by Hansraj Agrawal | Jul 25, 2025 | Trending News
Navi Mumbai Police Job Vacancy 2025: बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन लवकरच होण्याची शक्यता आहे. गृह विभागाने विमानतळ इमिग्रेशन चेक पोस्टसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आस्थापनेवर अधिकारी आणि कर्मचारी मिळून एकूण 285 पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता दिली. यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला.
कोणकोणत्या पोस्टसाठी होणार भरती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत 17 सप्टेंबरला नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. विमानतळ इमिग्रेशन चेक पोस्टसाठी निर्माण करण्यात आलेल्या पोलीस पदांमध्ये पोलीस निरीक्षक 20, पोलीस उपनिरीक्षक 55, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 30, पोलीस हवालदार 60 आणि पोलीस शिपाई 120 या पदांचा समावेश आहे. पोलीस दलातील नोकऱ्यांबरोबरच या विमानतळाशीसंबंधीत हजारो नोकऱ्या लवकरच उपलब्ध होणार आहे. या विमानतळाचा आकार आणि त्यासाठी उपलब्ध करुन दिली कनेक्टीव्हीटीचा विचार केल्यास हे विमानतळ सुरु झाल्यानंतर हजारो लोकांना नोकरी मिळणार आहे.
केवढा आहे या विमानतळाचा पसारा?
नवी मुंबई विमानतळ 1160 हेक्टर परिसरात उभारण्यात येत आहे. या विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका लांब असून या विमातळावर एकाचवेळी 350 विमाने उभी राहू शकतात. हे विमानतळ पूर्णपणे कार्यन्वित झाल्यानंतर वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करु शकतात. या विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 2029 पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, तिसरा टप्पा 2032 पर्यंत आणि चौथा टप्पा 2036 पर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. देशातील सर्वात मोठी कार्गो सिस्टीम देखील तयार केली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळामुळं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे.
पहिल्या दिवशीच 15 हून अधिक शहरं जोडणार
नवी मुंबई विमानतळावरुन पहिल्या दिवसापासून 15 पेक्षा जास्त शहरांमध्ये 18 दैनंदिन उड्डाणे (36 एअर ट्राफिक मॅनेजमेंट) सुरू केले जाणार आहे. सिडकोकडून नवी मुंबई विमानतळाचा विकास केला जाणार आहे. विमानतळाला चांगली कनेक्टीव्हिटी मिळावी यासाठी परिसरातील इतर मार्गाना विमानतळासोबत जोडलं जाणार आहे. त्यादृष्टीने काम सुरू असल्याची माहिती सिडकोच्या संचालकांनी दिली. नोव्हेंबर 2025 पर्यंत 79 दैनंदिन उड्डाणे (158 एटीएम) केले जाणार असून, यामध्ये 14 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे. नवी मुंबई विमानतळ जगातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे. तसंच, नवी मुंबईच्या विमानतळाला मेट्रो, लोकल,बस आणि खासगी वाहनांसोबत जोडण्यात येईल. तसंच, मुंबईवरुन नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी वॉटर टॅक्सीचा विचारही करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वेगळं टर्मिनल
बॉलिवूड कलाकार, उद्योगपती आणि अति महत्त्वाचे नेते, मंत्री यांच्यासाठी नवी मुंबई विमानतळावर एक समर्पित असलेल्या वेगळं टर्मिनल बनविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. नवीन विमानतळाच्या व्यावसायिक उद्घाटनानंतर सुरू होणाऱ्या विस्ताराच्या पुढील टप्प्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) एक वेगळं टर्मिनल बांधण्याची योजना आखत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 24, 2025 | Trending News
Jalna Crime News: जालनात्यातील एका सात वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याची घटनेने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता एक महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. जालन्यातील भोकरदन येथील गणपती इंग्लिश स्कुलच्या आदिवासी निवासी वस्तीगृहात राहणाऱ्या आणि दुसरीत शिकणाऱ्या 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा त्याच्याच हॉस्टेलमधील दोन अल्पवयीन बालकांनी दोरीने गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. या अल्पवयीन आरोपींनी मोबाईलवर क्राईम स्टोरीज पाहून हा खून केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी खून करणाऱ्या अल्पवयीन दोन बालकांना ताब्यात घेत त्यांची बालसुधारगृहात रवानगी केलीय.
जालन्यातील भोकरदनच्या याच गणपती विद्यालयात दुसरी च्या वर्गात शिकणाऱ्या 7 वर्षाच्या बालवीर पवारचा रात्रीच्या वेळी दोरीने गळा आवळून खून करण्यात आलाय. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनं भोकरदन शहर आणि तालुका हादरून गेला होता. दोन दिवसांपूर्वी बालवीरचा हॉस्टेलच्या परीसरात मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आणि पोलीस तपास सुरू झाला. बालवीरच्या हत्येप्रकरणी तपासा दरम्यान पोलिसांनी याच शाळेच्या हॉस्टेलमधून एक 14 आणि दुसऱ्या 8 वर्षाच्या अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतलं आणि या दोन्हीही मुलांनी बालवीरचा दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली
पोलिसांनी दोन अल्पवयीन बालकांना या हत्येप्रकरणी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केल्यानंतर पोलीसही हादरले आहेत. अल्पवयीन दोन्हीही आरोपींचे बालवीरसोबत शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यावरून भांडण होत होतं. तसेच हॉस्टेलमध्ये झोपण्यासाठी दोन कप्प्यांचे बेड असल्यानं वर झोपलेल्या बालकाकडून पेन्सिल अथवा पेन सतत खाली पडण्यावरून देखील त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे या दोन अल्पवयीन आरोपींनी बालवीरचा दोरीने गळा आवळून खून केला. हा खून केल्यानंतर अल्पवयीन आरोपी रात्रभर बालवीरच्या पार्थिवावर ब्लॅंकेट टाकून या पार्थिवा शेजारी देखील बसून राहिल्याचं पोलीस तपासात समोर आलं. विशेष म्हणजे या तपासा दरम्यान या अल्पवयीन आरोपींनी बालवीरचा खून मोबाईलमध्ये क्राईम स्टोरी पाहून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. त्यामुळे पालकांनी आपली लहान मुलं मोबाईलमध्ये काय बघतात याकडे लक्ष द्यावं असं आवाहन पोलिसांनी केलंय
भोकरदनमध्ये 2 रीच्या वर्गात शिकणाऱ्या बालविरच्या हत्येनं सध्या भोकरदन शहर सुन्न झालंय. या खुनाच्या घटनेने बालविरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. शाळा अथवा हॉस्टेलमध्ये लहान मुलांच्या भांडणांच्या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे या घटनेने अधोरेखीत केलंय.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 23, 2025 | Trending News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारला आर्थिक शिस्त लावण्यासाठी हातात निर्बंधांची छडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. नगरविकास खात्याला कोणत्याही योजनेसाठी परस्पर निधी देता येणार नाही. कोणताही निधी मंजूर करताना एकनाथ शिंदेंनाही फडणवीसांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 23, 2025 | Trending News
ठाण्यात तलवारीने हल्ला करणाऱ्या शिंदे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. हल्ल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 22, 2025 | Trending News
मुंबईतील कांदिवली परिसरात असणाऱ्या कदम कुटुंबीयांच्या ‘सावली’ या बारचा मुद्दा शिवसेना UBTच्या अनिल परब यांनी पुन्हा उचलून धरला. अनिल परब यांनी रामदास कदम आणि योगेश कदम या पितापुत्रांना खडे बोल सुनावलेत.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 22, 2025 | Trending News
Manikrao Kokate New Video: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपण सभागृहात रमी खेळतानाचा आरोप फेटाळून लावला आहे. आपण आयुष्यात कधीच रमी खेळलो नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसंच आपण जाहिरात स्कीप करत असताना, फक्त 18 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करुन आरोप प्रत्यारोप केले जात असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. त्यानंतरचा व्हिडीओ जाणुनबुजून शेअर करण्यात आला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. यानंतर रोहित पवार यांनी एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ 22 सेकंदाचा आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा दावा फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच पुन्हा एकदा राजीनाम्याची मागणी केली आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना रोहित पवारांनी लिहिलं आहे की, “सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो?”.
“विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
“विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता?,” अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
कोकाटेंनी काय म्हटलं आहे?
“हाऊसमध्ये माझं काम होतं, लक्षवेधी होती. माझ्या ओएसडी किंवा इतरांकडून माहिती मिळवण्यासाठी फोन किंवा मेसेज करावा लागतो. त्यासाठी मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यानंतर त्यावर मोबाईल गेम पॉप अप झाला. एक एका सेकंदाला गेम येत असतात. मोबाईल नवा असल्याने मला तो स्कीप करता आला नाही. पण स्कीप केल्यानंतरचा व्हिडीओ समोर आलाच नाही. आपण 5 जीमध्ये असल्याने मोबाईलवर एकामागोमाग गेम पॉप अप होतात आणि ते स्कीप करावे लागतात. हा फक्त 18 सेकंदाचा व्हिडीओ आहे. त्यात मी स्कीप करण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढाच व्हिडीओ शूट करुन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. माझा खेळण्याचा काही हेतू नव्हता. पूर्ण दाखवलं असतं तर काहीही तथ्य नसल्याचं लक्षात आलं असतं,” असा दावा माणिकराव कोकाटेंनी केला आहे.
“मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे आरोप बिनबुडाचा आणि चुकीचा आहे. या आरोपांमुळे महाराष्ट्रात माझी बदनामी झाली आहे. कारण नसताना ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला, बदनामी केली आहे त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Source link