by Hansraj Agrawal | Dec 20, 2024 | Trending News
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाबद्दल एक महत्वाच विधान केलंय. केवळ हिंदु हिंदू म्हंटल तर कोणी हिंदूंचा नेता होत नाही. असं म्हणत त्यांनी उथळ बोलणाऱ्यांना एक प्रकारे चपराकच लगावलीये. भागवतांच्या विधानावर अनेक राजकीय प्रतिक्रीयाही समोर आल्यात.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 20, 2024 | Trending News
Akhilesh Shukla Detained: कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाला (Akhilesh Shukla) ताब्यात घेण्यात आलं आहे. व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिल्यानंतर अखिलेश शुक्लाने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण तापलं होतं आणि तेव्हापासून अखिलेश शुक्ला गायब झाला होता. अखेर दोन दिवसांनी तो समोर आला असून व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं. दरम्यान याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
नेमकं घडलं काय?
कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस इमारतीत बुधवारी झालेल्या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या हाय प्रोफाईल इमारतीत अखिलेश शुक्ला हा अधिकारी वास्तव्यास आहे. त्याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कल्वीकट्टे राहतात. बुधवारी रात्री अखिलेश शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता. धूपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होत होता. याबाबत शेजारी विजय कल्वीकट्टे याने शुक्ला याला टोकले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. शुक्ला याने आपल्या मित्रांना बोलावून अभिजीत देशमुख यांना मारहाण केली. या वादात हस्तेक्षेप करण्यास गेलेल्यांनाही शुक्लाने मारहाण केली. या प्रकरणावरुन संताप व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्र्यांनीही यावरुन निवेदन केलं आहे.
फडणवीसांकडून निलंबनाची घोषणा
“अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने मराठी माणसाला अपमानित होईल असा उल्लेख केला आणि त्यातून संतापाची लाट लोकांमध्ये निर्माण झाली आहे. शुक्ला हा एमटीडीसीमधे काम करणारा व्यक्ती आहे. त्याच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई सुरू झाली आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये दिली. पुढे बोलताना फडणवीसांनी, “जे माज करतात त्याचा माज उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही. मराठी माणूस कुणाच्या काळात बाहेर गेला? वसई विरारला कोणाच्या काळात मराठी माणूस गेला याचा शोध घ्यायला हवा,” असा टोलाही लगावला.
अखिलेश शुक्लाचं स्पष्टीकरण
“दोन दिवसांपासून माझ्या संबंधी प्रकरण व्हायरल होत आहे. नेमकं काय झालं आहे मला सांगायचं आहे. एक वर्ष आधी मी माझ्या घराच्या इंटिरिअरचं काम केलं. यावेळी मी माझा शू रॅक उजव्या बाजूला घेतला. यावर देशमुख, काळवीट्टे कुटुंब यांनी आक्षेप घेतला. ते आम्हाला एका वर्षापासून त्रास देत होते. आम्ही हा तोडून फेकू अशी धमकी देत होती. माझ्या बायकोलाही ते त्रास देत होते. शिवीगाळ करत होते. मी ऑफिसमधून आल्यानंतर पत्नी मला याबाबत सांगायची. पण मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो,” असा दावा अखिलेश शुक्लाने केला आहे.
“परवा माझ्या बायकोने घराबाहेर धूप लावला होता. काळविट्टे कुटुंबाने यावर आक्षेप घेतला. आम्ही तुम्हाला येथे राहू देणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्यांनी माझ्या बायकोला शिवीगाळ केला. मी आल्यावर वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर देशमुख कुटुंब आलं आणि बायकोला शिवीगाळ केली. त्यांनी जोरजोरात दरवाजा आपटला आणि बायकोचे केस ओढून कानाखाली मारली. मी सोडवण्याचा प्रयत्न केला असता मलाही शिवीगाळ कऱण्यात आली,” असाही त्याचा दावा आहे.
“व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात भांडण दिसत आहे. पण त्याआधी काय घडलं हे कोणाला माहिती नाही. देशमुख कुटुंब एक वर्षांपासून त्रास देत होते. माझ्या मराठी मित्रांनी मला सहकार्य केलं आणि वाचवलं. आमची पाचवी पिढी महाराष्ट्रात असून, आम्ही अमराठी आहोत असं कधी वाटलं नाही. त्यांनीच आम्हाला तुम्ही भय्या आहात, आम्ही तुमचं काय करतो पाहा अशी धमकी दिली. त्यानंतर माझ्या मराठी मित्रांनी मला वाचवलं. मीदेखील महाराष्ट्रीयन आहे. मी स्वतःला मराठी भाषिक समजतो,” असंही त्याने म्हटलं आहे.
शुक्ला याने यावेळी आपल्या जुन्या शेजारीपणाच्या वादाला राजकीय वळण देण्याच्या प्रयत्नांचा निषेध केला. त्याने या घटनेचा सखोल तपास करून सत्य बाहेर यावे, अशी मागणी केली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 19, 2024 | Trending News
Elephanta Caves : एलिफंटा लेणींमध्ये दगडी कोरीव शिल्पे कोरलेली आहेत. ही बौद्धकालीन आहे. तसेच या लेण्यांमध्ये प्राचीन शिवमंदिर देखील आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 18, 2024 | Trending News
पुढील
बातमी
महाराष्ट्रातील नेत्यांना राजकीय आजाराची लागण! अजित पवारांच्या आजारावर खातेवाटपाचं औषध?
Source link
by Hansraj Agrawal | Dec 18, 2024 | Trending News
Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दादा म्हणून हाक मारणाऱ्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 17, 2024 | Trending News
Nagpur Goa Shaktipeeth Expressway : कोल्हापूरमार्गे कोकणात जायचे असेल तर आंबोली घाटाशिवाय पर्याया नाही. मात्र, भविष्यात कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाताना आंबोली घाट लागणार नाही. विशेष म्हणजे कोल्हापूर ते सिंधूदुर्ग हा चार तासांचा प्रवास फक्त एका तासांत पूर्ण होणार आहे. हे शक्य होणार ते नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे (nagpur goa shaktipeeth expressway).
शक्तीपीठ महामार्ग हा महायुती सरकारचा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प आहे. राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग गेम जेंचर ठरणार आहे. 2023 मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. हा 802 किमी लांबीचा ग्रीनफिल्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडणार आहे. राज्यातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार असल्याने या महामार्गाला ‘शक्तीपीठ’ महामार्ग असे नाव देण्यात आलं होते. सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने 18 तास लागतात, मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ आठ तासात होणार आहे.
हा सहा पदरी शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, नांदेड, परभणी, , धाराशिव, यवतमाळ, हिंगोली बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणेज शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई , तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. यासोबतच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही हा माहामार्द जोडला जाणार आहे. याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर , नांदेडमधील गुरु गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर , पट्टणकोडोली, कणेरी , आदमापूर तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार आहे.
या महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असतील तर 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असणार आहेत. या महामार्गातील सर्वात महत्वाचा टप्पा आहे आंबोली घाट सेक्शनमध्ये. आंबोली घाटाच्या पश्चिम घाटाखाली 2 बोगदे बांधण्याचे नियोजन आहे. हा बोगदा 21.9 किलोमीटर लांब असेल. हा देशातील सर्वात लांब बोगदा ठरु शकतो. हा बोगदा तयार झाल्यावर कोल्हापूर ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रवास फक्त 1 तासात होणार आहे. कारण आंबोली घाटमार्गे हा प्रवास तब्बल चार तासांचा आहे.
शक्तीपीठ महामार्गात अडथळे असतील तर पर्याय शोधले जातील. विरोध असलेल्या भागात फ्लायओव्हर किंवा सध्या असलेल्या माहामार्गाला शक्तीपीठ महामार्ग जोडता येईल अनुषंगाने बदल केले जातील असे सांगत लवकरच शक्तीपीठ महामार्गाबाबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.
Source link