निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्याच्या (Pune News) वेल्हा तालुक्यात झालेल्या खुनाला धक्कादायक वळण लागलंय. पुण्याच्या (Pune Crime) अप्पा बळवंत चौकातील कन्या शाळेजवळील विजय लॉज बिल्डींगमध्ये राहणार्‍या व्यक्तीचा पानशेतजवळील आंबीगाव रस्त्यावरील कुरण गावच्या हद्दीतील रानवडी येथे लोखंडी सळईने खून करण्यात आल्याचे म्हटले जात होते. वेल्हे पोलिसांच्या (Velhe Police Station) सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा उलघडा केला आहे.

सोन्या, चांदीच्या हव्यासापोटी मित्रांनीच मित्राला संपवल्याच पोलीस तपासात समोर आलंय. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आली असून, आरोपींकडून सोन्याचांदीचे दागीन्यांसह 1,83,76, 165 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी वेल्हा तालुक्यातील पानशेतजवळ विजय काळोखे या व्यक्तीचा लोखंडी रॉड डोक्यात मारून आरोपींनी खून केला असे सांगण्यात येत होते.

विजय प्रफुल्ल काळोखे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  वेल्हे पोलिसांनी याप्रकरणी नितीन रामभाऊ निवंगुणे आणि विजय दत्तात्रय निवंगुणे यांच्यासह आणखी दोघांना अटक केली आहे. आरोपींविरुध्द वेल्हे पोलीस ठाण्यात खून, खुनाचा पुरावा नष्ट करणे आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपींकडून पावने दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

वेल्हा तालुक्यात पानशेत जवळ काही दिवसांपूर्वी शिवीगाळ केल्याच्या रागातून दोन भावांनी एका व्यक्तीचा लोखंडी रॉड, वीट आणि लोखंडी वस्तू डोक्यात मारून खून केला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी घर बांधकाम सुरू असलेल्या खड्ड्यात पुरला होता. मात्र आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबधित व्यक्तीकडे असणाऱ्या सोन्या चांदीच्या हव्यासापोटी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. वेल्हा पोलिसांनी या घटनेचा समांतर तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून 1,83,76, 165 रूपयांचा सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी वेल्हा पोलिसांनी नितीन रामभाऊ निवंगुणे, विजय दत्तात्रय निवंगुणे,ओमकार नितीन निवंगुणे आणि आणखी एक अशा चार जणांना ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं?

मृत पावलेल्या विजय काळोखे घरातून सोबत सोने, चांदी आणि रोख रक्कम घेऊन निघाले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती. वेल्हे पोलिसांनी त्यानुसार घटनेचा तपास सुरू केला. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी नितीन निवंगुणे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याने उडवा उडविची उत्तरे दिली होती. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटना क्रम सांगितला.

विजय काळोखे हा सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेवून निघाल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. काळोखे जवळील ऐवज  लुटण्याच्या प्रयत्नात आरोपींनी संतोषनगर कात्रज येथे स्टिलच्या चिमटयाने मयत विजय प्रफुल्ल काळोखे याचे डोक्यात आणि तोंडावर वार करुन त्याचा खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी विजय काळोखेचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅरलमध्ये टाकला. हा बॅरल इनोव्हा कारमध्ये टाकून तो मौजे रानवडी येथे आरोपी नितीन निवंगुणे याच्या शेतजमीनीच्या ठिकाणी आणला. आरोपी विजय दत्तात्रय निवंगुणे याच्या सहाय्याने तो मृतदेह खड्डयात पुरण्यात आला. 





Source link