When and where can the HSC result be checked : 12 वीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक नक्कीच वाढली असेल. निकाल जाहीर व्हायला काही तास शिल्लक असताना कोणाला किती टक्के पडणार या बाबत विद्यार्थ्यांना तर चिंता असतेच त्यापेक्षा जास्त पालकांच्या चेहऱ्यावर निकालाची चिंता दिसून येते. मागील काही दिवसांपासून 12 वी चा निकाल कधी लागणार याबाबत चर्चा होती. काल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एचएससी निकालाची तारिख आणि वेळ जाहीर केली आहे. पण हा निकाल कोणत्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार 12 वीचा निकाल 2 मे रोजी जाहीर केला जाणार आहे, या 2 तारखेला 1:00 वाजता विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या वेबसाइटवर पाहता येणार यासंदर्भात जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

12 वीचा निकाल या वेबसाइटवर पाहता येणार

2 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे, हा निकाल विद्यार्थी results.digilocker.gov.in, mahahsscboard.in आणि hscresult.mkcl.org या वेबसाइटवर पाहू शकणार आहेत. मंडळाने यासंदर्भात माहिती दिली आहे, याबद्दल मंडळाने सांगितले की या परिक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी हे या पोर्टल्सवरून त्यांचा निकाल पाहू शकणार आहेत. त्याचबरोबर असेही सांगितले आहे की डिजीलॅाकर ॲप्लिकेशनद्वारे निकालपत्र विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालये देखील लॉगिनद्वारे मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकणार आहेत. 

हे ही वाचा 

‘आधी ‘अमृतांजन बाम’ लावावा लागत होता, आता ‘टायगर बाम’ उपाय केलाय;’ एकनाथ शिंदेंचं ‘कनेक्टिंग लिंक’ उद्घाटनादरम्यान विधान

मंडळाची पत्रकार परिषद आणि घोषणा प्रक्रिया

मंडळ 2 मे रोजी निकाल जाहीर करणार आहे, त्याआधी 2 मे ला 11 वाजता पुणे कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये दुपारी 1 वाजता निकालाची लिंक सक्रिय करण्याआधी त्याचबरोबर परिक्षा आणि विद्यार्थीच्या कामगिरीशी संबंधित महत्वाचा तपशील दिला जाणार आहे. 2026 मध्ये बारावीची परीक्षा ही यंदा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांमध्ये मंडळांमार्फत घेण्यात आली होती. 

पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध

निकाल लागल्यानंतर अनेकदा विद्यार्थ्यांना त्यांची उत्तरपत्रिका किंवा निकालामध्ये शंका असल्यास त्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 3 मे ते 17 मे ही वेळ देण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाईट देखील सादर केली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी त्याच्या विभागामधील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp