राज ठाकरे- उद्धव ठाकरे युती होणार? संजय राऊतांच्या विधानाने उत्सुकता वाढली, 'सकारात्मकता…'

राज ठाकरे- उद्धव ठाकरे युती होणार? संजय राऊतांच्या विधानाने उत्सुकता वाढली, 'सकारात्मकता…'


राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एका पॉडकास्टमधून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचं आवाहन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही जाहीर कार्यक्रमातून सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर राज्याच्या राजकारणात मनोमिलनाच्या चर्चांना वेग आला. परदेशातून आल्यानंतर राज ठाकरे यावर बोलतील असं मनेसकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळं राज ठाकरे परतल्यामुळे आता हालचालींना वेग आल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक असल्याचं सांगून संजय राऊतांनी उत्सुकता वाढवली आहे.

राज्याच्या राजकीय वर्तुळात यावरून प्रतिक्रिया उमटल्यात. शरद पवारांनीही राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याबाबत भाष्य केलं आहे. 

लोकसभा आणि विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास बीएमसी निवडणुकीत चित्र वेगळं दिसू शकतं, असंही बोललं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनीही या युतीच्या चर्चावर प्रतिक्रिया दिली आहे. 

दरम्यान, हुतात्मा चौकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट झाली. सुप्रिया सुळे हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट झाली. राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यात दोन ते तीन मिनिटं संवाद झाला.

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी नाही. मात्र यावेळी चर्चेचा सूर कधी नव्हे इतका सकारात्मक दिसतोय. दोन्ही बाजूनं युतीसाठी पावलं टाकली जात आहेत. त्यामुळे ही केवळ चर्चाच न राहता युतीबाबत ठोस पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे.





Source link

महाराष्ट्रातलं एकमेव गुलाबी गाव; 100% सौर ऊर्जेवर चालणाऱ्या गावाची जगाच्या नकाशात नोंद

महाराष्ट्रातलं एकमेव गुलाबी गाव; 100% सौर ऊर्जेवर चालणाऱ्या गावाची जगाच्या नकाशात नोंद


1 मे आज जगभरात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. 6 विभाग 36 जिल्ह्यांमध्ये विभागला गेलेला महाराष्ट्र वेगवेगळ्या गोष्टींनी संपन्न आहे. आजही महाराष्ट्रातील कानाकोपरा विविधतेने नटलेला आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त असं गाव पाहणार आहोत, ज्याने आपली ओळख ‘गुलाबी’ गाव म्हणून निर्माण केली आहे. एवढंच नव्हे तर या कमी लोकसंख्या असलेल्या गावाने अनोखा विक्रम जगाच्या नकाशात नोंदवला आहे. 

हे गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेले शेळकेवाडी.  एकेकाळी सत्तेच्या नजरेतून दुर्लक्षित राहिलेले, पंचायतीला विकास निधी म्हणून २-३ लाख रुपये मिळत होते. अशावेळी गावकऱ्यांनी गावाचे कायापालट करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. अन् गेल्या २० वर्षांत ‘आदर्श गाव’ म्हणून पुन्हा स्वतःची ओळख निर्माण केली. 

फक्त १०२ घरे आणि १००० लोकसंख्या असलेले शेळकेवाडी आता देशाच्या नकाशावर पहिले १००% सौरऊर्जेवर चालणारे गाव म्हणून ठसा उमटवत आहे. सौरऊर्जेवर चालणारे स्वतःचे बायोगॅस प्रकल्प असलेले पहिले गाव होण्याचा मानही या गावाला मिळाला आहे. याशिवाय आता राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या या गावाने मिळवलेली बक्षीस रक्कम सध्या उघड्यावर शौचमुक्ती मोहीम राबविण्यासाठी वापरली जात आहे. आणि या गावाबद्दल सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे येथील ‘गुलाबी घरं’.

“गुलाबी घरे आपल्या एकतेचे प्रतीक आहेत. आम्ही सर्वांनी एकमताने एका रंगाच्या पॅटर्नचे पालन करण्याचा निर्णय घेतला जो आम्हाला गावाच्या हितासाठी लढण्याचा संकल्प करण्यास मदत करेल,” असे रहिवासी म्हणाले.

गावकऱ्यांनी सौरऊर्जेद्वारे गावात वीजपुरवठा करण्यासाठी एकत्र आल्यावर, त्यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत औपचारिकता सुरू केली. या योजनेअंतर्गत, घरगुती सौरऊर्जा यंत्रणेला अनुदान दिले जाते. ग्रामपंचायतीने 100 घरांमध्ये 1 किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प आणि दोन मोठ्या घरांमध्ये 2 किलोवॅट प्रणाली बसवल्या, ज्यामुळे ते कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे पहिले गाव बनले.

स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत शेळकेवाडीला एक आदर्श गाव असल्याचा अभिमान आहे. प्रत्येक घर बायोगॅसशी जोडलेल्या शौचालयांनी जोडले गेले आहे, जिथे सर्व ओला कचरा बायोगॅसमध्ये प्रक्रिया केला जातो. बायोगॅसच्या या निर्मितीमुळे एलपीजी सिलिंडरवरील अवलंबित्व कमी झाले आहे. गावातील सुका आणि प्लास्टिक कचरा अवनी संस्थेद्वारे व्यवस्थापित केला जातो, तर सांडपाणी मोठ्या सेप्टिक टँकमध्ये पाठवले जाते.

“गावात आदर्श गाव म्हणवण्यासारखे सर्वकाही आहे. सर्वत्र स्वच्छतेचे निकष पाळले जातात. गटारे बंद आहेत, रस्ते स्वच्छ आहेत आणि योग्य कचरा व्यवस्थापनामुळे वातावरणही खूप चांगले झाले आहे,” असे ग्रामविकास अधिकारी सुरेखा आवाड म्हणाल्या. लोकसहभाग हा त्यांच्या यशाचा मंत्र असल्याने, गावाने पाणी वितरणासाठी स्वतःचा धरण बांधले आहे.

या परिवर्तनामुळे गावात खूप आनंद झाला आहे कारण कोणालाही वीज बिल भरावे लागत नाही. “आम्ही पंखे, मिक्सर आणि वॉशिंग मशीन वापरतो – आणि तरीही आम्हाला कोणतेही बिल भरावे लागत नाही,” असे एका रहिवाशाने सांगितले.

संत गाडगे बाबांच्या ग्राम स्वच्छता मोहिमेअंतर्गत राज्यस्तरीय सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी गावातील रहिवाशांसाठी डिजिटल प्रशासन, आरोग्य जागरूकता, शिक्षण हे प्राधान्य आहे.

“आम्हाला पूर्वी मागासलेले किंवा दुर्लक्षित गाव म्हणून पाहिले जात असे. परंतु ग्रामस्थांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि सरकारी योजनांचा योग्य वापर यामुळे परिस्थिती बदलण्यास मदत झाली आहे. आता आम्ही स्वच्छता आणि शाश्वततेसाठी राज्य क्रमवारीत जिंकण्याकडे पाहत आहोत,” असे गावकरी सांगतात.





Source link

Maharashtra Day : महाराष्ट्राचा अर्थ महान राष्ट्र नव्हे तर….

Maharashtra Day : महाराष्ट्राचा अर्थ महान राष्ट्र नव्हे तर….


65 वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. 1960 मध्ये महाराष्ट्रासह गुजरात राज्य स्थापन करण्यात आला. 106 हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला प्राणांची आहुती दिली. अशा पद्धतीने महाराष्ट्र हे राज्य स्थापन झालं. आज महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण अभिमान बाळगतो पण महाराष्ट्र हे नाव कसं देण्यात आलं. 

कुठून आलं महाराष्ट्र हे नाव? 

महाराष्ट्र राज्याची महाराष्ट्रीय प्राकृती भाषा होती. महाराष्ट्री अथवा महाराष्ट्री प्राकृत ही प्राचीन व मध्ययुगीन भारतातील एक प्राकृत भाषा होती. मराठी, कोकणी या आधुनिक भाषा महाराष्ट्रीपासून उद्भवल्या आहेत. ही भाषा उत्तरेतील माळवा प्रदेशापासून दक्षिणेतील कृष्णा, तुंगभद्रेपर्यंतच्या परिसरात बोलली जात असे. अनेक प्राचीन नाटकांतील पात्रांच्या तोंडी या भाषेचा वापर होत असे. सातवाहन सम्राट हाल याने गाहासत्तसई नामक काव्यसंग्रह महाराष्ट्रीत रचला.

(हे पण वाचा – शालिवानपासून चालत आलेल्या महाराष्ट्राचा भारावणारा प्रवास 8 मुद्यांमध्ये) 

या भाषेवरुन महाराष्ट्र हे नाव राज्याला देण्यात आलं आहे. तसेच रट्टे नावाचे लोक महाराष्ट्रात होते. त्या रटट्यांचा प्रदेश म्हणजे ‘महाराष्ट्र’ असा देखील उल्लेख इतिहासात सापडतो.  

(हे पण वाचा – Maharashtra Din Wishes in Marathi: सह्याद्रीचा सिंह गर्जतो… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा) 

महाराष्ट्र नावाचा अर्थ काय? 

महाराष्ट्राला ‘महाराष्ट्र’ हे नाव कसे पडले, याबाबत अनेक मतं आहेत. काही जण म्हणतात की, महाराष्ट्रातील ‘महारठ्ठ’ किंवा ‘मराठा’ या क्षत्रिय वंशावरून हे नाव आले आहे. ‘महारठ्ठ’ म्हणजे ‘महाराज’ किंवा ‘महान राष्ट्र’ असा अर्थ होतो. काही इतिहासकार आणि भाषाशास्त्रज्ञ ‘राष्ट्र’ या शब्दाचा संबंध ‘महान’ किंवा ‘मोठा’ या अर्थाशी जोडतात, तर काही जण ‘महाकांतार’ या शब्दाचा अपभ्रंश म्हणून ‘महाराष्ट्र’ नावाची व्याख्या करतात. 





Source link

1 मे रोजी बँका बंद असतील की सुरू, शेअर बाजार बंद असणार का? जाणून घ्या

1 मे रोजी बँका बंद असतील की सुरू, शेअर बाजार बंद असणार का? जाणून घ्या


Bank Holiday on May 1: 1 मेच्या दिवशी तुम्ही बँकेचे कोणते काम करण्यासाठी जात असाल तर आत्ताच ही बातमी वाचा. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी बँक बंद राहणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा केला जातो. या दिवशी राज्यभरातील बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकानुसार 1 मे रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

RBIच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, मेमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद असणार आहेत. यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि 4 रविवार यांचाही समावेश आहे. RBIच्या अधिकृत वेबसाइटनुसार, सुट्टीच्या यादीत वेगवेगळ्या राज्यांनुसार सुट्ट्या जाहीर करण्यात येतात. 

महाराष्ट्राव्यतिरिक्त या राज्यातही बँका बंद

1 मे रोजी कामगार दिन असल्यामुळं महाराष्ट्राव्यतिरिक्त इतरही राज्यात बँका बंद असणार आहेत. बेलापूर, बंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, कोची, कोलकाता, पणजी, पटना आणि थिरुअनंतापुरम या राज्यातही बँका बंद असतील. 

1 मेला शेअर बाजारही बंद 

1 मे रोजी BSE आणि NSE देखील बंद असणार आहेत. या दिवशी शेअर बाजाराचे कोणतेही काम होणार नाही. शेअर बाजार बंद असणार आहे.  

30 मे रोजीही बँका बंद

30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बेंगळुरूत बँका बंद असणार होत्या. अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळं या दिवशी सराफा दुकानात मोठी गर्दी होते. 





Source link

IRCTC ची 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' हेरिटेज टूर; 5 दिवसांचा दौरा अन् किंमत… 'या' दिवशी सुरू होणार

IRCTC ची 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' हेरिटेज टूर; 5 दिवसांचा दौरा अन् किंमत… 'या' दिवशी सुरू होणार


Chhatrapati Shivaji Maharaj Circuit Tour: लवकरच महाराष्ट्रात ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ ही रेल्वे टूर सुरू करण्यात येत आहे. आयआरटीसीकडून भारत गौरव ट्रेनअंतर्गंत ही टूर सुरू होणार आहे. या टूरच्या माध्यमातून तुम्ही महाराजांचे गडकिल्ले, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देऊ शकणार आहेत. आयआरसीटीसीने पाच दिवसांच्या टूरची घोषणा केली आहे. 9 जून 2025 पासून ही टूर भारत गौरव पर्यटक ट्रेनअंतर्गंत आयोजित करण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत प्रमुख ऐतिहासिक आणि अध्यात्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. या टूरची किंमत किती आणि कोणती स्थळे पाहता येणार याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

 ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ ही टूर मुंबईतील सीएसएमटी येथून सुरू होईल आणि तिथूनच या टूरची सांगता होणार आहे. मात्र प्रवासी दादर, ठाणे येथेही बोर्डिंग करु शकणार आहात. आयआरटीसीकडून या टूरची सविस्तर माहिती समोर आली आहे.

या स्थळांना भेट देऊ शकणार

रायगड किल्लाः स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक स्थळ

पुण्यातील लाल महाल आणि कसबा गणपतीः छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण या किल्ल्यात गेले. तर, कसबा गणपती हे पुण्याचे प्रमुख देवता ग्रामदेवता आहे.

शिवनेरी किल्लाः शिवनेरी येथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला

प्रतापगड किल्लाः सातारा जिल्ह्यात हा किल्ला असून येथेच शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला

पन्हाळा किल्लाः हा किल्ला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे. 

कोल्हापूरातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर आणि महालक्ष्मी मंदिराचादेखील या टूर पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

ही संपूर्ण यात्रा पाच दिवसांची असून सहाव्या दिवशी सकाळी मुंबईत पोहोचणार आहेत. तर, प्रमुख स्थळांमध्ये मुंबई, रायगड, पुणे, शिवनेरी, भीमाशंकर, प्रतापगड, कोल्हापुर, पन्हाळा या शहरांचा समावेश आहे. 

या टूरमध्ये तीर्थक्षेत्रांचाही समावेश

भीमाशंकर येथे भगवान शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. 

कोल्हापूरः महालक्ष्मी मंदिराला पौराणिक महत्त्व असून स्थानिक अंबाबाईच्या रुपात पुजतात. 

टूरची किंमत किती?

ही टूर तीन श्रेणींमध्ये असणार आहे. 

इकोनॉमी (स्लीपर क्लास): 13,155 रुपये 
कम्फर्ट (3AC): 19,840 रुपये
सुपीरियर (2AC): 27,365 रुपये

पॅकेजच्या आधारेच AC/Non Ac हॉटेलमध्ये नागरिकांची सोय करण्यात येणार आहे. ऑनबॉर्ड आणि ऑफबोर्ड असताना शाकाहरी जेवण देण्यात येणार आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp