Vaishnavi Death Case: शशांकने पाईपने वैष्णवीवर…; पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा, FIR मध्ये एक कलम वाढलं

Vaishnavi Death Case: शशांकने पाईपने वैष्णवीवर…; पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा, FIR मध्ये एक कलम वाढलं


Vaishnavi Death Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला (Rajendra Hagawane) अटक केली आहे. राजेंद्र हगवणेसह फरार असणारा दीर सुशील हगवणे यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दोघांना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं असता, 28 मेपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. तसंच रिमांड कॉपीमध्ये वैष्णवीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे पोलीस तपासात काही धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत.  वैष्णवीला शशांकने केली पाईपने मारहाण केल्याचं समोर आलं आहे. 

वैष्णवी मृत्यू प्रकरणात 12 जणांच्या साक्ष आतापर्यंत नोंदवल्या आहेत. त्यातच वैष्णवीला शशांकने पाईपने मारहाण केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी हा पाईप जप्त केला आहे. यानंतर पोलिसांकडून आणखी एका कलम वाढवण्यात आलं आहे. पोलिसांनी शशांकवर IPC 118 (2) कलम लावलं आहे. 

थार गाडी जप्त

वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांनी वापरलेली थार गाडी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर दोघेही फरार झाले होते. यादरम्यान MH 12 WH 0404 या थार गाडीमधून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केली होती. आता याच प्रवासादरम्यान वापरलेली इंडेव्हर गाडी आणि बलेनो ही गाडी पोलीस केव्हा जप्त करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अखेर आला समोर; धक्कादायक माहिती उघड

वैष्णवीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी मटण पार्टी

16 मे रोजी वैष्णवीचा मृत्यू झाला. मात्र राजेंद्र हगवणे दुसऱ्या दिवशी वडगाव मावळमध्ये हॉटेल तांबडा पांढरा याठिकाणी मटणावर ताव मारत होता. 17 मे रोजी हगवणे मित्रांबरोबर वडगाव मावळमध्ये मटणावर ताव मारताना दिसला. हॉटेल तांबडा पांढराचा मालक मोहन भेगडे आणि राजेंद्र हगवणे हे दोघे तालमीतील मित्र आहेत. त्यामुळे हगवणे हॉटेलमध्ये जेवायला आला होता. 

परंतु 17 मे रोजी ज्या ठिकाणी हगवणे जेवायला बसला होता त्या रूमला आता बंद ठेवण्यात आलं आहे. ही रूम का बंद करण्यात आली आहे याचं उत्तर या हॉटेल मधील एकाही स्टाफकडे नाही. याशिवाय हगवणे याठिकाणी आला त्याविषयी माहिती देण्यासाठी देखील बंदी घालण्यात आल्याचं एका कर्मचाऱ्याने सांगितलं. 

हॉटेल मालक मोहन भेगडे यांच्याशी झी 24 तासच्या प्रतिनिधीकडून फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे आता या हॉटेल मालकाने देखील त्यांना या प्रकरणी मदत केली का असा सवाल उपस्थित होत आहे.





Source link

11 वीची प्रवेश प्रक्रिया बंद; Admission साठी नवं वेळापत्रक जारी, पाहून घ्या महत्त्वाच्या तारखा

11 वीची प्रवेश प्रक्रिया बंद; Admission साठी नवं वेळापत्रक जारी, पाहून घ्या महत्त्वाच्या तारखा


No match is being played.

May 14, 2025 | Match 65

Indian Premier League, 2025

May 14, 2025 | Match 66

ICC CWC League 2, 2023-27

UAE

(47.5 ov) 161

VS

SCO

162/2(24.2 ov)

Scotland beat United Arab Emirates by 8 wickets
Full Scorecard →

May 13, 2025 | Match 64

Indian Premier League, 2025





Source link

राज्यातील 21 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या तुषार दोषींचीही बदली, वाचा संपूर्ण यादी

राज्यातील 21 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या तुषार दोषींचीही बदली, वाचा संपूर्ण यादी



IPS Officers Transfer: पोलीस अधिकाऱी बदलून नवी  व्यवस्था उभी करण्याचा भाग म्हणून  आयपीएसच्या बदल्या होत आहेत.
 



Source link

टोलनाक्याला धडकल्यानंतर ट्रक पेटला! टोलनाका जळून खाक; महामार्गावरील थरार कॅमेरात कैद

टोलनाक्याला धडकल्यानंतर ट्रक पेटला! टोलनाका जळून खाक; महामार्गावरील थरार कॅमेरात कैद


No match is being played.

May 14, 2025 | Match 65

Indian Premier League, 2025

May 14, 2025 | Match 66

ICC CWC League 2, 2023-27

UAE

(47.5 ov) 161

VS

SCO

162/2(24.2 ov)

Scotland beat United Arab Emirates by 8 wickets
Full Scorecard →

May 13, 2025 | Match 64

Indian Premier League, 2025





Source link

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अखेर आला समोर; धक्कादायक माहिती उघड

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अखेर आला समोर; धक्कादायक माहिती उघड


Vaishnavi Hagawane Death Case: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांची सून वैष्णवी हगवणेने (Vaishnavi Hagawane) आत्महत्या केल्यानंतर तिचा शवविच्छेदने अहवाल समोर आला आहे. यामध्ये शरीरावर अनेक बोथट जखमा आढळून आल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच मानेच्या अस्थिबंधन दाबामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील एक्सवर हा अहवाल शेअर केला आहे. तसंच अजित पवारांना वैष्णवीला न्याय देणार का? अशी विचारणा केली आहे. 

 

“जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये माहेरून आण म्हणून सुनेचा अत्याधिक छळ करून तिची हत्या /आत्महत्या इथपर्यंत मजल मारणाऱ्या मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार ? अजितदादा, तुम्ही सत्तेत आहात.पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या  वैष्णवीला न्याय देणार?,” असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. 

वैष्णवीचा मैत्रिणीला केलेला फोन कॉलही आला समोर

वैष्णवीने आपल्या मैत्रिणीला फोन करुन सासरी किती त्रास होत आहे याची माहिती देत व्यथा मांडली होती. हा फोन कॉलही समोर आला आहे. यामध्ये तिने ज्याच्यासाठी सर्वांचा विरोध पत्करुन लग्न केलं तो पतीही साथ देत नसल्याने खंत व्यक्त केली. 

“तुझ्या मैत्रिणींना तू किती घाणेरडी आहेस हे सांगते. तू शशांकसोबतही कधी एकनिष्ठ राहिली नाहीस. तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे. घाण शिव्या देऊ लागली. आईला, पप्पांना काहीही बोलू लागली. मगाशी पप्पा, मम्मी बसले होते त्यामुळे मला बोलता आलं नाही. डॅडी मला मारताना पाहत होते. नंतर त्यांनीही माझ्यावर हात उचलला. त्यांनाही खरं वाटलं आहे,” असं वैष्णवी फोनवरुन मैत्रिणीला सांगते. 

 

पुढे ती सांगते, “पप्पा मला यावर विचार करु म्हणालेत. माझा नवराच माझ्याकडे आला नाही याचं जास्त वाईट वाटत आहे. सासू सासऱ्यांचं असं वागण्याचं काम असतं. पण ज्याच्यामुळे मी त्या घऱात गेले, लय चुकलं माझं. सर्वांना विरोध करुन लग्न केलं तिथंच चूक झाली माझी. सगळं बोलणं, समजण्यापलीकडे गेलं आहे. तुला ही छोटी गोष्ट वाटते का? माझ्या आयुष्यात विचारही केला नव्हता. मला इतकं घाण बोललेत, शिव्या देत असतात”. 

आत्महत्येपूर्वी तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचा, तिला मारहाण केल्याचं, शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. त्यामुळं सुनेला आत्महत्येस प्रवृत्त आणि हुंडाबळी केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि सासरे राजेंद्र हगवणेंसह सासू, पती शशांक, नणंद आणि दिरेवर गुन्हा दाखल आहे. यापैकी पती शशांक, सासू आणि नंदेला अटक करण्यात आलीये तर सासरे राजेंद्र आणि दिराचा शोध सुरु आहे. 

एकीकडे पोलिस राजेंद्र हगवणे यांचा शोध सुरू असल्याचा दावा करत असताना वैष्णवी यांच्या कुटुंबीयांनी मात्र हगवणे यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. अजित पवार हे स्वतः वैष्णवीच्या लग्नात होते, त्यांनी आशीर्वादही दिले होते. दादांनी लाडक्या बहिणीला न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. 

वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा सासरे राजेंद्र हगवणेसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर आरोप आहे. प्रेम विवाहावेळी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी अन चांदीची भांडी देण्यात आली. तरी जमीन खरेदीसाठी 2 कोटींच्या मागणीचा तगादा लावला होता. तसंच पती शशांक हा चारित्र्यावरून संशयही घेत होता. वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानं राजेंद्र हगवणेंची लहान सून वैष्णवीचा जीव गेला. अगदी असंच काहीसा मोठ्या सुनेचाही छळ हगवणे कुटुंबीयांनी केला होता. नोव्हेंबर 2024मध्ये तिने पौड पोलीस स्टेशनमध्ये तसा गुन्हाही दाखल केला आहे. 





Source link

'…आदर करायला हवा,' सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या स्वागताला एकही अधिकारी नाही; महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

'…आदर करायला हवा,' सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या स्वागताला एकही अधिकारी नाही; महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय


भारताचे सरन्यायाधीश झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या भूषण गवई यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्य सचिव सुजाता सैनिक, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती अनुपस्थित होते. यामुळे भूषण गवई यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारताचे सरन्यायाधीश आता कायमस्वरुपी राज्य अतिथी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. 

सरन्यायाधीशांच्या महाराष्ट्र प्रवासात कोणते राजशिष्टाचार पाळावेत, यासाठी दिशानिर्देश राज्य सरकारकडून जारी केले आहेत.  राज्य सरकारने परिपत्रकच जारी केलं असून स्पष्ट केलं आहे. 

यात सांगण्यात आलं आहे  की, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे महाराष्ट्र राज्य अतिथी नियम, 2004 नुसार यापूर्वीपासूनच घोषित राज्य अतिथी असल्याने त्यांना महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यादरम्यान अनुज्ञेय राजशिष्टाचारविषयत सुविधा (निवास, वाहन व्यवस्था, सुरक्षा) पुरवण्यात येतात. अशा सुविधा त्यांना राज्यात सर्वत्र दौऱ्यादरम्यान अनुज्ञेय राहतील.

तसंच सरन्यायाधीश महाराष्ट्र राज्यात मुंबई दौऱ्यावर असताना मुख्य सचिव अथवा त्यांचे प्रतिनिधी, पोलिस महासंचालक अथवा त्यांचे प्रतिनिधी, पोलीस महासंचालक अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, आणि राज्यात अन्यत्र संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक अथवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी यांनी मान्यवरांचे स्वागत करावे असं सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्र राज्याला भेट देणारे मान्यवर, अतिथी यांच्या भेटीदरम्यान ज्या विभागाच्या कामकाजासंदर्भात भेट देत असतील त्या विभागाने सदर मान्यवरांच्या स्वागतासाठी व समन्वयासाठी संपर्क अधिकारी नेमणे आधीच्या आदेशानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांच्या भेटीवेळी विधी व न्याय विभागाने मुंबईसाठी, तर जिल्ह्यात असेल जिल्हाधिकार्‍यांनी समन्वयासाठी क्लास 1 अधिकारी नेमणे बंधनकारक असेल असंही परिपत्रकात सांगण्यात आलं आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp