मान्सूनची पकड भक्कम; पुढचे चार दिवस राज्यात पावसाचा मारा आणखी वाढणार, 'या' भागांमध्ये वादळसदृश्य स्थिती

मान्सूनची पकड भक्कम; पुढचे चार दिवस राज्यात पावसाचा मारा आणखी वाढणार, 'या' भागांमध्ये वादळसदृश्य स्थिती


Maharashtra Weather News : मजल दरमजल करत मान्सून अखेर केरळातून महाराष्ट्राच्या तळकोकणात धडकला आणि तिथून 24 तासांहून कमी कालावधीत तो मुंबईतही पोहोचला. मान्सूननं हजेरी लावल्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शहराला पावसाचा तडाखा बसला आणि संपूर्ण यंत्रणाच कोलमडली. राज्याच्या इतर भागांमध्येही ही स्थिती कायम असून, मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग मात्र इथं अपवाद ठरले. दरम्यान पुढील 24 ते 48 तासांमध्ये राज्याच्या कोकण भागासह मुंबई शहर आणि उपनगरांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

सध्याच्या घडीला मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, अरबी समुद्रात पश्चिमी वाऱ्यांची स्थिती भक्कम झाली असून, आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर तिथं सह्याद्रीच्या डोंगररांगांसह घाट क्षेत्रावरही सातारा, कोल्हापूर, पुण्याच्या घाटांमध्ये पावसासाठीचे वारे आणखी तीव्र होत असून, पुणे शहरासाठी पुढील 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट आहे, जिथे मध्यम ते काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  आहे. 

कोणत्या भागासाठी कोणता अलर्ट? 

पुढील 24 तासांसाठी मुंबई, रायगड, ठाणे, सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुण्याच्या घाट क्षेत्रासह साताऱ्याचे आणि सिंधुदुर्ग, कोल्हापूरातही जोरदार पावसाच्या इशाऱ्यासह ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोणता अलर्ट काय सुचवतो? 

रेड अलर्ट : अतिवृष्टीची शक्यता, खबरदारी घ्या 
ऑरेंज अलर्ट: जोरदार पावसाची शक्यता, तयारीत राहा 
यलो अलर्ट: पावसाची शक्यता, सतर्क राहा 
ग्रीन अलर्ट: सर्व सामान्य स्थिती

मान्सूनची पुढील वाटचाल कशी असेल? 

मान्सूनची आतापर्यंतची वाटचाल पाहता पुढील तीन ते पाच दिवसांत मान्सूनचे वारे संपूर्ण राज्य व्यापतील अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं जारी केली आहे. दरम्यान, कोकण, पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज असून, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार आणि अहिल्यानगर, सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अतिजोरदार, तसेच सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जोरधारांचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील पाच दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ आहे.

 





Source link

Mumbai Rain Update: 'होय, लोकांची गैरसोय झाली,' DCM एकनाथ शिंदेंनी दिली कबुली, म्हणाले '270 मिमी पावसात…'

Mumbai Rain Update: 'होय, लोकांची गैरसोय झाली,' DCM एकनाथ शिंदेंनी दिली कबुली, म्हणाले '270 मिमी पावसात…'


Eknath Shinde on Mumbai Rain Update: मुंबईत मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून, नागरिकांची तारांबळ उडाली आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे लोकल ठप्प पडल्या होत्या, ज्यामुळे स्थानकांवर नागरिकांची गर्दी झाली होती. दुसरीकडे वरळीला नव्याने उद्घाटन झालेल्या मेट्रो स्थानकात पाणी साचलं आणि मान्सूनपूर्व तयारीचे दावे फोल ठरले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकांची गैरसोय झाल्याची कबुली दिली आहे. तसंच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि साताऱ्याला रेड अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे मंत्रालयातील राज्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देवून राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. 

“बारामतीत निराचा डावा कालवा फुटला. अजित पवार स्वत: सकाळी 5 वाजल्यापासून तिथे अधिकाऱ्यांसोबत ज्या भागात पाणी शिरलं आहे, तेथील आढावा घेत आहेत. लोकांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तिथंही जिल्हाधिकारी, अधिकारी आढावा घेत असून, पंचनामा करत आहेत. राज्यात ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि साताऱ्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. लोकांनाही अत्यावश्यक काम असेलच तरच बाहेर पडावं आणि सुरक्षेची काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

पुढे ते म्हणाले, “राज्य आपातकालीन विभागाकडून मोठ्या प्रमाणात समन्वय साधला जात आहे. सर्व पालिका, जिल्हाधिकारी एक टीम म्हणून काम करत आहेत. याचा फायदा राज्यातील नागरिकांना होईल”. 

मुंबईत पावसामुळे तारांबळ उडाल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले, “मुंबईत उशिरा येणारा पाऊस लवकर आला. 250 ते 270 मिमी पाऊस पडला आहे. गेल्या अनेक वर्षात इतक्या लवकर पाऊस झाला नाही. लोकांची तारांबळ उडाली आहे. लोकांची नक्कीच गैरसोय जाली आहे. पण आता आमची सगळी टीम रस्त्यावर उतरली आहे. सगळे तज्ज्ञ लोक येथे असून, भविष्यातील धोका कसा टाळता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत”.

“पालिकेच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांची सुरक्षा आणि एकही जिवितहानी होऊ नये हे आमचं लक्ष्य आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. 





Source link

महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेत्याचे नाव पुन्हा चर्चेत

महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेत्याचे नाव पुन्हा चर्चेत


Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणत खळबळजनक ट्विस्ट येणार आहे. राज्यात सध्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे असे दोन उप मुख्यमंत्री आहेत. अशातच आता महाराष्ट्राला तिसरा  उपमुख्यमंत्री मिळणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेत्याचे नाव  उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आले आहे.  

नाशिकच्या पालकमंत्रिपदासंदर्भात बोलताना गिरीश महाजन यांनी एक मोठं विधान केले आहे. पालकमंत्रीच काय फडणवीस शिंदे, अजित पवारांनंतर तिसरा उपमुख्यमंत्री देखील करू शकतात असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.  दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला टोला लगावला आहे.

भाजप आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलेलं एक विधान केले आहे. त्यांच हे विधान चांगलंच चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं तर ते भुजबळांना तिसरे उपमुख्यमंत्री देखील करू शकतात असं विधान गिरीश महाजन
यांनी केले आहे. 

दरम्यान यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय. भाजप गद्दारांसाठी घटना दुरुस्ती करून अनेक मुख्यमंत्री देखील करू शकतं असा टोला संजय राऊतांनी लगावला. नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तोडगा कधी निघणार असा प्रश्न सर्वांनाचा पडलाय. रायगडनंतर आता नाशिकच्या पालकमंत्रिपदाची चर्चा देखील जोर धरू लागलीय.. भुजबळांच्या एन्ट्रीनंतर त्यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रिपद जाणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र, पालकमंत्रिपदावर मुख्यमंत्रीच निर्णय घेणार असं संजय शिरसाट यांनी म्हटल आहे.

पालकमंत्री कोण होणार याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार. नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी राजकीय वर्तुळात भुजबळांच्या नावाची चर्चा सुरूय. मात्र, दुसरीकडे पालकमंत्रिपदाच्या रेसमध्ये नसल्याचं स्वत: भुजबळांनी म्हटलंय.. झी 24 तासच्या टू द पॉईंट
या कार्यक्रमात भुजबळांनी हे विधान केलंय.

पालकमंत्रिपदाचा मी दावेदार नाही, जो होईल त्याला सरकार्य करणार. नाशिकच्या पालकमंत्रिपदावर विचारलेल्या प्रश्नानंतर गिरीश महाजन यांनी केलेलं विधान चांगलंच चर्चेत आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून गिरीश महाजन देखील नाराज आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.  तसंच नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार, याकडे देखील आता लक्ष लागल आहे.

 





Source link

महाराष्ट्राला सुखावणारी बातमी! मान्सूनची धडाक्यात एन्ट्री; 'इतिहासात पहिल्यांदाच…'

महाराष्ट्राला सुखावणारी बातमी! मान्सूनची धडाक्यात एन्ट्री; 'इतिहासात पहिल्यांदाच…'


Maharashtra Monsoon: मान्सूनची तळकोकणात धडाक्यात एन्ट्री झालीय. नियोजित वेळेच्या आठवडाभर आधीच मोसमी वारे तळकोकणात पोहोचले आहेत.केरळात आठवडाभर आधी डेरेदाखल झालेला मान्सून महाराष्ट्रातही तब्बल आठ दिवस आधीच दाखल झालाय. 24 मे रोजी म्हणजेच काल केरळात दाखल झालेल्या मोसमी वा-याने अवघ्या एका दिवसात कर्नाटक, गोव्याचा प्रवास पूर्ण करत थेट महाराष्ट्रात धडाकेबाज प्रवेश केलाय.त्यामुळे मान्सूनला यंदा जरा घाईच असल्याचं दिसंतय. अंदमान-निकोबारपाठोपाठ केरळ आणि आता राज्यतही मान्सून नियोजित वेळेआधी दाखल झालाय.

पुढील 2 दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला. शिवाय अरबी समुद्राच्या दक्षिण भागातील काही भाग, मालदीव, लक्षद्वीप, कर्नाटकातील काही भाग, तामिळनाडू तसेच दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागापर्यंत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्यावर्षी पेक्षा 4 ते 5 दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  पुढील चार दिवसांत कोकण व गोव्यात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. नैऋत्य मान्सून 24 मे 2025 रोजी केरळमध्ये दाखल झाला. सामान्यत: तो 1 जून रोजी दाखल होतो. म्हणजेच नैऋत्य मान्सून केरळमध्ये सामान्य तारखेच्या 8 दिवस आधी दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय. 

कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार बॅटिंग केलीय. पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी-नाल्यांना पूर आला होता. कृष्णा नदीवरील राजराम बंधारा ओव्हरफ्लो झालाय.मान्सून दाखल होण्याआधीच राजाराम बंधारा तुडुंब झालाय.बंधारा भरल्याने कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळालाय.

इतिहासात पहिल्यांदाच इतक्या लवकर मान्सून 

आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या लवकर मान्सून दाखल झाल्याचा विक्रम पाहायला मिळतोय.  1956,1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी राज्यात मान्सून दाखल झाला होता. त्यामुळे 25 मे रोजी मान्सून दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्वात आधी 1956 साली 29 मे रोजी लवकर मान्सून दाखल झाला. यानंतर 31 मे 1990 रोजी लवकर मान्सून दाखल झाला. 29 मे 1962 ही लवकर मान्सून दाखल होण्याची तिसरी वेळ होती. 29 मे 1971 रोजीदेखील लवकर मान्सू दाखल झाला होता. 2006 साली 31 मे रोजी लवकर मान्सून दाखल झाला होता.





Source link

निलेश चव्हाणची नाकाबंदी, वैष्णवीच्या आई-वडिलांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

निलेश चव्हाणची नाकाबंदी, वैष्णवीच्या आई-वडिलांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल


चंद्रकांत फुंदेसह, कैलास पुरी (प्रतिनिधी) पुणे : वैष्णवीच्या आई-वडिलांना धमकी दिल्याप्रकरणी विकृत निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मात्र, निलेश चव्हाण अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी निलेशच्या घराची झाडाझडती घेतली असून त्याचं लॅपटॉप देखील जप्त केलं आहे. 

निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करून तसंच त्याला अटक करण्याचे आदेश देऊन जवळपास 12 तासापेक्षा जास्त कालावधी उलटला. मात्र, अजूनही विकृत निलेश चव्हाण हा पोलिसांच्या हाती लागत नाहीये. हगवणे कुटुंबाच्या जवळचा, वैष्णवीच्या आई-वडिलांना धमकावणारा निलेश चव्हाण आहे तरी कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. निलेश चव्हाण पोलिसांच्या हाती लागला नसल्यामुळे पोलिसांनी त्याच्या कुटुंबातील सदस्यांना ताब्यात घेतलं आहे. निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडिलांची वारजे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. 

निलेशचा मुसक्या कधी आवळणार?

निलेश चव्हाणच्या घराची पोलिसांकडून झाडाझडती करण्यात आली आहे. निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. सध्या पोलिसांचं दोन पथक निलेश चव्हाणच्या मागावर असून निलेश चव्हाणचा भाऊ, वडिलांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. चौकशीसाठी सहकार्य न केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर तिचं बाळ निलेश चव्हाणकडेच होतं. दरम्यान ज्यावेळी कस्पटे कुटुंब ते बाळ घेण्यासाठी गेलं असता, निलेश चव्हाणनं त्यांच्यावर बंदूक रोखली होती. याच संदर्भात निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच त्याच्या बंदुकीचा परवाना देखील रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. केवळ वैष्णवीच्या आई-वडिलांना धमकावणं एवढंच नव्हे तर निलेशनं विकृतपणाचा कळस गाठल्याचं देखील शुक्रवारी समोर आलं होतं. निलेश हा त्यांच्या पत्नीचा छळ करत होता. तसंच तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढत असल्याचं देखील समोर आलं.

हेही वाचा : हगवणे कुटुंबात करिश्माची दादागिरी; नेमकं यामागचं कारण काय?

निलेश चव्हाणचे काळे कारनामे समोर : 

3 जून 2018 रोजी निलेश चव्हाणचं लग्न झालं होतं. निलेश चव्हाण स्वत:च्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढत होता. जानेवारी 2019मध्ये निलेशच्या पत्नीला बेडरुमच्या सिलिंग फॅनमध्ये छुपा कॅमेरा दिसला. त्यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये एसीमध्ये छुपा कॅमेरा दिसला. पत्तीनं जाब विचारल्यानंतर निलेशकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. निलेशच्या पत्नीला निलेशच्या लॅपटॉपमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. स्पाय कॅमे-यानं निलेशनं चित्रिकरण केल्याचं उघड झालं आहे. लॅपटॉपमध्ये आणखी काही मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ देखील सापडल्याची माहिती आहे. निलेशच्या पत्नीने त्याला जाब विचारल्यानंतर तिला चाकू दाखवून धमकावलं आणि तिचा गळा दाबला. निलेशच्या पत्नीनं निलेशच्या आई-वडिलांकडे तक्रार केली. तक्रार का केली म्हणून?, निलेशकडून पत्नीचा अमानुष पद्धतीनं छळ सुरूच होता. पत्नीच्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात 2022 रोजी गुन्हा दाखल झाला होता.  पुणे सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. तरीसुद्धा वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. मात्र, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन दिला.

निलेश चव्हाणांच्या काळ्या कारनाम्यांची मालिका समोर आलीच आहे. तसंच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. मात्र, पोलिसांना अद्यापही निलेशला अटक करण्यात यश का आलं नाही? निलेश नेमका कुठल्या बिळात जाऊन लपलाय. याचा शोध पोलिसांकडून अद्यापही सुरूच आहे.





Source link

'राजकारणात माझे दोन गॉडफादर…', बाळासाहेब आणि शरद पवारांचं नाव घेत छगन भुजबळांनी स्पष्टचं सांगितलं

'राजकारणात माझे दोन गॉडफादर…', बाळासाहेब आणि शरद पवारांचं नाव घेत छगन भुजबळांनी स्पष्टचं सांगितलं


Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात कमबॅक झाले आहे. छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. छनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आले आहे. छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा पदभार सोपवण्यात आला आहे. छगन भुजबळ यांना सुरुवातीला मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर त्यांनी नाराजी स्पष्ट केली होती. मात्र पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर छगन भुजबळांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. झी २४ तासच्या टु द पॉइंट या मुलाखतीत त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्रिमंडळ होऊन ८ महिन्यानंतर स्थान मिळालं याप्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं आहे. थांबावं लागतं, वाट पाहावी लागते. आपल्याच मनाप्रमाणे गोष्टी होतात असं नाही. थांबाव लागतंच. राजकारणत चालतंच. राजकारणातील सत्तापदे ही अळवावरची पाणी आहेत. ती कधी निसटून जातील ते काही सांगता येत नाही. त्यामुळं तयारीतच राहावं लागतं. आयुष्याचं सुद्धा असंच आहे तर तर या पदाचं काय घेऊन बसलात, असं उत्तर त्यांनी दिलं आहे. 

राजकारणात माझे दोन गॉडफादर… 

मी राजकारणात आलो तेव्हा काही माझे कोणी गॉडफादर नव्हते. माझे पहिले गॉडफादर बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे गॉडफादर शरद पवार. मी जेव्हा चांगलं काम केले. जीव तोडून काम केले तेव्हा बाळासाहेबांनी मला जवळ केले. कधीही चांगलं द्यायचे असेल तेव्हा बाळासाहेबांनी माझा विचार पहिले केला. मी पहिला आमदार झालो शिवसेनेतून. शिवसेनेचे सगळे उमेदवार पडले. एकटा छगन भुजबळ निवडून आला. नंतर महापालिकेते निवडणूक आली तेव्हा बाळासाहेबांनी भुजबळ तुम्ही उभे राहियचे सांगितले. मी उभा राहिलो आणि शिवसेनेने मुसंडी मारली आणि मी महापौर झालो. आमदार महापौर छगन भुजबळ पहिलाच, असं त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेना वाढवण्यासाठी गावागावातून काम केलं. मला कधी डावललं नाही. तीच गोष्ट काँग्रेसमध्ये आल्यानंतरही. 18 लोकांना घेऊन काँग्रेसमध्ये आलो तेव्हा कॅबिनेट मंत्री मी आणि दोन तीन लोकांना मंत्रीपदाची शपथ दिली. काँग्रेसने 10 दिवसांत मंत्रीपदाची शपथ दिली. काहीतरी नाव असेल काहीतरी इतिहास असेल ना पाठीमागे म्हणूनच महसूल मंत्रीपदाची शपथ दिली, असंही त्यांनी म्हटलं आहे.

1985 ला आमदार होतो तेव्हाही मी वन मॅन आर्मी होतो. काँग्रेसमध्ये विरोधीपक्ष नेता असताना जीवघेणा हल्ला झाला. खोट्या केसेसमध्ये अडकवले पण त्यातूनही मी बाहेर पडलो. त्यानंतर ऐनवेळेला निवणडुकीला सात आठ महिने असताना पवार साहेबांना काढलं आणि दोन काँग्रेस झाल्या. तेव्हा मी पवार साहेबांसोबत गेलो. तेव्हा तुम्हाला कल्पना असेलच सगळ्यांनी मला पवारसाहेबांसोबत जाऊ नका, असं सांगितलं. मी तेव्हा त्यांना सांगितलं मी पवारसाहेबांना नाही सोडणार आणि मी पवारसाहेबांसोबत राहिलो, असंही त्यांनी म्हटलं आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp