‘मी रतन टाटा बोलतोय’… भेटू शकतो का? नव्या उद्योजकाचं असं बदललं नशीब

‘मी रतन टाटा बोलतोय’… भेटू शकतो का? नव्या उद्योजकाचं असं बदललं नशीब


मुंबई : टाटा समूहाची गुंतवणूक असलेल्या स्टार्टअप ‘रेपोस एनर्जी’ ने अलीकडेच मोबाईल इलेक्ट्रिक चार्जिंग वाहन लाँच केले. फक्त एक फोन कॉल आणि भेटण्याची ऑफर, जे काही होतं ते बघून स्टार्टअपचं नशीबच पालटलं. आज हे स्टार्टअप उंचीवर आहे. ही कोणत्याही चित्रपटाची कथा नसून वस्तुस्थिती आहे. देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी एक कॉल केला आणि सर्वच काही बदललं.

इलेक्ट्रिक चार्जिंग वाहन लाँच

रतन टाटा यांनी गुंतवणूक केलेल्या पुणे स्थित मोबाइल ऊर्जा वितरण स्टार्टअप रेपोस एनर्जीने अलीकडेच सेंद्रिय कचऱ्यावर चालणारे ‘मोबाइल इलेक्ट्रिक चार्जिंग व्हेईकल’ लाँच केले. स्टार्टअपच्या संस्थापक आदिती भोसले वाळुंज आणि चेतन वाळुंज यांनी त्यांचे सुरुवातीचे दिवस सांगितले. रतन टाटा यांच्या एका फोन कॉलने त्यांचे नशीब कसे बदलले ते त्यांनी सांगितले. या फोन कॉलपूर्वी दोघांचेही स्वप्न होते की आपल्या कंपनीला टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे मार्गदर्शन मिळावे.

रेपोस एनर्जीच्या संस्थापक अदिती भोसले वाळुंज यांनी त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईलवर एक पोस्ट शेअर केली आहे. अदिती यांनी लिहिले की, जेव्हा मी आणि चेतनने स्टार्टअप सुरू केले तेव्हा मी म्हणाले होते की रतन टाटा यांचे यासाठी मार्गदर्शक असल्यास चांगले होईल. यावर सर्वांनी त्यांना भेटणे अशक्य असल्याचे सांगितले.

12 तास घराबाहेर थांबलो

रतन टाटा यांना पत्रासह हे सादरीकरण पाठवले. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आदिती आणि चेतन त्यांना भेटण्यासाठी रतन टाटा यांच्या घरी पोहोचले. दोघेही जवळपास 12 तास घराबाहेर थांबले, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही आणि दोघेही थकून परतले.

अदिती यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांची प्रतीक्षा व्यर्थ गेली नाही, आम्ही हॉटेलमध्ये परत आलो, तेव्हाच एक फोन आला. मी फोन उचलला तर पलीकडून आवाज आला ‘हॅलो, मी अदितीशी बोलू शकतो का?’ अदितीच्या म्हणण्यानुसार, तुम्ही कोण बोलतंय म्हटल्यावर समोरून आवाज आला, मी रतन टाटा बोलतोय, मला तुमचं पत्र आलंय, भेटू शकतो का?

अदिती म्हणाल्या की हाच तो क्षण होता जेव्हा तिचे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण होत होते. दुसऱ्या दिवशी अदिती आणि चेतन टाटा ग्रुपच्या चेअरमन रतना टाटा यांना भेटले आणि त्यांचा प्लान सांगितला. अदिती म्हणाल्या, तीन तास चाललेल्या बैठकीत आम्ही आमचे काम आणि ध्येय सांगितले. यानंतर टाटा समूहाकडून पहिली गुंतवणूक 2019 मध्ये आणि दुसरी गुंतवणूक 2022 मध्ये मिळाली. त्यांनी त्यांच्या व्यावसायिक प्रवासाचे वर्णन “धैर्य आणि उत्कटतेची कहाणी” असे केले.





Source link

रीवा तुळपुळेची सॅनिटरी नॅपकिन्स वाटप आणि मासिक पाळीसंदर्भात जनजागृती मोहीम

रीवा तुळपुळेची सॅनिटरी नॅपकिन्स वाटप आणि मासिक पाळीसंदर्भात जनजागृती मोहीम



आपण समाजाला काहीतरी देऊ लागतो अशी भावना असली तर आपल्याकडून काहीनाकाही चांगलं काम घडतंच.



Source link

ऐकावं ते नवलच! एका पोपटामुळे फ्रेंडशीप दिनी शेजाऱ्यांच्या मैत्रीत दुरावा, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

ऐकावं ते नवलच! एका पोपटामुळे फ्रेंडशीप दिनी शेजाऱ्यांच्या मैत्रीत दुरावा, वाचा नेमकं काय आहे प्रकरण


पुढील
बातमी

घरापासून अवघ्या 500 मीटरवरच होती, 10 वर्षांनी सापडली बेपत्ता मुलगी, थक्क करणारी कहाणी





Source link

घरापासून अवघ्या 500 मीटरवरच होती, 10 वर्षांनी सापडली बेपत्ता मुलगी, थक्क करणारी कहाणी

घरापासून अवघ्या 500 मीटरवरच होती, 10 वर्षांनी सापडली बेपत्ता मुलगी, थक्क करणारी कहाणी


