by Hansraj Agrawal | Jul 2, 2025 | Trending News
Mumbai School Crime News: मुंबईतील एका नामांकित शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शिक्षिकेने मुलाचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आल्यानंतर तिच्याविरोघात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पालकांनाही बसला धक्का
शिक्षकांना, गुरूंना आपल्याकडे देवासमान दर्जा दिला येतो. मात्र शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या एका महिला शिक्षिकेने अत्यंत लांछनास्पद कृत्य केलं आहे. पालक आपल्या मुलांना अत्यंत विश्वासाने शाळेत पाठवतात, शिक्षकांवर त्यांचा फार विश्वास असतो. मात्र मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेने केलेल्या कृत्यामुळे पालकांनाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार
याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे. ही शिक्षिका गेल्या वर्षभरापासून पीडित अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करत होती असा आरोप करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे ही शिक्षिका शहरातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये या मुलाला नेऊन त्याचं लैंगिक शोषण करत होती. हे प्रकरण समोर आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला असून शाळेत एकच खळबळ माजली आहे. दादर पोलिसांनी या शिक्षिकेविरुद्ध पोक्सो कायदा, बाल न्याय कायदा आणि फौजदारी संहितेच्या इतर गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
त्याला ती औषधंही देत होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षिकेने विद्यार्थ्यावर मानसिक दबाव आणत त्याला इतके दिवस गप्प बसण्यास भाग पाडलं. एवढंच नव्हे तर आरोपी शिक्षिका विद्यार्थ्याला नैराश्य दूर करण्यासाठी औषधे देत असल्याचंही समोर आलं आहे. या औषधांमुळे विद्यार्थ्याची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमताही कमी झाल्याचं उघड झालं आहे. पीडित विद्यार्थी सर्वांना घाबरुन राहत असे. मानसिक परिस्थिती ठीक नसल्याने तो त्याच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल तो कोणालाही काहीही सांगू शकत नव्हता.
अनेकदा केला लैंगिक अत्याचार
आरोपी शिक्षिकेने अल्पवयीन मुलाबरोबर अनेकदा घृणास्पद कृत्य केले आहे. आरोपी शिक्षिका ही शाळेत शिकवायची. शाळेचे तास भरल्यानंतर ती पीडित विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील वेगवेघळ्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये न्यायची आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार करुन त्याचं शोषण करायची.
परीक्षेनंतर त्याच्या भावनांचा बांध फुटला
अखेर बराच काळ सगळं सहन केल्यानंतर, अखेर त्या विद्यार्थ्याने बारावीची (12वी बोर्ड) परीक्षा दिली आणि त्याने पालकांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्या शिक्षिकेने त्याला एका नोकराद्वारे बोलावले आणि नंतर अनेक वेळा त्याचं लैंगिक शोषण कसे केले, त्याचा संपूर्ण घटनाक्रमच विद्यार्थ्याने पालकांसमोर कथन केला.
पालकांची पोलिसात धाव
विद्यार्थ्याने सांगितलेला घटनाक्रम ऐकून पीडित मुलाचे पालक हादरले. त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. दादर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 1, 2025 | Trending News
No match is being played.
Jun 29, 2025 | 5/6 Place Play off
Continental Cup, 2025
Jun 29, 2025 | Final
Continental Cup, 2025
Jun 29, 2025 | 3/4 Place Play off
Continental Cup, 2025
Source link
by Hansraj Agrawal | Jul 1, 2025 | Trending News
Congress Oppose Raj Thackeray Stand On North Indian: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही बंधू एकत्र आले तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांनी याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडणार की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
काँग्रेसची बैठक अन् गोंधळाची स्थिती…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक झाली. पूर्वनियोजित बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे किंवा सरचिटणीस वेणुगोपाल यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. पक्ष संघटना, आगामी निवडणुकांसाठी आणि त्यासाठी संभाव्य आघाडी यासारख्या स्थानिक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि नंतर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची औपचारिक भेट घेतली. काँग्रेसचे जुने मुख्यालय 24 अकबर मार्ग येथे बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, भाई जगताप, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिल्लीतील नेते मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील यांच्यासह पक्षाचे खासदार सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे सोमवारची ही दिल्लीत झालेली बैठक पूर्वनियोजित होती आणि राहुल गांधींनी बोलावली असल्याचा निरोप नेत्यांना देण्यात आला होता. मात्र श्रेष्ठींच्या अनुपस्थितीत प्रभारी रमेश चेत्रिथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीच चर्चा केली. पक्षश्रेष्ठींनीच बैठकीकडे पाठ फिरवल्याबद्दल प्रदेश पातळीवरील नेते नाराज झाल्याचे कळते. प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षच बैठक घेणार असतील तर ती मुंबईतही होऊ शकली असती. दिल्लीत घेण्याची गरज काय होती, असा सवाल एका नेत्याने उपस्थित केला. अन्य एका नेत्याने बैठक कशासाठी बोलावली होती हे कळलेच नाही, अशी टिप्पणी केली.
काँग्रेसचा राज ठाकरेंना विरोध
याच बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रभारी रमेश चेत्रिथला यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नसल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे, “राज ठाकरे यांची उत्तर भारत आणि दक्षिण भारत ही भूमिका मान्य नाही. भारत एक आहे,” अशी बोलकी प्रतिक्रिया चेन्नीथला यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळाची भूमिका घेणार का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रात आणि कर्नाटकात वेगळी भूमिका कशी? असा थेट सवाल
यावर मनसेकडून पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. “रमेश चेन्निथला यांना आणि काँग्रेसला आमची भूमिका समजली नाही. आज कर्नाटकमध्ये एक भूमिका महाराष्ट्रात एक भूमिका असं यांचं आहे. 2009 ला काय भूमिका होती आमची? आजही आमची भूमिका कायम आहे. आमची भूमिका त्यांनी समजून घेतली पाहिजे,” अशी अपेक्षा देशपांडेंनी व्यक्त केली आहे. “कर्नाटकात कन्नड तर आपल्या राज्यात मराठीच आहे. दोन्ही राष्ट्रीय पक्षाचा अशा भूमिकेला पाठिंबा नव्हता आता काँग्रेसमध्ये थोडा बदल झाला आहे. दोन बंधू एकत्र येण्याचा मुद्दा नाही. हा मराठी माणसाचा विषय आहे,” असंही देशपांडे आवर्जून म्हणाले.
5 जुलैच्या मेळाव्याची जबाबदारी या व्यक्तीवर…
आमच्या पक्षाचे नेते बाळा नांदगावकर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत बोलतील. मेळाव्याचं सविस्तर नियोजन करतील. राजकीय पक्षाचा हा मेळावा नाही मराठी माणसाचा आहे याची काळजी आम्ही घेऊ, असं 5 जुलैच्या मेळाव्याबद्दल बोलताना देशपांडेंनी स्पष्ट केलं.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 30, 2025 | Trending News
हिंदी भाषेच्या मुद्यावरुन शिवसेना UBT पक्ष आणि मनसे आक्रमक; GR रद्द करण्यात आल्याची टीका
Source link
by Hansraj Agrawal | Jun 30, 2025 | Trending News
Maharashtra Weather News : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही भागांमध्ये ढगाळ वातावरण, तर कुठे चक्क लख्ख सूर्यप्रकाश पाहायला मिळत आहे. अधूनमधून दाटून येणाऱ्या काळ्याकुट्ट ढगांमुळं पावसाची एखादी जोरदार सरसुद्धा हजेरी लावून जात आहे. राज्याच्या काही भागांमध्येसुद्धा हेच चित्र पाहाय़ला मिळत असलं तरीही घाटमाथ्यावरील भागांमध्ये मात्र पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.
हवामान विभागानं प्राथमिक निरीक्षणाआधारे वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणाह राज्याच्या घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसाच्या सरीवर सरी बरसत आहेत आणि त्या अशाच बरसत राहतील. ज्या कारणानं रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे आणि घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, विदर्भ, कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, तिथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीवर पाच दिवस मुसळधार
फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर मान्सूनने देशाच्या इतर राज्यांतही जोरदार आगेकूच सुरू ठेवली असून, रविवारी संपूर्ण देश व्यापला. दरम्यान, अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे राहणार आहेत. कोकणाला या जोरदार पावसाचा तडाखा बसेल असं सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, संपूर्ण विदर्भ, रायगड, पुणे, उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
देशभरात मान्सून सक्रिय
ठरलेल्या मुहूर्ताआधीच मान्सूचं आगमन झालं आणि पाहता पाहता या मोसमी वाऱ्यांनी सबंध देश व्यापला. सर्वसाधारणपणे 8 जुलैपर्यंत मान्सून देश व्यापतो. देशात सक्रिय होण्यातही मान्सूनने नवा विक्रम रचला. देशात सर्वदूर मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण पाहायला मिळत असून, सध्या या पावसानं उत्तर भारतामध्ये हाहाकार माजवल्याचं पाहायला मिळत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 29, 2025 | Trending News
Maharashtra Police Transfers: महाराष्ट्रात मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत. गृह खात्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात एकाचवेळी 51 भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आणि 81 राज्य पोलिस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या प्रमुख शहरांमध्ये आणि अनेक जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कामाला बळकटी देणे आणि पोलिस यंत्रणा अधिक प्रभावी करणे यासाठी गृह खात्यात हे मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
बदल्यांच्या या क्रमात, पुण्यातील शस्त्र तपासणी शाखेच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची पुण्यातील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट १ च्या कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे शहरातील पोलिस उपायुक्त (डीसीपी) महेंद्र पंडित यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. याशिवाय पुण्यातील डीसीपी स्मार्तना पाटील यांची खंडाळा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. डीसीपी (वाहतूक) अमोल झेंडे यांना दौंड येथील एसआरपीएफमध्ये कमांडरची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांची मुंबईत डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय विजय पवार, सुनील लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांनाही मुंबईतील पोलिस उपायुक्तपदाची नवी जबाबदारी देण्यात आली आहे. अशाप्रकारे एकूण पाच आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबईत डीसीपी म्हणून बढती देण्यात आली आहे.
या बदल्यांद्वारे, राज्य सरकारने केवळ मोठ्या शहरांमध्ये पोलिस प्रशासन मजबूत करण्याचा प्रयत्न केला नाही तर महत्त्वाच्या पदांवर अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याच्या दिशेने कडक पावले उचलली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात आणखी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात. यामुळे राज्यभर पोलिस यंत्रणा अधिक कार्यक्षम करता येईल.
Source link