Rain will help in Oilseed Production

प्रादेशिक मौसम विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. 5 ते 7 मार्च दरम्यान विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडकडासह अतिवृष्टी व पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आपला माल सुरक्षीत ठिकाणी साठवून ठेवावा.
तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीकरीता आणला असल्यास मालाचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. विज व गारांपासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. याबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावा, असा इशारा जिल्हाधिकारी निमा अरोरा यानी दिला आहे.