पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा कळस! ‘या’ कारणाने आई-वडिलांनीच केली मारहाण, 6 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
नागपूरमध्ये अंधश्रद्धेची संतापजनक घटना, कारण ऐकूण तुमचाही होईल संताप
Source link
नागपूरमध्ये अंधश्रद्धेची संतापजनक घटना, कारण ऐकूण तुमचाही होईल संताप
Source link
जावेद मुलाणी, झी मिडिया, बारामती : भाजपने (BJP) 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती (Baramati) मतदारसंघावर आतापासूनच लक्ष केंद्रित केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना घेरण्यासाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
विशेष मिशन बारामती
भाजपने ‘मिशन बारामती’ हाती घेतलं असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या 16 ऑगस्ट पासून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या प्रयोगावर कायमचा उतारा शोधण्यासाठी भाजपने आता महासंग्रामाच्या अंतिम लढाईचा नारा दिला आहे. जिथे कधीच भाजप विजयी झाला नाही. तिथे गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकीय लढाईची पद्धत वापरली जाणार आहे. प्रत्येक चार मतदारसंघामागे एक केंद्रीय मंत्र्याकडे जबाबदारी देण्यात आली असून तीच रणनिती बारामती मतदारसंघात राबवली जाणार आहे.
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना भाजपने दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या माध्यमातून तगडे आव्हान दिलं होतं. भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून ते अनेक दिग्गजांच्या सभा बारामती मतदारसंघात झाल्या होत्या .
आता 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकाद भाजप पूर्ण ताकदनिशी उतरणार आहे. आगामी निवडणुकीत सुळे याच बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार भाजपकडून दिला जाईल हे निश्चित.
त्यासाठी मतदारसंघात आतापासून संपर्क वाढविण्यावर भाजपने भर दिला आहे. या संपर्क अभियानाची सुरुवात अर्थमंत्री सीतारामन यांच्या दौऱ्यापासून होणार आहे. विविध केंद्रीय मंत्री बारामती लोकसभा मतदारसंघात नजीकच्या काळात दौरे करणार आहेत. 2024 च्या निवडणुकीपर्यंत दौऱ्यांचा हा कार्यक्रम सुरूच राहणार आहे.
केंद्रीय मंत्री सीतारमण यांचा बारामती दौरा
16 ऑगस्ट पासून सितारामन यांचा दौरा सुरू होणार आहे .तीन दिवसीय दौऱ्यात त्यांच्या समवेत बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आमदार राम शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी होणार आहेत .
मंगळवारी 16 ऑगस्टला सितारामन या बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला आणि भोर इथं येणार आहेत. तर बुधवारी 17 ऑगस्टला इंदापूर व दौंड, गुरुवारी 18 ऑगस्टला रोजी बारामती व पुरंदरला पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत.
या सर्व ठिकाणी भाजपकडून स्वतंत्रपणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दौऱ्याच्या तयारीसाठी 9 ऑगस्टला बैठक
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात महत्त्वाचे स्थान असलेल्या आणि संपूर्ण देशाच्या तिजोरीच्या चाव्या हाती असलेल्या सितारामन यांच्या दौऱ्याचे काटेकोर नियोजन भाजपकडून केलं जात आहे. त्यासाठी मंगळवारी 9 ऑगस्ट रोजी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बारामतीत भाजपची बैठक पार पडणार आहे.
—
पुणे : आजवरच्या राजकीय इतिहासात असा पेचप्रसंग कधीही निर्माण झाला नव्हता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि शिंदेंचं सरकार याच्यातील राजकीय धुमश्चक्रामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या सत्तासंघर्षात राज्यघटनेतील मूल्ये पावलोपावली पायदळी तुडवली जात आहेत. पक्षांतर करणारे ते आमदार लोकशाहीचे गुन्हेगार आहे. अशात सत्तासंघर्षासाठी राजकीय गणितं उलटी फिरतील, असा दावा कायदेतज्ज्ञांनी केला आहे.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ही शिंदे सरकारसाठी महत्त्वपूर्ण आहे. शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी शिवसेनेकडून जोर लावला जात आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात कायदेतज्ज्ञांनी राज्यातील राजकीय सत्तासंघर्षबद्दल भाष्य केलं. (maharashtra political crisis hearing on supreme court what sya of legal experts in marathi)
”लोकप्रतिनिधींमध्ये निष्ठेची कमी असल्यामुळे त्यांना सूरत, गुवाहाटी, गोवा सारख्या ठिकाणी जावं लागलं. त्यांना एका ठिकाणी दडवून ठेवण्यात आलं. ही पक्षासाठी खूप मोठी नामुष्की म्हणायला हवी. या घडामोडीमुळे एक गोष्ट स्पष्ट होते ती देशात विश्वासार्हतेचा मोठा प्रश्न निमार्ण झाला आहे. तर दुसरीकडे काही गोष्टी या राज्यपालांच्या हातात असतात. तिथेदेखील तर मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचं पटत नसेल तर राज्यपालाला परत बोलाविण्याचे अधिकार असतात. मात्र राज्यपालचे सूत्र हे पंतप्रधान कार्यालयातून हलतात. मग अशा परिस्थित आपली लोकशाही धोक्यात आली आहे,” अशी भीती डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्ती केली आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकरराव आव्हाड यांच्या मते, ”16 आमदारांच्या अपात्रतेला स्थगिती दिल्यामुळे राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला. राज्यपाल, सभागृहाचे अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने जर त्यांची कर्तव्ये पार पाडली नाही अशात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करतो. लोकशाहीमध्ये सगळंच काही लिहिलेलं नसतं पण त्यात काही संकेत मात्र आहेत. पण नैतिक गोष्टी कोणालाही नको आहेत.”
ॲड. असिम सरोदे यांच्या मते, ” भीती, आमिष दाखवून, पैसा खर्च करून सत्ता मिळवायची. मग सत्ता टिकविण्यासाठी पुन्हा पैसे वाटून स्थैर्य प्राप्त करायचा. पुढे या सत्तेसाठी खर्च झालेला पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा. जर हे राज्याचं राजकारण असेल तर असं नेतृत्व संपूर्ण राज्याला प्रदूषित करणार. अशात ते आमदार अपात्र ठरले तर आगामी निवडणूक लढवू शकणार नाही, अशी तरतूदही कायद्यात आहेत.”
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा शिंदे सरकारचं भविष्य ठरवणारा असणार आहे. तर हा निकाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठीही तेवढाच महत्त्वपूर्ण आहे.
औरंगाबाद : उस्मानाबादचे झी 24 तासचे तत्कालीन रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी सडेतोड लेख लिहून तत्कालीन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांचे वाभाडे काढले म्हणून उस्मानाबादचे पत्रकार सुनील ढेपे यांच्यावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरवला आहे. हा निकाल न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकनवाडी आणि राजेश पाटील यांनी दिला.
उस्मानाबादेत सन 2020 मध्ये 10, 11 आणि 12 जानेवारी या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. या साहित्य संमेलनात झी 24 तासचे तत्कालीन रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणी पत्रकार सुनील ढेपे यांनी सोशल मीडियावर सडेतोड लेख लिहून तत्कालीन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांचे वाभाडे काढले होते. ‘बिहारी बाबू, आता तरी जागे व्हा’ असं त्या लेखाचं हेडिंग होतं.
ही पोस्ट ढेपे यांचे मित्र बाळासाहेब सुभेदार यांनी सोशल मीडियावर शेयर केली होती. त्यामुळे पोलिसांनी चिडून पत्रकार सुनील ढेपे यांच्यासह सुभेदारविरुद्ध आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये 14 जानेवारी 2020 रोजी पोलीस (अप्रितीची भावना चेतवणे) कायदा 1922 चे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. हा खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंध महाराष्ट्रात पत्रकारांनी संताप व्यक्त करून निषेध व्यक्त केला होता.
या एफआयआर आणि चार्जशीटला पत्रकार सुनील ढेपे यांनी ॲड. सुशांत चौधरी यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्याच्या औरंगाबाद खंडपीठात 16 फेब्रुवारी 2021 रोजी आव्हान दिलं होतं. कोरोनामुळे या आव्हान याचिकेची सुनावणी लांबणीवर पडली होती. पण दीड वर्षानंतर या आव्हान याचिकेचा 3 ऑगस्ट 2022 रोजी निकाल लागला असून, न्यायालयाने एफआयआर आणि चार्जशीट रद्दबातल ठरवलं आहे आणि पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.
पत्रकारांनी पोलिसांविरुद्ध सत्य लिहिलं की, पोलीस ब्रिटिशकालीन कलम पोलीस (अप्रितीची भावना चेतवने) कायदा 1922 चे कलम 3 चा गैरवापर करून पत्रकाराविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करतात, त्रास देतात. त्यामुळे हे कलम कायमचे रद्द करावं, यासाठी आपण लढा देणार असल्याचे पत्रकार सुनील ढेपे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे तसेच ज्या पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्याविरुद्ध उस्मानाबाद न्यायालयात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं सांगितलं.
या निकालामुळे महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांना दिलासा मिळणार आहे. पत्रकार सुनील ढेपे यांची न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणारे उस्मानाबादचे सुपुत्र ॲड. सुशांत चौधरी यांचे अनेकांनी अभिनंदन केलंय.
मुंबई : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलाय. मुसळधार पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचं बहुतांश ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे शेतकऱ्यांसाठी आणखी पुढील 3 दिवस हे वैऱ्याचे आहेत. राज्यात कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात 9 ऑगस्टपर्यंत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलाय. शिवाय या भागात अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. दरम्यान उर्वरित भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय मांजरम आणि लोहा तालुक्यातील उमरा भागात मुसळधार पावसामुळे कहाळा, पाटोदा, ममण्याळ, बरबडा भागात नाल्यांना पूर आला. यामुळे या भागातील शेकडो हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. तात्काळ पंचनामे करून पिकविमा मिळवून देण्याची मागणी येथील शेतकरी करताहेत
बीड जिल्ह्यातच ढगफुटीसदृश पाऊश झालाय. त्यामुळे शेतक-याचं प्रचंड नुकसान झालंय. रात्री परळी तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पांगरी लिंबोटा तळेगाव या गावातील भागात तर ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीये.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडनदीला पूर आला…जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या गडनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागात पुराचे पाणी घुसलं आहे. कणकवली आचरा मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला. तर माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला महापूर आल्याने कुडाळ तालुक्यातील 27 गावांचा संपर्क तुटलाय आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा 85 टक्के भरलंय. धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाच्या कॅचमेंट परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्यानं पाण्याची आवक वाढलीय. पाणीपातळी संतुलित राहावी यासाठी धरणाचे तीन दरवाजे खुले करण्यात आलेत.
वाशिम जिल्ह्यात मागील 5 दिवसापासून पावसांनी जोरदार हजेरी लावली. मालेगाव तालुक्यातील राजुरा, सुकांडा, खैरखेडा, अमानवाडी परिसरात ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण झाली. अतिपावसामुळे पिकांसह शेतकऱ्याची जमीन खरडून गेली. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतीचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.
सिंधुदुर्गात रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा फटका कणकवली तालुक्यातील बावशी गावातील दशरथ मर्ये यांच्या कुटुंबाला बसलाय…सततच्या पावसामुळे मर्येंचं घर कोसळलंय…दैव बलवत्तर म्हणून मोठ्या संकटातून हे कुटुंब बचावलंय…या घरात लहान मुलगी आणि तिची आजी होती…मोठा आवाज येताच दशरथ मर्ये धावत त्या खोलीत आले आणि त्यांनी मुलीला आजीला बाहेर काढलं.
हेमंत चापुडे झी मिडीया, पुणे : राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat Election) निकाल शुक्रवारी हाती आले आहेत. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. तर काही ठिकाणी अनपेक्षित निकाल हाती आले आहेत. या निकालानंतर विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला आहे.
पुणे (Pune) जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानंतर विजय आणि पराभावापेक्षा एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा रंगली आहे.
टाकळी हाजी ग्रामपंचायतीच्या निकालानंतर एका लग्नाची चर्चा या गावात रंगली आहे. दामू घोडे प्रतिष्ठानच्या मळगंगा ग्रामविकास पॅनलचे प्रमुख उमेदवार दामू घोडे यांनी प्रचार सभेत ही माझी निवडणूक नसून लग्न असल्याचे विधान केले होते.
या विधानानंतर विरोधकांकडून निवडणूक प्रचारात घोडे यांच्यावर निशाणा साधण्यात आला. मात्र या निवडणूकीत दामू घोडे यांच्या पॅनेलने माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या पॅनेलचा दारून पराभव केला.
घोडे यांच्या पॅनेलने १६ – १ असा दणदणीत विजय मिळवला आहे. या नंतर आभार सभेत मतदारांच्या आग्रहानंतर विजयी उमेदवार दामू घोडे आणि अरुणा घोडे या दाम्पत्याचा पुन्हा एकदा विवाह लावण्यात आला.
दरम्यान, या विवाह सोहळ्याची चर्चा जिल्हाभर रंगली असून घोडे दाम्पत्य आता ग्रामपंचायतीमध्ये एकत्र पहायला मिळणार आहे.