अमोल कोल्हे यांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा राडा; महाविकासआघाडीत महाबिघाडी
शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला.
Source link
शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला.
Source link
लोकसभा निवडणुकीत महाविकासघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. यामुळे महायुतीवर दबाव आला आहे. अशातच आता महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून नाराजी नाट्य रंगले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उद्धव ठाकरे यांच्यावर भडकले आहेत.
Source link
Rohit Pawar On Jayant Patil : लोकसभा निवडणूक निकालांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं 10 जागांवर निवडणूक लढवली होती, त्यापैकी 8 खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे 80 टक्के स्ट्राईक रेटसह आम्ही जिंकलोय, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. सांगलीत राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या जाहिरातीत जयंत पाटील (Jayant Patil) यांचा ‘विजयाचा सेनापती’ असा उल्लेख करण्यात आला आहे. जयंत पाटलांच्या पोस्टची जोरदार चर्चा झाली होती. अशातच आता रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता शरद पवार गटातच श्रेयवादाची लढाई सुरू झालीये का? असा सवाल विचारला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळालं, याचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं गेलं पाहिजे. गावागावात जाऊन त्यांनी काम केलंय. मी फक्त एवढंच म्हणतील काहीजण म्हणतील किंवा मी सुद्धा म्हणेल, मी किंगमेकर आहे.. मी ‘सेनापती’ आहे.., पण हे फक्त एक दोन सेनापतीचं काम नव्हतं तर तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांने केलेल्या कामामुळे हे यश आपल्याला मिळालं आहे. पवार साहेबांनी जे कष्ट या वयामध्ये घेतलेत, त्याचं हे फळ आहे. येत्या काळात आपल्याला एकत्रित रहायचंय, असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे आता रोहित पवार यांना निशाणा नेमका कोणावर होता? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. रोहित पवारांनी भाषणावेळी निवडणुकीत बजावलेल्या मोलाच्या कामगिरीबद्दल जयंत पाटील यांचे आभार देखील व्यक्त केले.
पुढच्या डिसेंबर महिन्यात शरद पवार 85 वर्षांचे होते आहेत, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला कमीत कमी 85 जागा निवडून द्यायच्या आहेत, असा एल्गार रोहित पवारांनी यावेळी केला. लोकसभेत आपले 8 खासदार निवडून आले, 2 उमेदवार जिद्दीने लढले. नकली चोरलेली राष्ट्रवादी त्यांचा स्ट्राईक रेट हा केवळ 25 टक्के होता. भाजपचा स्ट्राईक रेट 34 टक्केच होता, अशी टीका रोहित पवार यांनी केली. लोकसभेचं यश डोक्यात गेलं नाही पाहिजे, आपल्याला विधानसभा मोठ्या जिद्दीने लढायची आहे, असंही रोहित पवार यांनी यावेळी म्हटलंयय.
दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते शरद पवारांच्या पक्षात परत जाणार का? याची पुन्हा चर्चा सुरु झालीय. कारण संपर्कात आहेत ते येणारच आहेत. मला आकडा विचारु नका, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलंय. तेव्हा अजित पवार गटातील नेते शरद पवार गटात घरवापसी करण्याबाबतच्या चर्चांना उधाण आलंय. त्याआधी माझा फोनचा वापर आजकाल वाढलाय, असं म्हणत जयंत पाटलांनी सुचक संकेत दिले होते. अशातच आता अजित पवार गटात चलबिचल सुरू झाल्याचं चित्र पहायला मिळतंय.
Supriya Sule Reaction On Murlidhar Mohol : नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी 7.15 वाजता तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संधी देण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात मोहोळ यांना स्थान मिळाले आहे. आता यावर खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. पुण्याला मंत्रिपद मिळालंय याचा मला आनंद आहे. पण त्याचा फायदा कॅान्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.
“पुण्यात प्रशासन नाही. आज मी कोयता गँगने तोडफोड केल्याची बातमी पाहिली. पुण्यात पाणी तुंबतय. ससूनची बदनामी सुरु आहे. ड्रग्ज सुरु आहे. पुण्यासाठी पक्ष विरहीत फोरम स्थापन करा. पुण्यातील उद्योग बाहेर जात आहेत. ही चिंतेची बाब आहे. पुण्याला मंत्रीपद मिळालंय, त्याचा मला आनंद आहे. पण त्याचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“यापुढे देश संविधानानेच चालेल, हे देशातील जनतेने दाखवून दिले आहे. पन्नास खोके इज नॅाट ओके हे जनतेने सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने जबाबदारी वाढली. युगेंद्र पवार हे कुस्तीचे काम चांगले करत होते. त्यांना हटवने दुर्दैंवी आहे. त्यांना काढता येते का नाही हा देखील प्रश्न आहे. गेल्या 25 वर्षात आमचा पक्ष स्वत:च्या कर्तृत्वाने सत्तेत राहिला आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा”, अशी अपेक्षाही सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे.
यावेळी सुप्रिया सुळेंना अजित पवार गटाला मंत्रिपद न मिळाल्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर सुप्रिया सुळेंनी मी दुसऱ्याच्या घरात डोकावून बघणार नाही, असे म्हटले. भाजप सहयोगी पक्षांना कसं वागवते हे आम्ही जवळून पाहिले आहे.
पुण्यामध्ये पावसामुळे लोकांचे हाल झाले. सलग तीन वेळा पाणी साचलं. या सगळ्याला राज्य सरकार जबाबदार आहे. महापालिकेच्या निवडणुका घ्या म्हणून आम्ही मागे लागलोय. पण निवडणूक घेत नाहीत. महाविकासआघाडीमध्ये किंवा काँग्रेसचे केंद्रात सरकार असताना आम्ही मान, सन्मान, टॅलेंट वर आम्ही मंत्रीपदं दिली होती. गेली सात वर्षे सगळीकडे त्यांची सत्ता होती. त्यामुळे करांच्या प्रश्नांना तेच जबाबदार आहेत, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले.
Modi Government 3rd Term Ajit Pawar NCP Group : सलग तिस-यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद मोदींनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. सोबत 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभाराचे राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्री अशी एकूण 72 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या वाट्याला दोन कॅबिनेट तर चार राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत. सात खासदार असूनही शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले नाहीच. तर एकही खासदार नसताना आठवलेंना पुन्हा राज्यमंत्रीपद मिळाले आहे. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खासदाराला मात्र, मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतलीय. मोदी 3.0 कॅबिनेटमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली… तर काही विद्यमान मंत्र्यांचे पत्ते कट करण्यात आले. महाराष्ट्रातून मोदी सरकारमध्ये 6 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, चर्चा होतीय ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागा जिंकता आली. राष्ट्रवादीला 1 मंत्रीपद मिळेल, अशी आशा होती. मात्र मंत्रीमंडळात त्यांना स्थानच मिळालेलं नाही.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशी ऑफर देण्यात आली होती. मात्र, प्रफुल्ल पटेलांनी ती नाकारली आणि पुढील वेळेस मंत्रीपद दिलं तरी चालेलं असं सांगण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिलीये.
कॅबिनेट मंत्री राहिल्यानं राज्यमंत्रीपद स्वीकारणं योग्य वाटलं नाही असं स्पष्टीकरण स्वत: प्रफुल्ल पटेलांनी दिलंय…त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपल्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणालेत…राष्ट्रवादीत सर्व आलबेल असल्याचंही पटेलांनी स्पष्ट केलं…तर केंद्रीय मंत्रीपदावर ठाम असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय…
एक खासदार निवडून आलेल्या राष्ट्रवादीला कॅबिनेट देणे अशक्य असल्याने मंत्रिमंडळातील सहभाग खोळंबला. एकिकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार असून देखील त्यांना केवळ 1 राज्यमंत्रीपद मिळत असल्याने दुसरीकडे केवळ 1 खासदार असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद कस द्यायचा हा प्रश्न होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही इच्छुक नेते हे वरिष्ठ असल्याने राज्यमंत्रीपद देण्यात देखील महायुतीला अडचणी आल्या. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्रिमंडळात सहभाग नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळाल्यास घटक पक्ष नाराज होण्याची शक्यता कारण देशात 1 सदस्य निवडून आलेले 7 पक्ष आहेत.
रोहित पवारांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय…अजित पवार गटाला मंत्रिपद मिळालं नसलं तरी ईडीच्या कारवाईतून त्यांना मुक्ती मिळालीय…त्यामुळे अजित पवार गटाला व्यक्तिगत गिफ्ट मिळालंय…अजित पवार गट आणि शिंदेंना राज्याशी काही देणंघेणं नाही…स्वत:च्या स्वार्थासाठी मंत्रिपदाची मागणी करत असून, अजित पवारांचा पक्ष येत्या काळात राहणार नाही…निवडणूक लढविण्यासाठी अजित पवार गटाकडे कमळ हाच पर्याय आहे…असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय…दरम्यान रोहित पवार सारख्या गल्लीतल्या नेत्यांनी प्रसिद्धीसाठी दिल्लीतल्या घडामोडी वर भाष्य करू नये असा फलटवार राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी म्हटलंय…
Heavy Rain Orange Alert: मुंबईसह कोकण पट्ट्यातील नागरिक गेले अनेक दिवस उकाड्याने कंटाळले होते. सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान पावसाने आज दमदार एन्ट्री केली असून तो मुसळधार कोसळण्याची शक्यता आहे. पावसाची सुरुवात होताच मुंबईसह कोकण विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईसह उपनगरात रात्री उशिरा जोरदार पाऊस झाल्याने मुंबईकरांना पावसामुळे दिलासा मिळालाय. पूर्व उपनगरात कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पावसानं हजेरी लावली तर पश्चिम उपनगरातही पाऊस कोसळला. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगावमध्ये रात्री पाऊस झाला. हवामान विभागानं पुढील 2 दिवस मुंबईत पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आलंय.
आजपासून मंगळवारपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.. या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे याठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलीये. आजपासून कोकणासह मुंबईतत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, आणि साता-या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. रायगडमध्ये पहाटे ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या लखलखाटासह जोरदार पाऊस
झालाय…रायगडमध्ये सकाळपासून आता ढगाळ वातावरण आहे…पुढील 3 ते 4 तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय..
पहिल्याच पावसात मुंबईची लाईफलाईन कोलमडलीये..तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहे.. मध्य रेल्वेच्या कल्याणहून सीएसएमटीकडे जाणा-या लोकल सेवेला याचा विशेष फटका बसतोय.. लांब पल्ल्यांच्या गाड्याही यामुळे रखडल्यात.. मध्य रेल्वे प्रमाणेच पश्चिम रेल्वेची वाहतूकही उशीरानं सुरु आहे.. एकीकडे रेल्वे सेवा कोलमडली असताना मुंबई सकाळपासून सुरु असलेल्या पावासामुळे उपनगरांत पाणी साचण्यास सुरुवात झालीये.. मुंबईतील दहिसर भागात पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक मंदावल्याचं चित्र पहायला मिळालं..
सोलापूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. मोहोळ तालुक्यातील तुफान पाऊस बरसला. तालुक्यातील पापरी गावात अक्षरशः पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. तीन महिन्यांपासून कडक उन्हामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला होता मात्र आता पावसामुळे सर्वांनाच चांगला दिलासा मिळालाय.
पुण्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय.. या पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागात पाणी साचलं.. लोहगाव, कलवड वस्ती येथून पाण्यात अडकलेल्या 3 व्यक्तींची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली.. शहरातील विविध भागात अजूनही पाणी साचलं असून अग्निशमन दालाकडून रेस्क्यू ऑपरेशन वेगानं सुरु आहे.. दर्यान काल पुण्यात अंगावर झाड कोसळून एका व्यक्तीच्या मृत्यू झाला… अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या विविध झाडं तसंच भिंत कोसळण्याच्या 79 घटना घडल्यात..
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वा-यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे एका कापड दुकानावरील टिनपत्रे हवेत उडाले रस्त्यावर वर्दळ नसल्याने कोणतीच हानी झाली नाही. बाजार समितीतील टिन पत्रेही उडाले. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने बाजार समितीच्या आवारात ठेवलेली धानाची पोती भिजली. तर काही धानाच्या पोत्यावर दोन मोठी झाडं पडल्याने मोठं नुकसान झालं.