नाशिकमध्ये खळबळ! अनैतिक संबंधामुळं तरुणाचा जीव गेला, कारण ठरलं व्हॉट्सअॅप स्टेटस…

नाशिकमध्ये खळबळ! अनैतिक संबंधामुळं तरुणाचा जीव गेला, कारण ठरलं व्हॉट्सअॅप स्टेटस…


Nashik Crime News: नाशिक जिल्ह्यात अनैतिक संबंधातून एका तरुणाचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे.लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो स्टेटसला ठेवल्याच्या रागातून मैत्रिणीनेच मित्राचा खून केला आहे. विल्होळीजवळ तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो व्हॉट्सअॅपच्या स्टेटसला ठेवल्याने कामगारनगर येथील इसम सूरज ऊर्फ पप्पू काशीनाथ घोरपडे याचा दोघा जणांनी खून केला आहे. नाशिकच्या विल्होळी शिवारात धारदार हत्याराने डोक्यावर प्रहार करून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने मुख्य संशयित आरोपी शशिकांत ऊर्फ नाना रामदास गांगुर्डे यास ताब्यात घेतले असून त्याने साथीदाराच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली आहे. 

सातपूर भागातील कामगारनगर येथील रहिवासी असलेले सूरज यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो स्टेटसला शनिवारी ठेवले होते. यामुळे त्यांची मैत्रीण संशयित इंदू विजय साळवे (रा. संघर्षनगर) हिने त्यांना फोन करून त्रास दिला होता. यामुळे सूरज हे विल्होळी येथील तिच्या घरी विचारणा करण्यासाठी गेले असता, तिचा सख्खा भाऊ संशयित शशिकांत गांगुर्डे, नवीन सोनकांबळे, अजय रामदास कांबळे यांनी त्यांना मारहाण केली. 

मित्रांसोबत पार्टी साठी गेला अन् खून झाला

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शोध घेतला असता ओवाडी नाला ते दरेगाव हिल टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सदर तरुणाचा मृतदेह सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. सदर तरुणाच्या शरीरावर धारदार हत्याराने वार केल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून आल्याने सदर तरुण कोणासोबत होता याचा तपास आता पोलिस घेत आहेत





Source link

महाराष्ट्रात चाललंय काय? नाशिक मध्ये भाजप आमदाराच्या विराट सभेत झळकले लॉरेन्स बिश्नोईचे फोटो

महाराष्ट्रात चाललंय काय? नाशिक मध्ये भाजप आमदाराच्या विराट सभेत झळकले लॉरेन्स बिश्नोईचे फोटो


Lawrence Bishnoi : महाराष्ट्रात चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित करणारी घडामोड नाशिकमध्ये घडली आहे. नाशिक मध्ये भाजप आमदाराच्या विराट सभेत लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकले आहेत. याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. 

नाशिक मध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिंदू विराट सभेचे आयोजन केले होते.  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने ही सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी गोपीचंद पडाळकर यांचे भाषण सुरु असताना काही तरुणांनी  लॉरेन्स बिश्नोईचे फोटो हातात धरुन ते झळकवले. हे फोटो झळकवारे तरुण कोण होतो? यांनी  लॉरेन्स बिश्नोईचे फोटो का झळकवले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.  लॉरेन्स बिश्नोई हा मोठा गँंगस्टर आहे.  नाशिकच्या सिडको परिसरात करण्यात आले होत सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

कसबा पेठेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरा

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात कसबा पेठेतील फडके हौद चौकात साजरा करण्यात आला. यामध्ये संभाजी महाराज यांच्या 12 फूटी मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध 
श्रीमंत शिवशाही प्रतिष्ठान गणेश लोणारे प्रस्तुत ‘शिव पर्वती विवाह सोहळा’(जिवंत देखावा)या जन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.  या भव्य, नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन किशोर उर्फ राजेंद्र भगवान तरवडे, यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी  प्रमुख पाहुणे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणालदादा मालुसरे, छत्रपती संभाजी महाराजांचे दुधभाऊ, विरधाराऊ माता गाडे पाटील यांचे वंशज सरनोबत अमितदादा गाडे पाटील, किल्ले रायगड निर्माता हिरोजी इंदलकर यांचे वंशज समीरजी इंदलकर, सरसेनापती विरबाजी पासलकर यांचे वंशज सरसेनापती अविनाशदादा पासलकर, सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटील यांचे वंशज राजेंद्रदादा मोहिते पाटील,गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य विश्वस्त. श्रीमंत सचिनदादा भोसले पाटील, सरनौबत येसाजी कंक यांचे 14 वे वंशज रविंद्र श्रीपतराव कंक,पुणे शहर भाजपा अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज चित्रपटातील अभिनेते अनुप सिंग ठाकूर उपस्थित होते. 

यावेळी आदित्य जयकुमार गोरे, बाळासाहेब दाभेकर,अमित कंक,सम्यक साबळे,संजय अग्रवाल,ज्योती सावर्डेकर,जयेश टाक,मा.नगरसेवक योगेश समेळ,विशाल धनवडे,पल्लवीताई जावळे, या मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी  त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठान आखाडा, कसबा पेठ शिवकालीन मर्दानी खेळ सादर करत उपस्थितांची मने जिंकली. 

याप्रसंगी बोलताना आयोजक किशोर उर्फ राजेंद्र भगवान तरवडे म्हणाले, यंदा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे चौथे वर्ष आहे. जन्मोत्सव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी प्रत्येक गावातील आणि शहरातील मंडळांनी धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरी केली पाहिजे.

 





Source link

'मला तेव्हाच राग येतो जेव्हा…'; CM फडणवीसांनी उघड केलं हसऱ्या चेहऱ्यामागील गुपित; म्हणाले 'जर मी फार रागावलो…'

'मला तेव्हाच राग येतो जेव्हा…'; CM फडणवीसांनी उघड केलं हसऱ्या चेहऱ्यामागील गुपित; म्हणाले 'जर मी फार रागावलो…'



Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘झी 24 तास’च्या महाराष्ट्र गौरव कार्यक्रमात अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. यादरम्यान त्यांनी आपल्या हसऱ्या चेहऱ्यामागील रहस्यही उलगडलं. 
 



Source link

आता 'हा' कागद असेल तरच वाहनचालकांना पेट्रोल पंपावर मिळणार पेट्रोल/डिझेल

आता 'हा' कागद असेल तरच वाहनचालकांना पेट्रोल पंपावर मिळणार पेट्रोल/डिझेल


Maharashtra Government New Policy on Fuel: तुम्ही तुमच्या कारमध्ये किंवा बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेलात आणि तुमच्याकडे कागदपत्रं मागण्यात आली तर आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही. वाहनांसंदर्भातील नियमांचं कठोरतेनं पालन केलं जाणार आहे. वाहनचालकांना आता काही ठराविक कागदपत्रांशिवय पेट्रोल मिळणार नाही. हा नियम नेमका काय आहे पाहूयात…

नेमकं कोणतं सर्टिफिकेट आवश्यक?

दिवसोंदिवस देशातील वाहनसंख्येबरोबरच राज्यातील वाहनांच्या विक्रीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढताना होताना दिसत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने वायू प्रदूषणाचे प्रमाणही वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच वाहनचालकांकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच Pollution Under Control अर्थात पीयूसी सर्टिफिकेट असणं बंधनकारक असतं. पीयूसी नसेल तर पोलीस दंड देखील आकारतात. मात्र असं असतानाही अनेक वाहनचालक या सर्टिफिकेटकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच आता महाराष्ट्र सरकारने महत्वाचा निर्णय घेताना ‘नो पीयूसी सर्टिफिकेट, नो इंधन’ धोरण लागू करण्याचं ठरवलं आहे.

 

महाराष्ट्र सरकार आणत असलेल्या या नव्या नियमामुळे वाहनचालकांचे टेन्शन वाढणार आहे. नव्या नियमानुसार रस्त्यावरुन वाहन चालवताना त्या वाहनाचं पात्र पीयूसी सर्टिफिकेट असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पेट्रोल किंवा इंधन भरायला जाताना वाहनचालकाकडे पीयूसीची प्रत बंधनकारक करण्यात येणार आहे. पीयूसी नसेल तर वाहनचालकांना पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही.

ही ‘नो पीयूसी, नो इंधन’ धोरण आहे तरी काय?

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच ‘नो पीयूसी, नो इंधन’ प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचं बोलले होते. नव्या धोरणानुसार, प्रत्येक चालकाला वाहनाचं पात्र आणि सक्रीय पीयूसी प्रमाणपत्र पेट्रोल पंपावर दाखवावे लागणार आहे. पीयूसी सर्टिफिकेट दाखवल्यानंतरच वाहनचालकांना पेट्रोल किंवा डिझेल भरता येणार आहे. 

हे पाऊल का आवश्यक आहे?

राज्यातील वाहनांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. पुण्यासारख्या शहरात तर लोकसंख्येपेक्षा दुचाकींची संख्या जास्त असल्याचं सांगितलं जातं. केवळ मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकच नाही तर अनेक मध्यम आकाराच्या शहरांमध्येही दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्याने वायू प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. अनेक जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांमधून खूप मोठ्या प्रमाणात धूर निघतो आणि हवा दुषित करतो. पीयूसी बंधनकारक असलं तरी अनेकजण पीयूसी प्रमाणपत्राबद्दल फारसे गंभीर नसतात. पीयूसी न बनवणाऱ्यांबरोबर बनावट पीयूसी बनवून वाहने चालवणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. या मुळेच कायदा असला तरी प्रदूषण नियंत्रण धोरण केवळ कागदावर मर्यादित असल्याचं आणि प्रत्यक्ष कृतीत दिसून येत नसल्याचं पाहायला मिळतं. कायद्याला बगल देणाऱ्यांना धडा शिकवण्याच्या उद्देशानेच हा नवा नियम लागू केला जाणार आहे.

नव्या धोरणानुसार नेमका काय बदल होणार?

पेट्रोल पंप कर्मचारी प्रत्येक वाहनाचं पीयूसी तपासून पाहिल्यानंतरच इंधन देईल. सरकार क्यूआर कोडसह एक डिजिटल पीयूसी सिस्टम तयार करणार आहे. या सिस्टीमच्या माध्यमातून पेट्रोल पंपावर इंधन भरण्यापूर्वी त्वरित स्कॅनिंग आणि पडताळणी करता येणार आहे. हा डेटा इंटिग्रेस्टेड ऑनलाइन सिस्टमशी जोडला जाणार आहे. असं केल्याने वाहनांबद्दल सर्वत्र अपडेटेड माहिती उपलब्ध होईल. या माध्यमातून बनावट पीयूसीच्या समस्येला आळा बसण्यास मदत होणार आहे.

कधीपर्यंत लागू होणार हे धोरण?

नवीन धोरण हे केवळ वाहनचालकांना शिक्षा देण्यासाठी नाही तर जनतेमध्ये वाहनांच्या माध्यमातून होणाऱ्या वायू प्रदुषणाबद्दल जनजागृती करण्यासाठी आहे. हा नवा नियम लागू करण्यापूर्वी जनजागृती मोहीम राबवली जाईल. वाहनचालकांना वाहनांचं पीयूसी बनवण्यासाठी एक निश्चित वेळ दिला जाणार आहे. पेट्रोल पंप मालकांनाही या धोरणाबद्दल समजावून सांगितले जाईल आणि तांत्रिकदृष्ट्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना प्रशित्रण दिले जाईल. हे धोरण लवकरच अंतिम मंजुरीसाठी सादर केलं जाणार असून जर सर्व काही नियोजनाप्रमाणे झाले तर पुढील काही महिन्यामध्ये हे नवं धोरण संपूर्ण राज्यात लागू केलं जाणार आहे. 





Source link

लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवर ठेवायचं नाहीय, लखपती बनवायचंय- मुख्यमंत्री

लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवर ठेवायचं नाहीय, लखपती बनवायचंय- मुख्यमंत्री


Ladaki Bahin become Lakhpati Didi: महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणी’ 1500 रुपयाचा हफ्ता 2100 रुपये कधी होणार? याची वाट पाहतायत. असे असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिलीय. लोकसभा निवडणुकीत फटका पडल्यानंतर महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाडकी बहीण योजना आणली. याअंतर्हत पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीत सरकार पुन्हा सत्तेत आल्यास ही रक्कम 2100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. पण ते पूर्ण न झाल्याने लाडक्या बहिणींमध्ये नाराजी आहे. असे असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर महत्वाचे विधान केलंय. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्ध्यात बोलत असताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाचे भाष्य केले. सुरुवातीला त्यांनी 25 टक्के अपघाताच प्रमाण कमी झाल्याने वर्धावासियांचे आभार मानले.  परिवहन मंत्र्याची वर्धा जन्मभूमी आहे. तुम्ही त्यांना 50 बसेस मांगीतल्या. तुम्ही 100 बस मांगीतल्या असत्या तरी त्यांनी दिल्या असत्या. कारण जन्मभूमीपेक्षा काहीच महत्वाचं नसत. तुमच्या आमदारांनी कंजूसी केलीय, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन ठेवायचं नाहीय. तर त्यांना लखपती दीदी बनवायच आहे, असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील 1 कोटी बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. 

लाडक्या बहिणी खूष- झिरवळ 

लाडक्या बहिणी नाराज असल्याचे आपण किंवा विरोधक सांगतात. पण सर्व लाडक्या बहिणीला खुश आहेत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कोणीही म्हटलेलं नाही, असं विधान मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलंय. हे पंधराशे रुपयेदेखील देण्याची यांची देण्याची ऐपत नाही असा प्रचार विरोधकांनी सुरू केला होता. मात्र 1500 रुपये दिल्यानंतर विरोधकांनी आता 2100 रुपयावर जास्त जोर धरला आहे. मला वाटतं पंधराशे रुपये ही रक्कमदेखील परिपूर्ण आहे. महिला पंधराशे रुपये मिळाल्यानंतरही खुश आहेत, असे झिरवळ म्हणाले.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp