भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज १३४वी जयंती, अभिवादनासाठी हजारो भिम अनुयायी चैत्यभूमीवर होणार दाखल, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्रीही करणार अभिवादन

रायगडचा पालकमंत्री मीच होणार, अमित शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी तातडीनं मुंबईला बोलावल्यानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

अजित पवारांची अमित शाहांकडे तक्रार केल्याच्या चर्चेचं स्वतः एकनाथ शिंदेंकडून खंडन, महायुतीत सगळं आलबेल असल्याचा दावा, तर शिंदेंचे मंत्री राठोडांकडूनही अर्थखात्याच्या समभाव धोरणाचं कौतुक

रायगडावरील कार्यक्रमाचं खासदार उदयनराजेंना आमंत्रण मग खासदार शाहू महाराजांना आमंत्रण का नाही, संजय राऊतांचा सवाल तर निमंत्रण मिळेल अशी आशा नव्हती, शाहू महाराजांनीही आवळला नाराजीचा सूर

दहशतवादी तहव्वूर राणाला कारागृहात कुराणाची प्रत आणि पेन सुपूर्द, पाच वेळा नमाज अदा करत असल्याची माहिती, पेननं स्वतःला इजा करू नये म्हणून राणावर करडी नजर

टँकर असोसिएशनच्या संपामुळे मुंबई महापालिका अॅक्शन मोडवर, आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू, संप मागे घेणार का याकडे लक्ष

धाराशिवमधील यात्रा उत्सवात कुख्यात गुंड निलेश घायवळला मारहाण.. अहिल्यानगरचा पैलवान सागर मोहोळकरनं मारहाण केल्याची माहिती, गुन्हा दाखल’अमेरिकेतल्या बेकायदा नागरिकांनी ३० दिवसांत देश सोडावा’ अमेरिकेच्या सरकारनं सोडलं फर्मान, ३० दिवसांत अमेरिकेबाहेर न गेल्यास दंड आणि कारावास…

चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर १२ धावांनी रोमहर्षक विजय, शेवटचे तीन फलंदाज सलग तीन चेंडूवर धावबाद, दिल्लीचा यंदाचा पहिला पराभव तर मुंबईचा दुसरा विजय..

Source link