'आमच्या फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत,' नितेश राणेंच्या टीकेला योगेश कदमांचं प्रत्युत्तर, 'मला शहाणपणा…'

'आमच्या फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत,' नितेश राणेंच्या टीकेला योगेश कदमांचं प्रत्युत्तर, 'मला शहाणपणा…'



कोकणातील दोन मंत्री नितेश राणे आणि योगेश कदम आपापसात भिडले आहेत. महायुतीमधील दोन मंत्र्यांची भांडणं समोर आल्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीतच मिळालं आहे. 
 



Source link

'ती येत नाही तोपर्यंत…', इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवून तरुणाने उचललं भयंकर पाऊल, कॉलेजच्या आवारातच….

'ती येत नाही तोपर्यंत…', इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवून तरुणाने उचललं भयंकर पाऊल, कॉलेजच्या आवारातच….


वाल्मिक जोशी, झी मीडिया

Jalgaon Crime News: जळगावात एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. प्रेमभंग झाल्याच्या कारणातून विद्यार्थ्याने कॉलेजच्या आवारातच गळफास घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थी सकाळी कॉलेजमध्ये आल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक स्टेटसदेखील या तरुणाने पोस्ट केले होते. जळगाव येथे ही भयंकर घटना घडली आहे. सत्तू कोळी असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

प्रेमभंगाच्या दुःखातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने थेट जळगावच्या सुट्टीच्या दिवशी महाविद्यालयाच्या आवारातील झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सत्तू कोळी असे या मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो शहरातील एका दुसऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेत होता. आत्महत्या करण्यापूर्वी सत्तू कोळी याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक स्टेटस देखील पोस्ट केले होते.

इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याने स्टेटसदेखील ठेवले होते. जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत मला खाली उतरवू नका आणि माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका, असा व्हिडिओ केला होता. त्यानंतर त्याने महाविद्यालयाच्या आवारातील एका झाडाला गळफास लावून आयुष्य संपवले. सकाळी कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात ही बाब येताच तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

जळगावात बापाकडून मुलीची हत्या

जन्मदात्या बापानेच मुलीवर आणि जावयावर गोळीबार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मुलीने प्रेम विवाह केल्याचा राग आरोपी बापाच्या मनात होता. त्याच रागातून मुलीच्या बापाने तिच्यासह जावयावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला असून तिचा पती पाठीत गोळी घुसल्याने गंभीर जखमी झाला आहे, त्याला जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तृप्ती अविनाश वाघ असे मयत 24 वर्षीय तरुणीचे नाव असून अविनाश ईश्वर वाघ हा गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. किरण अर्जुन मंगले असे गोळीबार करणाऱ्या पित्याचे नाव असून ते सीआरपीएफचे सेवानिवृत्त अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे.





Source link

UPSC, MPSC करण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो मुलं पुण्यातील या एकाच ठिकाणी का येतात? ठिकाणाचं नाव आणि कारण जाणून शॉक व्हाल

UPSC, MPSC करण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो मुलं पुण्यातील या एकाच ठिकाणी का येतात? ठिकाणाचं नाव आणि कारण जाणून शॉक व्हाल


Pune Sadashiv Peth UPSC MPSC Classes : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यंदाच्या परीक्षेत 577 मुलं आणि 182 मुलींसह एकंदर 759 जणांची आयएएएस, आयपीएस, आयएफएस सह इतर सेवांसाठी निवड करण्यात आली आहे.  या परिक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी देखील चांगले यश मिळवले आहे. अशातच चर्चेत आले आहे ते पुण्यातील एक ठिकाण जिथं महाराष्ट्रातील लाखो मुलं UPSC, MPSC  करण्यासाठी येतात. /e ठिकाणाचं नाव आणि येथे येण्याचे कारण जाणून शॉक व्हाल. 

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुण्यात अनेक नामांकित विद्यापीठ आणि महाविद्यालये आहेत. त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी देखील अभ्यासासाठी पुण्यातच येतात. UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात सोईचे ठिकाण म्हणजे सदाशिव पेठ. पुण्याच्या सदाशिव पेठेतून फेरफटका मारताना जुने वाडे, जुन्या इमारती यांच्यासह लक्ष वेधून घेतात ते स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणाऱ्या संस्थांचे बोर्ड आणि अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचे घोळके.

पुणे हे कायम शिक्षणाचं मुख्य केंद्र अआहे. मेडिकल, इंजिनियरींग प्रमाणेच आता पुणे  UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील आकर्षित करत आहेत.  पुण्याची सदाशिव पेठ हे UPSC, MPSC परिक्षेचे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमुख केंद्र आहे. 

बीड, लातुर, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर, अमरावतीसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो विद्यार्थी UPSC, MPSC परिक्षेची तयारी करण्यासाठी सदाशिव पेठेत येतात. UPSC, MPSC ची शिकवणारी घेणाऱ्या अनेक नामांकित संस्था सादशिव पेठेत आहेत. सदाशिव पेठेत फिरताना असा प्रकारचे क्लासेस मोठ्या संख्येने पहायला मिळतात. 

यामुळेच सदाशिव पेठेत मोठी आर्थिक उलाढाल देखील होते. लाखो विद्यार्थी विविध क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. क्लासेस चालक विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी घेतात. लाखो विद्यार्थी UPSC, MPSC परीक्षेची तयारी करत असले तरी यातील फक्त हजारच्या आसपासच विद्यार्थी अधिकारी बनतात. 

सदाशिव पेठेत UPSC, MPSC चा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे अनेकांना रोजगार मिळतो. मुलांची राहण्याची व्यवस्था, मेस असे अनेक व्यवसाय येथे चालतात. फक्त  UPSC, MPSC चे क्लासेस घेणाऱ्या संस्थाच लाखो रुपयांची कमाई करत नाहीत तर यांच्यासह मुलांना रहाण्यासाठी PG चालवणारे, खानावळ इतकचं नाही तर सकाळी मुलांना चहा आणि नाश्ता विकणारे देखील बक्कळ कमाई करतात. एकूणच काय तर UPSC, MPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी येणाऱ्या लाखो मुलांमुळे सादशिव पेठेत कोट्यावधीची उलाढाल होते.   

 





Source link

पुण्यात 40000 कोटींचा नवा सुपरफास्ट हायवे; 2 हवाई पट्ट्या, 55 उड्डाणपूल 22 इंटरचेंज आणि…

पुण्यात 40000 कोटींचा नवा सुपरफास्ट हायवे; 2 हवाई पट्ट्या, 55 उड्डाणपूल 22 इंटरचेंज आणि…


Pune-Bengaluru Expressway:   मुंबईतून आता फक्त 6 तासांत आता बंगळुरु पोहचता येणार आहे. मुंबई आणि बंगळुरु दरम्यान ग्रीन एक्स्प्रेस हायवे उभारण्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. याच पुणे बंगळुरु द्रुतगती महामार्गाचे (Pune-Bengaluru Expressway) काम अती जलद गतीने सुरु आहे.  

भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे ते बंगळुरू दरम्यान सुमारे 700 किमी लांबीचा ग्रीन एक्स्प्रेस हायवे उभारला जात आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याच्या रिंग रोडपासून एक वळण लागेल आणि तिथून हा हायवे सुरु होणार आहे. आयटी हब असलेल्या पुणे आणि बंगळुरु  या दोन शहरांमधील संपर्क वाढवण्याच्या उद्देशाने बेंगळुरू-पुणे द्रुतगती महामार्ग  बांधला जात आहे.  या सुपफास्ट हायवेच्या निर्मितीमुळे दोन्ही शहरांमधील अंतर सुमारे 95 किमीने कमी होणार आहे. 

सध्या मुंबईतुन बंगळुरुला जाण्यासाठी 18 ते 19 तास लागतात. तर,  पुणे ते बंगळुरु हा प्रवास 15 – 16 तासांचा आहे. नवा द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यास पुणे-बंगळुरु प्रवास फक्त 5 ते 4 तासांत होणार आहे. हा महामार्ग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. यामुळे मुंबईहून बंगळुरुला फक्त 6 तासांत पोहचता येणार आहे. 

नवा द्रुतगती महामार्ग अ‍ॅक्सेस-कंट्रोल ग्रीनफिल्ड स्वरुपाचा असणार आहे. या द्रुतगती मार्गावर 2 आपत्कालीन हवाई पट्टी, 55 उड्डाणपूल  22 इंटरचेंज असणार आहेत. यावर फक्त हायस्पीड वाहनांना परवानगी असेल. या एक्स्प्रेस वेवर वाहन ताशी 120 किमी वेगाने वाहने धावणार आहेत.

बंगळुरू-पुणे द्रुतगती महामार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकूण 12 जिल्ह्यातून जाणार आहे. महाराष्ट्रातील 3 आणि कर्नाटकातील 9 जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. महाराष्ट्रात हा मार्ग पुणे रिंगरोडवरील कांजळे येथून सुरू होऊन पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातून जाणार आहे. कर्नाटकात, बेळगाव, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर आणि बंगलोर ग्रामीण या जिल्ह्यांतून हा महामार्ग बंगळुरु शहरात संपणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) देखरेखीखाली हा द्रुतगती मार्ग बांधला जाणार आहे. हा महामार्ग 8 लेनचा असणार आहे.





Source link

महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानींची आकडेवारी समोर; मुंबई, पुणे आणि ठाण्यातील संख्या आश्चर्यजनक!

महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानींची आकडेवारी समोर; मुंबई, पुणे आणि ठाण्यातील संख्या आश्चर्यजनक!


Pakistanis living in Maharashtra: जम्मू काश्मीरमधील पेहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 27 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा हात असल्याचे सांगण्यात येतंय. यानंतर भारत सरकारने पाकिस्तानसोबतच्या करारात अनेक निर्बंध आणले. यानंतर पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली. भारतात राहणाऱ्या पाकिस्तानींना देश सोडण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच त्यांना 48 तासांचा अल्टीमेटमही देण्यात आला. 

महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर आली आहे.  अल्पकालीन व्हिजा म्हणजेच शॉर्ट टर्म व्हिसा असलेले एकूण 55 पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहत असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीय. भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते. 

दरम्यान महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार ठाणे शहरात 19, नागपूरमध्ये 18, जळगांवमध्ये 12, पुणे शहरात 3, मुंबईत 1, नवी मुंबईत 1 आणि रायगडमध्ये 1 पाकिस्तानी नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर असल्याचे समोर आलंय. 

भारतात पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यातून समोर आला, पाकिस्तानातून भारतात आलेल्या सार्क व्हिजा, टुरिस्ट व्हिजा घेऊन आलेल्या नागरिकांनी तत्काळ भारत सोडण्याचा आवाहन देखील मोदी यांनी केलं आहे . या प्रकारानंतर जिल्हा पोलीस दल सक्रीय झालं असून जळगावमध्ये पाकिस्तानी नागरिकांची पडताळणी तसेच चौकशी सुरू करण्यात आली आहे. 327 पाकिस्तानी नागरिक जळगावमध्ये टुरिस्ट व्हिजा घेऊन राहत असल्याची बाब समोर आली आहे, या संदर्भात शासनाचे कारवाई संदर्भातले जे आदेश येतील त्यानुसार संबंधितांवर कार्यवाही केली जाईल अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी ही माहिती दिली. 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते गजानन मालपुरे यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी जळगावत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानातील नागरिकांबद्दल उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार जळगाव शहरात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी सिंधी बांधव राहत असल्याचा समोर आलं होतं. संबंधितांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारलं, मात्र नागरिकत्व स्वीकारल्यानंतरच्या शासनाच्या सरकारच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तींचा संबंधित व्यक्तींकडून पालन होत नसल्याने धोका निर्माण होऊ शकतो असं गजानन मालपुरे यांनी म्हटलं आहे. राजकीय दबाव असल्यामुळे संबंधितांकडे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील गजानन मालपुरे यांनी केला आहे. दरम्यान, संबंधित नियम अटींचं पालन करत नसल्यामुळे भविष्यात अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील गजानन मालपुरे यांनी उपस्थित केला आहे.





