सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी (crime) वाढत असून हत्याकांडाच्या (massacre) घटनांतही सातत्याने वाढ होत आहे. राज्यात गेल्या वर्षभरात 2 हजार 330 हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. मात्र यातील सर्वाधिक हत्याकांड अनैतिक संबंधातून (Immoral relationship) घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्येचे माहेरघर आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेले पुणे (Pune) शहर अनैतिक संबंधातून घडणाऱ्या हत्याकांडांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. (Pune ranks first in the crime of immoral relationship)

पुण्यात (Pune)अनैतिक संबंधातून सर्वाधिक 10 हत्याकांड घडले आहेत. तर नागपुरात (Nagpur) 7 हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार आहे. मुंबईत (Mumbai) मात्र केवळ 3 हत्याकांड अनैतिक संबंधातून घडल्याची नोंद आहे. अनैतिक संबंधातून घडलेल्या हत्याकांड राज्यात पुणे (Pune) शहर पहिल्या स्थानावर आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्यावर्षी 2 हजार 330 खुनाच्या घटना घडल्या आहेत. हत्याकांड घडण्यास अनेक कारणे जबाबदार आहेत. त्यात जुने वैमनस्य, राजकीय द्वेष, युवक-युवतीमधील प्रेमसंबंध, विवाहित महिला व पुरुषांचे असलेले अनैतिक संबंध, दरोडा टाकताना केलेला विरोध, धार्मिक तेढ, कौटुंबिक वाद, संपत्तीच्या वादासह अन्य कारणांचा समावेश आहे.

अनैतिक संबंधातून घडलेले गुन्हे
राज्य – खून
महाराष्ट्र – 232
आंध्रप्रदेश – 186
मध्यप्रदेश – 161
कर्नाटक – 152
तामिळनाडू – 140

दरम्यान, पत्नीचे अन्य पुरुषांशी किंवा पतीचे अन्य विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधातून सर्वाधिक हत्याकांड राज्यात घडले आहे. पत्नीचे प्रियकरासोबत असलेल्या प्रेमसंबंधाबाबत पतीला कुणकुण लागल्यामुळे खून केल्याच्या घटनांमध्येसुद्धा गेल्या वर्षांत वाढ झाल्याची नोंद आहे





Source link