ठाकरे बंधू अखेर युती करणार? नाशकात मिळाले संकेत, दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आले एकत्र; फोटोची तुफान चर्चा

ठाकरे बंधू अखेर युती करणार? नाशकात मिळाले संकेत, दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आले एकत्र; फोटोची तुफान चर्चा



नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी पोहोचले. 
 



Source link

29 लाख 87 हजार 422 गुंतवणूकदार, 2500 कोटींची फसवणूक, 56 आरोपी अन् 31 गुन्हे; महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा

29 लाख 87 हजार 422 गुंतवणूकदार, 2500 कोटींची फसवणूक, 56 आरोपी अन् 31 गुन्हे; महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा



मैत्रेय ग्रुप प्रकरणात 29 लाख 87 हजार 422 गुंतवणूकदारांची सुमारे 2500 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे
 



Source link

बीडमध्ये 843 ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचे प्रकरण? चित्रा वाघ यांचा अत्यंत धक्कादायक खुलासा; खरी माहिती आली समोर

बीडमध्ये 843 ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचे प्रकरण? चित्रा वाघ यांचा अत्यंत धक्कादायक खुलासा; खरी माहिती आली समोर


Beed News : ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामधून प्रत्येकवर्षी 1 लाख 75  हजार मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात… यापैकी 78 हजार महिला मजूर आहेत… त्यातील 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. 

बीडमध्ये 843 ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्य ही बातमी वाचून प्रत्येकाला धक्का बसला.  मलाही एक स्त्री म्हणून हे खूप जिव्हारी लागलं. पण जेव्हा मी सत्य तपासलं, तेव्हा लक्षात आलं की ही माहिती अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी आहे असं चित्रा वाघ म्हणाल्या. आपण याबद्दल थोडंस जाणून घेऊया… ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी  2019 पासून काही नियम आणि खबरदारी घेण्याच्या दृष्टीने शासनाने काही नियम बनवले आहेत. आता उठसूठ कोणीही गर्भपिशवी काढू शकत नाहीच. जर कोणत्या महिलेला गंभीर त्रास असेल फक्त तेव्हाच  बीड जिल्हा शल्य चिकित्सकांची पुर्वपरवानगी घेवुनच तपासणी करून मग गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते अस चित्रा वाघ यांनी सांगितले.
या शस्त्रक्रिया वैद्यकीय कारणांमुळे, वेगवेगळ्या वर्षांत  झाल्या आहेत. 2019 पासून तर महिलेला वैद्यकीय गरज असली तर बिड शल्य चिकित्सकाच्या अधिकृत परवानगीशिवाय अशा शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत. या शस्त्रक्रियांचा कालावधी हा ऊसतोड हंगामाच्या लगतचा नाही.

यापैकी 267 महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही 2019 ते ऑक्टबर 2024 या कालावधीत बिडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये महिलेला तशी वैद्यकीय गरज असल्यास तपासणीनंतर शल्य चिकित्सकाच्या पूर्वपरवानगीनेच झालेल्या आहेत. उर्वरित 576 महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही 2019 पुर्वीच झालेल्या आहेत. त्यामुळेच माझं माध्यमांना विनम्र आवाहन आहे: महिला आणि आरोग्य यांसारख्या संवेदनशील विषयांवर बातम्या देताना कृपया पूर्ण शहानिशा करा. गैरसमज आणि भीती पसरवू नका असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

काय आहे नेमकं प्रकरण

ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी  बीडची ओखळ. या जिल्ह्यामधून प्रत्येकवर्षी 1 लाख 75  हजार मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात. यापैकी 78 हजार महिला मजूर आहेत. त्यातील 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात 30 ते 35 वयोगटातील महिलांचा अधिक समावेश आहे. तसेच, 1 हजार 523 महिला गर्भवती असतानाही उसाच्या फडात काम करत असल्याचे उघड झाले आहे.

जिल्ह्यातील ऊसतोड मजूर हे दिवाळीच्या दरम्यान महाराष्ट्रासह परराज्यात कामासाठी जातात. सहा महिने ऊसतोडणी करून ते डिसेंबर, जानेवारी महिन्यात परत येतात. आरोग्य विभागाकडून ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याप्रमाणे आता याचा अहवाल तयार झाला आहे. यात महिलांना विविध आजार असल्याचे समोर आले आहे.





Source link

महाराष्ट्राच्या दोन सर्वात मोठे पक्ष अखेर एकत्र आले? शिवसेना आणि मनसे यांची युती झाली? आदित्य ठाकरेंनी दिला मोठा पुरावा

महाराष्ट्राच्या दोन सर्वात मोठे पक्ष अखेर एकत्र आले? शिवसेना आणि मनसे यांची युती झाली? आदित्य ठाकरेंनी दिला मोठा पुरावा



गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे सूर जुळण्याआधी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळाले.



Source link

सेलिब्रिटींची मुलं शिकणाऱ्या अंबानींच्या इंटरनॅशनल स्कूल ची फी किती?

सेलिब्रिटींची मुलं शिकणाऱ्या अंबानींच्या इंटरनॅशनल स्कूल ची फी किती?


Ambani School Fees : देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची स्थापना 2003 मध्ये नीत अंबानी यांनी केली होती. मुलांचे शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी हे स्कूल ओळखले जाते. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी या स्कूलची उपाध्यक्ष आहे. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल हे विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करते. यामुळे या स्कूलचे नाव भारतातील प्रतिष्ठित उद्योगपती आणि मुकेश अंबानी यांचे वडील धीरुभाई अंबानी यांच्या नावावर आहे. 

मुलांना चांगले शिक्षण देण्यावर भर

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल IGCSE, ICSE आणि IBDP कार्यक्रमांच्या मदतीने बालवाडी ते 12 वी पर्यंतच्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण देते. त्याचबरोबर हे स्कूल मुलांना शिक्षणापलीकडे जाऊन सर्वांगीण विकासावर आणि त्यांना चांगले मानव आणि प्रौढ नागरिक बनवण्यावर लक्ष देते. 

2024 मधील शैक्षणिक वर्षात, बालवाडीसाठी धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी 1,400,000 ते 12 वी साठी 20,00,000 पर्यंत आहे. या फीमध्ये मुलांना पुस्तके, स्टेशनरी, गणवेश आणि वाहतूक यासारख्या आवश्यक वस्तूंचा देखील समावेश आहे. तसेच स्कूलमधील गरजू मुलांना शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत देखील दिली जाते.

किती आहे वार्षिक फी? 
 
एलकेजी ते सातवी पर्यत 1,70,000 रुपये. तर आठवी ते 10 पर्यंत 5,90,000 रुपये. अकरावी आणि बारावी पर्यंत 9,65,000 रुपये फी आहे. अंबानींच्या या स्कूलमध्ये मुलांना देण्यासाठी खूप काही आहे. जसे की संगणकांसह विज्ञान प्रयोगशाळा आणि वर्गखोल्या आहेत. जिथे मुलांना नवीन गोष्टी शिकता येतात. त्यासोबतच मुलांना खेळण्यासाठी मोठे मैदान आणि ग्रंथालय देखील आहे. 

धीरुभाई अंबानी यांच्या स्कूलमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज जगभरात प्रसिद्ध आहेत. ज्यामध्ये आकाश अंबानी, ईशान धवन आणि श्लोका मेहता, खुशी कपूर, सारा अली खान, इब्राहिम अली खान, सुहाना खान, आर्यन खान, सारा तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर, न्यासा देवगन, अनन्या पांडे यासारख्या अनेक सेलिब्रिटीच्या मुलांनीही येथे शिक्षण घेतले आहे. 





Source link

Traffic Rules: वाहतूक पोलीस तुमच्या बाईकची चावी काढू शकतात का? असं झाल्यास काय करायचं?

Traffic Rules: वाहतूक पोलीस तुमच्या बाईकची चावी काढू शकतात का? असं झाल्यास काय करायचं?


Maharashtra Traffic Rules: वाहतूक पोलिसांनी तपासणीवेळी अचानक तुमच्या बाईकची चावी काढली तर अशा परिस्थितीत तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही अशी अनेक प्रकरण पाहिली असतील ज्यात वाहतूक पोलिस असे करतात. अशा परिस्थितीत काय करायचे, असे करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का? नसेल तर मग आपण काय करायला हवे? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पोलिसांकडून जर असे केले गेले तर तुम्ही काय करायला हवे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

मोटार वाहन कायद्याच्या नियमांनुसार, वाहतूक पोलिसांना बाईकची चावी काढण्याचा अधिकार नाही. पण तुमच्यासोबत असे झाल्यास तुम्ही वाहतूक पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करू शकता. बाईकची चावी फक्त विशेष परिस्थितीतच काढता येते. जर तुमच्या बाईकची चावी काढली असेल तर या गोष्टी करा.

शांत राहा

सर्वप्रथम शांत राहा आणि पोलिसांशी आदराने बोला. त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या सूचनांचे पालन करा.

कारण जाणून घ्या

तुमची चावी का काढली गेली आहे आणि तुम्ही कोणता नियम मोडला आहे हे पोलिसांना विचारा. हे जाणून घेणे महत्वाचे आहे. ज्यामुळे तुम्ही कोणती चूक केलीय, हे तुम्हाला समजेल.

दंड भरा

जर तुम्ही कोणत्याही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तुम्हाला चलन काढावे लागेल आणि दंड भरावा लागेल.

तक्रार दाखल करा

जर तुम्हाला वाटत असेल की पोलिसांनी तुमच्या वाहनाची चावी बेकायदेशीरपणे आणि चुकीच्या पद्धतीने काढून घेतलीय तर तुम्ही संबंधित पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकता. किंवा उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp