मुंबई : सत्ता संघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकारने जवळपास तीन महिन्यानंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. (Guardian Ministers Thane)  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला असणाऱ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याची प्रत्येकाला उत्सुकता होती. फडणवीसांकडेच नागपूरचं पालकमंत्रिपद राहिलं आहे. (Shambhuraj Desai Guardian Minister of Chief Minister Eknath Shindes Thane District) मात्र दुसरीकडे शिंदे यांनी आपल्या मर्जितल्या नेत्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे. (CM Announced Guardian Ministers list)

एकनाथ शिदेंनी पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या शंभूराज देसाई यांना ठाण्याचा ‘ठाणेदार’ बनवलं आहे. (Shambhuraj Desai Guardian Minister Thane)  देसाईंना पालकमंत्रीपद दिल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला असावा. ज्यावेळी शिंदें बंड पुकारत गुवाहाटी गेले होते तेव्हा ठाकरेंचा हात सोडत पहिला धक्का देणारे आमदार शंभूराज देसाई होते. याबाबत अनेकवेळा फेम ‘काय झाडी काय डोंगर’ सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.
 
मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर आणि ठाणे या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याची सर्वांना उत्सुकता होती. दीपक केसरकरांकडे मुंबई शहराची तर मुंबई उपनगरचं मंगलप्रभात लोढा,ठाण्याचं शंभूराज देसाई यांच्याकडे देण्यात आलं आहे.  देवेंद्र फडणवीसांकडे नागपूरसह एकूण सहा जिल्ह्यांची जबाबदारी आहे. 

पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे (CM Announced Guardian Ministers list)

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – बुलढाणा, दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे- सांगलीसंदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,
अतुल सावे – जालना, बीड, शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर





Source link