रायगडमध्ये महायुतीत वाद पुन्हा पेटणार?

रायगडमध्ये महायुतीत वाद पुन्हा पेटणार?


ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेसेना आमदार महेंद्र दळवी यांच्यावर कॅश बॉम्ब टाकला आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.. मात्र या कॅश बॉम्बनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादाचा भडका उडालाय.  सुनील तटकरेंनी महेंद्र दळवींवर केलेल्या टीकेनंतर दळवी यांनी थेट सुनील तटकरेंचेच व्हिडिओ बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब टाकल्यानंतर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच वादाच भडका उडालाय… अंबादास दानवेंनी व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी या प्रकरणात सुनील तटकरेंना ओढत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधल्यानंतर तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत आमदार दळवींवर शालजोडीतील टोले हाणले.. आणि यानंतर संतापलेल्या आमदार महेंद्र दळवी यांनी आता सुनील तटकरेंना इशारा दिलाय… तटकरेंचे अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत. हे व्हिडिओ बाहेर आले तर ते तोंड दाखवू शकणार नाहीत असा इशारा दळवींनी तटकरेंना दिलाय… 

तर अशा पोकळ धमक्या देण्यापेक्षा तुम्ही जे काय असेल ते जनतेसमोर आणा असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमेल मिटकरी यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर पलटवार केलाय.

अंबादास दानवे यांनी महेंद्र दळवींचा व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर दळवी यांनी दानवे यांच्यासोबत सुनील तटकरे यांच्यावर हा व्हिडिओ पुरवल्याचा आरोप केला होता. आणि त्यानंतर तटकरेंनी दळवींवर खोचक टीका केल्यानंतर दळवींनी तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढण्याचा इशारा दिला..

 तर अंबादास दानवेंनी महेंद्र दळवींच्या ट्विट केलेल्या व्हिडिओ वरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनाचा समाचार घेतलाय.. आता मॉर्फिंगचा धंदा सुरू झालाय… बाकी सगळे धंदे बंद झाल्याचं म्हणत शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केलाय..

तर दुसरीकडे  शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू झालेल्या वादावरून उद्धव ठाकरेंनी महायुतीवर हल्लाबोल केलाय. महायुतीमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाहीय.. मित्र मित्र म्हणून एकमेकांवर धाडी टाकण्याचं आणि एकमेकांची प्रकरणं बाहेर आणण्याचं काम सुरू असल्याचं म्हणज उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय

अंबादास दानवेंनी पैशांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ ट्विट करत

आमदार महेंद्र दळवींना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच वादाचा भडका उडालाय… सुनील तटकरे यांनी महेंद्र दळवींवर टीका केल्यानंतर आता महेंद्र दळवी यांनी तटकरेंचेच व्हिडिओ बाहेर काढण्याचा इशारा दिलाय.. त्यामुळे पुढल्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.





Source link

काका नव्हे मित्र! अमित ठाकरेंच्या मुलाची आदित्य ठाकरेंशी जमली गट्टी; वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ…

काका नव्हे मित्र! अमित ठाकरेंच्या मुलाची आदित्य ठाकरेंशी जमली गट्टी; वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ…



Aditya Thackeray Plays With Amit Thackeray Son: असं म्हणतात की, लहान मुलं पाहिली, की त्यांच्या बालक्रीडा नकळत आपल्यालासुद्धा लहानगं होण्यास भाग पाडतात. हा व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसेल… 
 



Source link

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात ‘सीट्रिपल आयटी’ सेंटर; राज्यात तिसरे मोठ्या IT पार्क उभारण्याआधी 1,15,00,00,000 रुपयांचे ट्रेनिंग सेंटर

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात ‘सीट्रिपल आयटी’ सेंटर; राज्यात तिसरे मोठ्या IT पार्क उभारण्याआधी 1,15,00,00,000 रुपयांचे ट्रेनिंग सेंटर


IT Park now the Ctriple IT center : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क मधील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्रात दोन नवीन आयटी पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. एक आयटी पार्क पुरंदर येथे तर दुसरे आयटी पार्क सातारा जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. साताऱ्यात  राज्यात तिसरे मोठ्या IT पार्क उभारण्याआधी 1,15,00,00,000 रुपयांचे ट्रेनिंग सेंटर उभारले जाणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

साताऱ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲन्ड ट्रेनिंग सेंटर उखखखढ (‌‘सीट्रिपलआयटी‌’) स्थापन केले जामार आहे. या संदर्भातील प्रस्ताव टाटा टेक्नॉलॉजीजने राज्य सरकारकडे सादर केला आहे. हा प्रकल्प 115 कोटी रुपयांचा आहे. यासंदर्भात कंपनीने मुख्यमंत्री तसेच  उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून प्रकल्पाची माहिती दिली आहे. सातारा शहर लवकरच आयटी हब म्हणून उदयास येणार आहे. सातारा आयटी पार्क प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. लिंब खिंड नागेवाडी परिसरात हे नवे आयटी पार्क उभारले जाणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांन या IT पार्कच्या उभारणीसाठी  सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. 

साताऱ्यात IT पार्क उभारण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरु असतानाच आयटी सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  टाटा टेक्नॉलॉजीजच्या सीआयआयआयटी प्रस्तावामुळे येथील आयटी पार्कला आणखी बळकटी येणार आहे. ‌‘टाटा टेक्नॉलॉजी‌’ कंपनीने केंद्र मंजुरीचे पत्र राज्य शासनाला पाठवले असून टाटा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून सातारा येथे लवकरत हे नवीन केंद्र उभारले जाणार आहे. 

या नव्या ‘सीट्रिपल आयटी’ सेंटरमुळे सातारा जिल्ह्यातील तरुणांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक ‌‘एआय‌’ तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र मंजुरीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल शिवेंद्रराजे यांनी दोघांचेही आभार मानले आहेत.
उद्योगक्षेत्रात तंत्रज्ञानाच्या जलद बदलामुळे कौशल्याधारित प्रशिक्षणाची गरज वाढली आहे.  सध्याची व्यावसायिक प्रशिक्षण प्रणाली स्पर्धात्मक उद्योगमानकांशी जुळत नसल्याचे टाटा टेक्नॉलॉजीजने नमूद केले आहे. तंत्रज्ञानातील प्रगती, नवीन मॉडेल्स आणि उद्योग 4.0 कौशल्यांमुळे रोजगार संधी बदलत आहेत, परंतु विद्यमान शैक्षणिक पद्धती मागे पडत असल्याने कुशल मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या सीआयआयआयटी सेंटरमुळे नवा बदलाव येणार आहे.

टाटा टेक्नॉलॉजीजने कर्नाटक, तामिळनाडू, बिहार आणि आसाम या राज्यांत असे कौशल्यविकास केंद्र यशस्वीरीत्या उभारले आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली येथेही राज्य सरकारच्या सहकार्याने असेच प्रकल्प राबवले आहेत. आता साताऱ्यात उद्योग 4.0 कौशल्यांसाठीच्या प्रशिक्षणाची उणीव भरून काढण्यासाठी सीआयआयआयटी उभारण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. या केंद्रामध्ये अत्याधुनिक उपकरणे, प्रयोगशाळा, सुविधा उन्नतीकरण, अभ्यासक्रम पुनर्रचना व नवीन तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा समावेश होणार आहे. हे केंद्र सुरू झाल्यावर दरवर्षी सुमारे 3000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रस्तावित प्रकल्पाची एकूण रक्कम 115 कोटी असून, त्यातील 15 टक्के हिस्सा साताऱ्यातून उभारला जाईल. उर्वरित खर्च टाटा टेक्नॉलॉजीज व उद्योग भागीदार उचलणार असल्याचे या संदर्भातील पत्रात नमूद आहे.

 





Source link

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ? उदय सामंत यांचा खळबळजनक दावा, 'काही दिवसात…'

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ? उदय सामंत यांचा खळबळजनक दावा, 'काही दिवसात…'


Uday Samant Big Claim: महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसंदर्भात त्यांनी मोठा दावा केला आहे. जर हा दावा खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. 

Add Zee News as a Preferred Source

उदय सामंत यांचा दावा काय? 

नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आहेत. यादरम्यान एकमेकांवर टीकेचे बाण सोडत आरोप-प्रत्युत्तर, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्याच उदय सामंत यांनी एक दावा केला आहे. 

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. काही दिवसातच सगळं काही समोर येईल असंही सूचक विधान त्यांनी केलं आहे. 

संजय शिरसाट यांनीही केला होता दावा

उदय सामंत यांच्याआधी शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीही असाच एक दावा केला होता. उद्धव ठाकरेंचे 20 पैकी 12 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांना माध्यमांशी केला होता. आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार असल्याचा दावा केल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर देताना हे विधान केलं होतं. 

“उद्धव ठाकरेंचे 20 पैकी 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत. मी रोज त्यांच्या संपर्कात आहे, माझं रोज त्यांच्याशी बोलणं होतं. ज्या दिवशी एकनाथ शिंदे झेंडा दाखवतील, ते सगळे आमच्या शिवसेनेत दाखल होतील,” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं होतं. 

सगळ्या आमदारांची नावं माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावर त्यांची नावं जाहीरपणे सांगणार असंही त्यांनी म्हटलं होतं. हे सर्व आमदार उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीला कंटाळले असून, लवकरच आमच्या शिवसेनेत येणार आहेत असा दावा त्यांनी केला होता. 





Source link

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यातील आरोपी शिंदेंच्या शिवसेनेत?

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यातील आरोपी शिंदेंच्या शिवसेनेत?



 छत्रपती संभाजीनगर मध्ये आदर्श बँक घोटाळा चांगलाच गाजला होता अनेक गोरगरिबांचे पैसे तिथे अडकले त्यातीलच काही प्रमुख आरोपींचा नुकताच पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश झाला असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. 



Source link

तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी, 20 कोटींवरुन राडा… BJP आमदाराला कोणी दिली धमकी? नेमका वाद काय?

तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी, 20 कोटींवरुन राडा… BJP आमदाराला कोणी दिली धमकी? नेमका वाद काय?


BJP MLA Threat Calls For Questioning Tukaram Mundhe: भारतीय जनता पार्टीचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना, त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद नसतानाही नियमबाह्य पद्धतीने एका कंत्राटदाराला 20 कोटी रुपयांचा वर्क ऑर्डर दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खोपडे हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून मुंढेंना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

Add Zee News as a Preferred Source

देवगिरी बंगल्यावर शिंदेंची भेट

नागपूर पूर्वचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी आयएस अधिकारी तुकाराम मुंढेबाबत खळबळजनक दावा केल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुंडेंविरोधात लक्षवेधी लावली होती. खोपडेंनी तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी केली आहे. कृष्णा खोपडे यांनी सोमवारी दुपारनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. देवगिरी बंगल्यावर त्यांनी ही भेट घेतली. मुंढे यांच्या समर्थकांकडून मराठवाड्यातून धमकी दिल्याचा कृष्णा खोपडे यांचा आरोप असून त्यांनी आपलं म्हणणं उपमुख्यमंत्र्‍यांसमोर मांडल्याचं समजतं. 

फोनवरुन धमक्या देण्यात आल्या

सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप करत लक्षवेधी मांडण्याची येण्याची भूमिका घेणारे आमदार कृष्णा खोपडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धमकीचे फोन आल्याचा दावा केला आहे. मुंडेंच्या निलंबनाची मागणी का करत असल्याचा सवाल करत दोन जणांनी शिवीगाळ करत धमकी दिल्याचा दावा खोपडे यांनी केला आहे. तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध लक्षवेधी लावू नका, तक्रार करू नका अशा धमक्या फोनवरुन देण्यात आल्याचा दावा खोपडेंनी केला आहे. या प्रकरणी खोपडे पोलिसात तक्रार करणार आहेत.  

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

फोनवरून धमकीप्रकरणी खोपडे यांनी मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे. तसेच बर्डी पोलीस ठाण्यात तक्रार देखील केल्याचं त्यांनी सांगितले.

कठोर निर्णयांमुळे राजकारणींशी मुंढेंचा सतत संघर्ष

तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या छोट्या गावात झाला. ते शेतकरी कुटुंबातून आले असून, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून राजनीती शास्त्रात मास्टर्स पदवी घेतली आहे. मुंढे यांनी राजनीती शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. ऑगस्ट 2005 मध्ये ते आयएएस सेवेत रुजू झाले. त्यांच्या 20 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांना अनेक वेळा ट्रान्सफर मिळाल्या आहेत. 2025 पर्यंत त्यांना 23 वेळा ट्रान्सफर झाल्या आहेत, ज्यामुळे ते अशोक खेमका यांच्या सारखे चर्चेत राहिले आहेत. मुंढे यांना प्रामाणिकपणा आणि कठोर निर्णयांमुळे राजकारणी आणि सहकाऱ्यांशी संघर्ष होतो. त्यांच्या व्यावहारिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे ट्रान्सफर होतात, असे म्हटले जाते. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp