तुमच्या लहान मुलांवर लक्ष ठेवा, बाल्कनीतून तोल जाऊन दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू
जावेद मुलाणी, झी मीडीया, बारामती : श्रीलंकेत एकाच कुटुंबाची सत्ता होती. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, अर्थमंत्री हे एकाच कुटुंबातील होते. श्रीलंकेत सत्तेचं केंद्रीकरण झालं त्यामुळे असंतोष वाढला आणि जनतेचा उद्रेक झाला असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं. बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Sharad Pawar NCP)
श्रीलंकेचं उदाहरण देत असताना आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वातावरणाची नोंद आमच्या देशाच्या राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे असं म्हणत त्यांनी (PM Modi) पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळाकडे आपल्या बोलण्याचा मोर्चा वळवला. (Srilanka Crisis)
सत्ता केंद्रीत जिथे झाली तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतात राष्ट्रीय पातळीवर सत्ता केंद्रीत होते की काय याची शंका लोकांमध्ये निर्माण होते आहे.सध्या आपल्याकडे उद्रेक होण्याची परिस्थिती दिसत नाही पण आपण सावध राहण्याची शक्यता आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
नितीश कुमार, हर घर तिरंगा यांसारख्या मुद्द्यांवर वक्तव्य करताना त्यांनी शिवसेनेचं चिन्हं असणाऱ्या धनुष्यबाणावरून होणाऱ्या वादाकडेही लक्ष वेधलं. हे शिवसेनेचं चिन्ह (Shivsena) असून; यावरून वाद करणे योग्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
‘धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचx चिन्ह काढून घेणं योग्य नाही’, असं म्हणत शरद पवार यांनी जर एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढू शकतात असंही म्हटलं.
आपण काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर वेगळा पक्ष काढला, त्यावेळी चिन्हं घेतलं. त्यांचं चिन्ह आम्ही मागितलं नाही असं उदाहरण देत नको तो वाद वाढवणं शक्य नसल्याचं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांचेच कान टवकारले.
पत्रकारांशी संवाद साधतेवेळी शिंदे- फडणवीस सरकारच्या कॅबिनेट घोषणेनंतर (Maharashtra Cabinate Expansion) संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या मंत्रीपदावरून बराच वाद झाला. पण, त्यासंबंधीच्या प्रश्नावर पवारांनी मात्र मौन बाळगण्यास पसंती दिली.
Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कामाबरोबरच स्वभावामुळे त्यांचे विरोधकांकडूनही नेहमीच कौतुक करण्यात येतं. सरकारमधील त्रुटीबाबतही अनेकदा नितीन गडकरी हे खुलेपणाने भाष्य करतात. असेच काहीसं मत नितीन गडकरी यांनी नागपूरात (Nagpur) व्यक्त केलं आहे.
‘महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स’च्या नागपूर शाखेने आदिवासींच्या आरोग्यासाठी ‘ब्लॉसम’ नावाचा प्रकल्प सुरू केला. त्याचे उद्घाटन करताना नितीन गडकरी यांनी आम्ही मंत्री असल्याने गरीबाच्या कल्याणाला आडवा येणारा कायदा तोडण्याचा अधिकार असल्याचं मत व्यक्त केलं.
“मी महाराष्ट्रात १९९५ मध्ये मंत्री होतो. त्यावेळी मी अनेक रस्ते, पूल मुंबईत बांधले, पण गडचिरोली आणि मेळघाटमध्ये तसं करताना अडचणी आल्या. या भागात कुपोषणामुळे २,००० मुलांचा मृत्यू झाला. तेथील ४५० गावांना रस्ते नव्हते. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. खूप प्रयत्न केले, आयुक्तांनी सांगितलं, मात्र वनविभागाचे अधिकारी रस्तेच बांधू देत नव्हते. त्यामुळे खूप त्रास झाला. या भागात अनेक लोक मागासलेली होती. त्यामुळे वनविभागाने त्रास देऊनही मी माझ्या मार्गाने नंतर प्रश्न सोडवला,” असे नितीन गडकरी म्हणाले.
“गरीबाचं कल्याण करण्यासाठी कुठलाही कायदा आडवा येत नाही. गरीबाच्या कल्याणाला आडवा येणारा कायदा एकदा नाही, तर दहावेळा तोडावा लागला तरी तोडला पाहिजे असं महात्मा गांधींनी सांगितलं आहे. तो कायदा तोडण्याचा अधिकार आमचा आहे, कारण आम्ही मंत्री आहोत,” असं नितीन गडकरींनी सांगितलं.
“मी नेहमी अधिकाऱ्यांना सांगतो की तुम्ही म्हणाल तसे सरकार चालणार नाही. तुम्ही फक्त यस सर म्हणायचं आम्ही म्हटलंय त्याची अंमलबजावणी करायची. आम्ही म्हणू तसं सरकार चालणार. त्या मी सगळे कायदे तोडून 450 गावे जोडली,” असेही नितीन गडकरी म्हणाले.
Investigation Report : लायटिंगचा झगमगाट, बॉलिवूडच्या गाण्यांचा (Bollywood Songs) कानठळ्या बसवणारा आवाज आणि बेभान होऊन नाचणाऱ्या बारबाला, अखंड बरसत असलेला पैशांचा पाऊस. हे चित्र आहे ठाण्यातलं. होय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Ekanth Shinde) ठाण्यातलं… मुख्यमंत्र्यांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे डान्स बार (Dance Bar) धूमधडाक्यात सुरू आहेत.
सगळ्या कायद्यांची पायमल्ली करून आणि नियमांची पार ऐशीतैशी करून हे डान्स बार सुरु आहेत. ठाण्यातील कोपरी, कापूरबावडी, तलावपाळी भागात अगदी पहाटेपर्यंत डान्स बारचा हा धांगडधिंगा सुरू असतो. झी २४ तास इन्व्हेस्टीगेशनच्या टीमनं मध्यरात्र उलटल्यानंतर अँटिक पॅलेस, आयकॉन, आम्रपाली अशा डान्स बारमध्ये धडक मारली तेव्हा तिथे बारबालांचा सर्रास डान्स सुरु होता.
2005 साली तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला. कोर्टानं विशिष्ट अटी आणि शर्ती घालून डान्स बार सुरू करायला पुन्हा परवानगी दिली.
डान्स बारसाठीचे नियम
डान्स बारमध्ये नोटांची उधळण करता येणार नाही
डान्स बारबालांवर नाणी उडवता येणार नाहीत
बारबालांना केवळ टीप देता येईल
सायंकाळी 6.30 ते रात्री 11.30 पर्यंतच डान्स बार सुरू राहतील
बारबालांसोबत डान्स किंवा कोणतंही अश्लील कृत्य करता येणार नाहीत
असे नियम कोर्टानं आणि पोलिसांनी घालून दिलेत. मात्र झी २४ तासच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हे सर्व नियम पायदळी तुडवले जात असल्याचा पर्दाफाश झालाय. अगदी पहाटेपर्यंत डान्स बारची ही दुनिया रंगलेली असते.
कधीकाळी याच डान्स बार विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खळ्ळ खटॅकची आक्रमक भूमिका घेतली होती. रात्रभर सुरू असलेल्या छमछममुळं नागरिकांना त्रास होत असल्यानं त्यांनी स्वतः डान्स बार फोडले होते.
पण आश्चर्याची बाब म्हणजे आता त्यांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे डान्स बार सुरू आहेत. नियमांची अजिबात पर्वा न करता. या डान्स बार मालकांना ना कायद्याची भीती आहे, ना पोलिसांची. कुणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय डान्स बार मालकांची एवढी हिंमतच होणार नाही. डान्स बारवाल्यांची पाठराखण करणारे हे हात कुणाचे? पहाटेपर्यंत सुरू असलेला हा धांगडधिंगा कुणाच्या आशीर्वादानं सुरूय? या डान्स बारना पाठिशी घालणाऱ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता काय कारवाई करणार? हा खरा सवाल आहे..
कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी : नागपूरमध्ये (Nagpur) दोन दिवसांपूर्वी अंधश्रद्धेचा (Superstition) धक्कादायक प्रकार समोर आला होता. सहा वर्षीय मुलीला भूतबाधा झाल्याच्या शंकेने आई-वडिलांनी मुलीची भूतबाधेतून मुक्तता करण्याच्या नावाखाली तिला जबर मारहाण केली. यात सहा वर्षीय मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राल हादरवून सोडले होते.
या क्रूर घटनेचा अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे निषेध नोंदवला आहे. अशातच एका मराठी अभिनेत्रीने लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आपला वाढदिवस स्मशानभूमीतच साजरा केला आहे.
देऊळबंद, बंदी शाळा, पोष्टर गर्ल, अबक, 66 सदाशिव, परफ्युम, भिरकीट या मराठी चित्रपटात बाल भूमीकेसह अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या आर्या घारे (Marathi actress aarya ghare) हिने तिचा वाढदिवस (Birthday) चक्क स्मशानभूमीत साजरा केला आहे. समाजात रुजत असलेली अंधश्रद्धा आणि त्यातून घडणाऱ्या घटना यातून आर्याने हा निर्णय घेतला.
काय म्हणाली आर्या?
“नागपूरमध्ये पाच वर्षाच्या चिमुरडीचा अंधश्रद्धेमुळे जीव गेला आहे. समाज अंधश्रद्धेमध्ये का वाहून चालला आहे? श्रद्धा ठेवा पण त्याचा अतिरेक करु नका. अनेक जण म्हणतात की, स्मशानभूमीत भूत प्रेत असतात. मी कोणाच्याही मताला चुकीचे बोलणार नाही. पण इथे भूत प्रेत असतील असं मला तरी नाही वाटत. कारण गरिब असला किंवा श्रीमंत असला तरी तो इथेच येतो. सगळ्यांचे अंतिम स्थान स्मशानभूमीतच असते. जर इथे आपल्या आत्म्याला शांती मिळत असेल तर ही भूमी अपित्र कशी?” असा सवाल आर्या घारेने केला आहे.
“त्यामुळे इथे वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. तसेच तरुणांनी पुढे येईन अंधश्रद्धेला थांबवलं पाहिजे. त्याकरता माझा छोटासा प्रयत्न आहे. मी कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न करत नाहीये. मला ट्रोल केलं तर दहा लोक चांगलं बोलतील आणि वीस लोकं वाईट बोलतील,” असंही आर्या म्हणाली.
मुंबई : Eknath Shinde government cabinet expansion : शिंदे – फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. शिंदे फडणवीस सरकारच्या 18 मंत्र्यांनी आज मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शिंदे गटाचे 9 आणि भाजपच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आजच्या विस्तारात सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. यापुढे होणा-या विस्तारात राज्यमंत्र्यांची घोषणा होणार आहे. या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेली नाही. यावरुन विरोधकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात 18 मंत्री सहभागी झाले आहेत. भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी 9 मंत्र्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपकडून आज राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजय कुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यापैकी मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे यांची प्रथमच मंत्रीपदी वर्णी लागलीय.
शिंदे गटाकडून दादाजी भुसे, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, उदय सामंत, तानाजी सावंत, संदीपान भुमरे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. तर संजय राठोड यांनाही संधी देण्यात आली आहे. तर वादात अडकूनही अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, संजय राठोडांच्या समावेशावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रीपद देणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. क्लीन चिट दिल्यामुळेच समावेश, करण्यात आल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
महाविकासआघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या बच्चू कडू आणि यड्रावकर यांना संधी देण्यात आलेली नाही. बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. कुठल्याही मंत्रिपदापेक्षा बच्चू कडू मोठा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर आमदार संजय शिरसाट यांचा पत्ता कट करत मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. मात्र नाराज नसल्याची शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यभरात भाजप आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अतुल सावेंना मंत्रिपद मिळाल्याबाबत जल्लोष साजरा करण्यात आला. मुंबईत गुलाबराव पाटलांच्या समर्थकांनी ढोल वाजवत जल्लोष केला. तर बीडमध्ये सुधीर मुनगंटीवारांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.