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknat Shinde) यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर मोठी गोंधळ उडाला अशातच आता एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करण्याच्या कटाची खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या इसमास लोणावळा पोलिसांनी केली अटक आहे.
अजय वाघमारे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मूळचा आटपाडीचा रहिवासी असलेला वाघमारे हा मुंबईला जात असताना लोणावळ्यातील एका धाब्यावर जेवण करण्यासाठी थांबला होता. हॉटेल मालकाने त्याला दहा रुपयाची पाण्याची बॉटल पंधरा रुपयाला दिली. हॉटेल मालकाला धडा शिकवण्यासाठी वाघमारे याने केला होता. पोलिसांना खोटा कॉल केल्याची माहिती आहे.
पोलिसांना खोटी माहिती देऊन यंत्रणेची धावपळ उडवणाऱ्या वाघमारेवर लोणावळा शहर पोलिसात विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलेल्या धमकीनंतर गुप्तचर विभागाने तपास सुरु केला होता, त्यानंतर आता अजय वाघमारे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
सर्वात मोठी बातमी : “आत्मघातकी स्फोटानं एकनाथ शिंदे यांना उडवणार”
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री असताना देखील एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्याकडून धमकी देण्यात आली होती. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी वेळीच आरोपीच्य़ा मुसक्या आवळल्या आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 2, 2022 | Trending News
building collapses in Navi Mumbai : नवी मुंबईमधील बोनकोडे गावातील चार मजली इमारतीचा एक भाग कोसळला.
Updated: Oct 2, 2022, 08:17 AM IST
Source link
by Hansraj Agrawal | Oct 1, 2022 | Trending News
पुढील
बातमी
ओव्हरहेड वायरला हात लावता क्षणीच…,पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार
Source link
by Hansraj Agrawal | Sep 30, 2022 | Trending News
शिंदेंच्या मंत्रीमंडळातील या मंत्र्याच्या परस्पर काळाबाजार, पोलखोल होताच मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
Updated: Sep 30, 2022, 08:58 PM IST
Source link
by Hansraj Agrawal | Sep 30, 2022 | Trending News
प्रो लीग चाचणीसाठी जाहीरात दिली, खेळाडूंनी पैसे भरले, पण… लाखो रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार
Updated: Sep 30, 2022, 03:08 PM IST
Source link