आता खरचं मुंबई ते गोवा प्रवास 6 तासांत होणार! रस्ते किंवा रेल्वेमार्गे नव्हे थेट समुद्रमार्गे अति जलद प्रवास

आता खरचं मुंबई ते गोवा प्रवास 6 तासांत होणार! रस्ते किंवा रेल्वेमार्गे नव्हे थेट समुद्रमार्गे अति जलद प्रवास



 Ro Ro Ferry: मुंबई ते गोवा प्रवास 6 तासांत होणार आहे. रस्ते किंवा रेल्वेमार्गे नव्हे थेट समुद्रमार्गे अति जलद प्रवास करता येणार आहे. 



Source link

महाराष्ट्रात चाललंय काय? पुण्यात बापाचे मुलीवर लैंगिक अत्याचार; मुंबईत वडिलांकडून 4 महिन्यांच्या मुलीची हत्या

महाराष्ट्रात चाललंय काय? पुण्यात बापाचे मुलीवर लैंगिक अत्याचार; मुंबईत वडिलांकडून 4 महिन्यांच्या मुलीची हत्या


Crime Against Women In Maharashtra: महाराष्ट्राला हादरवून सोडणारी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामधील बलात्काराची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधून महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या धक्कादायक बातम्या समोर येण्याचा प्रकार सुरु आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या अशाच दोन घटना मुंबई आणि पुण्यामधून समोर आल्या आहेत. बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या दोन्ही घटनांनी राज्य हादरुन गेलं आहे. पुण्यात एका बापानेच आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली असून मुंबईत एका इसमाने आपल्याच चार महिन्याच्या मुलीला संपवल्याची घटना समोर आली आहे.

बापाकडून 14 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासनारी घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडली आहे. बापानेच आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. स्वतःच्या 14 वर्षीय मुलीवर नराधम बाप 8 महिने लैंगिक अत्याचार करत होता. मुलीची आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता. याप्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.

नक्की वाचा >> Pune Rape Case: 400 गावकऱ्यांनी आरोपीला शोधून काढलं; पण ‘या’ एकट्यालाच मिळणार 1 लाखाचं बक्षीस

बाल हक्क समितीने हा प्रकार उघडकीस आणला असून त्यानुसार गुन्हा दाखल करत नराधम बापाला काल बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, असं सांगण्यात आलं आहे. या मुलीला घडलेल्या प्रकरामुळे मोठा मानसिक धक्का बसला असून प्रकरण समोर आल्यावर परिसरात खळबळ माजली आहे.

घाटकोपरमध्ये बापानेच 4 महिन्याच्या मुलीला संपवलं

दुसरीकडे मुंबईमधील घाटकोपर येथे मुलगी नको म्हणून बापाने पाळण्यातच चार महिन्याच्या मुलीचा गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार प्रकाशझोतात आला आहे. घाटकोपरमधील कामराज नगरमध्ये ही विचित्र आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. संजय बाबू कोकरे असं आपल्याच चार महिन्याच्या बाळाचा जीव घेणाऱ्या नराधम बापाचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

नक्की वाचा >> महाराष्ट्रात महिला असुरक्षित… केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसोबत टवाळखोरांची छेडछाड

मुलीच्या जन्मापासूनच संजय तिचा तिरस्कार करत होता, अशी माहिती समोर आली आहे. बाळाची आई काही कामानिमित्त घराबाहेर गेली तेव्हा संजयने पाळण्याच्या दोरीने गळा आवळून मुलीची हत्या केली. हे प्रकरण समोर आल्यानंतर कामराज नगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 





Source link

MH 58 महाराष्ट्रातील 'या' शहराला मिळाला मिळाला नवीन RTO क्रमांक

MH 58 महाराष्ट्रातील 'या' शहराला मिळाला मिळाला नवीन RTO क्रमांक



मुंबईजवळच्या शहाराला नविन RTO कार्यालय तसेच नविन RTO क्रमांक मिळाला आहे. लाखो वाहन चालकांना याचा फायदा होणार आहे. 



Source link

स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, आता एसटी कामगारांना…

स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, आता एसटी कामगारांना…


Pune Swargate News In Marathi: पुण्यातील स्वारगेट बस आगारात उभ्या असलेल्या एसटीत एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, बस स्थानकात अशा प्रकारची घटना घडल्याने एसटी महामंडळ निशाण्यावर आले आहे. या सगळ्या प्रकरणानंतर राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

स्वारगेट शिवशाही प्रकरणानंतर राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने जनमानसात प्रतिमा मलीन होणे आणि प्रवासी सुरक्षेचे कारण देत गणवेश सक्तीचे आदेश एसटी मुख्यालयाने काढले आहेत. दरम्यान, आदेशाबाबत एसटी कामगार संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांनी कर्तव्यावर असताना मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार निश्चित केलेला गणवेश परिधान करूनच कामगिरी करणे आवश्यक आहे, असे आदेश एसटी मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र वाहतूक भवनमधून देण्यात आले आहेत. 

सद्यस्थितीत खाकी गणवेशाशिवाय अन्य गणवेशात चालक-वाहक कर्तव्यावर असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महामंडळाची जनमानासात प्रतिमा खराब होते. त्याचबरोबर प्रवाशांच्या मनात  सुरक्षेबाबतही शंका उपस्थित होण्याची भीती निर्माण होण्याची शक्यता आहे. चालक-वाहक व सर्व गणवेशधारी कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या गणवेशातच कर्तव्य बजावण्याचे आदेश वाहतूक विभागाने दिले आहेत. 

सर्व कर्मचाऱ्यांनी गणवेश धारण करूनच कर्तव्य बजावायचे आहे. मार्ग तपासणी पथकामार्फत, सुरक्षा व दक्षता शाखेतील तपासणीसांकडून व आगारभेटीवेळी सर्व संबंधितांकडून गणवेश नियमांचे पालन होत  असल्याचे तपासणी करणे गरजेचे आहे. नियम भंग करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, असे या आदेशात म्हटले आहे. एखादी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्यानंतर एसटी प्रशासनाला जाग येते आणि चालक वाहक व इतर गणवेशधारी कर्मचाऱ्यास जाचक होणारे आदेश काढण्यात येतात. ‘गणवेशाचे कापड दिले, मात्र शिलाई मिळाली नाही,” अशी प्रतिक्रिया एसटी कामगार संघटनेने दिली आहे.

खाकी टी-शर्टलाही बंदी 

स्वारगेट प्रकरणानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत चालक-वाहकांना खाकी रंगाचे लोगो एम्ब्रॉयडरी केलेले टी-शर्ट गणवेश म्हणून परिधान करण्यास पूर्ण बंदी घालावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 





Source link

बीड हत्येतील आरोपी वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट! देशमुखांच्या कुटुंबीयांची तक्रार

बीड हत्येतील आरोपी वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट! देशमुखांच्या कुटुंबीयांची तक्रार



संतोष देशमुख  हत्या प्रकरणातील आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी केलाय. दरम्यान यासंदर्भात देशमुख कुटुंबीयांनी जेल प्रशासनाकडे लेखी तक्रार केलीय. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp