बीड : Pankaja Mundhe On Shiv Sena Dasara Melava: शिवसेनेतून बंडखोरी करुन एकनाथ शिंदे आणि समर्थक बाहेर पडल्यानंतर यावर्षी मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागले आहे. राज्याच्या सत्तासंघर्षातला कळीचा मुद्दा ठरलेला दसरा मेळावा आज शिंदे गट आणि ठाकरे गट साजरा करत आहेत. एकमेकांवर शरसंधान, आरोप प्रत्यारोप, राजकीय तोफा आज शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर डागतील. या मेळाव्याची उत्सुकता मोठी आहे. याबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 शिंदे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून शिंदे गटाने मेळाव्यासाठी 3 लाख लोक येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. शांतते या, मात्र गाजत वाजत या, असे ठाकरे यांनी आवाहन केले होते. त्यानंतर आज मुंबईत मोठ्या प्रमाणात शिवेसनेचे कार्यकर्ते दाखल झाले आहेत.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे, भाषण ऐकणार?  तुम्ही कोणाला प्राधान्य देणार, असा प्रश्न विचारला असता पंकजा म्हणाल्या की,  मी दोघांचंही भाषण ऐकणार आहे. मी दोघांच्याही मेळाव्याकडे कुतूहलाने बघते. आज खऱ्या अर्थाने दोघांच्याही सीमोल्लंघनांचा दिवस आहे. जनतेच्या प्रश्नांचं, विषयांचे सीमोल्लंघन करतील, जनतेच्या मनाला हात घालतील, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

दरम्यान, मुंबईत आलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी वडापाव, रेल्वे स्थानकावरच जेवणाच्या पंगती उठल्या आहेत. तर नेत्यांना शाही जेवण असल्याचे पाहायला मिळाला. दरम्यान, यावेळी शिंदे गटाला त्यांनी टोला लगावला. माझा मेळावा शहरातल्या मोठ्या मेळाव्यांसारखा नाही. इथे मोठी व्यवस्था नाही, खुर्च्या नाहीत, जेवणाची सोयही नाही, पण गेल्या अनेक वर्षापासून लोक इथे येत आहेत. जेवणाचा डबाही घरुनच घेऊन येतात. माझा मेळावा कोणत्या राजकीय पक्षाचा नाही, तो वंचितांचा आहे, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा झाला. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तत्पूर्वी खासदार डॉ. प्रीतम मुंडे या परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्या आहेत. मुंबईत ज्या पद्धतीने दोन दसरा मेळावा होता त्याच पद्धतीने पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी भगवान गडाच्या पायथ्याशी पारंपारिक पद्धतीने दसरा मेळावा होतोय अशी चर्चा आहे.  भगवानगडावर पारंपारिक पद्धतीने दसरा मेळावा यावर्षीपासून सुरु झाला. जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, विनोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीपासून दसरा मेळावा भगवानगडावरती पारंपारिक पद्धतीने झाला. परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्यानंतर खासदार प्रीतम मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा सावरगाव घाटकडे रवाना झाला. परळी येथील गोपीनाथ गड ते सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर प्रीतम मुंडे यांची रॅली काढण्यात आली. शिरसाळा, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड अशा मुख्य ठिकाणी प्रीतम मुंडे यांचं मुंडे समर्थक स्वागत केले.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?

मंचावर नातमस्तक होत पंकजा मुंडे यांनी जनतेला अभिवादन केलं. जसx स्वाभिमानाने जन्माला घातलं तस स्वाभिमानाने मरण यावा.  हा मेळावा चिखल तुडवणाऱ्याचा आहे. मी कधी कुणावर आरोप केले नाहीत, कधी संधीचा फायदा घेतला नाही ते आमच्या रक्तात नाही. मी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचा वारसा चालवते. तसा पंडित दीनदयाल, अमित शाहा यांचा वारसा चालवते. मी ज्यांचा वारसा चालवते त्यांच्या बद्दल वाईट कसं बोलणार. मी असुरक्षित नाही माझ्या समाजाला जे मिळालं त्यात मी खूश आहे. माझे लोक शेततळं आहेत का ? जे समाजाच्या विरोधात असतील त्यांना माफी नाही.  व्यक्ती श्रेष्ठ नाही संघटना श्रेष्ठ आहे. मी आमदार नाही खाजदार नाही. काही नाही. मी स्वाभिमान देऊ शकतेमला गर्व नाही, पण स्वाभिमान आहे. मी असत्य बोलत नाही, असे पंकजा म्हणाल्या.





Source link