अमर काणे, झी मीडिया, नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने 14 अनारक्षित विशेष गाड्या (Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 3 स्पेशल गाड्या नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, 6 स्पेशल गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminals) मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर, 2 स्पेशल गाड्या कलबुर्गी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान, 2 स्पेशल गाड्या धावतील. सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि एक विशेष गाडी अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावतील. (railway news 14 special trains on the occasion of Mahaparinirvana Day by Central Railway)

विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे  – 

(A) नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष (3)

1. विशेष गाडी क्रमांक 01262 नागपूरहून 4.12.2022 रोजी 23.55 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 15.30 वाजता पोहोचेल.
2. विशेष गाडी क्रमांक 01264 ही 5.12.2022 रोजी सकाळी 08.00 वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी 23.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
3. विशेष गाडी क्रमांक 01266 5.12.2022 रोजी नागपूरहून 15.50 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी 10.55 वाजता पोहोचेल.

इथे असतील थांबे (stops) – अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर.

रचना (Structure) – 1. विशेष गाडी क्रमांक 01262 :- 16 सामान्य द्वितीय श्रेणी.
विशेष गाडी क्रमांक 01264 आणि 01266 :- 12 सामान्य द्वितीय श्रेणी

(B) मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर अनारक्षित विशेष (6)

1. विशेष गाडी क्रमांक 01249 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 6.12.2022 रोजी 16.45 वाजता सुटेल आणि अजनीला दुसऱ्या दिवशी 09.30 वाजता पोहोचेल.
2. विशेष गाडी क्रमांक 01251 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 6.12.2022 रोजी 18.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.30 वाजता सेवाग्राम येथे पोहोचेल.
3. विशेष गाडी क्रमांक 01253 दादर 7.12.2022 रोजी 00.40 वाजता (6/7.12.2022 रोजी मध्यरात्री) सुटेल आणि त्याच दिवशी 15.55 वाजता अजनीला पोहोचेल.
4. विशेष ट्रेन क्रमांक 01255 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 7.12 2022 रोजी 12.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.00 वाजता नागपूरला पोहोचेल.
5. विशेष गाडी क्रमांक 01257 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 8.12.2022 रोजी 18.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.10 वाजता नागपूरला पोहोचेल.
6. विशेष गाडी क्रमांक 01259 दादर 8.12.2022 रोजी (7/8.12.2022 च्या मध्यरात्री) 00.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15.55 वाजता अजनीला पोहोचेल.

इथे असतील थांबे (stops) – दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी.

रचना (Structure) – विशेष गाडी क्रमांक 01249, 01255, 01247 आणि 01259 :- 16 सामान्य द्वितीय श्रेणी.
विशेष ट्रेन क्रमांक 01251 आणि 01253 :- 12 सामान्य द्वितीय श्रेणी

हेही वाचा – 14 वर्षाच्या शाळकरी पोराचे Instagram status पाहून का गाठावं लागलं Police Station?

(C) कलबुर्गी-मुंबई अनारक्षित विशेष (2)

1. विशेष गाडी क्रमांक 01245 कलबुर्गी 5.12.2022 रोजी 18.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
2. विशेष ट्रेन क्रमांक 01246 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 7.12.2022 रोजी (6/7.12.2022 च्या मध्यरात्री) 00.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 11.30 वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल.

इथे असतील थांबे (stops) –  गंगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर 

रचना (Structure) –  7 सामान्य द्वितीय श्रेणी.

(D) सोलापूर-मुंबई अनारक्षित विशेष (2)

1. विशेष गाडी क्रमांक 01247 ही 5.12.2022 रोजी 22.20 वाजता सोलापूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

2. विशेष गाडी क्रमांक 01248 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 7.12.2022 रोजी (6/7.12.2022 च्या मध्यरात्री) 00.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 09.00 वाजता सोलापूरला पोहोचेल.

इथे असतील थांबे (stops) – कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर.

रचना (Structure) – 10 सामान्य द्वितीय श्रेणी.

हेही वाचा – दुर्दैव! परदेशात मिळाली नोकरीची ऑफर पण घडलं असं की…

(E) अजनी-मुंबई वन-वे सुपरफास्ट अनारक्षित विशेष (1)

1. सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्रमांक 02040 अजनी येथून 7.12.2022 रोजी 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

इथे असतील थांबे (stops) – वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर.

रचना (Structure) – 16 सामान्य द्वितीय श्रेणी.

महत्त्वाचे (important) – मध्य रेल्वेने 6.12.2022 रोजी सुरु होणारी ट्रेन क्रमांक 11401 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-आदिलाबाद एक्सप्रेस प्रवास वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय दक्षिण मध्य रेल्वे आदिलाबाद-मुंबई विशेष ट्रेन चालवणार आहे ज्याची सूचना योग्य वेळी केली जाईल. सर्व संबंधितांनी कृपया या विशेष गाड्यांची नोंद घ्यावी आणि त्यांचा प्रवास सुखकर करावा. प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 





Source link