शिक्षकी पेशाला काळीमा! कबड्डी शिकवण्याच्या निमित्ताने शरिराच्या नको त्या भागाला स्पर्श

शिक्षकी पेशाला काळीमा! कबड्डी शिकवण्याच्या निमित्ताने शरिराच्या नको त्या भागाला स्पर्श


कोच जयप्रकाश हा कबड्डीचा क्लास सुटल्यावर फिर्यादी प्रशिक्षणार्थीला उंची वाढविण्याकरिता मालिश करावी लागते, असे सांगून तिला थांबवत होता. त्यानंतर तिची तो मालिश करून द्यायचा. 


Updated: Aug 9, 2022, 11:55 AM IST

प्रतिकात्मक फोटो





Source link

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, तुमचा मंत्री कोण? । जाणून घ्या

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, तुमचा मंत्री कोण? । जाणून घ्या


मुंबई : Eknath Shinde government cabinet expansion : राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. मंत्र्यांच्या नावांची यादीही निश्चित झाली आहेत. आज 18 आमदार शपथ घेणार आहेत.  शिंदे – फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा राजभवनात सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा होत आहे. तुमचा मंत्री कोण? याची माहिती जाणून घ्या.

– चंद्रकांत पाटील
पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून भाजपचे आमदार
कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचा ‘मराठा’ चेहरा
2014 – युती सरकारमध्ये महसूल, सार्वजनिक बांधकाममंत्री 
पांडुरंग फुंडकरांच्या निधनानंतर कृषी खात्याचा अतिरिक्त भार
2019 पासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष

– सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघाचे आमदार
2010 ते 2013 सालापर्यंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष
2014 – युती सरकारमध्ये अर्थमंत्री आणि वनमंत्री
मुनगंटीवारांच्या प्रयत्नानं चंद्रपुरात दारुबंदीचा ऐतिहासिक निर्णय

– राधाकृष्ण विखे पाटील
1995 पासून नगरमधील शिर्डी विधानसभेचे आमदार
सहकार, समाजकारण आणि राजकारणील मातब्बर नेतृत्व
काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस ते भाजप असा राजकीय प्रवास
माजी शिक्षणमंत्री, माजी कृषिमंत्री
2014 – विधानसभा विरोधी पक्षनेते असताना काँग्रेसमधून भाजपात

– संजय कुटे
बुलढाण्यातील जळगाव जामोद मतदारसंघाचे चार टर्म आमदार
2014 – युती सरकारमध्ये कामगार कल्याणमंत्री
भाजपमधील तरुण, ओबीसी चेहरा
देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू सहकारी
महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यात मोठी जबाबदारी

– गिरीश महाजन
जळगावमधील जामनेर मतदारसंघाचे आमदार
उत्तर महाराष्ट्रातला भाजपचा महत्त्वाचा चेहरा
2014 – युती सरकारमध्ये जलसंपदामंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री
2019 – सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी
देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख

– रवींद्र चव्हाण
2009 पासून डोंबिवली मतदारसंघाचे भाजप आमदार
2016 – युती सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री
कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक
महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यात महत्त्वाची भूमिका

– मंगलप्रभात लोढा 
भाजप आमदार मंगल प्रभात लोढा मलबार हिल मतदारसंघातून विजयी
लोढा हे रिअल इस्टेटमधील मोठं नाव
सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक
मूळचे राजस्थानच्या जोधपूरचे असलेले लोढा १९८१ मध्ये मुंबईत आले. 
लोढा समूहाची स्थापना. रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा दबदबा 

– अतुल मोरेश्वर सावे
अतुल  सावे हे  औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून विजयी
2014 ते 2019च्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात 2018 मध्ये त्यांना राज्यमंत्रिपद (उद्योग आणि खनिकर्म अल्पसंख्यांक विकास व वक्फ, महाराष्ट्र राज्य)
तसेच हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद 

– विजयकुमार गावित 
नंदुरबारमधून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.  

– उदय सामंत
रत्नागिरी मतदारसंघाचे आमदार
2004 पासून आतापर्यंत चारवेळा आमदारपदी निवड
2014 – राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश
2018 – शिवसेना उपनेतेपदी निवड, म्हाडाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक
2019 – मविआ सरकारमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री

– गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे विद्यमान आमदार
पानटपरीवाला ते मंत्रीपदापर्यंत प्रवास
1999 मध्ये पहिल्यांदा विधानसभा आमदार
2009 मध्ये शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती
2016-19 – युती सरकारमध्ये सहकार राज्यमंत्री
2019 – मविआ सरकारमध्ये पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री
शेरोशायरी आणि जोशपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध

– दीपक केसरकर
सावंतवाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार
2009 पासून आमदारकीची तिसरी टर्म
2014- युती सरकारमध्ये गृह आणि वित्त राज्यमंत्री
2019 – मविआत मंत्रीपद न मिळाल्यानं नाराजी
सध्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते

– अब्दुल सत्तार 
संभाजीनगरमधील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार
2009 पासून आतापर्यंत तीनवेळा आमदार
2009 – काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये पशूसंवर्धन राज्यमंत्री
2019 – काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश
2019 – मविआ सरकारमध्ये महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री

– दादाजी भुसे
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (बाह्य) मतदारसंघाचे आमदार
सामान्य शेतक-याचा मुलगा ते मंत्री असा प्रवास
2004 पासून आतापर्यंत चारवेळा आमदार
2014 – युती सरकारमध्ये सहकार, ग्रामविकास राज्यमंत्री
2019 – मविआ सरकारमध्ये कृषीमंत्री

– तानाजी सावंत
धाराशिवमधील भूम परांडा मतदारसंघाचे आमदार
धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली पकड
खासगी साखरसम्राट, शिक्षणसम्राट अशी ओळख
2015 साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश
2016 – शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती
जून 2019 – जलसंधारणमंत्री

– शंभूराज देसाई
सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघाचे आमदार
2004 पासून आतापर्यंत तीनवेळा आमदार
2019 – मविआ सरकारमध्ये गृह (ग्रामीण) आणि अर्थ राज्यमंत्री
21व्या वर्षीच बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची धुरा सांभाळली
1995-99 काळात युती सरकारमध्ये सहकार परिषदेचे अध्यक्ष
महाराष्ट्र बँकेचे माजी संचालक

– संदीपान भुमरे
संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मतदारसंघाचे आमदार
आतापर्यंत 5 वेळा विधानसभेवर आमदार
साखर कारखान्यात ‘स्लिप बॉय’ ते मंत्रीपदापर्यंत 

– संजय शिरसाठ 
संभाजीनगर पश्चिमचे शिवसेना आमदार 
रिक्षाचालक ते तीन वेळा आमदारकीचा प्रवास 
भारतीय कामगार सेनेतून राजकारणाला सुरूवात 
2000 साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवड
2005 मध्ये पुन्हा नगरसेवक आणि सभागृहनेते 
2009 पासून सलग तीन वेळा विजयी 





Source link

Maharashtra Cabinate Expansion : एकनाथ शिंदेंसाठी 9 अंक विशेष? आज मंत्रिमंडळ विस्तार आणि अनेक घडामोडींमध्ये लपलंय 9 अंकाचं गुपित

Maharashtra Cabinate Expansion : एकनाथ शिंदेंसाठी 9 अंक विशेष? आज मंत्रिमंडळ विस्तार आणि अनेक घडामोडींमध्ये लपलंय 9 अंकाचं गुपित


मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सातत्याने सुरु आहे. एका महिन्यात 7 ते 8 वेळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांचीच कॅबिनेट राज्याचा कारभार चालवत आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक समस्या तर आहेच त्यासोबतच, प्रशासकिय कामकाज करताना देखील मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवारांसोबत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या लांबणीवर टिका केली आहे. 

मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे आणि आज सकाळी 11 वाजता साधारण एकुण 18 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे 9 आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. यासगळ्यामध्ये विशेष आहे ते 9 हा अंक. 

झी मीडियाच्या रिसर्च टीमने या 9 अंकाकडे लक्ष वेधलं आहे. मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि 9 अंक हे एक विशेष समीकरण आहे. चला तर मग जाणून घेऊया…

1. एकनाथ शिंदे यांची जन्म तारखेत 9 फेब्रूवारी 1964 आहे. त्यांचा जन्म दिनांक 9 असा आहे. 

2. एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात देखील 9-9 अस प्रमाण ठरलं आहे. आजच्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावं समोर आली आहेत. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे असं बोललं जातंय.

3. टेंभीनाक्याचा नवरात्री महोत्सव
धर्मवीर आनंद दिघे यांनी 1978 ला जय आंबे माँ सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था जगदंबे संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेअंतर्गत नवरात्री महोत्सवाची परंपरा अजूनही सरु आहे. या नवरात्री महोत्सवाला माजी पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी देखील भेट दिली होती. त्याचबरोबर, चित्रपट अभिनेते देखील या महोत्सवाला भेट देत असतात.

4. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 जूनला राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती आणि 39 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार होतो आहे. 39 या आकड्यामध्ये देखील 9 हा अंक आहे.





Source link

शिंदे सरकार मंत्रिमंडळ विस्तार, या नावांवर शिक्कामोर्तब, उदय सामंत यांची माहिती

शिंदे सरकार मंत्रिमंडळ विस्तार, या नावांवर शिक्कामोर्तब, उदय सामंत यांची माहिती


मुंबई : Eknath Shinde government cabinet expansion : राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. मंत्र्यांच्या नावांची यादीही निश्चित झाली आहेत. आज 18 आमदार शपथ घेणार आहेत.  शिंदे – फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा राजभवनात सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा होत आहे.

तब्बल महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर आज अखेर मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. आज सकाळी  वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये आज 18 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. भाजपचे 9 मंत्री तर शिंदे गटाचे 9 मंत्री आज शपथ घेतील. राजभवनात छोटेखानी समारंभात हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या लिस्टमध्ये एकही महिला नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

भाजपकडून आज शपथ घेणाऱ्यांची नावं जवळपास निश्चित झाली असली तरी शिंदे गटाकडून नेमके कोण कोण शपथ घेणार, याचा अंतिम निर्णय झालेला नव्हता. मात्र, उदय सामंत यांनी शिंदे गटाकडून नऊ जण आणि भाजपकडून नऊ, असे 18 जण मंत्रीपदाची शपथ घेतील, असे सांगितले. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर शिंदे समर्थक 50 आमदार उपस्थित राहणार आहे. या बैठकीत नावं अंतिम केली जाणार आहेत. 

शिंदे गटाकडून 9 मंत्री मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अब्दुल सत्तार यांचाही मंत्रिमंडळात समावेश असेल तर संजय राठोड, केसरकरही मंत्रिमंडळात असतील की नाही याचा अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान, शिंदे गटाच्या बैठकीनंतर नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे.

शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, संदीपान भुमरे, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत,संजय राठोड आणि दीपक केसरकर या नऊ जणांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब असल्याचे सांगण्यात येत आहे.

 भाजपकडून मंत्रिपदासाठी 9 जणांची नावं निश्चित झाली आहेत. यात मुंबईतून आमदार मंगलप्रभात लोढांना संधी आहे. सुधीर मुनगंटीवार, अतुल सावेंना संधी आहे. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील , गिरीश महाजन , सुरेश खाडे रवींद्र चव्हाण , अतुल सावे , मंगलप्रभात लोढा, विजयकुमार गावित यांच्या समावेश आहे. मुंबईतून आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर हे मुख्य चेहरे बाजूला ठेवत मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आलीय. तर दलित कोट्यातून सुरेश खाडे तर आदिवासी कोट्यातून विजयकुमार गावित यांना संधी मिळणार आहे.





Source link

धो धो पाऊस, नदीला पूर तरीही भलताच आगावूपणा, जे व्हायचं तेच झालं…ट्रॅक्टरसह 5 जण वाहून गेलेत । पाहा

धो धो पाऊस, नदीला पूर तरीही भलताच आगावूपणा, जे व्हायचं तेच झालं…ट्रॅक्टरसह 5 जण वाहून गेलेत । पाहा


 Rain In Amravati : राज्यात सर्वत्र धो धो पाऊस कोसळत आहे. अमरावती जिल्ह्यातही असाच पाऊस कोसळत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पुलावरुन पाणी वाहत असताना ट्रॅक्टर पाण्यात घालणे जीवावर बेतले. 


Updated: Aug 9, 2022, 09:31 AM IST





Source link

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट


मुंबई : Rain News : Rain In Maharashtra : राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. गेले दोन दिवस पावसाचे धुमशान पाहायला मिळत आहे. विदर्भाला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तर कोकणातही धुवाधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. तर काही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियात रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात  वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने आणि कुलाबा वेधशाळेने विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियात रेड अलर्ट जारी केला असून मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. नदी काठच्या गावांता सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागपूर, गडचिरोली जनजीवन विस्कळीत

नागपूर ग्रामीण भागात अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. काटोल-वरुड रस्ता पाण्याखाली असल्याने पहाटेपासून या मार्गावरील वाहतूक बंद आहे. तर राज्य मार्ग 253 पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने बंद आहे. जाम नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरले आहे. 

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात जनजीवन ठप्प झालंय. एटापल्ली आणि मुलचेरा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालीय. तर गडचिरोली तालुक्यातही गेल्या 24 तासात 100 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. आष्टी- आलापल्ली मार्गावरील दिना नदीचा पूल पुराखाली आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. 

पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. खेड,चिपळूण, दापोलीसह गुहागर तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून इशारा पातळीचीच्यावर पाणी आल्याने प्रशासन सर्तक झाले आहे. दरम्यान रघुवीर घाटात ही दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

तसेच  राजापूर मधीलशहरात जवाहर चौकात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. तर लांजा येथील अंजणारी येथील दत्त मंदिर पाण्याखाली बुडाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी भरायला सुरुवात झाली आहे. रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यासाठी पुढील 48 तास रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.  त्यापुढे तीन दिवस ऑरेंज अलर्ट राहणार आहे. नागरिकांनी या काळात खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दापोली तालुक्यातील लोणवडी येथील केशरी नदीला पूर आला. या पुराने ईळने,माळवी, वाघिवणे या गावांचा संपर्क तुटला. लोणवळी आणि ईळने गावांना जोडणारा केशरी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं दोन्ही कडील वाहतूक बंद करण्यात आली.

कोल्हापूर पोलिसाच्या आदेशानुसार करुळ आणि भुई  बावडा घाटात  दरड कोसळल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व वाहतूक फोंडा  घाटामार्गे वळविण्यात आली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.कोल्हापुरातल्या काटेभोगावला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. पावसामुळे इथल्या नदी नाल्यांना पूर आलाय. या पाण्यात बाईक टाकणं एका तरूणाच्या जिवावर बेतलं असतं. पुराचं पाणी वाढलेलं असतानाही या बाईकस्वारानं पाण्यात बाईक टाकली मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या बाईकस्वाराचा जीव वाचलाय.  राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरु असून धरणामध्ये पाण्याची आवक मोठया प्रमाणात सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे..त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

राज्यात अनेक ठिकाणची धरणं भरली

सांगली जिल्ह्यातील वारणा धरण 83 टक्के भरलंय.  धरणाचे 4 दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले.. सांडव्यातून 3 हजार क्यूसेक पाणी वारणा नदीत  सोडलं जातंय. त्यामुळेही वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतेय. कोकरूड-रेठरे, शिराळे खुर्द-माणगाव हे बंधारे पाण्याखाली गेलेत.

यवतमाळ जिल्ह्यात कोसळणा-या मुसळधार पावसामुळे दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणात 86 % पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आलेत. परिणामी अरुणावती नदीच्या काठावर वसलेल्या 16 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 

अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्प हा 85 टक्के भरला. प्रकल्पाचे दहाही दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.. पाण्याची आवक अशीच राहिली तर सर्व दहा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्याचे निर्देशही देण्यात आलेत.

शिर्डीच्या कोपरगाव परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे वेळापूर शिवारातील कडकडी बंधारा फुटला. यामुळे आजूबाजूच्या शेतात पाणी शिरल्याने शेतक-यांचं नुकसान झालंय…बंधारा फुटल्यामुळे रस्ता खचला असून या रस्त्यावरून शिर्डी-लासलगावचा संपर्क तुटलाय… रस्ता बंद झाल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय…

वाशिम जिल्ह्यात सकाळपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 26 गावांचा संपर्क तुटला आहे. पिकांमध्ये पाणी साचल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp