Akola News:अकोल्यात जिल्हा प्राथमिक शाळेचा (ZP school Akola) भोंगळ कारभार समोर आला आहे. अकोल्यातील दिग्रस बुद्रुक गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्गखोल्या नसल्याने खुल्या मैदानात शाळा भरत आहे. मात्र, इथं विद्यार्थ्यांसोबत काही वेगळच घडत असल्याचे चित्र आहे. झाडाखाली भरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाकांवर विषारी अळ्या पडत असून त्याचा विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.

जिल्हा परिषदच्या शालेयमध्ये (Primary education Akola) अपेक्षित वर्ग खोल्या नसल्याने येथील शिक्षक काही वर्ग खुल्या मैदानात भरत आहे. झाडाखाली सुरू असलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे बेंचवर झाडावरील विषारी अळ्या पडत असल्याने विद्यार्थ्यांचा जीविताला धोका असल्याच पालकांच म्हणणं आहे.

दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वर्गखोल्या बांधण्यात याव्या अन्यथा रास्ता रोको आंदोलन व शाळेला कुलूप ठोकू, असा इशारा विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलाय. शाळेच्या परिसरात असलेल्या झाडावर मोठ्या प्रमाणांत विषारी अळ्यांचा प्रादूर्भाव दिसून येतोय. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

जालन्यातही शाळा मोडकळीस आल्याने पत्र्यावरचे उपोषण चर्चेत

जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील दाढेगावच्या जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आली आहे. यासाठी ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे याचे पत्र्यावरचे आमरण उपोषणाची चर्चा होत आहे. प्रशासनाने शाळेची दुरुस्ती आणि नवी इमारत बांधून द्यावी यासाठी शाळेच्या जीर्ण व मोडकळीस आलेल्या पत्र्यावर असून शाळेच्या दूरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. परिणामी आता राज्यातील एकूणच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हेही वाचा:

Jalna News: मोडकळीस आलेल्या शाळेच्या पत्र्यावर 3 दिवसांपासून उपोषण, आंदोलकाची तब्येत खालावली

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..Source link