भारतातील 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारची मोठी घोषणा!

भारतातील 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारची मोठी घोषणा!


NPS: केंद्र सरकारने देशातील 23 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज दिलीय. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेल्या एकात्मिक पेन्शन योजनेला (यूपीएस) राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) सारखे कर लाभ देखील मिळणार आहेत. अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात यासंदर्भात माहिती दिली आहे. पारदर्शक, लवचिक आणि कर-कार्यक्षम पर्यायांद्वारे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती सुरक्षा मजबूत करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे केंद्र सरकारने निवेदनात म्हटलंय. एनपीएस अंतर्गत उपलब्ध असलेले कर लाभ यूपीएसला देखील लागू होतील. कारण ते एनपीएस अंतर्गत एक पर्याय आहे. या तरतुदी विद्यमान एनपीएस रचनेसारख्या असतील.

NPS अंतर्गत पर्याय म्हणून UPS

अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025 रोजी NPS अंतर्गत पर्याय म्हणून UPS सादर केले. 1 एप्रिल 2025 पासून केंद्र सरकारच्या नागरी सेवांमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना ते लागू होईल. UPS लागू करण्यासाठी, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) 19 मार्च रोजी एक नियमावली जारी केली होती. NPS मध्ये सहभागी असलेल्या आणि हा पर्याय निवडणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना UPS लागू होईल. सुमारे 23 लाख सरकारी कर्मचारी UPS निवडू शकतात. अलीकडेच सरकारने कर्मचाऱ्यांना UPS निवडण्याची अंतिम मुदत तीन महिन्यांनी वाढवून 30 सप्टेंबर केली आहे.

NPS सारखे फायदे मिळणार 

या तरतुदी विद्यमान एनपीएसप्रमाणे असून UPS निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेशी कर सवलत मिळेल. अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025 रोजी काढलेल्या नोटिफिकेशनुसार, 1 एप्रिल 2025 पासून केंद्र सरकारच्या नागरी सेवांमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस अंतर्गत एक पर्याय म्हणून यूपीएस लागू करण्यात आला आहे. या नोटिफिकेशननंतर, एनपीएस अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना देखील यूपीएस अंतर्गत सामील होण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

पीएफआरडीए करेल व्यवस्थापन 

या चौकटीची अंमलबजावणी करण्यासाठी, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (पीएफआरडीए) ने 19 मार्च 2025 रोजी पीएफआरडीए (एनपीएस अंतर्गत एकात्मिक पेन्शन योजनेचे ऑपरेशन) नोटिफिकेशन काढले. एनपीएसच्या कक्षेत येणाऱ्या आणि एनपीएस अंतर्गत हा पर्याय निवडणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना यूपीएस लागू होते. सध्या 23 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी त्याच्या कक्षेत येतात.

गेल्या वर्षी UPS लागू 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 ऑगस्ट 2024 रोजी UPS च्या पर्यायाला मान्यता दिली होती. जानेवारी 2004 पासून जुनी पेन्शन योजना (OPS) बंद केल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS सुरू करण्यात आला. पण ही प्रणाली बाजार जोखमीच्या अधीन आहे. म्हणजेच या योजनेत हमी पेन्शन उपलब्ध नाही. कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला आणि त्यांची ही कोंडी दूर करण्यासाठी, हमी पेन्शन यूपीएस लागू करण्यात आली आहे.





Source link

'एकही जागा नसलेल्यांनाही…', केडियांनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं; 'लालबागचा राजा'च्या चरणातील फोटो पोस्ट करत म्हणाले, 'शिवाजी…'

'एकही जागा नसलेल्यांनाही…', केडियांनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं; 'लालबागचा राजा'च्या चरणातील फोटो पोस्ट करत म्हणाले, 'शिवाजी…'


MNS Shivsena Victory Rally Sushil Kedia New Post: “मी मराठी शिकणार नाही अशी शपथ घेतो, काय करायचं बोल?” अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देणारे उद्योजक सुशील केडिया यांनी दिलं आहे. आपल्या एक्स अकाऊंटवरुन राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या केडिया यांनी वादाला तोंड फुटल्यानंतर काही पोस्ट करत पुन्हा एकदा राज ठाकरेंना डिवचलं आहे.

लालबागच्या राजाच्या चरणी केडिया

“हे पाहा राज ठाकरेजी, आम्हालाही गणपती बाप्पा मोरया म्हणायचं आहे आणि तुम्हालाही. आपला देव एक आहे. आपला देश एक आहे. भाषा आणि प्रेमाला संधी द्या लोकांना स्वीकारण्याची. मारलं, फटकावलं, घाबरवलं तर कोणी कशाला शिकेल? केवळ भीती दाखवून शिकणार का?” असा सवाल सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना विचारला आहे. हा सवाल त्यांनी एक फोटो रिट्वीट करत विचारला आहे. या फोटोमध्ये सुशील केडिया ‘लालाबागचा राजा’च्या चरणी माथा टेकवत असल्याचं दिसत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत केडिया यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी मराठीत, “जेव्हा शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतावर मराठा साम्राज्य स्थापन केले तेव्हा त्यांनी मराठी भाषा कोणावरही लादली नाही आणि महाराष्ट्रात एकही जागा नसलेल्यांनाही बळजबरी करायची आहे,” असा टोला राज ठाकरेंना लगावला आहे. याच पोस्टच्या शेवटी त्यांनी, “देवेंद्र फडणवीसजी अशा पराभूतांना नियंत्रित करायला हवे,” असा केडियांनी म्हटलं आहे.

…तर माझ्यासहीत सगळेच प्रेमाने मराठी शिकतील

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोंदवलेल्या प्रतिक्रियेवर व्यक्त होताना केडिया यांनी, “देवेंद्र फडणवीसांच्या या भूमिकेमुळे माझ्यासहीत सगळे प्रेमाने मराठी बोलतील. प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा आत्मसन्मान महत्त्वाचा असतो. हाच कोणी चिरडण्याचा प्रयत्न केला तर आधी लोक त्याच्या संरक्षणासाठी प्रयत्न करतील राज ठाकरे!” असं फडणवीसांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे.

केडियांना राज ठाकरे आज उत्तर देणार?

केडिया यांच्याबद्दल आजच्या विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरे काही बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखामधून केडियांनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना, “केडिया नावाचा एक व्यापारी महाराष्ट्राला आव्हान देत त्याची टांग वर करून सांगतो, ‘‘मी महाराष्ट्रात 30 वर्षे राहतो, पण मराठी बोलणार नाही.’’ हे धाडस या लोकांत वाढले आहे. कारण अमित शहा यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट तोडली आहे. मराठी एकजूट तोडून त्यांनी शिंदेसारख्या लोकांना मांडलिक केले. पैशांच्या ताकदीवर माणसे विकत घेण्याचा (स्वाभिमानासह) गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे. तो रोखायचा असेल तर ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर करत आज वरळीच्या दिशेने मराठी माणसाला कूच करावी लागेल,” असं म्हटलं आहे.





Source link

'एकतर भोंदू आहेत किंवा…', शिंदेंनी 'जय गुजरात' नारा दिल्यानंतर शिवसेनेकडून उद्धव ठाकरेचा व्हिडीओ पोस्ट; करुन दिली आठवण

'एकतर भोंदू आहेत किंवा…', शिंदेंनी 'जय गुजरात' नारा दिल्यानंतर शिवसेनेकडून उद्धव ठाकरेचा व्हिडीओ पोस्ट; करुन दिली आठवण


राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात ‘जय गुजरात’ असा नारा दिल्याने वाट पेटला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कडाडून टीका होत आहे. महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री यांना अमित शहांमुळे विसर पडलेला आहे. हे स्वतःला शिवसेनेचे प्रमुख मानतात पण ती शहा शिवसेना आहे. त्यांनी अमित शहांसमोर अशा प्रकारची लाचारी पत्करली आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. यानंतर आता शिवसेनेने उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे असणाऱ्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा दिली. यामुळे टीका होत असताना आता शिवसेनेने एक्सवर उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात उद्धव ठाकरे हे ‘जय गुजरात’ म्हणत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना सोबत ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’ अशीही टीका करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गुजरातमधील भाजपाच्या कार्यक्रमात गेले होते हा व्हिडीओ तेव्हाचा आहे. 

मतांसाठी आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गुजरात मतदारांना जवळ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यासाठी कधी ‘जिलेबी ने फापडा, उद्धव भाई आपडा’, अशा घोषणा दिल्या होत्या. तर आदित्य ठाकरे यांनीही ‘केम छो वरळी’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’. अशी घणाघाणी टीका शिवसेनेच्या अधिकृत सोशल मिडीया खात्यावरून करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“अमित शाह महाराष्ट्राचे जावई आहेत. कारण त्यांच्या होम मिनिस्टर कोल्हापूरच्या आहेत. गुजराती बांधवांनी एकजूट कायम ठेवावी राज्याच्या प्रगतीमध्ये तुमचा वाटा आहे,” असं सांगत एकनाथ शिंदे यांनी शायरीच्या माध्यमातून अमित शाहांवर स्तुतीसुमनं उधळळी. दरम्यान भाषण संपवताना एकनाथ शिंदे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा दिली.

राऊतांकडून टीकेची झोड 

“महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री यांना अमित शहांमुळे विसर पडलेला आहे. हे स्वतःला शिवसेनेचे प्रमुख मानतात पण ती शहा शिवसेना आहे. त्यांनी अमित शहांसमोर अशा प्रकारची लाचारी पत्करली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच म्हटलं होतं की ज्या राज्यात गेलो त्या राज्याचा जय करणार. महाराष्ट्राच्या पुण्यनगरीमध्ये गुजरातचा नारा दिला आहे. महाराष्ट्र गुजरातला विकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मी त्यावरती या सर्वांचे सही शिक्के आहेत हे स्पष्ट झालं आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. 

“गुजरातींबद्दल आमच्या मनात कुठलीही द्वेष भावना नाही. सध्याचे उपमुख्यमंत्री आपल्या मालकाच्या समोर जय गुजरात म्हणतात म्हणजे त्यांच्या मनात नक्की काय चाललंय? ते डुप्लिकेट नाही तर शहासेना आहेत असं म्हणा. मराठी माणसाची संस्कृती आणि बालेकिल्ला असणाऱ्या ठिकाणी जय गुजरातचा नारा दिला आहे. ते कोणाच्या हातात आहे हे त्यांनी दाखवून दिलं. एकनाथ शिंदे यांच्या पोटातलं ओठावर आलेला आहे. त्यांच्या पक्षाचा उदयच सुरतला झालेला आहे,” अशीही टीका त्यांनी केली आहे. 





Source link

सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर, विविध मुद्द्यावरून सरकारला दाखवला आरसा

सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर, विविध मुद्द्यावरून सरकारला दाखवला आरसा


विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे अनेक सवाल उपस्थित करत आपल्याच सरकारला धारेवर धरताना दिसताहेत. आता विधीमंडळाच्या इंग्रजी कामकाज पत्रिकेवर आक्षेप घेत मुननंटीवार यांनी सरकारला सवाल केलाय.

पावसाळी अधिवेशन सुरू झालेल्यापासून आपल्या सरकारवर वार करणाऱ्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिलाय. मराठीच्या मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विधीमंडळाच्या इंग्रजी कामकाज पत्रिकेवर त्यांनी आक्षेप घेत सरकारला धारेवर धरलंय. मराठी अभिजात भाषा असताना कामकाज पत्रिका इंग्रजीत का छापता? असा थेट सवालच त्यांनी विधानसभाध्यक्षांना विचारलाय.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या या आक्षेपानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काहीसं मिश्किल उत्तर दिलं. राज्यात 24 तास वाळूच्या वाहतुकीला परवानगी देण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. यावरी सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. बुलेट ट्रेनपेक्षा वेगात काम करणारे मंत्रिमहोदय घरकुलांचा प्रश्न आला की पॅसेंजरपेक्षा स्लो का होतात असा सवाल करत मुनगंटीवार यांनी बावनकुळेंना टोला लगावलाय. 

वाळूच्या 24 तास वाहतुकीला परवानगी दिल्याची घोषणा सभागृहात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली , वाळू धोरणावर बोलत असताना देखील भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी काही लपून राहिली नाही. एवढंच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धीवरून देखील टोला लगावला. सीएम बुलेट ट्रेन पद्धतीन काम करतात पण सामान्य लोकांना घरकूल बांधणी करताना स्लो का होतात ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सभागृहात आज सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानांची जोरदार चर्चा रंगली, सभागृहाच्या कार्यक्रम पत्रिकेवरून तसेच मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या पद्धतीवर बोलून मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहे दिल्याचे पाहायला मिळतेय, तसेच त्यांची नाराजी चव्हाट्यावर आल्याचं देखील बोललं जातंय. याविषयी बोलताना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू काय म्हणाले पाहुयात  तर सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचे डोळे उघडलेत आता तरी सरकारने शहाणं व्हवं असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी सरकारवर निशाणा साधलाय.





Source link

पुण्यात बाजीराव पेशवेंच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण; राणी मस्तानीच्या वंशजांकडून कार्यक्रमावर बहिष्कार, 'आम्ही DNA चाचणी…'

पुण्यात बाजीराव पेशवेंच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण; राणी मस्तानीच्या वंशजांकडून कार्यक्रमावर बहिष्कार, 'आम्ही DNA चाचणी…'


पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एन डी ए येथे गुरुवारी बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे. दरम्यान मस्तानी यांचे वंशज नवाब शदाब अली बहादूर पेशवा नवाब ऑफ बांदा यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं म्हटलं आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला उशिरा आमंत्रण दिलं असून, व्यासपीठावर जागा देणार नसल्याचं आयोजकांनी सांगितले आहे, हा पेशव्यांच्या वंशजांचा अपमान असून, आपण कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

पेशव्यांच्या पुण्यातील वंशजांना व्यासपीठावर जागा आहे मात्र आपल्याला खाली बसविण्यात येणार असल्याने आपण नाराज असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “सध्याचे बाजीराव पेशव्यांचे पुण्यातील वंशज रघुनाथ राव हे वाराणसी येथून भासकुटे परिवाराकडून दत्तक घेतले गेले आहेत.त्यामुळे मीच खरा बाजीराव पेशव्यांचा रक्त वंशज आहे. माझ्या पूर्वजांच्य बलिदानाचा गौरवशाली इतिहास आहे. माझे पूर्वज समशेर बहादूर यांनी (1761 ) पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठांच्या वतीने सहभाग घेतला. सत्ताविसव्या वर्षी त्यांचे निधन झाले.माझे पणजोबा नवाब अली बहादूर 1857 मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना साथ देत, लढाई लढले”. 

“या सर्व गौरवशाली इतिहासाकडे थोरले बाजीराव पेशवा प्रतिष्ठान समितीचे कुंदन कुमार साठे आणि सहकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. दत्तक वंशजांना मानाचे स्थान देत, व्यासपीठावर स्थान दिले आहे. या कार्यक्रमांचे आमंत्रण देखील दोन दिवसांपूर्वी मला देण्यात आले असून, आपल्याला व्यासपीठावर बसवता येणार नाही, असं सांगितलं आहे,” अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

“माझा याला विरोध नाही,पण या माध्यमातून ऐतिहासिक सत्य दडपण्याचा आणि अमित शहा यांना भरकटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाह हे इतिहासप्रेमी असून, त्यांनी यावर पुस्तक लिहिले आहे.त्यामुळे हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. श्रीमंत बाजीराव पेशवा आणि मस्तानी साहिबा प्रेम आणि बलिदान यांचे प्रतीक आहे. आम्ही अशा प्रकारचा आमचा अपमान सहन नाही करू शकत. याद्वारे आमच्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान करावा, ही आमची मागणी आहे.आम्हीच बाजीराव पेशव्यांचे रक्त वंशज असून, यासाठी आम्ही डी एन ए चाचणी करायला तयार आहोत. तसेच अशा अपमानामुळे आम्ही कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहोत,” असं त्यांनी म्हटलं आहे.  





Source link

अजित पवारांच्या 27 पट श्रीमंत, 5 वर्षात संपत्ती 575 टक्क्यांनी वाढली; महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार 33830000000 रुपयांचा मालक

अजित पवारांच्या 27 पट श्रीमंत, 5 वर्षात संपत्ती 575 टक्क्यांनी वाढली; महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार 33830000000 रुपयांचा मालक


Maharashtra Richest MLA Parag Shah : महाराष्ट्रातील एक श्रीमंत आमदार  भारतातील बडे उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना टक्कर देतो.  हा श्रीमंत आमदार फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्वात श्रीमंत आमदार आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात श्रीमंत आमदार 33830000000 रुपयांचा मालक आहे. हा आमदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या 27 पट श्रीमंत आहे.  विशेष म्हणजे या आमदाराची संपत्ती पाच वर्षात 575 टक्क्यांनी वाढली आहे. जाणून घेऊय महाराष्ट्रातील हा सर्वात श्रीमंत आमदार आहे तरी कोण?

पराग शहा (Parag Shah) असे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदाराचे नाव आहे.  पराग शहा हे मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. 2024  विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात पराग शहा यांनी सध्याची संपत्ती  3353.06  इतकी असल्याचे नमूद केले आहे.  पाच वर्षात पराग शहा यांच्या संपत्तीत 575 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. कारण,  2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञा पत्र सादर करताना त्यांची संपत्ती 550 कोटी असल्याचे नमूद केले होते. अजित पवार यांच्याकडे 124 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्यांच्यावर 21.39 कोटी रुपये कर्ज आहे.

पराग शाह यांच्याकडे 3,315 कोटींची जंगम आणि 67  कोटींची अचल मालमत्ता आहे.  स्वतःच्या नावावर 2,179  कोटी तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 1,136  कोटींची संपत्ती आहे.  पराग शाह हे रिअल इस्टेट बिल्डर आहेत आणि मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेड ही बांधकाम कंपनी चालवतात. पराग शाह हे शाह हे एमआयसीआय ग्रुपचे अध्यक्ष देखील आहेत.
महाराष्ट्रातील इतर श्रीमंत आमदार

मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha)

 मंगलप्रभात लोढा हे मुंबईतील  मलबार हिलचे आमदार आहेत.  मंगलप्रभात लोढा हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 441 कोटी इतकी आहे. 

संजय चंद्रकांत जगताप (Sanjay Chandrkant Jagtap) 

संजय चंद्रकांत जगताप हे कॉंग्रेस पक्षाचे पुण्यातील पुरंदर मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची  एकूण मालमत्ता 245 कोटी आहे. 

विश्वजीत पतंगराव कदम (Viswajit Patangrao Kadam) 

विश्वजीत पतंगराव कदम हे कॉंग्रेस पक्षाचे आमदार आहेत. पलूस कडेगाव हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांची मालमत्ता 216 कोटी रुपये आहे. 

अबू अझीम अस्मी (Abu Azim Asmi) 

अबू अझीम अस्मी हे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. मानखुर्द शिवाजीनगर चे आमदार आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 209 कोटी आहे. 

राजेश संभाजीराव पवार (Rajesh Sabhajirao Pawar) 

राजेश संभाजीराव पवार हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. नायगाव, नांदेड हा त्यांचा  मतदारसंघ आहे. त्यांची एकूण मालमत्ता 191 कोटी आहे.

प्रशांत रामशेठ ठाकूर (Prashant Thakur) 

प्रशांत रामशेठ ठाकूर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत.  पनवेल हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांची एकूण मालमत्ता 183 कोटी आहे.

समीर दत्तात्रय मेघे (Sameer Meghe) 

समीर दत्तात्रय मेघे हे भारतीय जनता पक्ष मतदारसंघाचे आमदार आहेत.  हिंगणा, नागपूर हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांची एकूण मालमत्ता 159 कोटी आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra  Fadnavis)

देवेंद्र फडणवीसांकडे सव्वा पाच कोटींची संपत्ती आहे. पत्नी अमृता फडणवीसांच्या नावे 7.9 कोटींची संपत्ती आहे. 

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp