by Hansraj Agrawal | Dec 12, 2025 | Trending News
Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या 90 हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली. या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशा नऊ जणांचे निलंबन करण्यात आले.
परवानगीपेक्षा 90 हजार ब्रास अधिक उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणीत निष्पन्न झाले असून, यावर फौजदारी व महसूली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आमदार सुनील शेळके यांनी मावळ येथील उत्खनन गैरव्यवहाराबाबत आज विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. उत्खनन प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली असून, अधिकारी आठ महिने टाळाटाळ करत अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शेळके यांनी केला होता.
Add Zee News as a Preferred Source
विभागीय आयुक्तांच्या चौकशीत निष्पन्न
महसूल मंत्र्यांनी सांगितले की, विभागीय आयुक्तांनी दोनदा चौकशी केली. गट क्रमांक 36, 37, आणि 38 मध्ये खाणपट्टे मंजूर होते, मात्र 35, 41, 42, आणि 46 या गट क्रमांकांवरही गौण खनिजाचे तात्पुरत्या स्वरूपाचे उत्खनन झाले आहे. ईटीएस मोजणीमध्ये 3 लाख 63 हजार ब्रासची परवानगी असताना तब्बल 4 लाख 54 हजार ब्रास उत्खनन झाल्याचे आढळले. म्हणजेच, 90 हजार ब्रास जास्तीचे उत्खनन झाले आहे.
निलंबित अधिकाऱ्यांची नावे
गैरव्यवहारात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तलाठी (२): दीपाली सनगर आणि गजानन सोटपल्लीवार. मंडळ अधिकारी (४): संदीप बोरकर, माणिक साबळे, अजय सोनवणे आणि रमेश कदम. तहसीलदार (४): जोगेंद्र कटियार, मनजीत देसाई, मधुसूदन बारगे, विक्रम देशमुख. (या काळात कार्यरत असलेले चार तहसीलदार.)
90 हजार ब्रास जादा उत्खननासाठी संबंधितांवर गुन्हा दाखल करणे, दंड आकारणी करणे, सातबारा उताऱ्यावर नोंदी घेणे आणि दंड न भरल्यास व्याजासह वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निलंबित अधिकाऱ्यांची तीन महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल आगामी अधिवेशनात पटलावर ठेवला जाईल, असे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.
वनिकरणाचा मुद्दा
आमदार शेळके यांनी वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात उत्खनन झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर बोलताना महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ती खाजगी जमीन आहे. गुगल इमेजमध्ये फक्त 15 झाडे होती आणि ती तोडण्यासाठी परवानगी घेण्यात आली होती. महसूल मंत्र्यांनी सांगितले की, वन अधिकाऱ्यांनी हा ‘फॉरेस्ट झोन’ नसल्याचे लेखी कळवले आहे, म्हणूनच खाणपट्ट्याला परवानगी मिळाली. तथापि, पीएमआरडीएच्या प्रस्तावीत विकास आराखड्यात (Proposed DP) ही जमीन खाजगी वनीकरणासाठी राखीव दर्शवण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहिती असल्यास स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करण्याची तयारी मंत्र्यांनी दर्शविली.
मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यभरातील अवैध उत्खननाला लगाम लावण्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावाचा ईटीएस सर्वे सुरू करण्यात आला आहे. यामुळे किती परवानग्या दिल्या आणि किती अवैध उत्खनन झाले, याची माहिती मिळेल व त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 12, 2025 | Trending News
Mumbai Metro 12: मुंबईसह संपूर्ण महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. मुंबई शहरासह ठाणे, कल्याण येथेही मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. एमएमआरडीएमार्फत उभारल्या जात असलेल्या मुंबई मेट्रो लाइन-12 (कल्याण ते तळोजा) प्रकल्पानं एक मोठी कामगिरी पूर्ण केली आहे. शिळफाटा रोडवरील डोंबिवली एमआयडीसी मेट्रो स्थानकाजवळ 100 वा U गर्डर यशस्वीरित्या लाँच करण्यात आला आहे. या मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामात हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून यामुळं प्रकल्पाला आणखी गती मिळणार आहे.
Add Zee News as a Preferred Source
कल्याण ते तळोजा मेट्रो मार्ग हा सुमारे 23.57 किमी लांबीचा उन्नत मार्ग असून या मार्गिकावर 19 मेट्रो स्थानके असणार आहेत. या मार्गिकेमुळं कल्याण, डोंबिवली, तळोजा आणि पुढे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणार आहे. या मार्गिकेमुळं ठाणे ते नवी मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ व जलद पद्धतीने होणार आहे. तसंच, कळवा ते तळोजा परिसरातील ट्रान्झिस्ट-ओरिएंडेट विकासालाही चालना मिळणार आहे.
कळवा-शिळफाटा तळोजा मार्गाला समांतर असणारा हा कॉरिडॉर तब्बल 7 किमी MSRDC फ्लायओव्हरच्या एकत्रित रचनेसह उभा राहतोय. यात कोळेगावजवळील 100 मीटर मोकळा स्पॅन. महत्त्वाच्या रेल्वे आणि ROB क्रॉसिंग्ज तसंच, 21-23 मीटर उंचीवरील उन्नत स्थानक अशा अभियांत्रिकी कौशल्याच्या अनेक विशेष स्पॅनचा या प्रकल्पात समावेश असेल. ही मेट्रो मार्गिकेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण इंटरजेंचमुळं खालील मार्गाशी सहज जोडले जातील. कळवा मेट्रो लाइन 5, मेट्रो लाइन 14, अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो लाइन 1 तसंच कळवा जंक्शनला सेंट्रल रेल्वेशी थेट एका पुलाद्वारे जोडले जाणार आहेत. हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
कशी असेल मेट्रो 12
मेट्रो लाईन 12 चा जोड कल्याण, डोंबिवली एमआयडीसी, कल्याण ग्रोथ सेंटर, वडवली, तुर्भे, पिसारवे, तळोजा आणि आमंडूटमार्गे होणार आहे. निलजे येथे सुमारे 31 हेक्टर क्षेत्रावर समर्पित डेपो नियोजित आहे. हा मार्ग प्रवासाचा सध्याचा कालावधी 50% ते 75% पर्यंत कमी करेल, जो रस्त्याच्या परिस्थितीनुसार ठरेल.
इंटरचेंजिंग स्थानके:
कळ्याण (मेट्रो लाईन 5: ठाणे-भिवंडी–कळ्याण)
हेदूतने (मेट्रो लाईन 14: विक्रोळी-बदलापूर)
आमंडूट (नवी मुंबई मेट्रो लाईन 1)
Source link
by Hansraj Agrawal | Dec 11, 2025 | Trending News
ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेसेना आमदार महेंद्र दळवी यांच्यावर कॅश बॉम्ब टाकला आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.. मात्र या कॅश बॉम्बनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादाचा भडका उडालाय. सुनील तटकरेंनी महेंद्र दळवींवर केलेल्या टीकेनंतर दळवी यांनी थेट सुनील तटकरेंचेच व्हिडिओ बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.
Add Zee News as a Preferred Source
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब टाकल्यानंतर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच वादाच भडका उडालाय… अंबादास दानवेंनी व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी या प्रकरणात सुनील तटकरेंना ओढत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधल्यानंतर तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत आमदार दळवींवर शालजोडीतील टोले हाणले.. आणि यानंतर संतापलेल्या आमदार महेंद्र दळवी यांनी आता सुनील तटकरेंना इशारा दिलाय… तटकरेंचे अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत. हे व्हिडिओ बाहेर आले तर ते तोंड दाखवू शकणार नाहीत असा इशारा दळवींनी तटकरेंना दिलाय…
तर अशा पोकळ धमक्या देण्यापेक्षा तुम्ही जे काय असेल ते जनतेसमोर आणा असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमेल मिटकरी यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर पलटवार केलाय.
अंबादास दानवे यांनी महेंद्र दळवींचा व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर दळवी यांनी दानवे यांच्यासोबत सुनील तटकरे यांच्यावर हा व्हिडिओ पुरवल्याचा आरोप केला होता. आणि त्यानंतर तटकरेंनी दळवींवर खोचक टीका केल्यानंतर दळवींनी तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढण्याचा इशारा दिला..
तर अंबादास दानवेंनी महेंद्र दळवींच्या ट्विट केलेल्या व्हिडिओ वरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनाचा समाचार घेतलाय.. आता मॉर्फिंगचा धंदा सुरू झालाय… बाकी सगळे धंदे बंद झाल्याचं म्हणत शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केलाय..
तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू झालेल्या वादावरून उद्धव ठाकरेंनी महायुतीवर हल्लाबोल केलाय. महायुतीमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाहीय.. मित्र मित्र म्हणून एकमेकांवर धाडी टाकण्याचं आणि एकमेकांची प्रकरणं बाहेर आणण्याचं काम सुरू असल्याचं म्हणज उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय
अंबादास दानवेंनी पैशांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ ट्विट करत
आमदार महेंद्र दळवींना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच वादाचा भडका उडालाय… सुनील तटकरे यांनी महेंद्र दळवींवर टीका केल्यानंतर आता महेंद्र दळवी यांनी तटकरेंचेच व्हिडिओ बाहेर काढण्याचा इशारा दिलाय.. त्यामुळे पुढल्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 11, 2025 | Trending News
Aditya Thackeray Plays With Amit Thackeray Son: असं म्हणतात की, लहान मुलं पाहिली, की त्यांच्या बालक्रीडा नकळत आपल्यालासुद्धा लहानगं होण्यास भाग पाडतात. हा व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसेल…
Source link
by Hansraj Agrawal | Dec 10, 2025 | Trending News
IT Park now the Ctriple IT center : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क मधील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्रात दोन नवीन आयटी पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. एक आयटी पार्क पुरंदर येथे तर दुसरे आयटी पार्क सातारा जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. साताऱ्यात राज्यात तिसरे मोठ्या IT पार्क उभारण्याआधी 1,15,00,00,000 रुपयांचे ट्रेनिंग सेंटर उभारले जाणार आहे.
Add Zee News as a Preferred Source
साताऱ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲन्ड ट्रेनिंग सेंटर उखखखढ (‘सीट्रिपलआयटी’) स्थापन केले जामार आहे. या संदर्भातील प्रस्ताव टाटा टेक्नॉलॉजीजने राज्य सरकारकडे सादर केला आहे. हा प्रकल्प 115 कोटी रुपयांचा आहे. यासंदर्भात कंपनीने मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून प्रकल्पाची माहिती दिली आहे. सातारा शहर लवकरच आयटी हब म्हणून उदयास येणार आहे. सातारा आयटी पार्क प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. लिंब खिंड नागेवाडी परिसरात हे नवे आयटी पार्क उभारले जाणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांन या IT पार्कच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
साताऱ्यात IT पार्क उभारण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरु असतानाच आयटी सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टाटा टेक्नॉलॉजीजच्या सीआयआयआयटी प्रस्तावामुळे येथील आयटी पार्कला आणखी बळकटी येणार आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने केंद्र मंजुरीचे पत्र राज्य शासनाला पाठवले असून टाटा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून सातारा येथे लवकरत हे नवीन केंद्र उभारले जाणार आहे.
या नव्या ‘सीट्रिपल आयटी’ सेंटरमुळे सातारा जिल्ह्यातील तरुणांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र मंजुरीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल शिवेंद्रराजे यांनी दोघांचेही आभार मानले आहेत.
उद्योगक्षेत्रात तंत्रज्ञानाच्या जलद बदलामुळे कौशल्याधारित प्रशिक्षणाची गरज वाढली आहे. सध्याची व्यावसायिक प्रशिक्षण प्रणाली स्पर्धात्मक उद्योगमानकांशी जुळत नसल्याचे टाटा टेक्नॉलॉजीजने नमूद केले आहे. तंत्रज्ञानातील प्रगती, नवीन मॉडेल्स आणि उद्योग 4.0 कौशल्यांमुळे रोजगार संधी बदलत आहेत, परंतु विद्यमान शैक्षणिक पद्धती मागे पडत असल्याने कुशल मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या सीआयआयआयटी सेंटरमुळे नवा बदलाव येणार आहे.
टाटा टेक्नॉलॉजीजने कर्नाटक, तामिळनाडू, बिहार आणि आसाम या राज्यांत असे कौशल्यविकास केंद्र यशस्वीरीत्या उभारले आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली येथेही राज्य सरकारच्या सहकार्याने असेच प्रकल्प राबवले आहेत. आता साताऱ्यात उद्योग 4.0 कौशल्यांसाठीच्या प्रशिक्षणाची उणीव भरून काढण्यासाठी सीआयआयआयटी उभारण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. या केंद्रामध्ये अत्याधुनिक उपकरणे, प्रयोगशाळा, सुविधा उन्नतीकरण, अभ्यासक्रम पुनर्रचना व नवीन तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा समावेश होणार आहे. हे केंद्र सुरू झाल्यावर दरवर्षी सुमारे 3000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रस्तावित प्रकल्पाची एकूण रक्कम 115 कोटी असून, त्यातील 15 टक्के हिस्सा साताऱ्यातून उभारला जाईल. उर्वरित खर्च टाटा टेक्नॉलॉजीज व उद्योग भागीदार उचलणार असल्याचे या संदर्भातील पत्रात नमूद आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 10, 2025 | Trending News
Uday Samant Big Claim: महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसंदर्भात त्यांनी मोठा दावा केला आहे. जर हा दावा खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
Add Zee News as a Preferred Source
उदय सामंत यांचा दावा काय?
नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आहेत. यादरम्यान एकमेकांवर टीकेचे बाण सोडत आरोप-प्रत्युत्तर, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्याच उदय सामंत यांनी एक दावा केला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. काही दिवसातच सगळं काही समोर येईल असंही सूचक विधान त्यांनी केलं आहे.
संजय शिरसाट यांनीही केला होता दावा
उदय सामंत यांच्याआधी शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीही असाच एक दावा केला होता. उद्धव ठाकरेंचे 20 पैकी 12 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांना माध्यमांशी केला होता. आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार असल्याचा दावा केल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर देताना हे विधान केलं होतं.
“उद्धव ठाकरेंचे 20 पैकी 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत. मी रोज त्यांच्या संपर्कात आहे, माझं रोज त्यांच्याशी बोलणं होतं. ज्या दिवशी एकनाथ शिंदे झेंडा दाखवतील, ते सगळे आमच्या शिवसेनेत दाखल होतील,” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं होतं.
सगळ्या आमदारांची नावं माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावर त्यांची नावं जाहीरपणे सांगणार असंही त्यांनी म्हटलं होतं. हे सर्व आमदार उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीला कंटाळले असून, लवकरच आमच्या शिवसेनेत येणार आहेत असा दावा त्यांनी केला होता.
Source link