वाईमध्ये पाकिस्तानी झेंड्यामुळे तणाव, स्थानिक तरुण अटकेत; नेमकं घडलं काय जाणून घ्या

वाईमध्ये पाकिस्तानी झेंड्यामुळे तणाव, स्थानिक तरुण अटकेत; नेमकं घडलं काय जाणून घ्या


Wai Tention Over Pahalgam Attack: देशरामध्ये काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला जात आहे. या हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यात सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची दाट शक्यता असून भारताने तातडीने निर्णय घेत पाकिस्तानसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सरकारी स्तरावर या प्रकरणावरुन घडामोडींना वेग आलेला असतानाच दुसरीकडे मयत पर्यटकांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून भारतीयांचे डोळेही पाणावले आहेत.

पहलगाममधील हल्ल्यातील मयत पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील डोंबिवलीमधील 3, पुण्यातील 2 आणि पनवेलमधील एका पर्यटकाचा समावेश आहे. सध्या काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मागील दोन दिवसांमध्ये विशेष विमानाने काश्मीरमध्ये अडकलेले 500 हून अधिक पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत. असं असतानाच दुसरीकडे साताऱ्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून थेट पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली आहे. 

नेमकं घडलं काय?

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील वाईमध्ये राहणाऱ्या शुभम कांबळे नावाच्या युवकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील स्टेटसला थेट पाकिस्तानचा झेंडा ठेवला. इतकंच नाही, तर भारत देशाबद्दल शुभमने स्टेटला आक्षेपार्ह मजकूरही पोस्ट केल्याचं दिसून आलं. या प्रकारामुळे शुभम राहत असलेल्या गावात आणि परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

मित्रानेच दाखल केली तक्रार

सदर प्रकाराची माहिती आरोपी शुभमच्या मित्रालाच मिळाली आणि त्यानेच वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शुभमला ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. शुभमने नेमकं असं का केलं? यामागील त्याचा उद्देश काय आहे याबद्दलची चौकशी आता पोलिसांकडून केली जाणार आहे.

साताऱ्यातील मुस्लीमांनी जाळला पाकिस्तानी झेंडा

साताऱ्यात मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी पहलगाम येथील घटनेचा निषेध करत पाकिस्तानचा ध्वज जाळला. साताऱ्यातील पोवई नाक्यावर पाकिस्तानचा विरोधात घोषणाबाजी करत पाकिस्तानचा ध्वज फाडून जाळण्यात आला. निरपराध नागरिकांना मारणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई करावी अशी मागणी, सकल मराठा मुस्लिम समाज संघटनेच्या अरबाज शेख यांनी केली आहे.

 

 





Source link

पर्यटकांच्या मदतीसाठी महायुती सरकारमध्ये चढाओढ? शिंदे-महाजनांचं वेगवेगळं बचावकार्य!

पर्यटकांच्या मदतीसाठी महायुती सरकारमध्ये चढाओढ? शिंदे-महाजनांचं वेगवेगळं बचावकार्य!


Pahalgam Terrorist Attack: काश्मीरमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना आणण्यावरुन महायुती सरकारमध्येच चढाओढ सुरु असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मदत व पुनर्वसनमंत्री गिरीश महाजन श्रीनगरमध्ये जाण्याअगोदरच एकनाथ शिंदेंनी श्रीनगरमधून बचावकार्य सुरु केलंय. शिंदे समांतर सरकार चालवत असल्याचा आरोप शिवसेना UBTनं केलाय. तर विरोधकांच्या या टीकेचा सरकारनं समाचार घेतलाय.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळं पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेले हजारो पर्यटक तिथंच अडकून पडलेत. या सगळ्या मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकारी पातळीवर तातडीनं हालचाली सुरु झाल्यात. उपमुख्य़मंत्री एकनाथ शिंदे विशेष विमानानं श्रीनगरमध्ये गेले. त्यापूर्वीच श्रीकांत शिंदेंचे काही कार्यकर्ते श्रीनगरमध्ये मराठी माणसांच्या मदतीसाठी लागले होते.

दुसरीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना श्रीनगरमध्ये पाठवलंय. त्यांनीही मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात धाडण्यासाठी व्यवस्था केलीये. शेवटचा मराठी माणूस महाराष्ट्रात जाईपर्यंत श्रीनगरमध्ये थांबण्याचा त्यांनी निर्धार केलाय. एकाच महायुती सरकारचं एकत्र बचावकार्य अपेक्षित होतं. पण शिवसेना आणि भाजपचं वेगवेगळं बचावकार्य सुरु असल्याचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संजय राऊत यांनी उपस्थित केला.

संजय राऊतांनी केलेल्या टीकेला पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. विरोधक मराठी माणसाच्या मदतीतही राजकारण करत असल्याचा पलटवार गुलाबराव पाटलांनी केलाय. महायुती सरकार एकदिलानं एकजुटीनं मदतकार्य करत असल्याचं खासदार नरेश म्हस्केंनी सांगितलंय.

मदतीच्या कामात कुणी राजकारण करु नये असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिलाय. सत्ताधा-यांच्या उणिवा काढणं हे विरोधकांचं कामच आहे. मराठी पर्यटकांच्या बचावकार्यातही महायुतीत नसलेली एकी विरोधकांना ठळकपणं जाणवली.. तोच मुद्दा विरोधकांनी उपस्थित केलाय.

मदतीवरुन शिवसेना विरुद्ध शिवसेना 
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी शिवसेनेनं श्रीनगरमध्ये मदतकार्य़ सुरु केलंय. या मदतकार्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही नेता दिसत नसल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केलाय. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा एकही नेता मुंबई विमानतळावरही दिसला नसल्याचा आरोप पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटलांनी लगावलाय.एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा खरपूस भाषेत समाचार घेतलाय. मराठी माणसांना मदत न करता घरात बसून बोलणं सोप्पं असल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय.शिवसेनेनं मराठी माणसांना श्रीनगरमधून आणण्यासाठी विमानं पाठवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं चार सीटर गाडी तरी पाठवली का असा सवालही शिवसेनेंनं विचारलाय.शिवसेना फुटल्यापासून दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. श्रीनगरमधील मदतीच्या मुद्यावरही ठाकरेंच्या शिवसेनेनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला डिवचण्याची संधी सोडली नाही. पण या टीकेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरच बुमरँग झालंय.





Source link

आता स्वित्झर्लंड, युरोपप्रमाणेच मुंबईतही….; 1 मेपासून नागरिकांना मिळणार ही सुविधा

आता स्वित्झर्लंड, युरोपप्रमाणेच मुंबईतही….; 1 मेपासून नागरिकांना मिळणार ही सुविधा



Mumbai News Today: मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सुखाचा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 
 



Source link

कोकणात माकडे, वानरांकडून मोठा उपद्रव, वनमंत्री गणेश नाईक घेणार मोठा निर्णय!

कोकणात माकडे, वानरांकडून मोठा उपद्रव, वनमंत्री गणेश नाईक घेणार मोठा निर्णय!


Center for Sterilizing Monkeys: कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना होणारा वानर आणि माकडांचा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.  

 

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासासंदर्भात वनमंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी नाईक बोलत होत. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपसचिव विवेक होसिंग, कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) आर.एम. रामानुजम,  विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, दापोली ग्रामोद्योग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक विनायक महाजन, पत्रकार मिलिंद लिमये, वन्य जीव अभ्यासक संतोष महाजन आदी यावेळी उपस्थित होते. तर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिश्वास, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक नरेश झुरमुरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. दापोली तालुक्यात रानडुकर, माकड व वानरांमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असून आता माकडे व वानरे ही गावात येऊन घरातील वस्तूंचेही नुकसान करत असल्याचै महाजन यांनी सांगितले. 

 

कोकणात माकडे व वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वन्य प्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान झाल्यानंतर भरपाई देणे हा कायमस्वरुपी उपाय होऊ शकत नाही. हे नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी माकडे, वानरे यांचे निर्बीजीकरण करण्यासंदर्भात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्बीजीकरण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. वन्यप्राण्यांपासून फळबाग व शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नसल्याचे वनमंत्री नाईक यांनी यावेळी सांगितले. 

 

रानडुकरांमुळे फळबागा तसेच भातशेतीचे नुकसान होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून अनुमती देण्यात यावी. तसेच शेतात येणाऱ्या वन्य प्राण्यांपासून बचावासाठी यापूर्वी कोकणातील शेतकऱ्यांना शस्त्र परवाने देण्यात आले होते. मात्र, हे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अशा शेतकऱ्यांना शेतीच्या रक्षणासाठी नियमानुसार परवाने देण्याचे निर्देशही वन मंत्री नाईक यांनी यावेळी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी महाजन यांनी वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिक नुकसानीची भरपाई लवकर देण्यात यावी. तसेच साळिंद्र या प्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानाचाही समावेश यामध्ये करण्याची मागणी केली.





Source link

घराबाहेर पडताना काळजी घ्या! राज्यात उष्णतेचा प्रकोप, 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट येणार

घराबाहेर पडताना काळजी घ्या! राज्यात उष्णतेचा प्रकोप, 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट येणार


Maharashtra Weather Today: उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळत आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिली आहे. तर उर्वरित राज्यातही उन्हाची काहिली कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने मराठवाडा आणि कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे. आजचे हवामान कसे असेल जाणून घेऊया. 

बिहार आणि आजूबाजूच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून छत्तीसगड, पूर्व विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू ते मनारच्या अखातापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. त्यामुळं राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. उकाड्यातही वाढ झाली आहे. विदर्भात पारा तर 45 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळं दहा उष्ण शहरात विदर्भातील पाच शहरे आहेत. 

आज विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसंच, कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील सोलापूर मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम असणार आहे. 

उष्ण तापमान वाढीमुळे गव्हाचा दर्जा खालावला 

यंदा थंडी कमी होती त्यामुळे गव्हाची वाढ पूर्णपणे झाली नाही त्यामुळे  हलक्या प्रतीच्या गावांचे आवक जास्त होत आहे. त्यामुळे गव्हाला कीड लागण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वातावरणाचा फटका गव्हाला बसल्याने पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये गव्हाची आवक कमी झाली आहे. 15 एप्रिल नंतर गव्हाची आवक होती मात्र यंदा 15 मार्च नंतर गव्हाची आवक सुरू झाली. सध्या गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान येथूनच गहू येतोय.

महाराष्ट्रातील मंगळवारचे तापमान

विदर्भात सर्वाधिक तापमान पुन्हा चंद्रपूरमध्ये.

 चंद्रपूर –45.8
 ब्रह्मपुरी –45.2
नागपूर -44.2
अकोला— 44.8
अमरावती–44.4
 यवतमाळ -44.0
वर्धा –44.2
वाशिम-43.5
 गडचिरोली-44. 0
 बुलडाणा –40.4
 गोंदिया-42.7

मराठवाडा – तापमान 

छत्रपती संभाजीनगर – 40.9
धाराशिव  – 39 
जालना  – 42 
नांदेड – 42  
परभणी – 42.2
बीड – 41.7
लातूर –  39 
हिंगोली  – 43 

कोकण – तापमान 

मुंबई शहर जिल्हा – 33.4
मुंबई उपनगर जिल्हा- 33.6
ठाणे जिल्हा – 35 
पालघर जिल्हा-34 
रायगड जिल्हा-32 
रत्नागिरी जिल्हा- 33.8
सिंधुदुर्ग जिल्हा-  32

उत्तर महाराष्ट्रातील – तापमान 

नाशिक – 38.4
नंदुरबार: 40 
धुळे: 41 
जळगाव- 42

पश्चिम महाराष्ट्र- तापमान 

सांगली, 37.7
सातारा, – 39.3
कोल्हापूर,35.8
अहमदनगर , 38 
पुणे,38 
सोलापूर – 43





Source link

हिंदी भाषा सक्तीनंतर आता राज्य सरकारचा मोठा निर्णय, शिक्षणमंत्र्यांनी केलं जाहीर; यापुढे शाळेत….

हिंदी भाषा सक्तीनंतर आता राज्य सरकारचा मोठा निर्णय, शिक्षणमंत्र्यांनी केलं जाहीर; यापुढे शाळेत….


महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांनी या निर्णयावर नाराजी जाहीर केली असून, सरकारला लक्ष्य केलं आहे. दरम्यान अखेर राज्य सरकारने या निर्णयावर एक पाऊल मागे घेतलं आहे. हिंदी शिकणं अनिवार्य नसून, ऐच्छिक ठेवणार असल्याचा खुलासा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय लवकरच जारी करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. 

हिंदीच्या सक्तीवर ते म्हणाले की, “हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये केंद्राकडून काही थोपवलं जात असल्याची जी चर्चा सुरु आहे तसं काही नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषेच्या संदर्भातला जे काय आहे त्यात तीन भाषेचे सूत्रीकरण केले आहे. तुमच्यावर थोपविले जात आहे असे कुठेही लिहिले नाही”. 9 सप्टेंबर 2024 ला सुकाणू  समितीच्या बैठकीमध्ये तृतीय भाषा हिंदी म्हणून समावेश करण्याचा निर्णय झाला अशी माहिती त्यांनी दिली. 

“मराठी भाषा अनिवार्य आणि अंमलबजावणी कशी केली जाईल हे आधीच सांगितलं आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या व्यतिरिक्त बंगाली, उर्दू, हिंदी, ज्या इतर शाळा आहेत त्या भाषेला प्राधान्य देतात.  मराठी बंधनकारक आहे आणि तिसरी इंग्रजी नाहीतर अन्य निवडतात. अशाप्रकारे तीन भाषांचं शिक्षण दिलं जातं. आपण इंग्रजी स्विकारलं आहे पण हिंदी का? याचे उत्तर देतो. आपल्या मुलांना सोप्या पद्धतीने शिकायला होईल देवनागरी लिपी समान आहे. शिक्षकांना हिंदी शिकवणं अवघड नाही,” असं ते म्हणाले 

” दोन क्रमांकाला इंग्रजी आपण स्वीकारलं आहे तर तिसऱ्या नंबरला हिंदी हे शासन भाषा म्हणून स्वीकारायला हरकत नाही. या हिंदीचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून, शिक्षकांना शिकवायला सोपं आहे. हिंदी अनेकदा कानावर येत असते त्यामुळे विद्यार्थ्यांना हिंदी शिकायला सोपं आहे. म्हणून हिंदीचा विचार करण्यात आला आहे,” अशी बाजू त्यांनी मांडली. 

“राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये हिंदीचा बहुभाषिक म्हणून पुरस्कार केला आहे. हिंदी अभिषेक केंद्र शासनाने बंधनकारक केलं नाही. आपल्या राज्याच्या सुकाणू समितीने पहिली मराठी, दुसरी इंग्रजी. तृतीय भाषा म्हणून हिंदी त्या ठिकाणी स्वीकारली आहे. याच गोष्टीच्या आधारावर शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. अनिवार्य या शब्दामुळे गोंधळ झाला आहे. काही वेगळ्या भाषा शिकण्यासंदर्भात पण मागणी आहे. हिंदी शिकणं ऐच्छिक ठेवणार आहोत. पहिली मराठी, दुसरी इंग्रजी आणि तिसरी हिंदी ऐच्छिक आहेत त्यांनाच शिकवली जाईल,” असं दादा भुसे यांनी स्पष्ट केलं. हिंदी बाबतचा पुढचा शासन निर्णय सुधारित लवकरच जारी केला जाईल असंही ते म्हणाले आहेत. इतर भाषेसंदर्भात त्या वर्गातून किती विद्यार्थ्यांची मागणी येते त्याचा अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले आहेत. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp