स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’ यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते ‘झी 24 तास’मध्ये ‘डेप्युटी न्यूज एडिटर’ म्हणून कार्यरत आहेत.
ST Advertisment: रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी आणि अमराठी वाद पेटलाय… याच मुद्द्यावर झी24तासच्या टू पॉईंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी मोठं विधान केलंय.. रिक्षाचालकांनी 4 मे रोजी मोर्चाचा इशारा दिला असला, तरी तो मोर्चा निघणारच नाही, असा दावा सरनाईकांनी केलाय. तसंच रिक्षाचालकांचा मोर्चा इशारा हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट असल्याचा टोला लगावत त्यांना संघटनांचा दावा फेटाळलाय.. रिक्षाचालकांच्या संख्येवरून सरनाईकांनी मोर्चाचा इशारा देणाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच यावेळी त्यांनी रितेश-जेनेलिया यांच्या एसटी जाहिरातीबद्दलही भाष्य केले. काय म्हणाले प्रताप सरनाईक? सविस्तर जाणून घेऊया.
Add Zee News as a Preferred Source
बसेसची दुरावस्था
‘टू द पॉइंट विथ कमलेश सुतार’ या कार्यक्रमात सरनाईक यांना एसटीच्या दुरावस्थेचे व्हिडीओ दाखवण्यात आले. यावर प्रताप सरनाईकांनी भाष्य केले. काही वर्षापुर्वीचे यापेक्षा वाईट व्हिडीओ आहेत. मी नाही म्हणत नाही. 8300 बसेस आम्ही घेतल्या आहेत. गेल्यावर्षी 5000 आणि यावर्षी 3000 बसेस आम्ही घेतल्यायत. 5000 बसेसची निविदा आहे. या बसेस आल्यावर आम्ही जुन्या बसेस भंगारात काढणार आहोत. या शेवटच्या डिझेलच्या बसेस आहेत. यापुढे इलेक्ट्रिक बसेस येतील. एसटी महामंडळाला चांगले दिवस यावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
सदावर्तेंचा समाचार
रिक्षा, टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीला ऍड.गुणरत्न सदावर्ते सातत्यानं विरोध करतायेत. पण, सदावर्ते एसटी बँकेत पराभव झाल्याचा राग मराठी सक्तीवर काढत असल्याचा आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलाय. झी24तासच्या टू पॉईंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत प्रताप सरनाईकांनी सदावर्तेंच्या विरोधामुळे आपली त्यांच्यासोबतचं मैत्रीचं नातं अधिक दृढ झाल्याचं म्हणत सदावर्तेच्या मराठी सक्तीच्या विरोधाचा उपहासात्मकरित्या समाचार घेतला.
रितेश आणि जेनेलियाने किती मानधन घेतलं?
रितेश देशमुख हे मराठीसह हिंदीतील आघाडीचे अभिनेते आहेत. त्यांची विशेष ओळख आहे. वडिलांसोबतच्या त्यांच्या एसटीच्या आठवणी आहेत. तसेच रितेश यांचे वडील विलासराव देशमुखदेखील परिवहन मंत्री होते, असे सरनाईकांनी सांगितले. मी वडिलांसोबत पहिला प्रवास एसटीने केला होता, अशी आठवण रितेशने आपल्याया सांगितल्याचे सरनाईक म्हणाले. मी मानधनाबद्दल विचारल तेव्हा एक रुपयाही नको, असे ते म्हणाले. ब्रॅण्ड एंम्बेसिडर असल्याने आम्ही पैसे देऊ असे म्हटल्यावर मी ते दान करेन असे सरनाईक म्हणाले.
‘सहयोगी सदस्य असल्यानं मेहतांना सांभाळून घेतो’
भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर बलात्कार, खंडणीसह 28 गुन्हे दाखल असल्याचा आरोप करत, प्रताप सरनाईकांनी नरेंद्र मेहतांवर हल्ला चढवलाय. झी24तासच्या टू पॉईंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत प्रताप सरनाईकांनी नरेंद्र मेहतांवर निशाणा साधला. मीरा-भाईंदरमध्ये धमकावून मेहतांनी जमिनी बळकावल्याचा आरोपही सरनाईकांनी केलाय.. पण, मेहता सहयोगी सदस्य आमदार असल्यानं त्यांना सांभाळून घेतो, असं म्हणत सरनाईकांनी नरेंद्र मेहतांना डिवचल्याचं पाहायला मिळालं.
निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे : लग्नासाठी हल्ली मॅट्रिमोनिअल वेबसाईट सर्रास वापरल्या जातात. पण योग्य ती खातरजमा न करता जर तुम्ही एखाद्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तर तो तुम्हाला महागात पडू शकतो. पुण्यात अशाच एका बनावट प्रोफाईलमुळे महिलांची लाखोंची फसवणूक झाली आहे. नेमकं काय घडलंय? इस्त्रोचा वैज्ञानिक निघाला दहावी पास मजूर आहे. ‘लखोबा लोखंडे’कडून महिलांना लाखोंचा गंडा घातला आहे. मॅट्रिमोनिअल वेबसाईटद्वारे महिलांची फसवणूक केली. कसिनोच्या नादात महिलांच्या आयुष्याशी खेळ
Add Zee News as a Preferred Source
सध्या खोटी माहिती देवून फसवण्याचे प्रकार वाढलेयेत. त्यामुळे कुणावरही पटकन विश्वास ठेवत असाल, तर सावधान.. पुण्यात मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर खोटी माहिती देवून महिलांच्या आयुष्याचा खेळ मांडणाऱ्या बनावट इस्त्रो सायंटिसचा भांडाफोड झाला आहे. इस्रोमध्ये सायंटिस्ट म्हणून काम करतो असं म्हणून पुण्यातल्या एका दहावी पास मजुरानं अनेक जणींना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांची लाखो रूपयांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.
भविष्यासाठी गुंतवणूक करू, असं सांगून लाखो रूपये घ्यायचा
गोव्यातल्या कसिनोमध्ये ते पैसे उधळायचा
कसिनोच्या नादापायी महिलांना फसवल्याचं उघड
आरोपीवर 11 गुन्हे दाखल
लग्नाच्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढलेत. नागरिकांनी मॅट्रिमोनिअल साइटवर ओळख वाढवताना अधिक सतर्क राहावं, असं आवाहन पोलीस करत आहेत. नाहीतर तुमचीही फसवणूक होण्याचा भीती आहे..
Ratnagiri News : यंदाच्या वर्षी मान्सून सरासरीहून तुलनेनं कमी असेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, सध्या पूर्वमोसमी पावसानं कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. कोकणातील रत्नागिरीत याचा परिणाम आंबा आणि काजू पिकांवरही होताना दिसत आहे. याचसंदर्भात आंबा उत्पादकांच्या हिताच्या अनुषंगानं काही निर्णय घेण्यात आले आहेत. जिथं 72 तासांचं गणित लागू असेल.
Add Zee News as a Preferred Source
काय आहे निर्णय?
रत्नागिरीत वाऱ्यांचा वेग वाढून आंबा पिकाचं नुकसान झाल्यास बागायतदारांना मिळणार नुकसानभरपाई मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र यासाठी एक अट लागू असेल. संबंधित शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत विमाकंपनीकडे किंवा कृषी विभागाकडे तक्रार दाखल करणं अत्यावश्यक असेल. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
रत्नागिरीत निसर्ग रुसला…
रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळालं. दुपारनंतर आलेल्या अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने दापोली तालुक्याला अक्षरशः झोडपून काढलं. या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक कुटुंबांची घरं कोसळली, गुरांचे गोठेही जमीनदोस्त झाले. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालं. ज्यामुळं हवामानाचं हे रुप पाहता इथं भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
#रत्नागिरीत वाऱ्यांचा वेग वाढून आंबा पिकाचं नुकसान झाल्यास बागायतदारांना मिळणार नुकसानभरपाई. मात्र, संबंधित शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमाकंपनीकडे किंवा कृषी विभागाकडे तक्रार दाखल करणं अत्यावश्यक आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली.#Farmerspic.twitter.com/9elABWiQAm
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 23, 2026
गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, संगमेश्वर तालुक्यात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस बरसला, मेघगजनेसह जोरदार पावसाच्या सरींमुळं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली. ज्यामुळं या भागासाठी हवामान विभागाचा अवकाळी पावसाचा अंदाज खरा ठरला. जिथं दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, इथं पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्यातील आंबा पीक धोक्यात
तळकोकणात अवकाळी पावसामुळे बागायतदार हवालदिल झालेत. मागील काही दिवस अवकाळी पाऊस रिपरिप स्वरूपाचा होता. कुडाळ तालुक्यातील माणगाव भागात चक्क गारांचा पाऊस पाहायला मिळाला. या अवकाळी पावसात कोसणाऱ्या गारामुळे हवेत काही काळ गारवा निर्माण झाला होता. मात्र दुसऱ्या सत्रात चांगला आंबा मिळेल या प्रतीक्षेत आलेल्या बागायतदारांना मात्र धक्का बसलाय. तळकोकणात मागील तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला होता.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (पुणे म्हाडा) मार्च २०२६ मध्ये सुमारे ३,००० नवीन परवडणाऱ्या घरांसाठी लॉटरी काढण्याची घोषणा केली आहे. ही लॉटरी चिखली, ताथवडे, वाकड, लोहगाव, मुंढवा, येवलेवाडी, वाघोली, किवळे, फुरसुंगी, डुडुळगाव, पिसोळी, बालेवाडी, हडपसर, पुनावळे आदी परिसरांतील प्रकल्पांचा या योजनेत समावेश आहे. विविध प्रकल्पांमध्ये भिन्न क्षेत्रफळ, किंमत व सुविधा उपलब्ध असल्याने अर्जदारांना त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे. पुणे म्हाडा मंडळाने विविध गृहनिर्माण योजनांमधील शिल्लक राहिलेल्या २९५ सदनिकांसाठी विशेष “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” (First Come First Served – FCFS) योजना जाहीर केली आहे.
या योजनेची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
पुणे म्हाडा लॉटरीची ऑनलाइन नोंदणी सुरू ४ मे २०२६, सकाळी ११:३० वाजल्यापासून होणार आहे. नोंदणीचे पोर्टल bookmyhome.mhada.gov.in. या संकेतस्थळावर करु शकता. तसेच या ठिकाणी कशी असेल घरांची उपलब्धता आणि ठिकाण पाहू शकता. ही योजना प्रामुख्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड क्षेत्रासाठी आहे. या लॉटरीसाठी एकूण सदनिका: २९५ असणार आहेत. पुणे महानगरपालिका (PMC) क्षेत्र: ११३ सदनिका असून पिंपरी-चिंचवड (PCMC) क्षेत्र: १८२ सदनिका आहेत. तसेच घरांचे प्रकार यात १ RK, १ BHK आणि २ BHK अशा विविध प्रकारच्या घरांचा समावेश आहे. अर्जाचे शुल्क आणि अनामत रक्कम (EMD) असून अर्जाचे शुल्क: ₹६०० + १०८ (१८% GST) = ₹७०८ (न परतावा). आहेत. अनामत रक्कम (EMD): आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) ₹२०,००० निश्चित करण्यात आली आहे. एकूण सुरुवातीचा भरणा ₹20708 इतकी आहे.
पात्रता आणि अटी
वय: अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा किमान १५ वर्षांचा रहिवासी असावा (डोमिसाईल प्रमाणपत्र आवश्यक). ही “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” योजना असल्याने, जे अर्जदार आधी नोंदणी करून अनामत रक्कम भरतील, त्यांना सदनिका वाटपात प्राधान्य दिले जाईल. संपर्क आणि मदत केंद्र देखील उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी किंवा तांत्रिक अडचणींसाठी तुम्ही खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकता.