मुलाच्या बर्थ-डेची तयारी करतानाच गाठले अन्…; नागपुरात भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची दिवसाढवळ्या हत्या

मुलाच्या बर्थ-डेची तयारी करतानाच गाठले अन्…; नागपुरात भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची दिवसाढवळ्या हत्या


Nagpur Crime News: नागपुरात शनिवारी भरदिवसा धारदार शस्त्राने वार करत भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची हत्या करण्यात आली आहे. सचिन उर्फ सोनू साहू असं मयत व्यक्तीचे नाव आहे. यशोधरा पोलीस स्टेशन स्टेशनच्या हद्दीतील कांजी हाऊस येथे हा थरार घडला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सचिन साहू असं मृताचं नाव असून तो उत्तरं नागपुरातील वार्डचा अध्यक्ष होता. जुन्या पैशाच्या देवाण घेवाणचा वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक सचिनच्या मुलाचा वाढदिवस होता. तो मुलाच्या वाढदिवसाच्या तयारीचे साहित्य आणण्यासाठी बाहेर गेला होता. घरी परतत असतानाच वाटतेच कांजी हाऊस परिसरात त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

दोन दुचाकींवर आलेले चार मारेकरी पूर्ण तयारीनिशी आल्याचा संशय पोलिसांना आहे. सोनुच्या खूनानंतर चौघेही फरार झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आर्थिक वादातून खून झाल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. काही संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठीदेखील बोलवले होते.

मारेकरी नेमके कोण होते? हत्येमागाचे नमेके कारण काय? याचा तपास सुरू असून आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही तपासात आरोपीचा मागोवा घेत आहेत. तीन ते चार जण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसंच, मृतक सचिन शाहूचा गणपतीच्या दरम्यान काही लोकांशी वाद झाला होता त्यामुळे याच्या हत्येमागे त्या लोकांचा समावेश असल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

FAQ

प्रश्न 1: नागपुरात शनिवारी कोणत्या व्यक्तीची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे?

उत्तर: सचिन उर्फ सोनू साहू या भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची धारदार शस्त्राने वार करत भरदिवसा हत्या करण्यात आली आहे.

प्रश्न 2: ही घटना नागपुरात कोणत्या ठिकाणी घडली?

उत्तर: यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कांजी हाऊस परिसरात हा थरार घडला आहे.

प्रश्न 3: मृत सचिन साहू कोणत्या पक्षाचे व कोणत्या भागाचे अध्यक्ष होते?

उत्तर: मृत सचिन साहू हे उत्तर नागपुरातील भाजपचे वॉर्ड अध्यक्ष होते.

प्रश्न 4: हत्येमागे प्राथमिक संशयित कारण काय आहे?

उत्तर: प्राथमिक तपासात, ही हत्या जुन्या पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.





Source link

झी 24 तासची बातमी अन् अजितदादांची धावाधाव? पुणे जमीन प्रकरणाबाबत दादा-शाहांची चर्चा?

झी 24 तासची बातमी अन् अजितदादांची धावाधाव? पुणे जमीन प्रकरणाबाबत दादा-शाहांची चर्चा?


Ajit Pawar : झी 24 तासनं पर्दाफाश केलेल्या कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले आहेत. अजित पवारांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतलीय. या भेटीत अजित पवार आणि अमित शाहांमध्ये कोरेगाव जमीन गैरव्यवहारासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कारण झी 24 तासनं ही बातमी ब्रेक केल्यानंतर पार्थ पवार अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे अजित पवारांची देखील दाणादाण उडल्याचं चित्र आहे.

Add Zee News as a Preferred Source

झी 24 तासची बातमी, अजितदादांची धावाधाव?  

बिहारच्या निकालानंतर रात्री 10 वाजता अजित पवारांनी दिल्लीत देशाचे गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली आहे.  पुण्यातील कोरेगाव परिसरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती.  जमीन प्रकरणातील वस्तूस्थिती दादांनी शाहांसमोर मांडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. झी 24 तासनं समोर आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत उमटल्याचं पाहायला मिळालं.

अजित पवारांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील वर्षा बंगल्यावर जात भेट घेतली होती. दरम्यान या भेटीत देखील अजित पवारांनी फडणवीसांसोबत जमीन प्रकरणावर चर्चा केल्याची माहिती होती. दरम्यान आता शाहांच्या भेटीतही याच प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिल्यानंतर विरोधकांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय.

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय अंजली दमानियांनी व्यक्त केलाय. शाहांच्या भेटीनंतर प्रकरणाला दाबलं जात असेल तर ईडी, शाहांविरोधात याचिका करण्याचा इशारा अंजली दमानियांनी दिलाय. तर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील अजित पवारांवर शरसंधान साधलंय. तर तिकडे अमित विजय वडेट्टीवारांनी देखील या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय.

वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र 

पुणे मुंढवा जमीन प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी विजय वडेट्टीवारांची मागणी. जमीन प्रकरणी नेमलेल्या चौकशी समिती मधील अधिका-यांचाही जमीन गैरव्यवहार प्रकरणात सहभाग, त्यामुळे समिती रद्द करा. स्वतंत्र समिती नेमून निष्पक्ष चौकशी, आणि जबाबदार अधिका-यांवर कारवाईची वडेट्टीवारांची मागणी.

झी 24 तासनं पुणे जमीन प्रकरणाचा भांडाफोड केल्यानंतर पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केलीय. दरम्यान याच प्रकरणी अजित पवारांनी अमित शाहांसोबत चर्चा केल्याची माहितीय. तर दुसरीकडे वडेट्टीवारांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.





Source link

विकेंडला हुडहुडी! राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा, मुंबईतच अनुभवता येणार माथेरानचा आनंद

विकेंडला हुडहुडी! राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा, मुंबईतच अनुभवता येणार माथेरानचा आनंद


Maharashtra Weather Update: राज्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने नागरिकांची चिंता वाढवली होती. मात्र आता हळूहळू थंडीचा कडाका वाढू लागला आहे. राज्यातील बहुसंख्य शहरात तापमानाचा पारा घसरतोय. विकेंडला नागरिकांना थंडीचा सुखद अनुभव घेता येणार आहे. सोमवारपर्यंत गारठा टिकून राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे झेपावत असल्याने थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट काही दिवस टिकून राहणार आहे. राज्यातही गारठा वाढणार असून अनेक ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात किमान तापमान 11 अंशाच्या खाली आल्याने थंडीचा कडाका वाढणार असल्याने कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे. 

राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू घट होत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट आणि हुडहुडी कायम आहे. किमान तापमानाचा पारा 10 अंशाखाली घसरल्यास आणि तापमानात सरासरीपेक्षा 4.5 अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आल्याचे असे समजले जाते. 

मुंबईचे शुक्रवारी किमान तापमान 18.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. शनिवार, रविवार आणि सोमवारी हा पारा 16 ते 17 अंशांवर उतरण्याची शक्यता आहे. यामुळे गारेगार झालेल्या मुंबईकरांना बोचरी थंडी अनुभवता येणार आहे. मुंबई शेजारचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानचे किमान तापमान 18 नोंदविण्यात आले. 

14 ते 20 नोव्हेंबर आणि 21 ते 27 नोव्हेंबर या दोन आठवड्यांत महाराष्ट्र व मध्य भारतातील बहुतेक भागात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

FAQ

प्रश्न १: राज्यात थंडी का वाढू लागली आहे?

उत्तर: उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे झेपावत असल्याने राज्यात थंडी वाढू लागली आहे.

प्रश्न २: सध्या राज्यातील तापमानाची स्थिती काय आहे?

उत्तर: राज्यातील बहुसंख्य शहरांमध्ये तापमानाचा पारा घसरू लागला आहे आणि थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागला आहे.

प्रश्न ३: थंडीची लाट येण्याची शक्यता कोणत्या भागात आहे?

उत्तर: उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट काही दिवस टिकून राहणार आहे, तसेच राज्यातही गारठा वाढणार असून अनेक ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.





Source link

'….आम्ही मान्य केलं पाहिजे', सुप्रिया सुळे बिहारमधील निकालावर स्पष्टच बोलल्या, 'हा एकतर्फी निकाल…'

'….आम्ही मान्य केलं पाहिजे', सुप्रिया सुळे बिहारमधील निकालावर स्पष्टच बोलल्या, 'हा एकतर्फी निकाल…'


Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

…Read More





Source link

पुणे – आगीने वेढलेला कंटेनर रस्त्यावर धावत होता, अपघाताचं धक्कादायक CCTV आलं समोर

पुणे – आगीने वेढलेला कंटेनर रस्त्यावर धावत होता, अपघाताचं धक्कादायक CCTV आलं समोर


Pune Accident CCTV: पुण्यातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघात 8 जणांचा मृत्यू झाला असून, 17 जण जखमी झाले आहेत. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने रस्त्यात येणाऱ्या सर्व गाड्यांना उडवलं आणि अखेर पेट घेतला. या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. सीसीटीव्हीत आगीत वेढलेला कंटनेर रस्त्यावरुन धावताना दिसत आहे. या व्हिडीओतूनच हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येत आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

Add Zee News as a Preferred Source

कंटेनरने 20 ते 25 वाहनांना चेंडूप्रमाणे उडवत त्यांचा अक्षरश: चुराडा केला आहे. अपघात इतका भीषण होता की, दोन कंटेनरच्या मधे एक कार अडकली होती. अपघातामुळे कंटनेरला आग लागल्यानंतर ही कार प्रवाशांसह जळाली. आगीनंतर कारची राख झाली आहे. कंटनेर चालकही अपघातात ठार झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.

नेमकं काय घडलं?

कंटनेर नवले पुलाच्या पुढे असणाऱ्या बोगद्यातून पुण्याच्या दिशेन येत होता. उतारावर कंटेनरचा ब्रेक फेल झाला. यानंतर कंटेनरने समोर येतील त्या सगळ्या गाड्यांना धडक दिली. चेंडूप्रमाणे गाड्या रस्त्यावर उडत होत्या. जवळपास 3 किमी कंटेनर वाहनांना धडक देत होता. 20 ते 25 गाड्यांना कंटेनरने धडक दिली. एका क्षणी कंटेनरने दुसऱ्या एका कंटेनरला धडक दिली. यावेळी कार दोन्ही कंटेनरच्या मधे अडकली आणि आग लागली. कार बाहेर पडण्यासाठी जाग नसल्याने आतील प्रवाशांसह ती जळाली आणि राख झाली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. 

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. आग लागल्यानंतर क्रेनच्या माध्यमातून कंटेनर आणि कारला काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसंच अपघातग्रस्त वाहनांना बाजूला काढण्यात आलं. रस्त्यावर काचा आणि रक्ताचा सडा पडला आहे. 

गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला असून लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली आहे. तसंच अपघातानंतर तिथे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. काही दुचाकींनाही कंटेनरने धडक दिली. मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. 

अजित पवारांची पोस्ट

पुण्यातील नवले पुलाजवळ दोन कंटेनरची झालेली धडक आणि त्यामध्ये एका कारचा झालेला भीषण अपघात तसेच त्यानंतर लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी असून मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.





Source link

मुलीच्या साखरपुड्यामधील कपड्यांवरील कमेंट्सनी इंदुरीकर महाराज संतप्त, घेतला कीर्तन सोडण्याचा निर्णय

मुलीच्या साखरपुड्यामधील कपड्यांवरील कमेंट्सनी इंदुरीकर महाराज संतप्त, घेतला कीर्तन सोडण्याचा निर्णय


Ahmednagar : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमीच त्यांच्या विनोदी शैलीतून आणि वास्तवाशी निगडित भाषणातून लोकांना विचार करायला भाग पाडतात.  काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लेकीचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात कपड्यावरून ट्रोल करण्यात आलं. लेकीच्या साखरपुड्यामधील कपड्यांवर झालेल्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज यांनी व्यथित होऊन कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.

Add Zee News as a Preferred Source

मात्र, या प्रसंगानंतर सोशल मीडियावर काही लोकांनी अत्यंत अयोग्य आणि वैयक्तिक टीका करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मुलीच्या कपड्यांवर केलेल्या अश्लील आणि अनावश्यक कमेंट्समुळे महाराज मनोमन दुखावले गेले आहेत.

‘लोक खाली गेलेत… माझ्या मुलीच्या कपड्यांवर कमेंट्स करत आहेत’

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इंदुरीकर महाराज म्हणतात, ‘आमची पोरं लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी भेट होत नसे. मी लोकांसाठी धावत राहिलो. पण आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगावरच्या कपड्यांवर कमेंट्स करत आहेत. यापेक्षा वाईट काय असेल? चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या साखरपुड्याचे कपडे चर्चेत आहेत. पण तिच्या बापाला काहीही विचारत नाहीत’.

ते पुढे म्हणाले, ‘तुमच्याही मुली असतील. तिच्या कपड्यांवर कोणी बोललं तर तुम्हाला काय वाटेल? साखरपुड्यात कपडे मुलीकडून घेतले की नवरदेवाकडून? मग त्यावर माझा काय दोष? एवढी तरी लाज असावी ना! 31 वर्ष मी कीर्तन केलं, लोकांना प्रेरणा दिली, उपदेश केला पण आता मजा उरली नाही. 

लोकांच्या शिव्या खात खात आयुष्य गेलं पण आता हे व्यक्तिगत पातळीवर गेलं आहे. मी आजही समर्थ आहे उत्तर द्यायला पण कुटुंबावर बोट गेलं की सहन होत नाही’.  त्यांनी असंही स्पष्ट सांगितलं की ते काही दिवसांत एक व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध करून कीर्तन थांबवण्याचा औपचारिक निर्णय जाहीर करतील.

जनतेकडून सहानुभूतीची लाट

सोशल मीडियावर अनेकांनी इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘महाराज आमचं प्रेरणास्थान आहेत, त्यांनी कीर्तन सोडू नये’, असे अनेक लोक म्हणत आहेत. काहींनी सोशल मीडियावरील वैयक्तिक टीकेला आळा घालावा अशी मागणीही केली आहे.

इंदुरीकर महाराज हे केवळ कीर्तनकार नाहीत तर ग्रामीण महाराष्ट्राचं प्रतिबिंब आहेत. त्यांच्या शब्दांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे. पण वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींवरून केलेली टीका किती खोल जखमा करते हे या प्रसंगातून स्पष्ट झालं आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp