चलनात पाचशेच्या बनावट नोटा?, तुमच्या खिशातली पाचशेची नोट तपासा

चलनात पाचशेच्या बनावट नोटा?, तुमच्या खिशातली पाचशेची नोट तपासा


Jul 31, 2025 | LIVE

Anderson-Tendulkar Trophy, 2025

Aug 01, 2025 | 1st T20

Pakistan and West Indies in USA, 3 T20I Series, 2025

PAK

(20 ov) 178/6

VS

WI

164/7(20 ov)

Pakistan beat West Indies by 14 runs
Full Scorecard →

Jul 30, 2025 | 1st Test

New Zealand in Zimbabwe, 2 Test Series, 2025

ZIM

(60.3 ov) 149

(67.1 ov) 165

VS

NZ

307(96.1 ov)

8/1(2.2 ov)

New Zealand beat Zimbabwe by 9 wickets
Full Scorecard →

Jul 29, 2025 | 5th T20

Australia in West Indies, 5 T20I Series, 2025

WI

(19.4 ov) 170

VS

AUS

173/7(17 ov)

Australia beat West Indies by 3 wickets
Full Scorecard →





Source link

तेजस ठाकरेंचा एकनाथ शिंदेंच्या सेनेत प्रवेश! स्वत: शिंदेंच घोषणा करत म्हणाले, 'खऱ्या शिवसेनेत…'

तेजस ठाकरेंचा एकनाथ शिंदेंच्या सेनेत प्रवेश! स्वत: शिंदेंच घोषणा करत म्हणाले, 'खऱ्या शिवसेनेत…'


Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि त्यांचे थोरले बंधू राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तशी वातावरण निर्मितीही दोन्ही बाजूने तयार केली जात आहे. या दोन्ही सेनांच्या एकत्र येण्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील इनकमिंग मंदावल्याच्या बातम्याही समोर आल्या. मात्र या बातम्यांना खोडून काढणारा एक मोठा पक्ष प्रवेश गुरुवारी सायंकाळी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घरी पार पाडला. या पक्षप्रवेशामध्ये काँग्रेसबरोबरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र या पक्ष प्रवेशादरम्यान एक नाव ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या, हे नाव होतं तेजस ठाकरे!

तेजस ठाकरे कोण?

एकीकडे ठाकरे एकत्र येत असतानाच एकनाथ शिंदेंच्या पक्षात तेजस ठाकरेंनी प्रवेश केल्याची घोषणा स्वत: एकनाथ शिंदेंनी केला आहे. ठाण्यात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं सांगताना एक यादी वाचून दाखवली या यादीमधील एक नाव तेजस ठाकरे असं होतं. आता हे तेजस ठाकरे तुम्हाला जे वाढले ते नाहीत. उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरेंच्या नावाशी साधर्म्य साधणारे त्यांच्याच पक्षातील यवतमाळमधील वरिष्ठ पदाधिकारी असलेल्या तेजस ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं आहे. मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थित यवतमाळमधील वेगवेगळ्या पक्षांमधील पदाधिकाऱ्यांचे प्रवेश गुरुवारी सायंकाळी ठाण्यात पार पाडले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंनीच या दुसऱ्या तेजस ठाकरेंचा उल्लेख करत ते ‘खऱ्या शिवसेनेत’ प्रवेश करत असल्याचं म्हटलं.

कोणीकोणी केला पक्षात प्रवेश?

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या यवतमाळमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने नेरचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, सुनीता जयस्वाल, विनिता मिसळे तसेच माजी नगरसेवक संदीप गायकवाड, दिलीप मस्के, उबाठा अल्पसंख्याक आघाडीचे रिझवान खान, माजी नगरसेविका सरिता मुने, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लोकेश इंगोले, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका दर्शना इंगोले, राकेश नेमनवार, माजी नगराध्यक्ष संतोष बोडेवार, माजी उपसभापती अभय डोंगरे, विलास ठाकरे, राहुल देहणकर, साजिद शरीफ, अविनाश देशमुख, तेजस ठाकरे, रुपेश ठाकरे, अमोल जाधव, शुभम राठोड, निलेश भारती, विक्रम झाडे यांचा समावेश आहे.

घौडदौड अधिक मजबूत होईल

“अनेक सरपंच , अनेक जिल्हापरिषद सदस्य , माजी नगराध्यक्ष यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांचे स्वागत करतो,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “या सर्वांच्या प्रवेशामुळे संजय राठोड यांची विजयी घोडदौड सुरू आहे ती अजून मजबूत होईल. या सर्वांचा खऱ्या शिवसेनेत स्वगृही प्रवेश झाला हे मी जाहीर करतो,” असं शिंदेंनी पत्रकारांसमोर म्हटलं. 

विश्वास सार्थ करणार

“जे अडीच वर्षात राज्यात काम झालं, विकास झाला, लाडकी बहीण लाडका भाऊ सर्वांना चांगले दिवस आणण्याचे काम सरकारने केलं. 232 जागा महायुतीला मिळाल्या. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केले. सरकार येण्याचे स्वप्न ज्यांची होती त्यांचे स्वप्न धुळीस मिळवले. जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करणार. त्याच वेगाने त्याहीपेक्षा जास्त वेगाने महायुतीचा कारभार सुरू आहे,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. 

दररोज येणाऱ्यांचा ओढा वाढतोय

“दररोज शिवसेनेत येण्याचा ओढा आहे एका विश्वासाने ही सर्व येत आहेत. विविध जिल्ह्यातून लोक येत आहेत. महायुतीचा भगवा डौलाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फडकेल. संजय राठोड यांचे अभिनंदन करतो. हे प्रेम सर्वांनी दिले आहे. हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून सार्थ करेल,” असं शिंदे म्हणाले. 





Source link

मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, NIA न्यायालयाचा मोठा निर्णय

मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, NIA न्यायालयाचा मोठा निर्णय


Malegaon Blast Case Verdict Updates: नाशिकच्या मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी आज न्यायालयात निकाल जाहीर करण्यात आला. तब्बल 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागला आहे. कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 

बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित, सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर , सुधाकर द्विवेदी , सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी या सातही आरोपींनी निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात लादण्यात आलेले UAPA कलमदेखील सिद्ध होऊ शकले नाही, असा महत्त्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्याचबरोबर, राहिरकर, प्रसाद पुरोहित, उपाध्याय यांच्या संस्थेला मिळालेला निधी स्फोटाचा कट रचण्यासाठी वापरला गेला, हेदेखील सिद्ध होऊ शकले नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. 

बॉम्बस्फोटात जे जखमी झालेत किंवा मृत्यू झालेत ते बॉम्ब स्फोटामुळेच झाले आहेत हे सरकारी पक्ष सिद्ध करु शकला आहे, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. मात्र स्फोटाच्या ठिकाणी सापडलेल्या दुचाकीमध्ये आरडीएक्स लावण्यात आले होते हे सरकारी वकिलांना सिद्ध करता आले नाही. मा्त्र बाईक प्रज्ञासिंह ठाकूरची होती, याचा कोणाताही पुरावा सापडला नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. 

निर्दोष मुक्तता होताच आरोपींनी अश्रू अनावर

न्यायालयाने सर्व सातही आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर आरोपींनी न्यायालयाचे आभार मानले आहे. समीर कुलकर्णी यांनी आमचा पुनर्जन्म झाला असं म्हटलं आहे. तसंच, 17 वर्ष आम्ही पिडीत होतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

निर्दोष मुक्तता झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह काय म्हणाल्या?

मला गेल्या 17 वर्षात खूप अपमान सहन करावा लागला, स्वतःच्या देशात आम्हाला आतंकवादी बनवण्यात आले. मी संन्यासी आहे म्हणून कदाचित मी जिवंत आहे, मी दररोज मरत होते. आज मला आनंद झाला, कोण तरी आहे जो माझा आवाज ऐकत आहे. हिंदुत्व आणि भगव्याचे आज विजय झाला, असं साध्वी प्रज्ञ्रा सिंह यांनी म्हटलं आहे.





Source link

अजितदादांचं स्नेहभोजन, शिंदेची सेना गैरहजर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत धुसपूस?

अजितदादांचं स्नेहभोजन, शिंदेची सेना गैरहजर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत धुसपूस?



उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित स्नेहभोजनाला शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारलीय. केवळ एकनाथ शिंदेच या कार्यक्रमाला उपस्थित होते.



Source link

Video Call वर शिक्षिकेचे अश्लील चाळे; दहावीच्या विद्यार्थ्यांना कॉल करुन…; नवी मुंबई हादरली

Video Call वर शिक्षिकेचे अश्लील चाळे; दहावीच्या विद्यार्थ्यांना कॉल करुन…; नवी मुंबई हादरली


Navi Mumbai School Crime News: नवी मुंबईमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारा एक अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील एक शिक्षिका विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडीओ कॉल करुन उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा हादरवून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे.

गुन्हा दाखल अन् अटक

व्हिडीओ कॉलवरून अश्लील चाळे दाखवत एक शिक्षिका विद्यार्थ्यांना उत्तेजित करत असल्याचा प्रकार समोर आल्याने कोपरखैरणेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला. या शिक्षिकेला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. एका विद्यार्थ्यासोबतच तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

काय करायची शिक्षिका?

कोपरखैरणेतील एका शाळेतील शिक्षिकेचे आक्षेपार्ह कृत्य समोर आले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारी ही 35 वर्षीय शिक्षिका तिच्याच वर्गातील काही अल्पवयीन विद्यार्थ्यांना उत्तेजित करत होती. यासाठी ती स्वतःचे अर्धनग्न फोटो, व्हिडीओ त्यांना इन्स्टाग्रामवर पाठवत होती. त्याशिवाय व्हिडीओ कॉल करूनअश्लील कृत्य करायची. मागील बऱ्याच दिवसांपासून हा सारा प्रकार सुरु होता.

कसा समोर आला हा प्रकार?

मात्र, या शिक्षिकेचा एका विद्यार्थ्यासोबत केलेल्या अश्लील चाळ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे हा प्रकार पालकांच्या व पोलिसांच्या निदर्शनात आला. तेव्हा तिच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर तिला अटक करण्यात आली.

पालकांना मोठा धक्का

मिळालेल्या माहितीनुसार, ही शिक्षिका उलवे परिसरात राहणारी असून तिने इतरही काही अल्पवयीन विद्यार्थ्यांना अशाप्रकारे उत्तेजित करून गळाला लावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिने त्यांच्यासोबत गैरकृत्य केले आहे का? याचा अधिक तपास पोलिस करत आहेत. मात्र, शिक्षिकेच्या या कृत्याने पालकांना धक्का बसला आहे.

मुंबईतही समोर आलेला असाच काहीसा धक्कादायक प्रकार

काही आठवड्यांपूर्वी दादरमधील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. या विद्यार्थ्याला त्याच्या मैत्रिणीच्या माध्यमातून जाळ्यात ओढून ही शिक्षिका दक्षिण मुंबईतील अनेक फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये या विद्यार्थ्याला घेऊन जायची. तिथे ती त्याच्यासोबत अश्लील चाळे करायची आणि नंतर शरीरसंबंध ठेवायची. बराच काळ हा प्रकार सुरु होता. हा मुलगा तणावात राहू लागल्याने पालकांना शंका आल्यावर त्यांनी विचारपूस केली असता हा प्रकार उघड झाला. या शिक्षिकेने कोर्टासमोर दोघांमधील संबंध हे परस्पर संमतीने होते असा दावा केला आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp