Unseasonal Rain in Vidarbha : अवकाळी पावसाने विदर्भाला (Unseasonal Rain) सलग दुसऱ्या दिवशी अक्षरशः झोडपून काढले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भातील(Vidarbha)  शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आज पुन्हा एकदा पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे. विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली चंद्रपूर इत्यादि जिल्ह्यात पावसानं झोडपून काढले आहे. तर वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील बहुतांश ठिकाणी बोराच्या आकाराच्या गार पडत असल्याची माहिती सामोर आली आहे. या अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

वर्धा जिल्ह्यातील  25 गावांना गारपिटीचा तडाखा

वर्धा जिल्ह्यातील  सालापुर, मारडा, कळमना, कोरा, काकरापार, मंगरूळ, रासा, मोहगा इत्यादिसह लगतच्या 25 गावांमध्ये दमदार गारपीट होत असल्याचे चित्र आहे. 11 जानेवारीच्या सायंकाळी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे. बोराच्या आकारांच्या या गारीमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी डबघाईस जाण्याची शक्यता बाळवली आहे. या नुकसान भरपाईचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनाने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने जोर धरू लागली आहे. 

यवतमाळमध्ये रब्बी हंगामातील पिकांना फटका 

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बोरी, चातारी, सावळेश्वर, माणकेश्वर, गंजगाव, कोपरा,देवसरी इत्यादींसह आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीटने हजेरी लावली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र तारांबळ उडवली आहे. त्याचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील काढणीला आलेले गहू, चना, तूर आणि ज्वारी पिकांना बसला असून शेतमालाचे मोठे नुकसान त्यात झाले आहे.  

सोमवारीही याच जिल्ह्यांना पावसाचा इशारा

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारीही काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इत्यादि जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला असून तुरळक ते विरळ पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात देखील कालपासून पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी विजांसह गारपीटची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण असणार आहे. विदर्भात 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या पाच दिवसात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना धमकीचं पत्र नेमकं कुठून आलं? समोर आली मोठी अपडेट

अधिक पाहा..



Source link