CSMTतील चहावाला महिन्याला कमवायचा दीड लाख, चौकशी करताच मोठा घोटाळा उघड, अधिकाऱ्यांना चहा पाजायचा अन्…

CSMTतील चहावाला महिन्याला कमवायचा दीड लाख, चौकशी करताच मोठा घोटाळा उघड, अधिकाऱ्यांना चहा पाजायचा अन्…


tea seller ticket scam, CST tea vendor scam , tea seller ticket scam,CSmT tea vendor, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चहाविक्रेत्याचा घोटाळा, मुंबई बातम्या, mumbai news, mumbai local news,





Source link

मुंबई सगळ्यांची आहे आणि संविधान बाप आहे? गुणरत्न सदावर्ते यांचे राज ठाकरेंना ओपन चॅलेंज

मुंबई सगळ्यांची आहे आणि संविधान बाप आहे? गुणरत्न सदावर्ते यांचे राज ठाकरेंना ओपन चॅलेंज



राज ठाकरे विरुद्ध गुणरत्न सदावर्ते असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या मराठी सक्तीच्या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार आहेत. टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी ही मागणी केलीय. राज ठाकरे हे चिथावणी देत असून त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केलाय.



Source link

महिला पोलीस अधिकारी अचानक बेपत्ता, 2 वर्षांनी खून झाल्याचे समोर, अश्विनी बिद्रे हत्याकांडात नेमकं काय घडलं?

महिला पोलीस अधिकारी अचानक बेपत्ता, 2 वर्षांनी खून झाल्याचे समोर, अश्विनी बिद्रे हत्याकांडात नेमकं काय घडलं?


Ashwini Bidre Murder: सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्वीनी बिद्रे-गोरे खून प्रकरणात आज शनिवारी पनवेल येथील सत्र न्यायालयात निकाल जारी करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा आरोप अभय कुरुंदकर यांच्यावर आहे. त्याचबरोबर आणखी चार जणांवरही आरोप आहेत. सर्व आरोपी गेल्या सात वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या. 

अश्विनी बीद्रे या सहाय्यक पोलिस निरीक्षक पदी काम करत होत्या. 11 एप्रिल 2016 रोजी  अश्विनी ड्युटीसाठी घराबाहेर पडल्या होत्या मात्र नंतर त्या परतल्याच नाहीत. अश्विनी रहस्यमयरित्या घरातून गायब झाल्या होत्या. त्यानंतर 14 जुलै 2016 रोजी त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मात्र तक्रारीची दखल घेण्यात न आल्याने त्यांचे पती राजू गोरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत 4 ऑक्टोबर 2016 रोजी याचिका दाखल करण्यात आली. 

 २७ ऑक्टोबर २०१६ ला न्या. ए एस ओकसाहेब आणि ए ए सय्यद साहेब  यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना डिसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली टीम नियुक्त करून तत्काळ अहवाल दाखल करण्याचा आदेश दिला. ३१ जानेवारी २०१७ ला खून करण्याच्या उद्देशून अपहरण करणे आदी बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर वर कंळबोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा  दाखल करण्यात आला. या प्रकरणात अभय कुरुंदकरचा खासगी ड्रायव्हर आणि त्याचा मित्र महेश फळणीकर यांनाही अटक करण्यात आली. 

अश्विनी बिद्रा बेपत्ता झाल्याच्या दोन वर्षानंतर म्हणजेच 28 फेब्रुवारी 2018 ला अश्विनीचा खून झाल्याचं उघडकीस आले. 1 मार्च 2018 खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आणि 19 मे 2018 ला चार्जशीट दाखल करण्यात आले.

नेमकं काय घडलं?

2016 रोजी अश्विनी यांची मीरा रोड येथे हत्या करण्यात आली. त्यानंतर लाकूड कापायच्या मशीनने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले व ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले, असा आरोप करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी कुरुंदकर यांनी अश्विनी यांच्या मृतदेहाचे तुकडे वसई खाडीत फेकून दिले होते. मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी वसई खाडी मध्ये शोध मोहीम घेण्यात आली. परंतु कोणतेही पुरावे सापडले नाही. अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांचे प्रेमसंबंध होते. त्यातूनच हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत होता. 

दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल आज येण्याची शक्यता आहे. आरोपी कुरुंदकरला कोर्टात आणलं असून पनवेल सत्र न्यायालय काय निकाल देतं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 





Source link

वाल्मिक कराडला बीडबाहेर नेल्याने कथित व्हीआयपी सुविधांना आळा बसेल?

वाल्मिक कराडला बीडबाहेर नेल्याने कथित व्हीआयपी सुविधांना आळा बसेल?


Valmik Karad: वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना बीडबाहेर हलवण्यात येण्याची शक्यता आहे. तशी मागणीच धनंजय देशमुखांनी केलीय. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुखांनी योगेश कदमांसमोर विविध मागण्या मांडल्यात.

गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारासोबत पोलिसांचं संगनमत आहे, असा आरोप धनंजय देशमुखांनी केलाय. गृहराज्यमंत्री योगेश कदमांसमोर धनंजय देशमुखांनी तक्रारींचा पाढा वाचला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना कारागृहात विशेष सोयी-सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आलाय.वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांना बीडबाहेर हलवण्याची मागणीही करण्यात आली होती. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली होती.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याप्रकरणी तातडीनं चौकशीचे आदेश दिलेत. बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाणार आहे. जर या प्रकरणात कारागृहातील अधिकारी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा खुद्द गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिलाय. कदम यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वाल्मिक कराडला बीड कारागृहातून हलवणार असल्याचं आश्वासन देशमुख कुटुंबीयांना दिलंय.

वाल्मीक कराड व त्याच्या साथीदारांना आता यापुढे राज्यातील वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवलं जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. गृहविभागाच्या या निर्णयानंतर आता वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांना वेगवेगळ्या कारागृहात हलवलं जाणार आहे. यामुळे त्यांना मिळणाऱ्या कथित व्हीआयपी सुविधांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बीड हत्येतील आरोपी वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट!

संतोष देशमुख  हत्या प्रकरणातील आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी केलाय. दरम्यान यासंदर्भात देशमुख कुटुंबीयांनी जेल प्रशासनाकडे लेखी तक्रार केलीय. या तक्रारात जेलमधील सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी करण्यात आली आहे. देशमुख कुटुंबातील सदस्य दादासाहेब खिंडकर यांनी पोलीस प्रशासनातील लोक आरोपींना मदत करत आहेत असा दावा केला. तर जेलमध्ये सर्वांना आरोपींसारखी वागणूक दिली गेली पाहिजे असे म्हटले. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला बीडमध्ये न ठेवता, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह येथे वर्ग करण्याचे आदेश आहेत. मात्र, कारागृहातील काही कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन केवळ विष्णू चाटेची लातूर जेलमध्ये रवानगी केल्याची तक्रार देशमुख कुटुंबाची आहे. वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्येच ठेवण्यात आलं आहे. वाल्मिक कराडला मोबाईल वापरण्याची सुविधा कर्मचारी सुधाकर मुंडेंनी दिली आहे. वाल्मीक कराड, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनावणे यांना नियमबाह्य पद्धतीने एकाच बराकीमध्ये ठेवण्यात आल्याचाही आरोप देशमुख कुटुंबाने केला आहे. बीड हत्येतील आरोपींच्या व्हीआयपी ट्रिटमेंटवरुन जितेंद्र आव्हाडांनी देखील टीका केली आहे. छोट्या गुन्ह्यात वाल्मिक कराडची लोकं जेलमध्ये जातात आणि त्याची सेवा करतात असा दावा आव्हाडांनी केलाय. देशमुख कुटुंबीयांनी जेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप केलाय. तसंच जेलमधील सीसीटीव्ही  देण्याचीही मागणी त्यांनी केलीय. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांची मागणी मान्य होते का? ते पाहणं महत्वाचं असणार आहे.





Source link

मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्यात सापडलं 57 हजार किलो गोमांस; हैदराबाद कनेक्शन उघड

मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्यात सापडलं 57 हजार किलो गोमांस; हैदराबाद कनेक्शन उघड



Beef Found On Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून दोन एसी कंटेनर संशयास्पदरित्या येत असल्याची टीप पोलिसांना मिळाली.



Source link

10वीच्या विद्यार्थ्याने AIच्या मदतीने 2 महिन्यात कमावले दीड लाख; व्हायरल पोस्टमध्ये दावा!

10वीच्या विद्यार्थ्याने AIच्या मदतीने 2 महिन्यात कमावले दीड लाख; व्हायरल पोस्टमध्ये दावा!


Class 10th student earning with AI: देशासह जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय वेगाने वाढतोय. लहान मुलांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वजण एआयचा वापर करु लागले आहेत. दुसरीकडे एआयच्या वाढत्या वापरामुळे नोकरदार वर्गात भीतीचे वातावरण आहे. एआयमुळे लाखो नोकऱ्यांवर टांगती तलवार असल्याचे म्हटले जात आहे.  पण या सर्वाची पर्वा न करता दहावीच्या एका विद्यार्थ्याने एआयला कामाला लावून 2 महिन्यात 1.5 लाख रुपयांहून जादा कमाई केलीय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर एक पोस्ट व्हायरल होतेय. ज्यामध्ये याबद्दल सांगण्यात आलंय. 

दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने एआयच्या मदतीने वेबसाइट बनवून विकली आणि अवघ्या 2 महिन्यात 1.5 लाख रुपयांहून जास्त कमाई केली.  रेडीटच्या पोस्टमध्ये यासंदर्भात दावा करण्यात आलाय. एआय इनोव्हेशनवर काम करत असलेल्या रेडीट अकॅडेमिक वॉइस 6526 यूजरने विद्यार्थ्याची कहाणी शेअर केली आहे. जी खूप व्हायरल होतेय. 

व्हायरल पोस्टमध्ये काय म्हटलंय?

‘इंडिया इज नॉट बिगिनर्स’ ही ओळ आपण ऐकली असेल. पण मी काल ही अनुभवली. एआय नोकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात ताबा घेतोय. खूप लोकं भविष्यात बेरोजगार होण्याच्या भीतीत आहेत.  मीदेखील याबाबत विचार करत होतो. एआय प्लॅटफॉर्म वापरायला लागल्यापासून हा विचार जास्त येऊ लागला. लोकं आमच्या एआय वेबसाइट बिल्डरचा उपयोग कसा करतात, हे काल मी यूजर एनालिटिक्सवर तपासत होतो.’ 

पोस्टमध्ये पुढे म्हटलंय,  एक यूजर होता. ज्याचे यूजरनेम मस्त असे होते. तो याचा वापर नियमित करत होता. क्रेडीट खरेदी करत होता. रोज वेबसाइट बनवत होता. मला उत्सुकता वाटली आणि मी त्याची प्रोफाइल तपासली तर तो एक दहावीचा विद्यार्थी होता.’

एआय वेबसाइट बिल्डर प्लॅटफॉर्मचे फाऊंडर आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात, ‘स्टुडंट्स लोकल कम्युनिटी, रेडीट, सोशल मीडिया प्लॅटफर्म आणि स्कूल कनेक्शनच्या माध्यमातून छोट्या छोट्या व्यवसायासाठी एक पेजर वेबसाइट बनवत होता. तो कोडर नव्हता तरीही त्याने 2 महिन्यात 8 वेबसाइट्स बनवून त्याने विकल्या होत्या. एक वेबसाइट विकून त्याने साधारण 250-300 डॉलर म्हणजेच 1.5 लाखहून जास्त रुपये कमावले.’ 

एआयमुळे जगभरातील 9.2 कोटी नोकऱ्या धोक्यात असल्याचे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या ‘फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025’ मध्ये म्हटलंय. 2030 पर्यंत कोट्यवधी नोकऱ्या समाप्त होतील. सोबतच 17 कोटी नव्या नोकऱ्या तयार होतील. तांत्रिक विकास, हरित बदल, आर्थिक आणि डेमोग्राफीक बदलामुळे हे स्थित्यंतर येईल. एआयचा वापर वेगाने वाढतोय.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp