पुणेकरांसाठी मोठी बातमी, म्हाडाच्या लॉटरीची तारीख जाहीर, 2BHK घेण्याची सुवर्ण संधी

पुणेकरांसाठी मोठी बातमी, म्हाडाच्या लॉटरीची तारीख जाहीर, 2BHK घेण्याची सुवर्ण संधी


पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (पुणे म्हाडा) मार्च २०२६ मध्ये सुमारे ३,००० नवीन परवडणाऱ्या घरांसाठी लॉटरी काढण्याची घोषणा केली आहे. ही लॉटरी चिखली, ताथवडे, वाकड, लोहगाव, मुंढवा, येवलेवाडी, वाघोली, किवळे, फुरसुंगी, डुडुळगाव, पिसोळी, बालेवाडी, हडपसर, पुनावळे आदी परिसरांतील प्रकल्पांचा या योजनेत समावेश आहे. विविध प्रकल्पांमध्ये भिन्न क्षेत्रफळ, किंमत व सुविधा उपलब्ध असल्याने अर्जदारांना त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे. पुणे म्हाडा मंडळाने विविध गृहनिर्माण योजनांमधील शिल्लक राहिलेल्या २९५ सदनिकांसाठी विशेष “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” (First Come First Served – FCFS) योजना जाहीर केली आहे. 

या योजनेची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे 

पुणे म्हाडा लॉटरीची ऑनलाइन नोंदणी सुरू ४ मे २०२६, सकाळी ११:३० वाजल्यापासून होणार आहे. नोंदणीचे पोर्टल bookmyhome.mhada.gov.in. या संकेतस्थळावर करु शकता. तसेच या ठिकाणी कशी असेल घरांची उपलब्धता आणि ठिकाण पाहू शकता. ही योजना प्रामुख्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड क्षेत्रासाठी आहे. या लॉटरीसाठी एकूण सदनिका: २९५ असणार आहेत. पुणे महानगरपालिका (PMC) क्षेत्र: ११३ सदनिका असून पिंपरी-चिंचवड (PCMC) क्षेत्र: १८२ सदनिका आहेत. तसेच घरांचे प्रकार यात १ RK, १ BHK आणि २ BHK अशा विविध प्रकारच्या घरांचा समावेश आहे. अर्जाचे शुल्क आणि अनामत रक्कम (EMD) असून अर्जाचे शुल्क: ₹६०० + १०८ (१८% GST) = ₹७०८ (न परतावा). आहेत. अनामत रक्कम (EMD): आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) ₹२०,००० निश्चित करण्यात आली आहे. एकूण सुरुवातीचा भरणा ₹20708 इतकी आहे. 

पात्रता आणि अटी

वय: अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा किमान १५ वर्षांचा रहिवासी असावा (डोमिसाईल प्रमाणपत्र आवश्यक). ही “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” योजना असल्याने, जे अर्जदार आधी नोंदणी करून अनामत रक्कम भरतील, त्यांना सदनिका वाटपात प्राधान्य दिले जाईल. संपर्क आणि मदत केंद्र देखील उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी किंवा तांत्रिक अडचणींसाठी तुम्ही खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकता.





Source link

Baramati By Election: शरद पवार मतदान करु शकणार नाहीत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, 'अजित पवारांनी तुमच्या…', पार्थ पवारांची पोस्ट 'आजोबा तुम्ही…'

Baramati By Election: शरद पवार मतदान करु शकणार नाहीत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, 'अजित पवारांनी तुमच्या…', पार्थ पवारांची पोस्ट 'आजोबा तुम्ही…'


Sunetra Pawar Post for Sharad Pawar: अजित पवारांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघासाठी आज पोटनिवडणूक होत आहे. सुनेत्रा पवार ही निवडणूक लढत असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष बारामतीकडे आहे. सर्व मोठ्या पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला असल्याने त्या निवडून येणार हे निश्चित आहे. मात्र काही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने निवडणूक बिनविरोध होऊ शकलेली नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला असून, सुप्रिया सुळेंनी सांगता सभेला हजेरी लावली होती. दरम्यान शरद पवारांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपण मतदान करु शकत नसल्याचं सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी बुधवारी रात्री पोस्ट केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सुनेत्रा पवारांची पोस्ट

आदरणीय साहेबांनी केलेल्या  आवाहनाला बारामतीकर नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद देतील असा विश्वास सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला आहे. बारामतीसह महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासात आदरणीय साहेबांचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय दादांनीही विकासात्मक राजकारणाची समृद्ध परंपरा जपली असंही त्यांनी सांगितलं आहे. 

“प्रकृती अस्वस्थ्यामुळे आदरणीय पवार साहेब बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानास उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि बारामतीकरांसाठी लाखमोलाचे आहेत. बारामतीसह महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासात आदरणीय साहेबांचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय दादांनीही विकासात्मक राजकारणाची समृद्ध परंपरा जपली. आदरणीय साहेबांनी केलेल्या  आवाहनाला बारामतीकर नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद देतील. बारामतीची जनता विकासाच्या विचारांशी जोडलेली आहे आणि तीच दिशा पुढेही कायम राहील. आदरणीय साहेबांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, हीच मनःपूर्वक प्रार्थना,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

पार्थ पवारांची पोस्ट

खासदार पार्थ पवार यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रकृती लवकर सुधारावी यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. “आजोबा, तुम्ही लवकर बरे व्हा! तुम्हाला शक्ती, दिलासा आणि लवकरात लवकर प्रकृती सुधारो, अशी आमची सदिच्छा आहे. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहोत”, असं त्यांनी म्हटलं आहे. 

पवार कुटुंब बजावणार मतदानाचा हक्क

बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात सुनेत्रा पवार, पुत्र खासदार पार्थ पवार तसंच अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार, पत्नी शर्मिला पवार, युगेंद्र पवार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर शहरातील रिमांड होम येथे खासदार सुप्रिया सुळे यादेखील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे प्रकृतीच्या कारणास्तव मतदान करणार नाहीत. अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार हे जळोची येथे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या विद्याप्रतिष्ठान येथील स्मृतीस्थळी अभिवादन करतील  त्यानंतर सकाळी 7 वाजता काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावतील.

7 वाजता मतदानास सुरुवात

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. यासाठी एकूण 478 मतदान केंद्रे आहेत, यापैकी मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने विविध संकल्पनांवर आधारित पाच विशेष मतदान केंद्रे उभारण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे. 

यामध्ये केंद्र क्रमांक १२१, मुलींचे शासकीय वसतिगृह, एमआयडीसी येथे ‘पिंक मतदान केंद्र’ तयार करण्यात आले आहे. तसेच केंद्र क्रमांक २६१, राधेश्याम अग्रवाल ज्युनिअर कॉलेज, बारामती येथे ‘आदर्श मतदान केंद्र’, केंद्र क्रमांक २२५, जिल्हा परिषद शाळा, पिंपरी येथे ‘युवा मतदान केंद्र’, केंद्र क्रमांक २५८, जिल्हा परिषद शाळा, माळेगाव येथे ‘दिव्यांग मतदान केंद्र’ आणि केंद्र क्रमांक ४७, जिल्हा परिषद शाळा, डोर्लेवाडी येथे ‘युनिक मतदान केंद्र’ उभारण्यात आले आहे.





Source link

कोल्हापुरात शिवजयंतीला हत्या; धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचा बापाचा दावा, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य उघड, अख्खं गाव हादरलं

कोल्हापुरात शिवजयंतीला हत्या; धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचा बापाचा दावा, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य उघड, अख्खं गाव हादरलं



A Father Murders Son in Kolhapur: धक्कादायक बाब म्हणजे हा खून लपवण्यासाठी वडिलांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीत हल्ला झाल्याचा बनाव केला. मात्र कोल्हापूर पोलिसांनी हा बनाव उधळून लावला. 
 



Source link

अशोक खरात प्रकरणाचे खळबळजनक पुरावे सापडले गोडाऊनमध्ये

अशोक खरात प्रकरणाचे खळबळजनक पुरावे सापडले गोडाऊनमध्ये



समता पतसंस्थेसंदर्भातली आणखी एक बातमी समोर आली आहे. कोपरगाव शहरातील एका गोडाऊनमध्ये समता पतसंस्थेशी निगडीत
कागदपत्र समोर आली आहेत. 
 



Source link

सासू-सुनेच्या भांडणानंतर सुनेनं दोन्ही मुलांसहीत विहिरीत मारली उडी; तिघांचा मृत्यू, तिघे पोलिसांच्या ताब्यात

सासू-सुनेच्या भांडणानंतर सुनेनं दोन्ही मुलांसहीत विहिरीत मारली उडी; तिघांचा मृत्यू, तिघे पोलिसांच्या ताब्यात


Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’ यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते ‘झी 24 तास’मध्ये ‘डेप्युटी न्यूज एडिटर’ म्हणून कार्यरत आहेत.

…Read More





Source link

महाराष्ट्रातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठा 'VIP' घोटाळा! थेट भक्तांनाच लुबाडले

महाराष्ट्रातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठा 'VIP' घोटाळा! थेट भक्तांनाच लुबाडले


Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

…Read More





Source link

YouTube
Instagram
WhatsApp