बारामतीत हैदराबादच्या नवाबाचा घोडा! किंमत 11000000… भारतातील एकमेव अश्व

बारामतीत हैदराबादच्या नवाबाचा घोडा! किंमत 11000000… भारतातील एकमेव अश्व



बारामतीच्या कृषी प्रदर्शनात हैदराबादच्या नवाबाचा 11 कोटींचा घोडा चर्चेत आसला आहे. हा घोडा बघायला गर्दी लोटली आहे.



Source link

माझी विनंती मान्य केल्याबद्दल आभार! अजित पवार यांची बीडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर धनंजय मुंडेची प्रतिक्रिया

माझी विनंती मान्य केल्याबद्दल आभार! अजित पवार यांची बीडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर धनंजय मुंडेची प्रतिक्रिया


Maharashtra Guardian Ministers :  बहुप्रतीक्षित पालकमंत्रिपदांची यादी जाहीर झाली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोलीची जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे बीड आणि पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल, धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच  अभिनंदन केलं आहे. 

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे.

बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो.

सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

बीडमधील जे प्रश्न आहेत, ते इतके जटील झाले आहेत ते पाहता अजित पवार यांनी तिथे स्वतः जाणे पसंत केले असेल. पालकमंत्री पदाची जबाबदारी वाटण्याचे काम हे सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा असते. कोणाला कुठला पालकमंत्री पद दिल यावर टीका टिपणी करण्यापेक्षा ज्याला जी जबाबदारी दिलेत ते कशा पद्धतीने पार पाडतात हे पाहुयात अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. 

 





Source link

गुजरातच्या वनविभागामुळे महाराष्ट्रातील लोकांचा जीव धोक्यात! नर्मदेच्या पत्रातून बिबट्यांना…

गुजरातच्या वनविभागामुळे महाराष्ट्रातील लोकांचा जीव धोक्यात! नर्मदेच्या पत्रातून बिबट्यांना…



Gujarat Vs Maharashtra Leopard Issue: मागील अनेक दिवसांपासून हे असले प्रकार सुरु असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त करताना थेट राज्य सरकारला सवाल केला आहे.



Source link

संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंसमोर आता नवं संकट! 'त्या' निर्णयाविरोधात कोर्टात याचिका

संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंसमोर आता नवं संकट! 'त्या' निर्णयाविरोधात कोर्टात याचिका



बीड मस्साजोग प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात आले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणामुळे आधीच अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंसमोर आता नवं संकट उभं राहिलंय. कृषी साहित्य खरेदीचं धोरण का बदललं, असा सवाल कोर्टानं राज्य सरकारला केलाय. त्यामुळे आता या प्रकरणातही धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 



Source link

Pune Narayangaon Accident: ओव्हरटेकच्या मोहापायी 9 जणांनी गमावले प्राण; पुण्यात विचित्र अपघात

Pune Narayangaon Accident: ओव्हरटेकच्या मोहापायी 9 जणांनी गमावले प्राण; पुण्यात विचित्र अपघात



Narayangaon Accident: आज सकाळच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातामध्ये सहा प्रवाशांची जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघांनी उपचारादरम्यान प्राण सोडले.



Source link

बॉडी स्प्रे वापरणाऱ्यांनो सावधान! चुकूनही स्वयंपाकघरात नेऊ नका, कर्जतमध्ये काय घडलंय पाहा

बॉडी स्प्रे वापरणाऱ्यांनो सावधान! चुकूनही स्वयंपाकघरात नेऊ नका, कर्जतमध्ये काय घडलंय पाहा


बॉडी स्प्रे वापरणाऱ्यांना सावध करणारी एक महत्त्वाची बातमी. कर्जतमध्ये एका लहान मुलानं खेळता खेळता बॉडी स्प्रे स्वयंपाकघरात नेला आणि गॅसजवळ ठेवला. त्यानंतर जे झालं त्यानं संपूर्ण परिसर हादरुन गेला. 

बॉडी स्प्रे वापरत असाल तर सावधान!

बॉडी स्प्रेमुळे तुमच्याही घरात होऊ शकतो स्फोट

कर्जतमधील घटनेनं राज्यात खळबळ

बॉडी स्प्रेच्या या छोट्याशा बाटलीने कर्जतमधल्या घराची अशी दशा केली आहे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत शहरात राहणारे राहुल डाळींबकर यांच्या घरात बॉडी स्प्रेच्या बाटलीचा स्फोट झाला. त्याचं झालं असं डाळींबकर यांचा छोटा भाचा स्वयंपाकघरात खेळत होता. त्याच्या हातात बॉडी स्प्रेची बाटली होती. त्यानं तो बॉडी स्प्रे गॅसच्या शेगडीजवळ ठेवला. मात्र गॅसच्या उष्णतेनं अचानक बॉडी स्प्रेचा मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजानं परिसर हादरून गेला. या स्फोटात डाळींबकर यांच्या भाच्यासह घरातील सगळे सुदैवाने बचावले. पण घरावरील छपराचे पत्रे उडाले. खिडक्यांच्या काचा फुटल्या. धक्कादायक म्हणजे घरातल्या भिंतीत या काचा घुसल्या. घराच्या भिंतींना तडेही गेले. 

बॉडी स्प्रे हा ज्वलनशील पदार्थ

परफ्युम, बॉडी स्प्रेमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त

कल्कोहोल नसलं तरी इतर घटक ज्वलनशील

आग किंवा उष्णतेच्या संपर्कात आल्यावर बॉडी स्प्रेचा स्फोट

विमानातही परफ्युम, बॉडी स्प्रे नेण्यावर बंदी

त्यामुळं मुलांच्या हातात बॉडी स्प्रे देताना आणि स्वत:ही बॉडी स्प्रे वापरताना योग्य काळजी घ्या.. नाहीतर अपघाताला निमंत्रण मिळू शकतं.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp