by Hansraj Agrawal | Feb 1, 2024 | Trending News
मुंबईत मिलिंद देवरांपाठोपाठ काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे. झिशान सिद्धीकी, बाबा सिद्धीकी पितापुत्र अजित पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 1, 2024 | Trending News
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल आणि गर्दी यांचे समीकरण तर तुम्हाला माहीती असेलच. ट्रेन दोन ते तीन मिनिटे उशीरा असली तरी वेळेचे पूर्ण गणित चुकते. गेल्या काही दिवसांपासून बदलापूरकरांना मनस्ताप सहन करावा लागतोय. एक नंबर प्लॅटफॉर्मवर नियोजित जागेपेक्षा पुढे थांबत असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत होता. मात्र, आता रेल्वे प्रशासनाने थेट प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंदच करण्यात आला आहे. नव्या होणाऱ्या पुलासाठी फलाट क्रमांक एक प्रवासासाठी बंद करणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळं रेल्वे प्रवासी मात्र संतप्त झाले आहेत. (Mumbai Local Train)
बदलापूरच्या प्रवाशांसाठी रेल्वेने होम प्लॅटफॉर्मचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मात्र, या होम प्लॅटफॉर्मचे कामही संथ गतीने सुरू आहे. एक नंबरचा प्लॅटफॉर्म बंद केल्यामुळं आता मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल गाठण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
बदलापुर रेल्वे स्थानकात सध्या मोठ्या प्रमाणात काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेने मुंबईच्या दिशेने असलेल्या टोकाकडून ते अगदी कर्जतच्या दिशेकडील शेवटच्या टोकापर्यंत बारा मीटर लांबीच्या मोठ्या पुलाचे काम हाती घेतलं आहे. पुलावर अत्याधुनिक सोयी सुविधाही करण्यात येणार आहे.
पुल उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या पिलरसाठी फलाट क्रमांक एक व दोनवरील जागा अपुरी पडत आहे. त्यासाठीच रेल्वे प्रशासनाने एक नंबर फलाट पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, पुढील आठवड्यातच त्या ठिकाणी पोलादी कुंपण घालण्याचे काम सुरू करणार आहेत. त्यामुळं येत्या सात दिवसांत रेल्वे प्लॅटफॉर्म बंद होणार आहे.
लोकल पकडण्यासाठी एकाच फलाटावरती खूप गर्दी होते. त्यामुळं होम प्लॅटफॉर्म झाल्यामुळं ही गर्दी विभागली जाईल, अशी आशा बदलापुरकरांना होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळं बदलापूरकर संतप्त झाले आहेत. मध्य रेल्वे विभाग मुंबई कार्यालयातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळं आता प्रवाशांना होम प्लॅटफॉर्मवरुनच लोकल पकडावी लागणारी आहे. पण अर्धवट अवस्थेत असलेली कामे आणि प्लॅटफॉर्मची अपुरी जागा यामुळं प्रवाशांची मोठी गर्दी या प्लॅटफॉर्मवर होण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळेत तर प्रवाशांची गर्दी खूप असते. अशावेळी गर्दीमुळं काही अनुचित प्रकार घडू नये, अशी भीती प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 31, 2024 | Trending News
महाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे. 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 31, 2024 | Trending News
Chhagan Bhujbal challenge to Manoj Jarange: राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. यादरम्यान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा पुकारणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जाहीर आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाविरोधात आवाज उठवावा. त्यांच्याविरोधात कारवाई करावी, त्यांना संपवून दाखवावं असं ते जाहीरपणे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
“मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असं आमचं म्हणणं होतं. पण झुंडशाहीपुढे नमतं घेण्यात येत आहे. मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्राचे लाखो दाखले देण्याचं काम सुरु आहे. सगेसोयरे वैगरे मागण्यामुळे ओबीसी, भटक्या विमुक्त यांचं आरक्षण धोक्यात येत असताना आमच्यापुढे पर्याय नाही. अशा परिस्थितीत आमच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही. त्यामुळे आमदार-खासदारांसमोर आमची कैफियत मांडणे, न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे, लोकांमध्ये जनजागृती करणे, आक्रोश व्यक्त करणे, असे मार्ग आमच्यासमोर उरले आहेत. लोकशाहीने जे काही अधिकार दिले आहेत ती आयुधं वापरणार आहोत,” असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
छगन भुजबळ यांनी यावेळी मनोज जरांगेंना जाहीर आव्हान दिलं. तसंच भारतात त्यांच्याइतका मोठा ज्ञानी नाही असा टोलाही लगावला. “मनोज जरांगे यांच्याइतका ज्ञानी भारतात दुसरं कोणी नाही. ते तीन कोटी मराठा बांधव मुंबईत आणणार होते. पण नवी मुंबईत सर्वांनीच पाहिले किती लोक होते. त्यांना लाखात, कोटीत फरक कळत नाही. मंडल आयोगाला त्यांना विरोध करायचा असेल तर त्यांनी जरूर करावा आणि मंडल आयोगाला संपविण्याचे काम करून दाखवावं. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“ते मराठा जातीसाठी लढत आहेत, मी तर संपूर्ण समाजासाठी लढत आहे. मी सगळ्या ओबीसींसाठी लढतोय. मंत्रिमंडळ बैठकीत मी याबद्दल आक्षेप घेतला, पण मंत्रिमंडळाची बैठक अजेंड्यावर चालत असते. त्या अजेंड्यावर हा विषय नव्हता,” अशी माहिती छगन भुजबळांनी दिली.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 30, 2024 | Trending News
रत्नागिरीतील थिबा पॅलेस हा थिबा राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधला होता. हा राजवाडा अतिशय सुंदर आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 30, 2024 | Trending News
Crime News Today: पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचीच हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. अत्यंत निर्घृणपणे पत्नीने हत्येचा कट रचला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Source link