महाराष्ट्राने गुजरातलाही मागे टाकलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

महाराष्ट्राने गुजरातलाही मागे टाकलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा


Foreign Direct Investment In Maharashtra : देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आहे. पहिल्या तिमाहीमध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या आठ राज्यांच्या गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षाही राज्यात अधिक गुंतवणूक असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. गेली २ वर्ष परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक १वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.

कोणत्या राज्यात किती गुंतवणूक?

महाराष्ट्रात एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तीन महिन्यात एकूण 70 हजार 795 कोटींची गुंतवणूक आली. दुस-या क्रमांकावर आहे कर्नाटक. कर्नाटकात 19,059 कोटींची गुंतवूक झाली.  तर तिस-या  क्रमांकावरील दिल्लीत 10,788 कोटी गुंतवणूक आली. तेलंगणा चौथ्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे 9 हजार 23 कोटींची गुंतवणूक आहे.  तर महाराष्ट्रातले विरोधक सातत्याने ज्या गुजरातचा उल्लेख करतात ते राज्य पाचव्या क्रमांकावर आहे.. गुजरातमध्ये फक्त 8 हजार 508 कोटींची गुंतवणूक आलीय.  सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडूत 8,325 कोटी), सातव्या क्रमांकावरील हरयाणात 5,818 कोटी तर आठव्या क्रमांकावरील उत्तरप्रदेशमध्ये फक्त 370 कोटींची परकीय गुंतवणूक आलीय.  तर नवव्या क्रमांकावरील राजस्थानमध्येही 311 कोटींची परकीय गुंतवणूक आलीय. देशातल्या या सर्व राज्यांच्या बेरजेपेक्षाही अधिक परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे..

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.  या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46 टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे. यापूर्वी 2022-23 मध्ये 1 लाख 18 हजार 422 कोटींची गुंतवणूक आली होती.  तर 2023-24 मध्ये 1,25,101 कोटी गुंतवणूक आली होती.  राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण : 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. अडीच वर्षांत आम्ही 5 वर्षांचं काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितलं होतं. आता सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे, असंही फडणवीसांनी सांगितले. 





Source link

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आकडेवारी

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आकडेवारी


Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आहे. पहिल्या तिमाहीमध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या आठ राज्यांच्या गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षाही राज्यात अधिक गुंतवणूक असल्याचं  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? 

2020 आणि 2021 साली महाराष्ट्र गुंतवणुकीमध्ये मागे गेला होता. 2014 ते 2019 यावेळी तो आम्ही पहिल्या क्रमांकावर ठेवला होता. त्यावेळी गुजरात आणि कर्नाटक पुढे गेले होते. ज्यावेळी सरकार आलं त्यावेळी मी सांगितलेले की थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राला परत पहिल्या क्रमांकावर आणू. त्यानंतर 2022-23 मध्ये ते आम्ही पहिल्या क्रमांकावर आणले. मागच्या वर्षी देखील आपल्या नंतरची जी मोठी राज्य आहेत. गुजरात, कर्नाटक आणि दिल्ली असेल, यांच्या एकत्रित गुंतवणुकी पेक्षा जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रात आली होती. यावेळी तर आपण सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. 52 % गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. जे लोकं नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत होते. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर चालले आहेत. आज त्यांना या आकड्यांने पूर्ण उत्तर मिळालं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

अभिनंदन महाराष्ट्र ! अतिशय आनंदाची बातमी !! देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात !!! गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसर्‍या क्रमांकावरील कर्नाटक (19,059 कोटी), तिसर्‍या क्रमांकावरील दिल्ली (10,788 कोटी), चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा (9023 कोटी), पाचव्या क्रमांकावरील गुजरात (8508 कोटी), सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू (8325 कोटी), सातव्या क्रमांकावरील हरयाणा (5818 कोटी), आठव्या क्रमांकावरील उत्तरप्रदेश (370 कोटी), नवव्या क्रमांकावरील राजस्थान (311 कोटी) या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे.

थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46 टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे.

यापूर्वी2022-23 : 1,18,422 कोटी (कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक) 2023-24 : 1,25,101 कोटी (गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात+कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक)

राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण : 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. अडीच वर्षांत आम्ही 5 वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 





Source link

मनोज जरांगे-अब्दुल सत्तारांमध्ये बंद दाराआड तीन तास चर्चा, जरांगेंचा फडणवीसांनाही फोन

मनोज जरांगे-अब्दुल सत्तारांमध्ये बंद दाराआड तीन तास चर्चा, जरांगेंचा फडणवीसांनाही फोन



Maharashtra Politics : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा दिलाय.. याच वेळी मंत्री अब्दुल सत्तारांनी जरांगेंची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चासुद्धा केली. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचवेळी जरांगे आणि फडणवीसांमध्ये फोनवरुन चर्चाही झाली
 



Source link

बदलापूर ते पनवेल अंतर 10 मिनिटांत गाठता येणार; महाराष्ट्रात तयार होतोय सर्वात लांब बोगदा

बदलापूर ते पनवेल अंतर 10 मिनिटांत गाठता येणार; महाराष्ट्रात तयार होतोय सर्वात लांब बोगदा



Badlapur To Panvel Tunnel: जेएनपीटी महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा असणार आहे. बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा बोगदा असून बोगद्याचं काम 15 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत काम पूर्ण केले आहे. 



Source link

देवाक् काळजी! जादा गाड्या, आरक्षित तिकिटांचं काय? एसटी कामगारांच्या आंदोलनामुळं प्रवासी बुचकळ्यात

देवाक् काळजी! जादा गाड्या, आरक्षित तिकिटांचं काय? एसटी कामगारांच्या आंदोलनामुळं प्रवासी बुचकळ्यात



MSRTC ST Bus Epmloyees Strike : गाव गाठायचाय पण, हे कसं शक्यंय? एसटी कर्मचाऱ्यांच्या आमदोलनामुळं प्रवाशांपुढे अडचणींचा डोंगर. आता पुढे काय? पाहा सर्वात मोठी अपडेट
 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp