Weather Update: राज्यात थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, पारा 10 अंशावर घसरल्याने 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Weather Update: राज्यात थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, पारा 10 अंशावर घसरल्याने 'या' जिल्ह्यांना अलर्ट


Cold Wave in Maharashtra: राज्यात सध्या तापमानाचा पारा घसरला असून, संपूर्ण महाराष्ट्र थंडीने कुडकुडत आहे. राज्यात थंडीची लाट असून, अनेक शहरांचा पारा 10 अंशांवर पोहोचला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईसह महाराष्ट्र गारठला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, नाताळपर्यंत वातावरण असंच राहणार आहे. यामुळे महाराष्ट्राला पुढील काही दिवस थंडीची सामना करावा लागणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. दिल्ली, उत्तर प्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतातही कडाक्याची थंडी पडली आहे. हवामान विभागाने भारताच्या अनेक राज्यांमध्ये शीत लहरीचा इशारा दिला आहे.

Add Zee News as a Preferred Source

सोमवारी, मंगळवारी किमान तापमानात किंचित वाढ होईल. गुरुवारपासून किमान तापमान घसरण्यास सुरुवात होईल. नाताळपर्यंत हुडहुडी कायम राहील असं हवामान विभागाने दिलं आहे. 

10 अंशापर्यंत घसरला पारा

विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच शहरांचा पारा 10 अंशांपर्यंत घसरला आहे. अहिल्यानगर, नाशिक, सातारा, पुणे, बारामती, नांदेड, जेऊर, धाराशिव, जळगाव, मालेगाव, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या सर्व शहरांत किमान तापमानाची नोंद 10 अंश सेल्सिअस एवढी झाली आहे.

मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता

आज मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्राला यलो अलर्टचा इशारा दिला आहे. तसंच राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात कुठे किती नोंदवले गेले किमान तापमान ?

मुंबईत 16.6 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर महाबळेश्वरमध्ये 12.9 अंश तापमान आहे. जेऊरला पारा 6 अंशापर्यंत घसरला असून, जळगावात 7 आणि पुणे, मालेगावमध्ये 8 अंशापर्यंत घसरल्याने कडाक्याती थंडी पडली आहे. नाशिकमध्ये तापमान 8.6 अंशापर्यंत आलं आहे. बारामतीत पारा 7.7 अंशापर्यंत घसरला आहे. 

भंडारा, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, धाराशिव, नांदेड, सातारा, सांगली येथे तापमान 10 ते 11 अंशापर्यंत आहे. 





Source link

मुंबई पुणे महामार्गावर 15 KM लांब वाहनांच्या रांगा; भयानक वाहतुक कोंडीत प्रवासी अडकले

मुंबई पुणे महामार्गावर 15 KM लांब वाहनांच्या रांगा; भयानक वाहतुक कोंडीत प्रवासी अडकले



मुंबई पुणे महामार्गावरुन प्रवास करणे आता त्रासदायक ठरत आहे. विकेंडच्या दिवशी मुंबई पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. शनिवारी सकाळपासूनच मुंबई पुणे महामार्गावर भयानक वाहतूक कोंडी झाली. मुंबई पुणे महामार्गावर 15 KM लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हजारो प्रवासी या भयानक वाहतुक कोंडीत अडकले. 



Source link

पुण्यात सर्वात मोठी कारवाई! चार तहसीलदारांसह 10 जण एकाचवेळी निलंबित; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कारवाईचे आदेश

पुण्यात सर्वात मोठी कारवाई! चार तहसीलदारांसह 10 जण एकाचवेळी निलंबित; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कारवाईचे आदेश


Pune Crime News :  पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या 90 हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली. या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशा नऊ जणांचे निलंबन करण्यात आले.
परवानगीपेक्षा 90 हजार ब्रास अधिक उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणीत निष्पन्न झाले असून, यावर फौजदारी व महसूली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आमदार सुनील शेळके यांनी मावळ येथील उत्खनन गैरव्यवहाराबाबत आज विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. उत्खनन प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली असून, अधिकारी आठ महिने टाळाटाळ करत अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शेळके यांनी केला होता.

Add Zee News as a Preferred Source

विभागीय आयुक्तांच्या चौकशीत निष्पन्न

महसूल मंत्र्यांनी सांगितले की, विभागीय आयुक्तांनी दोनदा चौकशी केली. गट क्रमांक 36, 37, आणि 38 मध्ये खाणपट्टे मंजूर होते, मात्र 35, 41, 42, आणि 46 या गट क्रमांकांवरही गौण खनिजाचे तात्पुरत्या स्वरूपाचे उत्खनन झाले आहे. ईटीएस मोजणीमध्ये 3 लाख 63 हजार ब्रासची परवानगी असताना तब्बल 4 लाख 54 हजार ब्रास उत्खनन झाल्याचे आढळले. म्हणजेच, 90 हजार ब्रास जास्तीचे उत्खनन झाले आहे.

निलंबित अधिकाऱ्यांची नावे

गैरव्यवहारात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तलाठी (२): दीपाली सनगर आणि गजानन सोटपल्लीवार. मंडळ अधिकारी (४): संदीप बोरकर, माणिक साबळे, अजय सोनवणे आणि रमेश कदम. तहसीलदार (४): जोगेंद्र कटियार, मनजीत देसाई, मधुसूदन बारगे, विक्रम देशमुख. (या काळात कार्यरत असलेले चार तहसीलदार.)
 90 हजार ब्रास जादा उत्खननासाठी संबंधितांवर गुन्हा दाखल करणे, दंड आकारणी करणे, सातबारा उताऱ्यावर नोंदी घेणे आणि दंड न भरल्यास व्याजासह वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निलंबित अधिकाऱ्यांची तीन महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल आगामी अधिवेशनात पटलावर ठेवला जाईल, असे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

वनिकरणाचा मुद्दा 

आमदार शेळके यांनी वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात उत्खनन झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर बोलताना महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ती खाजगी जमीन आहे. गुगल इमेजमध्ये फक्त 15 झाडे होती आणि ती तोडण्यासाठी परवानगी घेण्यात आली होती. महसूल मंत्र्यांनी सांगितले की, वन अधिकाऱ्यांनी हा ‘फॉरेस्ट झोन’ नसल्याचे लेखी कळवले आहे, म्हणूनच खाणपट्ट्याला परवानगी मिळाली. तथापि, पीएमआरडीएच्या प्रस्तावीत विकास आराखड्यात (Proposed DP) ही जमीन खाजगी वनीकरणासाठी राखीव दर्शवण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहिती असल्यास स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करण्याची तयारी मंत्र्यांनी दर्शविली.
मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यभरातील अवैध उत्खननाला लगाम लावण्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावाचा ईटीएस सर्वे सुरू करण्यात आला आहे. यामुळे किती परवानग्या दिल्या आणि किती अवैध उत्खनन झाले, याची माहिती मिळेल व त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल.





Source link

कल्याणवरुन फक्त 45 मिनिटांत नवी मुंबईत पोहोचता येणार; मेट्रो 12चा महत्त्वाचा टप्पा पूर्ण, 19 स्थानके अन्…

कल्याणवरुन फक्त 45 मिनिटांत नवी मुंबईत पोहोचता येणार; मेट्रो 12चा महत्त्वाचा टप्पा पूर्ण, 19 स्थानके अन्…


Mumbai Metro 12: मुंबईसह संपूर्ण महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. मुंबई शहरासह ठाणे, कल्याण येथेही मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. एमएमआरडीएमार्फत उभारल्या जात असलेल्या मुंबई मेट्रो लाइन-12 (कल्याण ते तळोजा) प्रकल्पानं एक मोठी कामगिरी पूर्ण केली आहे. शिळफाटा रोडवरील डोंबिवली एमआयडीसी मेट्रो स्थानकाजवळ 100 वा U गर्डर यशस्वीरित्या लाँच करण्यात आला आहे. या मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामात हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून यामुळं प्रकल्पाला आणखी गती मिळणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

कल्याण ते तळोजा मेट्रो मार्ग हा सुमारे 23.57 किमी लांबीचा उन्नत मार्ग असून या मार्गिकावर 19 मेट्रो स्थानके असणार आहेत. या मार्गिकेमुळं कल्याण, डोंबिवली, तळोजा आणि पुढे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणार आहे. या मार्गिकेमुळं ठाणे ते नवी मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ व जलद पद्धतीने होणार आहे. तसंच, कळवा ते तळोजा परिसरातील ट्रान्झिस्ट-ओरिएंडेट विकासालाही चालना मिळणार आहे.

कळवा-शिळफाटा तळोजा मार्गाला समांतर असणारा हा कॉरिडॉर तब्बल 7 किमी MSRDC फ्लायओव्हरच्या एकत्रित रचनेसह उभा राहतोय. यात कोळेगावजवळील 100 मीटर मोकळा स्पॅन. महत्त्वाच्या रेल्वे आणि ROB क्रॉसिंग्ज तसंच, 21-23 मीटर उंचीवरील उन्नत स्थानक अशा अभियांत्रिकी कौशल्याच्या अनेक विशेष स्पॅनचा या प्रकल्पात समावेश असेल. ही मेट्रो मार्गिकेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण इंटरजेंचमुळं खालील मार्गाशी सहज जोडले जातील. कळवा मेट्रो लाइन 5, मेट्रो लाइन 14, अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो लाइन 1 तसंच कळवा जंक्शनला सेंट्रल रेल्वेशी थेट एका पुलाद्वारे जोडले जाणार आहेत. हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

कशी असेल मेट्रो 12

मेट्रो लाईन 12 चा जोड कल्याण, डोंबिवली एमआयडीसी, कल्याण ग्रोथ सेंटर, वडवली, तुर्भे, पिसारवे, तळोजा आणि आमंडूटमार्गे होणार आहे. निलजे येथे सुमारे 31 हेक्टर क्षेत्रावर समर्पित डेपो नियोजित आहे. हा मार्ग प्रवासाचा सध्याचा कालावधी 50% ते 75% पर्यंत कमी करेल, जो रस्त्याच्या परिस्थितीनुसार ठरेल.

इंटरचेंजिंग स्थानके:

कळ्याण (मेट्रो लाईन 5: ठाणे-भिवंडीकळ्याण)

हेदूतने (मेट्रो लाईन 14: विक्रोळी-बदलापूर)

आमंडूट (नवी मुंबई मेट्रो लाईन 1)





Source link

रायगडमध्ये महायुतीत वाद पुन्हा पेटणार?

रायगडमध्ये महायुतीत वाद पुन्हा पेटणार?


ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेसेना आमदार महेंद्र दळवी यांच्यावर कॅश बॉम्ब टाकला आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.. मात्र या कॅश बॉम्बनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादाचा भडका उडालाय.  सुनील तटकरेंनी महेंद्र दळवींवर केलेल्या टीकेनंतर दळवी यांनी थेट सुनील तटकरेंचेच व्हिडिओ बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब टाकल्यानंतर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच वादाच भडका उडालाय… अंबादास दानवेंनी व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी या प्रकरणात सुनील तटकरेंना ओढत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधल्यानंतर तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत आमदार दळवींवर शालजोडीतील टोले हाणले.. आणि यानंतर संतापलेल्या आमदार महेंद्र दळवी यांनी आता सुनील तटकरेंना इशारा दिलाय… तटकरेंचे अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत. हे व्हिडिओ बाहेर आले तर ते तोंड दाखवू शकणार नाहीत असा इशारा दळवींनी तटकरेंना दिलाय… 

तर अशा पोकळ धमक्या देण्यापेक्षा तुम्ही जे काय असेल ते जनतेसमोर आणा असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमेल मिटकरी यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर पलटवार केलाय.

अंबादास दानवे यांनी महेंद्र दळवींचा व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर दळवी यांनी दानवे यांच्यासोबत सुनील तटकरे यांच्यावर हा व्हिडिओ पुरवल्याचा आरोप केला होता. आणि त्यानंतर तटकरेंनी दळवींवर खोचक टीका केल्यानंतर दळवींनी तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढण्याचा इशारा दिला..

 तर अंबादास दानवेंनी महेंद्र दळवींच्या ट्विट केलेल्या व्हिडिओ वरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनाचा समाचार घेतलाय.. आता मॉर्फिंगचा धंदा सुरू झालाय… बाकी सगळे धंदे बंद झाल्याचं म्हणत शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केलाय..

तर दुसरीकडे  शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू झालेल्या वादावरून उद्धव ठाकरेंनी महायुतीवर हल्लाबोल केलाय. महायुतीमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाहीय.. मित्र मित्र म्हणून एकमेकांवर धाडी टाकण्याचं आणि एकमेकांची प्रकरणं बाहेर आणण्याचं काम सुरू असल्याचं म्हणज उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय

अंबादास दानवेंनी पैशांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ ट्विट करत

आमदार महेंद्र दळवींना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच वादाचा भडका उडालाय… सुनील तटकरे यांनी महेंद्र दळवींवर टीका केल्यानंतर आता महेंद्र दळवी यांनी तटकरेंचेच व्हिडिओ बाहेर काढण्याचा इशारा दिलाय.. त्यामुळे पुढल्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.





Source link

काका नव्हे मित्र! अमित ठाकरेंच्या मुलाची आदित्य ठाकरेंशी जमली गट्टी; वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ…

काका नव्हे मित्र! अमित ठाकरेंच्या मुलाची आदित्य ठाकरेंशी जमली गट्टी; वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ…



Aditya Thackeray Plays With Amit Thackeray Son: असं म्हणतात की, लहान मुलं पाहिली, की त्यांच्या बालक्रीडा नकळत आपल्यालासुद्धा लहानगं होण्यास भाग पाडतात. हा व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसेल… 
 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp