तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉ. घैसासांचा हलगर्जीपणा? डॉ. सुश्रुत घैसासांवर कारवाई होणार?

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉ. घैसासांचा हलगर्जीपणा? डॉ. सुश्रुत घैसासांवर कारवाई होणार?


तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलंय. आता तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉ सुश्रुत घैसास यांच्याविरोधात कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणातील दोन्ही चौकशी अहवालांमध्ये डॉ. घैसास दोषी आढळल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलंय. तनिषा भिसे मृत्यू मृत्यू प्रकरणी मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसासांविरोधात कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन अहवाल सादर करण्यात आलेत. या दोन्ही अहवालात डॉ. घैसास हे दोषी आढळून आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीये. त्यामुळे येत्या दोन दिवसांत डॉ. घैसास यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील संबंधीत डॉक्टर आणि व्यवस्थापन तनिषा भिसे यांच्या मृत्यूला कारणीभूत आहे.. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप आणदार अणित गोरखे यांनी केलीय.

तर तनिशा भिसेंचा मृत्यू नाही तर ती हत्याच असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी सुळे यांनी केलीय.

या प्रकरणात आरोप करण्यात आलेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आधीच राजीनामा दिलाय. मात्र त्यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागलीय. आता चौकशी अहवालातही ते दोषी असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतेय. त्यामुळे डॉ. घैसास आणि मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनाच्या अडचणी वाढण्याची शक्यताय.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. पेशंटसमोरच 10 लाखांची मागणी करण्यात आल्याचं चाकणकर यांनी सांगितलं. रुग्ण तब्बल साडेपाच तास रुग्णालयात होती. यावेळी रक्तस्त्राव सुरु असतानाही उपचार करण्यात आले नाहीत असं चाकणकरांनी म्हटलंय. याप्रकरणी शासकीय अहवालानंतर आणखी दोन अहवाल येणार आहेत. या तिन्ही अहवालानंतर कारवाई करणार असल्याचं चाकणकरांनी सांगितलं. या प्रकरणात दीनानाथ रुग्णालयाचा हलगर्जीपणा असल्याचंही चाकणकरांनी नमूद केलंय.





Source link

सिगारेटच्या ठिणगीमुळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्याला आगीचा वेढा; 40 घोरपडी होरपळल्या अन्…

सिगारेटच्या ठिणगीमुळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्याला आगीचा वेढा; 40 घोरपडी होरपळल्या अन्…


Maharashtra Fort Fire Updates: छत्रपती संभाजी नगरमधील दौलताबाद येथे देवगिरी किल्ला परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. उन्हामुळे गडाच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळलेलं गवत असल्याने आग झपाट्याने पसरली आणि आगीने या गडाला विळखाच घातल्याचं दिसून आलं. किल्ल्याच्या चारही बाजूला धुराचे मोठे मोठे लोट उठलेले दिसून आले. आग पसरत गेल्यानंतर चिंतेत भर पडली.

सिगारेटमुळे लागली आग

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिगारेटची ठिणगी गवतावर पडल्याने ही आग लागली. मंगळवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत 100 पेक्षा जास्त झाड जळाली, तर 50 वर घोरपडी होरपळल्या आहेत. तसेच 25 हून अधिक मोर जखमी झाले आहेत. त्याप्रमाणे 25 वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती जळून खाक झाल्या आहेत. 12 तासांच्या परिश्रमानंतर रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास ही आग विझवण्यात यश आलं. या आग्नीकांडानंतर आग विझवण्यासाठी  किल्ल्यावर कायमस्वरूपी यंत्रणा बसवण्याची गरज असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. या ठिकाणी सातत्याने आग लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अशा दुर्घटना पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून काहीतरी ठोस उपाय योजना केल्या पाहिजेत अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

किल्ल्याचा इतिहास

देवगिरी किल्ला दौलताबाद गावात स्थित एक ऐतिहासिक तटबंदी असलेला किल्ला आहे . हा किल्ला 9 व्या शतकापासून 14 व्या शतकापर्यंत यादवांची राजधानी होता. तसेच काही काळासाठी म्हणजेच 1327 ते 1334 दरम्यान हा किल्ला दिल्ली सल्तनतची राजधानी होता. नंतर इसवी सन 1966 ते 1636 दरम्यान हा किल्ला अहमदनगर सल्तनतची दुय्यम राजधानी होता. सहाव्या शतकाच्या सुमारास, देवगिरी हे सध्याच्या संभाजीनगरजवळील एक महत्त्वाचे उंचावरील शहर म्हणून उदयास आले, जे पश्चिम आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या कारवां मार्गांवर होते. शहरातील ऐतिहासिक त्रिकोणी आकाराचा किल्ला सुरुवातीला 1187 सालाच्या आसापास पहिला यादव राजा भिल्लाम पाचवा याने बांधला होता.

सन 1308 मध्ये, उत्तर भारताच्या काही भागांवर राज्य करणाऱ्या दिल्ली सल्तनतच्या अलाउद्दीन खिलजीने हे शहर ताब्यात घेतले . 1327 मध्ये, दिल्ली सल्तनतच्या मुहम्मद बिन तुघलकने शहराला दौलताबाद असे नाव ठेवले. त्याने आपली शाही राजधानी दिल्लीहून या शहरात हलवली. ज्यामुळे दिल्लीतील लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात आताच्या दौलताबाद येथे स्थलांतर झाले. तथापि, मुहम्मद बिन तुघलकने 1334 मध्ये आपला निर्णय उलटवला आणि दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीला परत हलवण्यात आली. 1499 मध्ये, दौलताबाद अहमदनगर सल्तनतचा भाग बनले, ज्यांनी ते त्यांची दुय्यम राजधानी म्हणून वापरले. 1610 मध्ये, दौलताबाद किल्ल्याजवळ, संभाजीनगर हे नवीन शहर, ज्याचे नाव तेव्हा खडकी होते

किल्ल्यावर आज काय काय आहे?

हा किल्ला सुमारे 200 मीटर उंच असलेल्या शंकूच्या आकाराच्या टेकडीवर उभा आहे. यादव राजवंशाच्या शासकांनी टेकडीचा बराचसा खालचा उतार कापून टाकला आहे. शिखरावर पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एक अरुंद पूल, ज्यामध्ये दोनपेक्षा जास्त लोक जाऊ शकत नाहीत आणि खडकात खोदलेली एक लांब गॅलरी आहे. या गॅलरीच्या मध्यभागी प्रवेश गॅलरीला उंच पायऱ्या आहेत. शिखरावर आणि उतारावर अंतराने, आजूबाजूच्या ग्रामीण भागात तोंड करून मोठ्या जुन्या तोफांचे नमुने आहेत. तसेच मध्यभागी, शत्रूंना गोंधळात टाकण्यासाठी एक गुहेचे प्रवेशद्वार आहे.





Source link

भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट, खासगीकरणाविरोधात मनसे रस्त्यावर

भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट, खासगीकरणाविरोधात मनसे रस्त्यावर


Bhagwati Hospital : बोरिवली येथील मुंबई महापालिकेच्या भगवती हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. मात्र, भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला तीव्र विरोध करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे पक्षासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही भगवती रुग्णालयाच्या खासगिकरणाला तीव्र विरोध केला आहे. तर मनसे खासगीकरणाविरोधात रस्त्यावर उतरली होती.  

मुंबई महानगर पालिकेचं बोरिवलीमध्ये असलेलं भगवती रुग्णालय हे सर्वसामान्य मुंबईकर रुग्णांचा आधार आहे. मात्र, भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. रुग्णालयाच्या खासगीकरणाला तीव्र विरोध होतो आहे. भगवती हॉस्पिटल खासगीकरणा विरोधात मनसे आता मैदानात उतरली आहे. भगवती हॉस्पिटलचे खाजगीकरण होऊ नये याबाबत मनसेच्या वतीने आज रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे उपस्थित होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून रुग्णालयाबाहेर सकाळपासूनच पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जर भगवती रुग्णालयाचे खासगीकरण झाले तर पैसे काही लोकांच्या खिश्यात जाणार आहेत. मग याचा आपल्या लोकांना काही फायदा होणार नाही. महानगर पालिका हे बरोबर काम करत नाही. त्यामुळे आम्ही भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला तीव्र विरोध करत आहोत. हा निर्णय रद्द करावा. जो पर्यंत आम्ही येथे आहोत तो पर्यंत भगवती रुग्णालयाचे खासगीकरण होणार नाही. आम्ही प्राण देऊ पण खासगीकरण होऊ देणार नाही असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं. 

भगवती हॉस्पिटलच्या खाजगीकरणाला मनसेचा विरोध

भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील विरोध केला आहे. भगवती रुग्णालयाचं खासगीकरण करू नये अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. तर याच मागणीसाठी महाविकास आघाडीचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सुभाष देसाई यांनी मुंबई पालिका आय़ुक्तांची भेट घेत खासगीकरणाला विरोध केला आहे. 

मुंबईतल्या सर्वसामान्य रुग्णांचा आधार असलेलं भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट का घातला जातोय हे न उलगडलेलं कोडं आहे. मात्र, या खासगीकरणाला मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला आहे. आता पालिका प्रशासन काय निर्णय घेतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.





Source link

मुंबई गोवा मार्गावर सुरु होणार 180 वर्ष जुन्या पद्धतीची वाहतूक व्यवस्था; 620 प्रवासी, 60 वाहने आणि 6 तासांचा प्रवास

मुंबई गोवा मार्गावर सुरु होणार 180 वर्ष जुन्या पद्धतीची वाहतूक व्यवस्था; 620 प्रवासी, 60 वाहने आणि 6 तासांचा प्रवास


Mumbai To Goa Ro Ro Ferry:  मुंबई गोवा मार्गावर  180 वर्ष जुन्या पद्धतीची वाहतूक व्यवस्था सुरु होणार आहे. ही वाहतूक व्यवस्था म्हणजे जसमार्ग वाहतूक आहे. मुंबई गोवा प्रवास 6 तासांत होणार आहे. रस्ते किंवा रेल्वेमार्गे नव्हे थेट समुद्रमार्गे अति जलद प्रवास करता येणार आहे. लवकरच  मुंबई ते गोवा अशी रो रो बोट सेवा सुरु होणार आहे. या रो रो मधून एकाच वेळी 620 प्रवासी आणि 60 वाहने जाऊ शकतात. 

145 मध्ये बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना झाली. या कंपनीच्या माध्यमातून मुंबई ते गोवा अशी जलवाहतूक सुरु करण्यात आली. मुंबईतून निघालेले जहाज रत्नागिरीनंतर जैतापूर, मालवण, वेंगुर्ला अशी बंदरं घेत घेत ती बोट गोव्याला जायचे. 1964 नंतर ही जलवाहतूक बंद झाली. आता 180 वर्ष जुन्या पद्धतीची ही जलवाहतूक व्यवस्था पुन्हा सुरु होणार आहे. पुन्हा एकदा प्रवाशांना समुद्रमार्गे मुंबई ते गोवा हा प्रवास होणार आहे. 

मुंबई ते गोवा हे अंतर 589 किमी इतके आहे. मुंबई ते गोवा या प्रवासाठी सध्या वाहतुकीचे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे कोकण रेल्वे आणि दुसरा म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. मुंबई गोवा महामार्गे प्रवासासाठी 10 ते 12 तास लागतात.   तर, रेल्वेने गेल्यास प्रवासासाठी 8 ते 9 तासांचा वेळ लागतो. मात्र, आता समुद्र मार्गे हाच मुंबई गोवा प्रवास फक्त 6 तासात शक्य होणार आहे. 

जल वाहतूक सेवा देणाऱ्या  एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून मुंबई ते गोवा अशी रो रो बोट सेवा सुरु केली जाणार आहे. प्रवासी जहाजाच्या माध्यमातून प्रवाशांन मुंबई गोवा प्रवास करता येणार आहे. गोव्याला जाणारे हे खाजगी जहाज मुंबईतून निघेल. मुंबईतील माजगाव ते गोव्यातील मुरगाव दरम्यान अशी ही रो रो फेरी असेल. 

मुंबई – गोवा रो रो ची ट्रायल रन झाली असल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातीच्या चाचणीत मुंबई-गोवा प्रवास 6.5 तासांत पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. याला अंतिम मंजुरी मिळाल्या नंतर  माझगाव डॉक ते पणजी जेट्टी डॉक पर्यंत फेरी सेवा सुरू होईल. परवानगीसाठी गोवा सरकारशी चर्चा सुरू आहे. 620 प्रवासी आणि 60 वाहने वाहून नेण्याची क्षमतेचे हे जहाज असेल. मार्च 2025 पर्यंत ही रो रो सेवा सुरु करण्याचे टार्गेट होते. मात्र, आता एप्रिस अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातील ही वाहतूक सुरु होऊ शकते.  या रो रो सेवेमुळे महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही राज्यांच्या पर्यटनासाठी फायदा होणार आहे.  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ही रो रो सेवा सुरु करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील आहेत. 

 

 





Source link

मुलांनी खेळायचं कुठे कारण शाळेला क्रीडांगण नाही.. सोलापुरच्या शाळेची दुरवस्था

मुलांनी खेळायचं कुठे कारण शाळेला क्रीडांगण नाही.. सोलापुरच्या शाळेची दुरवस्था


सचिन कसबे, झी 24 तास, सोलापूर :  शालेय जीवनाचा काळ अविस्मरणीय असतो. पण आजही काही गावांमधल्या शाळाची अवस्था दयनीय आहे. सोलापुरातल्या सांगोलामधल्या महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाची इमारत याचं एक उदाहरण आहे.. मुलांनी शाळेत जाऊन कसं शिकायचं?? साध्या सोयीसुविधाही शाळेत नाहीत.

मुलं शाळेत गेली त्यांच्या पालकांच्याच मनाला धास्ती लागून राहते. इतकी दयनीय अवस्था या शालेय इमारतीची दिसत आहे. शाळेची दुरूस्ती करा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रामस्थांच्या तक्रारी फेटाळल्या आहेत. इमारत सुस्थितीत आहे, असा दावा मुख्याध्यापकांनी केला आहे. 

सांगोला तालुक्यात शाळेची दुरवस्था पाहून इमारत धोकादायक, स्वच्छतागृहही नाही अशा अवस्थेत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ चालला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. 

ही आवडते मज मनापासुनी शाळा 
लाविते लळा ही जसा माऊली बाळा…

अरेरे, पण हे काय… ही शाळा पाहिलीत.. सोलापुरातल्या सांगोला मधल्या किडे बिसरी इथलं हे महात्मा फुले माध्यमिक विद्यालय…  तुटलेल्या खिडक्या, काचाही फुटलेल्या… भिंतींना गेलेले तडे पाहून इथल्या विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागण्याऐवजी मनात भीती बसली असेल..  

शाळेची दुरवस्था पाहून पालकांना धास्ती लागलेली असते की, मुलं शाळेत सुरक्षित आहेत ना. ही शाळा 100 टक्के अनुदानित असूनही शाळेत मुलं-मुली, शिक्षक असूनही शौचालय नाही. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय नाही. आजूबाजूच्या परिसरात अस्वच्छता,  इमारत पडकी, खिडक्या निखळलेल्या, काचाही फुटक्या एवढंच नव्हे तर मुलांनी खेळायचं कुठे कारण शाळेला क्रीडांगण नाही.. 

मुलं शाळेत गेली त्यांच्या पालकांच्याच मनाला धास्ती लागून राहते. इतकी दयनीय अवस्था या शालेय इमारतीची दिसत आहे. शाळेची दुरूस्ती करा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रामस्थांच्या तक्रारी फेटाळल्या आहेत. इमारत सुस्थितीत आहे, असा दावा मुख्याध्यापकांनी केला आहे. 

विद्येच्या मंदिराची अवस्था इतकी बिकट असेल तर शाळेतल्या इतर कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहतंय… यात सुधारणा झाली नाही तर येत्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग आणखी खडतर होईल.. तेव्हा लक्ष द्या…





Source link

YouTube
Instagram
WhatsApp