'जीव गेला तरी माघार नाही', मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, 'या' तारखेपासून बसणार उपोषणाला

'जीव गेला तरी माघार नाही', मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, 'या' तारखेपासून बसणार उपोषणाला


Manoj Jarange patil Fast Strike : मनोज जरांगे पुन्हा एकदा 8 तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत. गेल्या आंदोलनात सरकारने सगे सोयरे कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा जरांगे आता सरकारविरोधात शड्डू ठोकत आहेत. आता जीव गेला तरी माघार नाही, असा पावित्रा मनोज जरांगे यांनी घेतला आहे. 

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची राळ उठणार आहे. मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा  उपोषणाला बसणार आहेत. आता गोळ्या घाला किंवा जेलमध्ये टाका माघार नाही, अशा पद्धतीचा निर्वाणीचा इशाराच मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. सगे सोयरेंबाबत कायदा करा, अन्यथा मराठ्यांचा रोष पत्करा, असे सांगत जरांगे यांनी थेट सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. मात्र यावेळी जरांगे पाटलांच्या पुढे अडचणींचा डोंगर आहे.  या उपोषणाला आजूबाजूच्या 3 गावांनी विरोध केला आहे. पोलिसांना पत्र लिहून आंदोलनामुळे जातीय सलोखा बिघडतो असा थेट आरोप त्यात करण्यात आला आहे. मात्र हा सरकारचा डाव आहे. आंदोलन करणारच यावर जरांगे ठाम आहे. 

अंतरवली आंदोलनाचा प्रवास

2023 पासून अंतरवलीतील हे आंदोलन पेटलंय. 29 ऑगस्ट 2023 ला आंदोलन सुरु झालं. 1 सप्टेंबरला पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यानंतर संपूर्ण राज्यात याचे थेट पडसाद उमटले. 14 सप्टेंबरला मुख्यमंत्री आले आणि उपोषण सोडवलं. त्यावेळी आरक्षणासाठी 45 दिवसाची मुदत सरकारला दिली होती. सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी 14 ऑक्टोबरला मोठी सभा घेतली. सरकारने आश्वासन न पूर्ण केल्यानं 25 ऑक्टोबरला अंतरवाली येथे दुसऱ्यांदा उपोषण 8 दिवसांचं करण्यात आले. हे उपोषण 2 नोव्हेंबर रोजी सुटलं. धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, अतुल सावे, उदय सामंत यांच्या उपस्थितीत हे उपोषण अश्वासनावर  सुटलं. 

20 जानेवारी रोजी मुंबईला आंदोलनासाठी निघाले. मात्र सरकारने पुन्हा आश्वासन दिले. नवी मुंबईत गुलाल उधळत जरांगे माघारी आले. पुन्हा सरकारने फसवल्याचा आरोप करीत 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी पर्यत अंतरवाली सराटी येथे तिसऱ्यांदा उपोषण केलं. फडणवीस यांच्यावर राग दाखवत थेट मुंबईकडे निघाले. मात्र पोलिसांनी संचारबंदी लावल्याने जरांगे याना अंतरवाली येथे माघारी फिरावं लागलं. 

मेलो तरी माघार नाही, जरांगेंचा पावित्रा

आता उद्या 8 जूनपासून जरांगे यांनी पुन्हा चौथ्यांदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आता मेलो तरी माघार नाही असा पवित्रा जरांगे यांचा आहे. यावेळी सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचा इशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीतच जरांगे फॅक्टरमुळे राज्य सरकारचं खास करुन भाजपचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक दिग्गज यामुळे पराभूत झाले आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांना सहज घेणं सरकारला परवडणारं नाही. याच जरांगे नावाच्या या कोंडीतून सरकार कसा मार्ग काढणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
 





Source link

लोकसभेत दारूण हार, महायुतीत टशन… निकालावरून नेत्यांमध्ये जुंपली

लोकसभेत दारूण हार, महायुतीत टशन… निकालावरून नेत्यांमध्ये जुंपली


Maharashtra Loksabha Result : लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाल्यानं सत्ताधारी महायुतीचे (Mahayuti) नेते सैरभैर झालेत. पराभव नेमका का झाला, महाराष्ट्रातील जनतेनं आपल्याला का नाकारलं, याचं चिंतन करण्याऐवजी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात नेते धन्यता मानतायत. नाशिकमध्ये झालेल्या पराभवाचं खापर हेमंत गोडसेंनी राष्ट्रवादी अजित पवार गटावर (NCP Ajit Pawar) फोडलंय. नाव न घेता गोडसेंनी राष्ट्रवादी आणि छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) निशाणा साधला. उमेदवारी उशिरा दिल्याचा इम्पॅक्ट पाहायाल मिळाला, विद्यमान असताना अनेक स्पर्धकांची नावं पुढे येत होती, त्यामुळे विलंब झाला आणि याचा फटका बसला असं हेमंत गोडसे यांनी म्हटलंय. तसंच भाजप, मनसे रिपाईच्या लोकांनी कामं केली. तर राष्ट्रवादीच्या काही लोकांनी केली तर काही लोकांनी कामं केली नाहीत, अता कोणी केली नाहीत हे जनतेला माहित आहे असा टोला हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचं नाव न घेता लगावला.

राष्ट्रवादीचा भाजप, सेनेवर आरोप
दुसरीकडं बारामती आणि शिरूरमधील पराभवाचं खापर राष्ट्रवादी अजित पवार गटानं भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर फोडलंय. बारामती आणि शिरूरमध्ये दोन्ही पक्षांकडून मदत झाली नाही, असा थेट आरोप अमोल मिटकरींनी केला. राज्यभरात महायुतीचे उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे प्रत्येक मित्र पक्षांनी उमेदवार निवडून आण्यासाठी एकमेकांना मदत करणे अपेक्षित होतं. मात्र भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रामाणिकपणे मदत केली. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती आणि शिरूरच्या उमेदवारांना दोन्ही पक्षाकडून मदत मिळाली नसल्याची नाराजी अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली 

कोकणातही धुमशान
हे कमी झालं म्हणून की काय, कोकणातही वेगळंच धूमशान रंगलंय. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्गातून मोठा विजय मिळवला. त्यामुळं राणे पुत्रांचा आत्मविश्वास एवढा वाढलाय की, त्यांनी राजापूर आणि उद्योगमंत्री उदय सामंतांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघांवरच दावा ठोकला. यावर राणे बंधूंनी सांभाळून बोलावं असा सूचक इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी दिलाय. नितेश राणे आणि निलेश राणे यांना काहीतरी बोलल्‍या शिवाय करमत नाही. एकतर त्‍यांना तिकीट मिळताना अडचण झाली होती. मुख्‍यमंत्रयांनी किरण सामंतांची समजूत काढली म्‍हणून त्‍यांना एवढी मते मिळाली. राणे बंधूनी सांभाळून बोलावे असा सूचक इशारा गोगावले यांनी दिलाय

भावना गवळी यांचा खळबळजनक दावा
दुसरीकडं भाजपनं केलेले सर्व्हे आणि उशिरा झालेलं जागावाटप यामुळं पराभव झाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटानं केलाय.. तर मला तिकीट न देण्यासाठी शिंदेवर दबाव टाकण्यात आला, असा खळबळजनक दावा माजी खासदार भावना गवळींनी केलाय.

भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात आपापसातच जुंपलीय.. आधीच निकालानं महायुतीचे बारा वाजवलेत. आता एकमेकांची उणीदुणी काढण्यात महायुतीचे नेते धन्यवाद मानत असतील तर विधानसभा निवडणुकीचं काही खरं नाही, असंच म्हणावं लागेल.





Source link

मान्सून महाराष्ट्रात पण संपूर्ण राज्य कधी व्यापणार, हवामान विभागाने दिली Good News!

मान्सून महाराष्ट्रात पण संपूर्ण राज्य कधी व्यापणार, हवामान विभागाने दिली Good News!


Monsoon Weather in Maharashtra: मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध ठिकाणी मान्सूनपूर्व सरी बरसल्या होत्या. मात्र, आज 6 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, मान्सून महाराष्ट्र कधी व्यापणार तसंच, शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी, याची माहितीही होसाळीकर यांनी दिली आहे. 

दुष्काळात होरपळत असलेला महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत होता तो मान्सून राज्यात दाखल झाला आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम  विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसंच, तळकोकणात प्रवेश केलेला मान्सून पुढील तीन-चार दिवसात आणखी पुढे सरकणार आहे. येत्या 15 जून पर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, अशी माहिती डॉ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. 

पेरणीची घाई करु नये

15 जूनपर्यंत जरी पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असेल तरीदेखील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये. राज्यात पाऊस बऱ्यापैकी स्थिरावल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. 

वर्ध्यात मान्सूनच्या पहिल्या पावसाला सुरुवात

वर्ध्याच्या सेलू,देवळी,समुद्रपूर,वर्धा तालुक्यात पावसाची हजेरी. मान्सूनच्या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पहिल्या पावसाने धूळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कपाशीला मदत झाली आहे.





Source link

Maharastra Politics : ना मुंडे ना महाजन, महाराष्ट्रात भाजपचं कमळ रुजवणाऱ्या पर्वाचा अस्त?

Maharastra Politics : ना मुंडे ना महाजन, महाराष्ट्रात भाजपचं कमळ रुजवणाऱ्या पर्वाचा अस्त?


BJP Maharastra Politics : राज्यात भाजपला तळागाळात आणि घराघरात पोहोचवण्याचं काम केलं ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी…  मुंडे महाजन बोलतील तो महाराष्ट्र भाजपमध्ये अंतिम शब्द होता. महाजन कधी राज्यसभेत तर कधी लोकसभेत निवडून गेले. तर गोपीनाथ मुंडे 2014 ला लोकसभेत निवडून गेले. गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती निधनानंतर त्यांची कन्या प्रीतम दोन वेळा लोकसभेवर निवडून गेल्या. मात्र 2024 मध्ये मुंडे महाजन कुटुंबातील कोणीही सदस्य संसदेत नसणार आहे.

मुंडे आणि महाजन यांच्या निधनानंतर त्यांच्या लेकींनी विजय साकारत आपले पारंपरिक मतदारसंघ राखले होते. मात्र यंदा प्रीतम मुंडे यांच्याऐवजी भाजपने बीडमधून पंकजांना उमेदवारी दिली. तिथे पंकजा मुंडेंना पराभव स्विकारावा लागला. तर पूनम महाजन यांचं तिकीट कापत भाजपने उत्तर मध्य मुंबईमधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती.

पंकजांचा पराभव झाल्याने आणि पूनम महाजनांचं तिकीट कापल्याने आता संसदेत या दोन्ही परिवारातील कोणीही नसणार आहे. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, पूनम महाजन या तिघी सख्ख्या आत्ते-मामे बहिणी एकाच वेळी संसदीय राजकारणातून दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता मुंडे महाजन पर्व संपुष्टात आलं की काय? असा सवाल विचारला जात आहे. 

जेव्हा 2014 साली देशात मोदी लाट होती, त्या काळात 33 वर्षीय पूनम महाजन यांना उत्तर मध्य मुंबईतून पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी महाजन यांनी प्रिया दत्त यांचा 1.86 लाखांनी तर नंतर 2019 च्या निवडणुकीत 1.30 लाखांनी पराभव केला. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात महाजन यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्यास त्यांच्या विजयाची शक्यता कमी वाटत असल्याने त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना पराभव स्विकारावा लागल्याने आता मुंडे आणि महाजन नाव संसदीय राजकारणातून खोडलं गेलं आहे.





Source link

'…तर कान धरुन मला काम सांगा', खासदार झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी हक्कानं दिली पहिली प्रतिक्रिया

'…तर कान धरुन मला काम सांगा', खासदार झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी हक्कानं दिली पहिली प्रतिक्रिया


MP Praniti Shinde Reaction : सोलापूर लोकसभा मतदारसंघाला पहिली महिला खासदार मिळाली आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांचा दारुण पराभव केला. प्रणिती शिंदे यांना 6 लाख 20 हजार 225 इतकी मतं मिळाली. तर राम सातपुते यांना 5 लाख 46 हजार 028 इतकी मतं मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 74 हजार 197 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. “मला अजूनही विश्वास बसत नाही की मी खासदार झाले”, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली. 

नवनियुक्त खासदार प्रणिती शिंदे यांनी विजयाचा गुलाल उधळत प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्या म्हणाल्या, “सोलापूरकर मी तुमचे उपकार कधीच विसरु शकणार नाही. सोलापूरसाठी बघितलेले स्वप्न पूर्ण करणे हे माझं कर्तव्य आहे. सोलापूरच्या 42 डिग्री तापमानात माझा कार्यकर्ता राबला. त्यामुळे मी तुमचे उपकार कधीच विसरु शकत नाही.” 

“हुकुमशाहीचा पराभव झाला”

“निवडणुकांच्या काळात थोडा राग येतो, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागते. पण आता यानंतर मात्र मी माझा स्वभाव सुधारण्याचा प्रयत्न करेन. शिंदे साहेबांनी मला छडी दिली आहे. ते म्हणत होते उमेदवाराला नाहीतर मोदींना मत द्या. सोलापूरला भाजपकडून जातीपातीची कीड लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात हुकुमशाहीचा पराभव झाला”, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले.  

“महाविकासआघाडीतील सर्वच पक्षाने एकमेकांना साथ दिली आणि त्याचा निकाल आला. 400 पार वाल्यांनी हे पाहावं की ही आमची ताकद आहे. मी काम करण्यासाठी कमी पडणार नाही, पण जर कमी पडत असेन तर कान धरुन मला काम सांगायचं”, असेही प्रणिती शिंदेंनी म्हटले. 

चला पुन्हा एकदा कामाला लागू या

जितना बडा संघर्ष उतनी शानदार जीत, असं मला नेहमीच वाटतं. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ मतदारसंघातील नागरिकांचे खूप खूप आभार. मी माझा हा विजय शिंदे साहेबांच्या संघर्षाला अर्पित करते. तसेच सर्वांचे आभार मानते आणि सर्वांना सांगते की चला पुन्हा एकदा कामाला लागू या, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

पहिल्या महिला खासदार

दरम्यान सोलापूर लोकसभा मतदार संघात सुशीलकुमार शिंदे यांना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. तर 2004 साली प्रणिती शिंदेंच्या आई उज्वला शिंदेंचा पराभव झाला होता. आता प्रणिती शिंदे यांनी भाजपचा पराभव करत वडिलांच्या पराभवाचा वाचपा काढला आहे. तसेच 1951 पासून सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकही महिला खासदार नव्हता. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून म्हणजे 14 वेळा खासदार झाले होते, पण त्यामध्ये एकही महिला खासदार नव्हत्या. पण 2024 च्या निवडणुकीत सोलापूरकारांनी प्रणिती शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत इतिहास रचला आहे. 





Source link

Vishal Patil : चहुबाजूंनी घेरलं, स्वपक्षानंही सोडलं; पण पठ्ठ्यानं शड्डू ठोकला अन् वसंतदादांचा नातू शोभला

Vishal Patil : चहुबाजूंनी घेरलं, स्वपक्षानंही सोडलं; पण पठ्ठ्यानं शड्डू ठोकला अन् वसंतदादांचा नातू शोभला



Sangli LokSabha Result 2024 : काँग्रेससाठी सांगलीची लढत अस्तित्वाची होती अन् काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक लढलीही तशीच… विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या विजयाची स्टोरी नेमकी कशी होती? वाचा



Source link

YouTube
Instagram
WhatsApp