by Hansraj Agrawal | Dec 9, 2025 | Trending News
छत्रपती संभाजीनगर मध्ये आदर्श बँक घोटाळा चांगलाच गाजला होता अनेक गोरगरिबांचे पैसे तिथे अडकले त्यातीलच काही प्रमुख आरोपींचा नुकताच पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश झाला असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 9, 2025 | Trending News
BJP MLA Threat Calls For Questioning Tukaram Mundhe: भारतीय जनता पार्टीचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना, त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद नसतानाही नियमबाह्य पद्धतीने एका कंत्राटदाराला 20 कोटी रुपयांचा वर्क ऑर्डर दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खोपडे हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून मुंढेंना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
Add Zee News as a Preferred Source
देवगिरी बंगल्यावर शिंदेंची भेट
नागपूर पूर्वचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी आयएस अधिकारी तुकाराम मुंढेबाबत खळबळजनक दावा केल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुंडेंविरोधात लक्षवेधी लावली होती. खोपडेंनी तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी केली आहे. कृष्णा खोपडे यांनी सोमवारी दुपारनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. देवगिरी बंगल्यावर त्यांनी ही भेट घेतली. मुंढे यांच्या समर्थकांकडून मराठवाड्यातून धमकी दिल्याचा कृष्णा खोपडे यांचा आरोप असून त्यांनी आपलं म्हणणं उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचं समजतं.
फोनवरुन धमक्या देण्यात आल्या
सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप करत लक्षवेधी मांडण्याची येण्याची भूमिका घेणारे आमदार कृष्णा खोपडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धमकीचे फोन आल्याचा दावा केला आहे. मुंडेंच्या निलंबनाची मागणी का करत असल्याचा सवाल करत दोन जणांनी शिवीगाळ करत धमकी दिल्याचा दावा खोपडे यांनी केला आहे. तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध लक्षवेधी लावू नका, तक्रार करू नका अशा धमक्या फोनवरुन देण्यात आल्याचा दावा खोपडेंनी केला आहे. या प्रकरणी खोपडे पोलिसात तक्रार करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
फोनवरून धमकीप्रकरणी खोपडे यांनी मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे. तसेच बर्डी पोलीस ठाण्यात तक्रार देखील केल्याचं त्यांनी सांगितले.
कठोर निर्णयांमुळे राजकारणींशी मुंढेंचा सतत संघर्ष
तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या छोट्या गावात झाला. ते शेतकरी कुटुंबातून आले असून, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून राजनीती शास्त्रात मास्टर्स पदवी घेतली आहे. मुंढे यांनी राजनीती शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. ऑगस्ट 2005 मध्ये ते आयएएस सेवेत रुजू झाले. त्यांच्या 20 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांना अनेक वेळा ट्रान्सफर मिळाल्या आहेत. 2025 पर्यंत त्यांना 23 वेळा ट्रान्सफर झाल्या आहेत, ज्यामुळे ते अशोक खेमका यांच्या सारखे चर्चेत राहिले आहेत. मुंढे यांना प्रामाणिकपणा आणि कठोर निर्णयांमुळे राजकारणी आणि सहकाऱ्यांशी संघर्ष होतो. त्यांच्या व्यावहारिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे ट्रान्सफर होतात, असे म्हटले जाते.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 8, 2025 | Trending News
Palghar Crime News: पालघर जिल्ह्यातील कासा येथे एक महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. जनतेचे रक्षकच भक्षक बनले आहेत. एका पोलीस हवलदाराने तक्रारी अर्जाच्या चौकशीसाठी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिस हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Add Zee News as a Preferred Source
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका तक्रारी अर्जाच्या चौकशीसंदर्भात कासा पोलीस ठाण्यात आली होती. तेव्हा याच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या शरद भोगाडे नावाच्या पोलीस हवलदाराने चौकशीच्या बहाण्याने पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या खोलीत नेले. त्याच ठिकाणी आरोपी पोलीस हवालदाराने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. महिलेने मोठे धाडस दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर या प्रकरणी पोलीस हवालदार भोगाडे याच्यावर लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, पुढील तपासासाठी गुन्हा कासा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती माहिती मिळाली आहे. आरोपी हवालदार बुगडे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी कासा पोलीस ठाण्याच्या प्रभारीची तातडीने जिल्हा मुख्यालयात बदली केली आहे. तसेच या प्रकरणी सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.
नाशिकमध्ये अल्पवयीन मुलावर अत्याचार
मालेगाव पाठोपाठ आता मनमाड शहरात ही अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी 64 वर्षीय बाबा भागवतला अटक करून त्याच्या विरुद्ध ऍट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या नराधमाने एका 7 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला शिवाय तो शहरातील एका भागात असलेली लॉन्ड्रीच्या दुकान प्रेस करण्यासाठी कपडे घेऊन येणाऱ्या लहान मुलांशी अश्लील चाळे करून लैंगिक अत्याचार करीत असल्याचे डिवायएसपी बाजीराव महाजन यांनी सांगितले.
FAQ
-
ही घटना पालघर जिल्ह्यात नेमकी कुठे घडली आहे?
ही घटना पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
2. आरोपी कोण आहे?
आरोपीचे नाव शरद भोगाडे आहे, जो कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस हवालदार आहे.
3. पीडित महिला पोलीस ठाण्यात कशासाठी आली होती?
पीडित महिला एका तक्रारी अर्जाच्या चौकशीसंदर्भात कासा पोलीस ठाण्यात आली होती.
4. आरोपीने महिलेवर कुठे लैंगिक अत्याचार केला?
आरोपी पोलीस हवालदाराने चौकशीच्या बहाण्याने पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या खोलीत महिलेवर लैंगिक अत्याचार केला.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 7, 2025 | Trending News
Pune Koregaon Park Land Deal Parth Pawar: झी 24 तासने समोर आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुद्रांक शुल्क विभागाच्या तक्रारीनंतर बावधन पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीची विक्री करणा-या शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शीतल तेजवानीला अटक केल्यानंतर आता दुय्यम निबंधक रवींद्र तारु याला अटक करण्यात आली आहे. आता तिसऱ्या व्यक्तीला अटक कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Add Zee News as a Preferred Source
झी २४ तासनं उघड केलेला जमीन गैरव्यवहार प्रकरण मोठी अपडेट समोर आली आहे. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारू याला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. रवींद्र तारूला पौड कोर्टात हजर केले जाणार आहे. रवींद्र तारू याने गैरव्यवहार करत दस्त बनवून दिले होते. या संदर्भात पुण्याच्या बावधन पोलीस ठाण्यात शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारू यांच्या विरोधात मुद्रांक शुल्क बुडवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपल्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथे 40 एकर जमिनीचा व्यवहार झाला आहे. 300 कोटींच्या व्यवहारासाठी अवघ्या 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेण्यात आल्याच्या गोंधळाबरोबरच इतरही अनेक आक्षेप घेतले जात आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांच्या विरोधात कुठलीही तक्रार करण्यात आलेली नाही. झी 24 तासने बुधवारी रात्रीपासून ही बातमी लावून धरली होती. त्यानंतर काल सकाळी मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर तातडीने तपासाची सूत्रे हलली आणि कारवाई सुरू झाला. रात्री मुद्रांक विभागाच्या तक्रारीनंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
FAQ
1 पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण काय आहे?
पुणे शहरातील मुंढवा भागात राज्याच्या कृषी विभागाच्या जमिनीबाबत अपहार केल्याप्रकरणी एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याप्रकरणी दिग्विजय अमरसिंह पाटील, शीतल तेजवानी, तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमेडिया कंपनीचाही यात समावेश आहे. बेकायदेशीर आदेश आणि पत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. नायाब तहसीलदार प्रवीणा चव्हाण यांनी तक्रार दाखल केली होती.
2 या प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे?उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अमेडिया कंपनीच्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथे ४० एकर जमिनीचा ३०० कोटी रुपयांचा व्यवहार केला असून, त्यासाठी अवघ्या ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठा जमीन गैरव्यवहार उघडकीस आला, ज्याचा पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी डायरेक्ट कनेक्शन आहे. हे नवे प्रकरण पुण्याच्या मुंढवा भागातील आहे.
3 या प्रकरणी कोणत्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे?या प्रकरणी दिग्विजय अमरसिंह पाटील (पार्थ पवार यांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार), शीतल तेजवानी (जागेची पॉवर ऑफ एटर्नी असलेली), निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले, रवींद्र तारू यांच्यासह एकूण ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगनमत करून शासनाचा ५ कोटी ८९ लाख ३१ हजार ८०० रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडल्याबद्दल हा गुन्हा आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 7, 2025 | Trending News
Crime News Women Sexual Herrasment Inside Car: ठाण्यातील कुटुंब न्यायालयाच्या आवारात एका विवाहित महिलेवर दोघा पुरुषांनी कारमध्ये सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा सारा प्रकार पोलिसांचा सतत वावर असलेल्या न्यायालयासारख्या संवेदनशील इमारतीच्या परिसरात घडला आहे. पोलिसांबरोबरच सर्वसामान्यांची वर्दळ असलेल्या ठाण्यासारख्या गर्दीच्या शहरात सार्वजनिक ठिकाणी हा प्रकार घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Add Zee News as a Preferred Source
नक्की घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी महिलेला नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने बोलावले होते. या महिलेच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या केकमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला केक खाऊ घालण्यात आला. त्यानंतर ती बेशुद्ध पडल्यावर आरोपींनी हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप आहे. ही घटना 25 ऑगस्ट 2024 रोजी घडली असल्याचे सांगितले जात असून, पीडित महिलेने 5 डिसेंबर 2025 रोजी ठाणे नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
इतक्या दिवस का शांत राहिली महिला?
जवळपास 15 महिन्यांपूर्वी हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत असताना पीडित महिला इतक्या दिवस का शांत राहिली असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी आरोपींनी महिलेसोबत घृणास्पद कृत्य केले तेव्हा त्यांनी त्याचे चित्रिकरणही केले होते. या महिलेचा अश्लील व्हिडिओ तयार करून आरोपींकडून महिलेला वारंवार दोघांनी ब्लॅकमेल केलं. त्यामुळेच ही महिला तक्रार करत नव्हती. मात्र सततच्या त्रासाला कंटाळलेल्या या महिलेचा संयम संपला आणि तिने 5 डिसेंबर रोजी म्हणजेच घटना घडल्यानंतर सव्वा वर्षाने तक्रार दाखल केली.
आरोपी कोण?
आरोपींपैकी एक हिरालाल केदार (युट्यूब पत्रकार) याला अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी रवी पवार फरार आहे. ठाणे नगर पोलिसांकडून पवार येथे तपास सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, न्यायालयाच्या आवारात अशी घटना घडल्याने सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ठाण्यात महिला अत्याचाराचं वाढतं प्रमाण
ठाण्यामध्ये मागील काही काळापासून महिलांवरील अत्याचारासंदर्भातील घटना घडल्या आहेत. ठाण्यात एका व्यक्तीने स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलीवर जून 2025 पासून डिसेंबरपर्यंत सतत अत्याचार केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला. पीडितेच्या आईने जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. आरोपी वडीलांवर गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरू आहे. ठाण्यातच 14 जुलै रोजी शाळकरी मुलींना ‘मासिक पाळी तपासणी’च्या नावाखाली कपडे काढण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकरणावरूनही वातावरण चांगलेच तापले होते.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 6, 2025 | Trending News
नेहा चौधरी या ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
…Read More
Source link