मुंबई :  वयाच्या 7 व्या वर्षी अपहरण झालेली चिमुकली आता तब्ब्ल 10 वर्षांनंतर घरी परतली आहे. महत्त्वाचं म्हणजे इतकी वर्षे ती जिथे होती तिथून तिचं घर अवघ्या 500 मीटर अंतरावर होतं. संबंधित मुलीचं नाव पूजा असं आहे. 13 वर्षांनंतर पूजाला कसं समजलं की  तिचं अपहरण झालं आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण-
22 जानेवारी 2013 रोजी अंधेरीच्या गिल्बर्ट हिल परिसरात भावासोबत शाळेत जात असताना पूजाचं अपहरण झालं होतं. शाळेच्या  परिसरात तिचा भाऊ शाळेमध्ये गेल्यानंतर अपहरणकर्त्यांनी पूजाला आईस्क्रीम घेऊन देत तिचं अपहरण केलं होतं. पूजाचं अपहरण हेनरी डिसूझा या महिलेने केलं होतं. 

हेनरी डिसूझा यांना मूल होत नसल्यामुळे तिने पूजाचं अपहरण केलं होतं. पोलिसांपासून वाचण्यासाठी हेनरीने पूजाला कर्नाटकमध्ये हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं आणि पूजाला एनी डिसूझा असं नाव दिलं. हेनरी आधी पूजासोबत खूप प्रेमाने वागायची मात्र त्यांना जेव्हा मूल झालं तेव्हा मात्र तिच्या वागण्यात बदल झाला. पूजाला घरी आणल्यावर तिला खूप काम करायला लावायचे.

हेनरीचा नवरा दारू प्यायचा एक दिवस दारूच्या धुंदीमध्ये बोलत बोलत तो पूजाला बोलला, मी तुझा वडील नाही. आम्ही तुझं अपहरण केलं होतं. पूजाचं जेव्हा अपहरण झालं तेव्हा ती 7 वर्षांची होती तिला काही आठवत नव्हतं. जेव्हा तिला समजलं की हे आपले खरे आई-बाप नाहीत त्यानंतर तिने स्वत:चा शोध घेण्यास सुरूवात केली.

असे शोधले खरे आई-वडील-  
पूजाने सोशल मीडियावर आपल्या नावाने मिंसिंग झालेल्या पोस्ट शोधायला सुरूवात केली. त्यावेळी तिला एक पोस्ट सापडली. त्यामध्ये पाच नंबर होते. त्यावर फोन लावत तिने व्हिडिओ कॉल केला आणि आपल्या आईशी बोलली, त्यावेळी पूजालाही तिच्या आईने ओळखलं. 

दरम्यान, ही घटना मुंबईत अंधेरी पश्चिम इथली आहे. पूजाचं खरं घर हे तिच्या घरापासून 500 मीटर अंतरावर होतं. मात्र पोलिसांनी ना पालकांनी खोलात जाऊन शोध घेतला. यामुळे पूजाला आपल्या घरापासून तब्बल 10 वर्षे दूर रहावं लागलं. 





Source link

चौघंही कॉलेजला गेले पण घरी परतलेच नाहीत, 7 दिवसांपासून बेपत्ता, समोर आली धक्कादायक माहिती

चौघंही कॉलेजला गेले पण घरी परतलेच नाहीत, 7 दिवसांपासून बेपत्ता, समोर आली धक्कादायक माहिती


जयेश जगड, झी मीडिया, अकोला :  अकोला जिल्ह्यातील व्याळा इथल्या मानव पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिकणारे तिन तरुण आणि एक तरुणी गेल्या एक ऑगस्ट पासून बेपत्ता आहेय..एक ऑगस्टला चौघेही घरून कॉलेजला गेले. मात्र तेव्हापासून ते परतलेच नाहीय, त्यामुळे त्यांची मिसिंग कंपलेंट बाळापूर आणि सिव्हील लाईन पोलिसात देण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हे चारही जण नापास झाले होते, त्यामुळे नैराश्यातून त्यांनी घर सोडलं आहे. शिक्षणात पुढे कसं जावं या विवंचनेतून हे चारही विद्यार्थी गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता आहेय, त्यांचे पालक आता त्यांना परत घरी येण्यासाठी विनंती करीत आहेय..

यामधील एक तरुणीचे चार विषय राहिल होते. तर इतर तीन विद्यार्थ्यांही काही विषयात नापास झाल्याची माहिती आहे. हे चौघेही कॉलेज मधून सोबत गेल्याच कॉलेज प्रशासनाने म्हंटलंय. 

दरम्यान, चौघांच्या बेपत्ता होण्यामागे नापास झाल्याचं कारण नसून वेगळंच कारण असावं असा अंदाज कॉलेजच्या संचालकांनी व्यक्त केला आहे. ही चारही मुलं कॉलेज मध्ये गेली होती, निकाल ऑनलाइन असल्यामुळे ती नेमकी कॉलेज मध्ये का आली होती ते माहीत नसून तीन आणि चार वाजताच्या सुमारास हे चौघेही कॉलेज मधून निघून गेले होते, हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये असल्याचं कॉलेज संचालकांनी म्हंटलंय

नेमकं प्रकरण काय याचा तपास पोलीस तर घेतच आहे, तर पालकांनी मुलांना घरी परतण्याचं आवाहन केलं आहे. चारही विद्यार्थी स्वतःहून बेपत्ता झाले आहे किंवा त्यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला आहे याचा तपास पोलीस करत आहेय.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp