महाराष्ट्रात होणाऱ्या राजकीय भूकंपाची दिल्लीत तयारी! ठाकरे बंधूंच्या युतीबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा?

महाराष्ट्रात होणाऱ्या राजकीय भूकंपाची दिल्लीत तयारी! ठाकरे बंधूंच्या युतीबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा?


No match is being played.

Aug 04, 2025 | 3rd T20

Pakistan and West Indies in USA, 3 T20I Series, 2025

PAK

(20 ov) 189/4

VS

WI

176/6(20 ov)

Pakistan beat West Indies by 13 runs
Full Scorecard →

Aug 03, 2025 | 2nd T20

Pakistan and West Indies in USA, 3 T20I Series, 2025

PAK

(20 ov) 133/9

VS

WI

135/8(20 ov)

West Indies beat Pakistan by 2 wickets
Full Scorecard →

Aug 01, 2025 | 1st T20

Pakistan and West Indies in USA, 3 T20I Series, 2025

PAK

(20 ov) 178/6

VS

WI

164/7(20 ov)

Pakistan beat West Indies by 14 runs
Full Scorecard →





Source link

महाराष्ट्रातील शाळेत पहिली-दुसरीच्या पुस्तकातील ‘बर्ड्स कॅन फ्लाय’ कवितेमुळे गोंधळ, काय आहे नेमकं प्रकरण?


Same poem Controversy: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) यांनी तयार केलेल्या पुस्तकातील कवितेमुळे गोंधळ निर्माण झालाय. पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये एकच कविता दिसून येतेय. ‘बर्ड्स कॅन फ्लाय’ असे या कवितेचे नाव आहे. यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यंदा प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईच्या धर्तीवर नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. मात्र, या नवीन पुस्तकांमध्ये ही कविता दोन्ही वर्गांमध्ये जशीच्या तशी समाविष्ट करण्यात आल्याने यामागील हेतू आणि नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एकच कविता, फक्त चित्रात बदल?

‘बर्ड्स कॅन फ्लाय’ ही कविता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 28 वर आहे. तर दुसरीच्या पाठ्यपुस्तकात तीच कविता पान क्रमांक 16 वर आहे. विशेष म्हणजे, दोन्ही ठिकाणी कवितेचा मजकूर एकसमान आहे; केवळ त्यासोबतच्या चित्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. या कवितेची पुनरावृत्ती दोन्ही वर्गांमध्ये का झाली?, याबाबत बालभारतीकडून कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही. यामुळे पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये याबाबत नाराजी आणि गोंधळाचे वातावरण आहे.

पालकांचा संभ्रम आणि प्रश्न काय?

पालकांचे म्हणणे आहे की, दोन वेगवेगळ्या वर्गांसाठी एकच कविता समाविष्ट करणे यातून पाठ्यपुस्तक निर्मितीतील निष्काळजीपणा दिसून येतो. एका पालकाने सांगितले, “पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेगळा असायला हवा. एकच कविता दोन्ही वर्गांत समाविष्ट करून मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे मुलांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मर्यादित होते.” दुसऱ्या एका पालकाने प्रश्न उपस्थित केला की, “ही कॉपी-पेस्टची चूक आहे की बालभारतीची ही काही खास रणनीती आहे? याबाबत स्पष्टता हवी.

सीबीएसईच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम?

यंदा प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि सीबीएसईच्या धर्तीवर एकात्मिक पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. या नवीन अभ्यासक्रमात भाषा, गणित, इंग्रजी आणि ‘खेळू, करू, शिकू’ या विषयांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. या अंतर्गत, इंग्रजी विषयाच्या अध्ययन निष्पत्तींमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्द, अक्षरे, त्यांचे उच्चार, कविता गायन, साध्या सूचना समजणे आणि स्वतःबद्दल बोलणे यासारख्या कौशल्यांचा समावेश आहे. मात्र, ‘बर्ड्स कॅन फ्लाय’ ही कविता दोन्ही वर्गांमध्ये समाविष्ट झाल्याने या एकात्मिक दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बालभारतीची भूमिका काय?

बालभारतीकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. ही कविता दोन्ही वर्गांमध्ये समाविष्ट करण्यामागे काही शैक्षणिक हेतू आहे की ही निव्वळ चूक आहे, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. काही शिक्षकांचे मत आहे की, ही कविता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी मूलभूत इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असू शकते, परंतु दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी तीच कविता पुन्हा समाविष्ट करणे अनावश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शिकण्यातील उत्साह आणि आव्हान कमी होऊ शकते.

FAQ

पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकांमध्ये एकच कविता का समाविष्ट आहे?

‘बर्ड्स कॅन फ्लाय’ ही कविता पहिलीच्या पाठ्यपुस्तकात (पान क्रमांक 28) आणि दुसरीच्या पाठ्यपुस्तकात (पान क्रमांक 16) समाविष्ट आहे. यामागे बालभारतीचा काही शैक्षणिक हेतू आहे की ही चूक आहे, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

या कवितेत काय बदल आहे?

दोन्ही वर्गांमधील कवितेचा मजकूर एकसमान आहे. केवळ कवितेसोबत असलेल्या चित्रांमध्ये बदल करण्यात आला आहे.

ही कविता दोन्ही वर्गांमध्ये समाविष्ट करण्यामागील कारण काय आहे?

बालभारतीने याबाबत कोणतेही स्पष्ट कारण दिलेले नाही. ही कॉपी-पेस्टची चूक असावी किंवा काही शैक्षणिक उद्दिष्ट असावे, याबाबत माहिती नाही. पालक आणि शिक्षकांनी याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

यंदा अभ्यासक्रमात काय बदल झाले आहेत?

यंदा प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) आणि सीबीएसईच्या धर्तीवर एकात्मिक पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये भाषा, गणित, इंग्रजी आणि ‘खेळू, करू, शिकू’ या विषयांचा समावेश आहे.





Source link

'बंद करा, बंद करा' मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला सुरुवात अन् प्रेक्षकांतून घोषणाबाजी; महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारावेळी नेमकं काय घडलं?

'बंद करा, बंद करा' मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला सुरुवात अन् प्रेक्षकांतून घोषणाबाजी; महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारावेळी नेमकं काय घडलं?


Khalid Ka Shivaji Cinema Controverversy: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा नुकताच वरळीत पार पडला. राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 या पुरस्काराने गजलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच, २०२४ चा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर 2024 चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना देण्यात आला. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत असताना 2 प्रेक्षकांनी घोषणाबाजी केली. यामुळे थोडावेळ कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला

मुख्यमंत्री भाषण करायला गेले आणि…

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पार पडले. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाला उभे असताना प्रेक्षागृहातून दोन इसम उभे राहिले आणि मोठमोठ्याने घोषणा देऊ लागले. या इसमांच्या हातामध्ये फलक होते. ‘बंद करा. बंद करा. इतिहासाचे विकृतीकरण बंद करा’ अशा घोषणा ते देत होते. यानंतर काही क्षणातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. ‘आम्ही तुमचं म्हणणं ऐकून घेतलंय. कार्यक्रम खराब करु नका.’  या दोन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

काय आहे नेमकं प्रकरण?

‘खालिद का शिवाजी’ बंद करा अशी घोषणाबाजी 2 इसमांनी केली. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. पण सिनेमा प्रदर्शनाआधीच वादात सापडलाय. चित्रपट महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोरच घोषणाबाजी केल्याने या सिनेमाची पुन्हा चर्चा झाली.

ते कोणत्या संघटनेचे?

घोषणा देणारे ते दोघे कोणत्या संघटनेचे होते? याची माहिती समोर आली नाही  असे असले तरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. 

‘खालिद का शिवाजी’ला कोणाचा विरोध?

मराठी चित्रपट ‘खालिद का शिवाजी’ येत्या 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सकल हिंदू समाज आणि हिंदू जनजागृती समिती यांसारख्या हिंदू संघटनांनी या चित्रपटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवणे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला आहे. या वादामुळे मुंबई पोलिसांनी सकल हिंदू समाजाच्या व्हॉट्सअॅप गटाच्या प्रशासकाला नोटीस बजावली आहे, ज्यामुळे हा वाद आणखी तीव्र झाला आहे.

वादाचे कारण काय?

‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित काही दाव्यांवरून वाद निर्माण झाला आहे. हिंदू संघटनांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात खालील बाबी चुकीच्या पद्धतीने दाखवल्या गेल्या आहेत:  35% सैन्य मुस्लिम होते: चित्रपटात दाखवले आहे की, शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुस्लिम सैनिक होते.  शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर मशीद बांधल्याचा दावा.  यात करण्यात आल्याचा आरोप आहे. शिवाजी महाराजांचे 11 अंगरक्षक मुस्लिम होते, असा उल्लेख, असल्याचा ठपकादेखील ठेवण्यात आलाय. 

हिंदू जनजागृती समितीचं म्हणणं काय? 

हिंदू जनजागृती समितीने या दाव्यांना ऐतिहासिक आधार नसलेले आणि खोटे ठरवत चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे. त्यांचा असा दावा आहे की, शिवाजी महाराजांनी ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले, आणि त्यांना धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) दाखवणे हे इतिहासाचे विकृतीकरण आहे.या संघटनेने चित्रपटात खोटा इतिहास दाखवून हिंदूंच्या मनात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर आंदोलनाची हाक दिली, ज्यामुळे मुंबई पोलिसांना नोटीस जारी करावी लागली.  या संघटनेने चित्रपटातील दावे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आणि धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ‘पद्मावत’ आणि ‘जोधा अकबर’ यांसारख्या चित्रपटांना झालेल्या विरोधाचा दाखला देत ‘खालिद का शिवाजी’वर बंदीची मागणी केली आहे.





Source link

Pune News : पुण्यात IT क्षेत्रातील नोकरदारांना मोठा दिलासा; प्रशासनाचा आराखडा एकदा पाहाच

Pune News : पुण्यात IT क्षेत्रातील नोकरदारांना मोठा दिलासा; प्रशासनाचा आराखडा एकदा पाहाच


Pune News : मागील काही वर्षांमध्ये बंगळुरूप्रमाणंच पुण्यामध्येसुद्धा देशभरातून IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक तरुण वर्गानं मुक्काम ठोकला. पुण्याच्या हिंजवडी, खराडी, मगरपट्टा या आणि अशा इतर भागांमध्ये असणाऱ्या आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येनं पुणे आणि पुण्याबाहेरी मंडळी नोकरीसाठी रुजू असून, राज्याबाहेर अनेक नोकरदारही पुण्यासह पुण्यानजीकच्या भागात स्थायिक होताना दिसत आहेत. मात्र त्यांच्यापुढं असणाऱ्या अनेक समस्या आणि कंपन्यांपुढं असणाऱ्या काही अडचणी पाहता एकिकडे आयटी पार्कच्या स्थलांतराची चर्चा जोर धरत असतानाच दुसरीकडे पुणे प्रशासनानं त्यावर तोडगा काढण्याच्या हेतूनं पावलं उचलल्याचं पाहायला मिळत आहे. (Pune Job News)

पुणे महानगरपालिकेचा मेगाप्लान? 

पुणे प्रशासनाच्या वतीनं पुणे मगानगर परिवहन महामंडळाच्या वतीनं प्रामुख्यानं (Pune IT Jobs) हिंजवडी, खराडी आणि आयटी पार्कच्या दिशेनं असणाऱ्या भागासाठी डबलडेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, पुण्यातील वाहतूक व्यवस्थेमध्ये केल्या जाणाऱ्या या प्रयोगाचा शुभारंभ या आयटी हबपासूनच केला जाणार आहे. 

पुणे आणि पिंपरी चिंचवडचा भाग पाहता तिथं हिंजवडी, मगरपट्टा, खराडी, हडपसर यांसारख्या भागांमध्ये आयटी क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या बड्या संस्थांची कार्यालयं असून, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधांच्या अभावी या संस्थांना कैक अडचणींचा सामना करावा लागत होता. ज्यामुळं कंपन्यांनी येथून गाशा गुंडाळण्याची तयारी दाखवली असता तातडीनं या भागामध्ये पर्यायी उपाययोजनांवर प्रशासनानं काम सुरू केल्याचं पाहायला मिळालं.

वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा निघणार? 

पुण्यात, प्रामुख्यानं आयटी क्षेत्रातील कार्यालयांच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुशं कर्मचारी वर्गापुढं उभ्या राहणाऱ्या अडचणी पाहता, इथं डबल डेकर बससेवा सुरू केल्या जाणार आहेत. ज्याअंतर्गत एका खासगी कंपनीच्या पथकाकडून या भागांची पाहणी करत तिथं प्रायोगिक तत्त्वावर पुणे महानगर परिवहनच्या वतीनं डबल डेकर बस चालवण्यात येणार आहे. तेव्हा आता प्रशासनानं शोधलेल्या या पर्यायाचा आयटी कंपन्या, तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि मागोमाग पुणेकरांनाही नेमका कसा आणि किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

FAQ

पुणे महानगरपालिका डबल डेकर बससेवा का सुरू करत आहे?
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आयटी हब्स जसे की हिंजवडी, खराडी, मगरपट्टा आणि हडपसर येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि आयटी कर्मचाऱ्यांना प्रवासात सुविधा देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) डबल डेकर बससेवा सुरू करत आहे.

ही बससेवा कोणत्या भागात चालवली जाणार आहे?
ही सेवा प्रामुख्याने आयटी हब्स असलेल्या हिंजवडी, खराडी, मगरपट्टा आणि हडपसर या भागांमध्ये चालवली जाणार आहे, जिथे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे.

डबल डेकर बससेवा कधी सुरू होणार आहे?
ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर लवकरच सुरू होणार आहे. यासाठी एका खासगी कंपनीच्या पथकाकडून येत्या आठवड्यात पाहणी केली जाईल आणि त्यानंतर बससेवेचा शुभारंभ होईल.





Source link

शिंदेंच्या शिवसेनेवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप; यादी वाचून नेत्यांनाच बसला धक्का

शिंदेंच्या शिवसेनेवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप; यादी वाचून नेत्यांनाच बसला धक्का



आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांना निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षांमध्ये मोठ्याप्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. विधानसभा निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेतही प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
 



Source link

मुंडेंमुळे भुजबळ वेटींग लिस्टवर! शासकीय बंगल्यावरुन अजित पवारांचे आजी-माजी मंत्री आमने-सामने

मुंडेंमुळे भुजबळ वेटींग लिस्टवर! शासकीय बंगल्यावरुन अजित पवारांचे आजी-माजी मंत्री आमने-सामने


Dhananjay Munde: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात वाल्मीक कराड यांचे नाव मुख्य आरोपी म्हणून पुढे आल्याने राज्याचे तात्कालीन अन्न व नागरीपुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा दिल्यानंतर तब्बल साडेचार महिने उलटले तरी धनंजय मुंडे यांनी मुंबईतील ‘सातपुडा’ हा शासकीय बंगला अद्याप रिकामा केलेला नाही. दरम्यान त्यांच्यावर लागलेली दंडाची रक्कम 42 लाख रुपयांवर पोहोचली आहे.

मुंबईतील मलबार हिल परिसरात असलेला ‘सातपुडा’ बंगला माजी मंत्र्यांच्या वापरासाठी देण्यात आला होता. परंतु नियमांनुसार मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर केवळ 15 दिवसांपर्यंत हा बंगला वापरण्याची परवानगी असते. त्यानंतर निवास सुरू ठेवण्यासाठी सरकारकडून मंजुरी घ्यावी लागते अन्यथा दंड आकारला जातो.

सातपुडा बंगल्याचे एकूण क्षेत्रफळ 4667 चौ. फूट असून, नियमानुसार त्यावर प्रतिमहिना 200 रुपये प्रति चौ. फूट दराने दंड आकारला जातो. त्यामुळे एकूण दंड रक्कम महिन्याला 9.33 लाख रुपये इतकी ठरते. साडेचार महिन्यांपासून धनंजय मुंडे यांनी बंगला न रिकाम्या केल्यामुळे दंडाची एकूण रक्कम सध्या 42 लाख रुपयांपर्यंत गेली आहे अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

धनंजय मुंडे काय म्हणाले? 

धनंजय मुंडे यांनी म्हटले की, माझे आरोग्य सध्या ठीक नाही. त्यामुळे मुंबईत राहणे आवश्यक आहे. त्यासोबतच माझ्या मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे. यामुळे मी निवासस्थान रिक्त करण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे. तसेच, त्यांनी असा दावा केला की, यापूर्वी अनेक माजी मंत्र्यांना अशा प्रकारे मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, सध्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना अद्याप अधिकृत निवासस्थान मिळालेले नाही. ते ‘सातपुडा’ बंगल्याच्या गृहप्रवेशाची प्रतीक्षा करत आहेत. यावरून शासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

दंड माफ होऊ शकतो का? 

प्राथमिक माहितीनुसार, दंड माफ करण्याचा विशेषाधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मागील अनेक प्रकरणांमध्ये दंड माफ करण्यात आले आहेत. त्यामुळे ‘सातपुडा’ प्रकरणातही दंड माफ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात होणारे आरोप-प्रत्यारोप त्यातून होणाऱ्या राजीनाम्यांनंतरही काही माजी मंत्री नियम पाळत नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp