by Hansraj Agrawal | Mar 20, 2025 | Trending News
No match is being played.
Mar 19, 2025 | Match 2
Canada in Namibia, 5 T20I Series, 2025
Mar 18, 2025 | 2nd T20
Pakistan in New Zealand, 5 T20I Series, 2025
|
PAK
(15 ov) 135/9
|
VS |
NZ
137/5(13.1 ov)
|
| New Zealand beat Pakistan by 5 wickets |
| Full Scorecard → |
Mar 17, 2025 | Final
Malaysia T20I Tri-Series, 2025
|
HK
(20 ov) 126/5
|
VS |
BRN
129/2(16.4 ov)
|
| Bahrain beat Hong Kong, China by 8 wickets |
| Full Scorecard → |
Source link
by Hansraj Agrawal | Mar 19, 2025 | Trending News
Nagpur Violence: नागपूर हिंसाचारामागे फहीम खान मास्टरमाईंड असल्याची माहिती समोर आली आहे. फहीम खानचं जमावाला भडकवलंय अशी तक्रार देखील पोलिसात करण्यात आली होती. दरम्यान यानंतर पोलिसांनी फहीम खानला अटक केली असून त्याला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नागपूरच्या हिंसाचारात पोलीस, तसंच अनेक कुटुंबाना लक्ष्य करण्यात आलं होते. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 46 जणांना अटक केली. तसंच या हिंसाचारामागच्या सूत्रधारांना सोडण्यात येणार नसल्याचा इशारा प्रवीण दरेकरांनी दिला.
एवढंच नव्हे नागपूरचा हिंसाचार घडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोपही प्रवीण दरेकरांनी केला आहे. तर नागपूरची घटना ही पूर्वनियोजित नव्हती असं पोलिसांनी सांगितल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे..
नागपूरच्या घटनेवरुन राज्यात चांगलंच राजकीय वातावरण तापलंय.. मात्र, दुसरीकडे हिंसाचारानंतर नागपुरात शांतता पाहायला मिळतेय. तसंच या सर्व घटनेची सखोल चौकशी सुरु असून आरोपींवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाआहे.
कोण आहे फहीम खान?
फहीम खान हा 38 वर्षाचा असून त्याचं
दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे
फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे.
फहीम खानचं हिंसाचारासाठी जमावाला प्रवृत्त
करत असल्याची सूत्रांची माहिती
पोलीस हिंदू असल्यानं आपल्याला मदत करत
नसल्याचं सांगत जमावाला भडकवत होता
गेल्या विधानसभा निवडणूक फहीम खानने निवडणूक देखील लढवली होती. मात्र, त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, नागपूर हिंसाचारामागे मास्टरमाइंड असल्याशिवाय अशी घटना होऊ शकत नाही, असा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केला होता. यात कोणीतरी मास्टरमाइंड आहे. त्याचा शोध पोलिसांनी घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी VHPनं केली. सर्व दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्याची मागणीही त्यांनी केली. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 18, 2025 | Trending News
महाराष्ट्रात अनेक IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नागपूर, संभाजीनगरसह महाराष्ट्रातील अति महत्वाच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 18, 2025 | Trending News
पुणे बलात्कार प्रकरणात विचित्र अपडेट समोर आली आहे. आरोपीच्या वकिलाचे अपहरण करुन त्यांना मारहाण करण्यात आली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 17, 2025 | Trending News
Cotton Farm: बाजारातही भाव मिळत नसल्याने शेतक-यांची आता आर्थिक कोंडी होतीये.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 17, 2025 | Trending News
Aurangzeb Tomb Issue Sanjay Raut Reacts: औरंगजेबची कबर हटवली जावी या मागणीसाठी राज्यभरातील अनेक ठिकाणी बजरंग दलाकडून आंदोलन केलं जात आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज तिथीनुसार असलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘औरंगजेबची कबर हटाव’ असे बॅनर्स हातात धरुन आंदोलनं केल्याचं पाहयला मिळालं. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आपलं परखड मत नोंदवताना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
हिंमत आहे का असा आदेश काढण्याची?
बजरंग दलाच्या आंदोलनासंदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी, “महाराष्ट्रात, देशात, राज्य कोणाचे आहे? त्यांचेच आहे. त्यांच्याच पक्षाचे राज्य आहे. मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कोणाचे आहेत? या विचारांच्या लोकांचे आहेत. हिंसक हिंदुत्ववाचे आहेत. मग त्यांना अडवलं कोणी कबर हटवायला? शासनाने हटवावी ना कबर! मारामाऱ्या कशाला करता? नाटकं कशाला करता? लोकांना त्रास का देता? सांगा आरएसएसला फर्मान काढा म्हणून, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद ही भाजपची पिल्लं आहेत. मग हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा, हिंमत आहे का असा आदेश काढण्याची?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
नक्की वाचा >> ‘6 महिन्यात आणखी एक विकेट जाणार,’ सुप्रिया सुळेंचं सूचक विधान; म्हणाल्या, ‘जो बायकोच्या आड…’
…मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं
“या क्षणी औरंगजेब कबरीच्या भोवती केंद्र सरकारचा पोलीस दल आहे. मग ते का ठेवलं संरक्षणासाठी? केंद्र सरकारचं पोलीस दल आणि जागा सरकारच्या आख्याधारित आहे,” असंही राऊत म्हणाले.
“छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य काय असतं हे या महाराष्ट्राला, देशाला दाखवलं. त्याचे स्मारक म्हणजे औरंगजेबाची कबर! महाराष्ट्रावरती हल्ला करणारे किंवा हल्ला करायला येणारी व महाराष्ट्राचे पंगा घेण्याआधी त्या व्यक्तीने छत्रपती संभाजीनगरला जावं आणि औरंगजेबाची कबर पहावी मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं असं आम्ही सांगतो,” अशी भूमिका राऊतांनी मांडली.
नक्की वाचा >> …म्हणून सरकारला औरंगजेबच्या कबरीला द्यावं लागतं संरक्षण; फडणवीसांनी जाहीर भाषणात सांगितलं कारण
…म्हणून ही थडगी असायला पाहिजेत
“छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची कबर खणलेली आहे. ती कबर बघा आणि मग महाराष्ट्राच्या नादाला लागा हा इतिहास आहे. ज्याला इतिहासाचे भान नाही असे सगळे इतिहासाच्या बाबतीत रडत असलेली लोक आहेत. तेच हे करत आहेत. अफजलखानाचा कोथळा महाराजांनी काढला इतिहासाला ते पिढीला माहिती पाहिजे. ही सगळी काही लोक आणि उद्योग करतात इतिहास नष्ट करण्याचे काम सुरू आहे. ही थडगी असायला हवीत. हा आमचा इतिहास आहे. हा आमच्या शौर्याचा इतिहास आहे,” असं राऊत म्हणाले.
Source link