Source link

आंबाप्रेमींनो सावधान! तुम्हाला विकला जातोय सडक्या आंब्यांचा आमरस; परिस्थिती ऐकून बसेल धक्का

आंबाप्रेमींनो सावधान! तुम्हाला विकला जातोय सडक्या आंब्यांचा आमरस; परिस्थिती ऐकून बसेल धक्का


Ripe Mango Juice: उन्हाळा सुरु असून आंब्याचा सिझनदेखील सुरु झालाय. आमरस प्रेमींना सावध करणारी एक बातमी समोर आली आहे. तुमच्या वाटीत येणारा आमरस खरंच अस्सल ताज्या आंब्यांपासून बनलेला असेल याची काही खात्री नाही. पिवळाजर्द दिसणारा आमरस कदाचित सडक्या आंब्यांपासूनही बनवलेला असू शकतो. यामागे कारणही तसंच आहे. कारण नवी मुंबईत अशा एका गलिच्छ आमरस कारखान्याचा पर्दाफाश झालाय.

उन्हाळ्यात आमरस म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. शहरात अनेकजण अगदी कितीही पैसे मोजून आमरस विकत आणतात आणि तो खातात. मात्र ही दृश्य बघितली तर पुन्हा तुम्ही बाजारातून आमरस विकत आणायचं धाडस करणार नाही. नवी मुंबईतील बोनकोडे गावात आमरस बनविणाऱ्या एका कारखान्यावर मनसेनं धाड टाकली. तेव्हा अतिशय धक्कादायक दृश्य समोर आलं. एका चाळीतल्या खोलीत अतिशय गलिच्छ जागेवर सडलेल्या आंब्यांच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या. याच सडक्या आंब्यांपासून आमरस बनवला जायचा. या आमरसचं श्रीजी या नावानं ब्रॅण्डिंग करुन नवी मुंबई आणि आसपासच्या शहरात विकलं जात होतं. 

या सडलेल्या खराब झालेल्या आंब्यांसपासून रोज तब्बल 6 हजार लिटर आमरस बनवला जातो. धक्कादायक म्हणजे या आमरस बनविणाऱ्या कारखान्याकडे ना फूड लायसन्स ना गुमास्ता लायसन्स.. मात्र बिनबोभाट नागरिकांच्या आयुष्याशी खेळ सुरू होता. 

मनसेनं या घाणेरड्या आमरस कारखान्याचा भांडाफोड केला. त्याची माहिती नवी मुंबई महापालिका प्रशासनाला दिली मात्र मनपा अधिकारी कारवाईला टाळाटाळ करत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. त्यामुळं या अधिकाऱ्यांना कारवाई टाळण्यासाठी कोणती मलाई खाऊ घालण्यात आलीय. असा सवाल उपस्थित होतोय. 

आजकाल कोणताही अन्नपदार्थ शुद्ध, चांगल्या प्रतिचा मिळेल याची कोणतीच खात्री नाही. चार पैसे कमावण्यासाठी असं घाणेरडं आमरस बनवून ते शेकडो घरात ताजं, रसायन आणि प्रिझर्वेटिव्ह विरहीत म्हणून विकलं जातंय. किमान आतातरी अशा नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कारखाने आणि कंपन्यांवर तात्काळ कठोर केली जाणार असा सवाल आता नागरिकच विचारताहेत.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp